श्री. एस.के.कापसे, मा. सदस्य यांचेनुसार
:- निकालपत्र :-
दिनांक 30 नोव्हेंबर 2011
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे-
1. तक्रारदार नौरोसजी वाडीस कॉलेज मध्ये गणित विषयाचे रिडर असून लेक्चरसाठी ब-याच वेळ उभे रहावे लागते, त्यामुळे पाठदुखी, गुडघेदुखी, वजन जास्त असणे, ओस्टेओपेनिया व्याधी या समस्यांमुळे ग्रस्त होत्या. जाबदेणार यांच्याकडे सुपर प्रिमीअर कॅटगिरी ट्रेनर्स होते. तक्रारदार जाबदेणार यांच्याकडे जिमनॅशिअमसाठी सात वर्षापासून जात आहेत. जाबदेणार यांनी श्री. अमित, ट्रेनर यांचे नाव सांगून श्री. अमित यांच्याबरोबर एक ट्रायल पूर्ण केल्यावर तक्रारदारांनी एक वर्षाचा OPT कोर्स 28/8/2009 ते 27/8/2010 कालावधीकरिता श्री. अमित, ट्रेनर यांच्याकडून पूर्ण करण्यासाठी जाबदेणार यांच्याकडे दिनांक 28/5/2009 रोजी रुपये 51,000/- भरले. ट्रेनिंग सुरु झाल्यानंतर श्री. अमित आठवडयातून एकदा तरी गैरहजर असत. त्याव्यतिरिक्त दिनांक 14/9/2009 व 2/10/2009 रोजी श्री. अमित गैरहजर होते. जाबदेणार यांना सांगूनही उपयोग झाला नाही. ट्रेनर यांचे काम जिमनॅशिअमसाठी प्रथम प्रोत्साहन देऊन ऑप्टीमम लेव्हल पर्यन्त करुन घ्यावयाचे होते. श्री. अमित यांनी नियमितपणे ट्रेनिंग घेतले नाही, त्यामुळे तक्रारदारांची पाठदुखी, गुडघेदुखी वाढली, वजन वाढले, तसेच वेळही वाया गेला. म्हणून तक्रारदारांनी दिनांक 5/10/2009 रोजी जाबदेणार यांना नोटीस पाठविली. परंतू उपयोग झाला. म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून रक्कम रुपये 51,000/- परत मागतात, नुकसान भरपाई पोटी रुपये 25,000/- व इतर दिलासा मागतात. तक्रारदारांनी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
2. जाबदेणार यांनी लेखी जबाब दाखल करुन तक्रारदारांच्या मागणीस विरोध दर्शविला. जाबदेणार यांची मुळ कल्पना फिजीकल फिटनेस असून तक्रारदार यांनी जाबदेणार यांच्याकडे शारिरीक कसरती [physical exercises] साठीचे सदस्यत्व घेतले होते. जाबदेणार यांच्याकडे ट्रेनर म्हणून कार्यरत असलेल्या व्यक्ती त्या त्या क्षेत्रातील तज्ञ असतात. तक्रारदार गेल्या पाच वर्षांपासून जाबदेणार यांच्याकडील सुविधा व उपकरणे यांचा लाभ घेत आहेत. तक्रारदार यांनी सुपर प्रिमीअम कॅटेगिरीतील ट्रेनींग घ्यावयाचे स्वत:च नक्की केले होते. श्री. अमित यांना ट्रेनर म्हणून डेसिग्नेटेड केलेले नव्हते. तक्रारदारांना जिमनॅशिअम साठी प्रोत्साहन देऊन ऑप्टीमम लेव्हलपर्यन्त करुन व्यायाम/कसरती करुन घेण्याचे काम ट्रेनरचे नव्हते. तर ट्रेनरनी सांगितल्याप्रमाणे व्यायाम/कसरती करण्याचे काम तक्रारदारांचे होते. ट्रेनर नियमितपणे येत नव्हते हे जाबदेणार यांना मान्य नाही तसेच तक्रारदारांनी कधीच दुस-या ट्रेनरची मागणी केली नाही. तक्रारदारांनी प्रोग्रॅम पूर्ण करुन परत त्याच ट्रेनर कडून व्यायाम/कसरती साठी ट्रेनिंग मिळावे म्हणून नाव नोंदविले होते. तक्रारदारांच्या वजनाच्या संदर्भात जाबदेणार यांनी कधीच आश्वासन दिले नव्हते. तसेच पाठदुखी व गुडघेदुखी पूर्णत: रिलीफ मिळेल असेही कधीच सांगितले नव्हते. नियम क्र.11 नुसार आरोग्य उत्तम राहण्यासंदर्भातील सुविधा जाबदेणार पुरवितात, सेवा देत नाहीत. जाबदेणार यांच्या सेवेत त्रुटी नाही. म्हणून तक्रार नामंजुर करावी अशी विनंती जाबदेणार करतात. जाबदेणार यांनी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
3. तक्रारदारांनी रिजॉईंडर दाखल करुन लेखी जबाब नाकारला. उभय पक्षकारांनी लेखी युक्तीवाद दाखल केला.
4. उभय पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचानी पाहणी केली. जाबदेणार यांनी दाखल केलेल्या श्री. अमित पायगुडे, कोड 45, डिपार्टमेंट- जिम स्टाफ यांच्या हजेरीपत्रकाचे अवलोकन केले असता दिनांक 14/9/2009 रोजी व दिनांक 2/10/2010 रोजी ते shift 2 मध्ये हजर असल्याचे दिसून येते. त्यामुळे तक्रारदारांची तक्रार श्री. अमित उपरोक्त दोन दिवस नव्हते ही तक्रार अमान्य करण्यात येते. ट्रेनर यांनी जिमनॅशिअमसाठी मोटिव्हेट करुन ते ऑप्टीमम लेव्हलपर्यन्त व्यायाम/कसरती पूर्ण करुन घ्यावयाचे होते, ते त्यांना नेमून दिलेले काम होते, या संदर्भातील पुरावा दाखल केलेला नाही. तसेच तक्रारदारांच्या गुडघेदुखी, पाठदुखी व अतिरिक्त वजन या व्याधींपासून त्यांना मुक्तता मिळेल असे जाबदेणार यांनी आश्वासन दिल्यासंदर्भातही कागदोपत्री पुरावा तक्रारदारांनी दाखल केलेला नाही. त्यामुळे यासंदर्भातील तक्रारदारांच्या तक्रारी अमान्य करण्यात येत आहेत.
जाबदेणार यांनी दाखल केलेल्या पावतीचे अवलोकन केले असता तक्रारदार यांनी जाबदेणार यांच्याकडे दिनांक 30/5/2009 रोजी रुपये 51,000/- भरुन दिनांक 28/8/2009 ते 27/8/2010 या कालावधीकरिता कोर्स/ट्रेनिंगसाठी प्रवेश घेतल्याचे दिसून येते. जाबदेणार यांनी दाखल केलेल्या नियमांचे अवलोकन केले असता त्यातील नियम क्र. “3. Fees once paid will not be refunded under any circumstances आणि नियम 11. Talwalkars provides facility for keeping your good health and does not provide service.” असे नमूद करण्यात आलेले आहे. “I have read the Rules, I accept and I will abide them. ”हे वाचून तक्रारदारांनी सही केल्याचे निदर्शनास येते. म्हणजेच उभय पक्षकारात करार झाला होता. तो करार/नियम तक्रारदारांना मान्य आहेत. तो करार/नियम उभय पक्षकारांवर बंधनकारक आहे. तक्रारदारांनी भरलेली रक्कम रुपये 51,000/- नॉन रिफंडेबल असल्यामुळे तक्रारदारांची रक्कम रुपये 51,000/- परत मिळण्याची तक्रारदारांची मागणी नामंजुर करण्यात येत आहे.
वर नमूद केलेल्या विवेचनावरुन व दाखल कागदपत्रांवरुन खालीलप्रमाणे आदेश देण्यात येत आहे-
:- आदेश :-
1. तक्रार नामंजुर करण्यात येत आहे.
2. खर्चाबद्यल आदेश नाही.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.