::: नि का ल प त्र :::
(आयोगाचे निर्णयान्वये, सौ. कल्पना जांगडे (कुटे), मा. सदस्या,)
(पारीत दिनांक ३०/०८/२०२२)
१. प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा २०१९ चे कलम ३५ अन्वये दाखल केलेली असून तक्रारीचा आशय खालिल प्रमाणेः-
२. तक्रारकर्त्याने, विरुध्दपक्षांचेकडे त्यांनी काढलेल्या योजनेअंतर्गत दिनांक २८/११/२०१३ रोजी रुपये १,००,०००/- जमा केले होते. त्याबाबत विरुध्दपक्षांनी तक्रारकर्त्यास प्रमाणपत्र दिले त्याचा क्रमांक ४४ आहे. प्रमाणपत्रानुसार तक्रारकर्त्याने जमा केलेल्या रक्कमेवर विरुध्दपक्ष हे प्रतिवर्ष १८% दराने व्याज देणार होते. विरुध्दपक्ष हे तक्रारकर्त्यास रक्कम जमा केल्यापासून पाच वर्षात मुळ रक्कम परत देणार होते व उर्वरीत व्याजाची रक्कम मुळ रक्कम परत केल्यापासून एक वर्षात परत देणार होते. परंतू विरुध्दपक्ष यांनी ठरल्याप्रमाणे प्रमाणपत्रानुसार मुळ रक्कम व्याजासह परत दिली नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने दिनांक ०४/१२/२०१९ रोजी विरुध्दपक्षांकडे उपरोक्त रक्कमेची मागणी केली. त्यावेळी विरुध्दपक्षांनी तक्रारकर्त्यास त्याला देय असलेल्या रक्कमेची उचल करण्याकरीता पत्र पाठविणार असे सांगितले, परंतू विरुध्दपक्षांचे कडून उपरोक्त रक्कम उचलण्याकरीता तक्रारकर्त्यास कोणतेही पत्र मिळाले नाही. त्यामूळे तक्रारकर्त्याने दिनांक १३/१०/२०२१ रोजी अधिवक्ता श्री. प्रितम पी. नागपूरे यांचे मार्फत विरुध्दपक्षांना नोटीस पाठवून त्यामध्ये उपरोक्त रक्कमेची व्याजासह मागणी केली. परंतू विरुध्दपक्षांनी नोटीसला कोणतेही उत्तर दिले नाही तसेच नोटीसची पुर्तता ही केली नाही. विरुध्दपक्षांनी तक्रारकर्त्यास रक्कम न देवून सेवेत न्युनता केली आहे त्यामुळे तक्रारकर्त्यास शारीरिक व मानसिक त्रास झालेला आहे. सबब तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षांचे विरुध्द आयोगासमोर प्रस्तूत तक्रार दाखल करुन त्यामध्ये अशी मागणी केली आहे की, विरुध्दपक्ष क्रमांक १ व २ यांनी तक्रारकर्त्यास दिलेले प्रमाणपत्र क्रमांक ४४ नुसार त्यांचेकडे जमा केलेली रक्कम रुपये १,००,०००/ व त्यावर दिनांक २८/११/२०१३ पासून १८% व्याजदराने तक्रारकर्त्यास वैयक्तीक वा संयुक्तीकरित्या दयावी. तसेच शारीरिक व मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई रक्कम रुपये १,००,०००/- व तक्रारीच्या खर्चापोटी रुपये १५,०००/- विरुध्दपक्षांनी तक्रारकर्त्यास वैयक्तीक वा संयुक्तीकरित्या दयावी.
३. तक्रारकर्त्याची तक्रार स्वीकृत करुन विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ यांना आयोगामार्फत नोटीस पाठविली असता सदर नोटीस आयोगामध्ये परत आली व त्यावर इंटीमेशन/सुचना असा शेरा पोष्ट ऑफिसने दिला असल्याने इंटीमेशन/सुचना म्हणजे त्यांना नोटीस प्राप्त झाली. त्यामुळे दिनांक २१/०४/२०२१ रोजी विरुध्दपक्ष क्रमांक १ व २ यांचेविरुध्द प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश निशानी क्रमांक १ वर पारीत करण्यात आला.
४. तक्रारकर्त्याने दाखल केलेली तक्रार, दस्तावेज तसेच तक्रारीतील मजकूराला तक्रारकर्त्याचे शपथपञ समजण्यात यावे अशी पुरसीस दाखल आणि तक्रारकर्त्याचा तोंडी युक्तिवाद यावरुन खालिल मुद्दे आयोगाच्या विचारार्थ घेण्यात आले व त्याबाबतची कारणमीमांसा आणि निष्कर्ष पुढीलप्रमाणे.
अ.क्र. मुद्दे निष्कर्षे
१. तक्रारकर्ता हे विरुध्द पक्ष क्र. १ व २ यांचे होय
ग्राहक आहेत काय ॽ
२. विरुध्द पक्ष क्र. १ व २ यांनी तक्रारकर्त्याप्रति होय
न्युनतापूर्ण सेवा दिली आहे काय ॽ
३. आदेश काय ॽ अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
मुद्दा क्रमांक १ बाबतः-
५. तक्रारकर्ता यांनी दिनांक २८/११/२०१३ रोजी विरुध्दपक्ष क्रमांक १ व २ यांचेकडे त्यांनी काढलेल्या लॉर्ड बुध्दा टेलीव्हीजन लिमी. च्या योजनेअंतर्गत रुपये १,००,०००/- जमा केले. त्याबाबत विरुध्दपक्ष क्रमांक १ व २ यांनी तक्रारकर्त्यास पावती / प्रमाणपत्र क्रमांक ४४ दिलेले आहे. सदर प्रमाणपत्र तक्रारकर्त्याने प्रकरणात निशानी ४ सह दस्तऐवज क्रमांक अ-१ वर दाखल केलेले आहे यावरुन तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष क्रमांक १ व २ यांचा ग्राहक आहे हे सिध्द होते. सबब मुद्दा क्रमांक १ चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रमांक २ बाबतः-
६ तक्रार व त्यामधील दाखल दस्तऐवजांचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, तक्रारकर्ता यांनी दाखल केलेल्या प्रमाणपत्रानुसार तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षांचे कडे उपरोक्त योजनेअंतर्गत रुपये १,००,०००/ जमा केलेले आहे हे स्पष्ट होते व त्या पावतीवर विरुध्दपक्ष क्रमांक १ व २ यांची व्यवस्थापकीय संचालक म्हणून स्वाक्षरी आहे. तक्रारकर्ता यांनी दाखल केलेले प्रमाणपत्र क्रमांक ४४ चे मागील बाजूस दिलेल्या अटी नुसार मुळ रक्कम ही पाच वर्षाकरीता जमा राहील व त्या मूळ रक्कमेवर द.सा.द.शे. १८% दराने व्याज दिले जाईल. पाचव्या वर्षानंतर तक्रारकर्त्यास फक्त मुळ रक्कम परत दिल्या जाईल व बाकी रक्कम ही त्यानंतर एक वर्षानंतर दिल्या जाईल असे नमूद आहे. तक्रारकर्ता यांनी दिनांक २८/११/२०१३ मध्ये उपरोक्त रक्कम जमा केली. पाच वर्षानंतर विरुध्दपक्षांनी पावती नुसार तक्रारकर्त्यास मूळ रक्कम परत दिली नाही. तसेच त्यानंतर त्या मुळ रक्कमेवरील व्याज सुध्दा दिले नाही. त्यामुळे तक्रारकर्ता यांनी दिनांक ०४/१२/२०१९ रोजी विरुध्दपक्षांकडून घेणेअसलेल्या रक्कमेची मागणी केली तेव्हा त्यांनी देय असलेल्या रक्कमेची उचल करण्याकरीता लेखी पत्र पाठविणार असे सांगीतले परंतू तक्रारकर्त्यास विरुध्दपक्षांकडून असे कोणतेही पत्र प्राप्त झाले नाही. त्यानंतर तक्रारकर्त्याने दिनांक् १३/१०/२०२१ रोजी अधिवक्त्यामार्फत नोटीस पाठविली. विरुध्दपक्ष क्रमांक १ व २ यांनी तक्रारकर्त्यास प्रमाणपत्रावरील अटीनुसार मुळ रक्कम रुपये १,००,०००/- पाच वर्षानंतर म्हणजे परीपक्वता कालावधी नंतर रक्कम परत केली नाही असे करुन विरुध्दपक्षांनी तक्रारकर्त्याप्रती न्युनतापुर्ण सेवा दिलेली आहे हे दाखल दस्ताऐवजावरुन सिध्द होते या निष्कर्षाप्रत आयोग आलेले आहे. त्यामुळे तक्रारकर्ता हे पावती/प्रमाणपत्रनुसार मुळ रक्कम रुपये १,००,०००/- व्याजसह तसेच झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई व तक्रारीचा खर्च विरुध्दपक्षांचे कडून मिळण्यास पात्र आहे सबब मुद्दा क्रमांक २ चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रमांक ३ बाबतः-
७. मुद्दा क्रमांक १ व २ च्या विवेंचनावरुन आयोग खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
अंतिम आदेश
१. तक्रारकर्त्याची तक्रार क्र. २००/२०२१ अंशतः मंजूर करण्यात येते.
२. विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ यांनी वैयक्तिक वा संयुक्तरित्या तक्रारकर्त्याला पावती क्रमांक ४४ नुसार मुळ रक्कम रुपये १,००,०००/- व त्यावर तक्रार दाखल दिनांक २८/१०/२०२१ पासून प्रत्यक्ष अदा होईपर्यत द.सा.द.शे ९% दराने तक्रारकर्त्यास व्याज द्यावे.
३. विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ यांनी वैयक्तिक वा संयुक्तरित्या तक्रारकर्त्याला शारीरिक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई रक्कम रुपये २०,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये १०,०००/- द्यावे.
४. उभयपक्षांना आदेशाच्या प्रती विनामुल्य देण्यात यावेत.