Maharashtra

Kolhapur

CC/13/260

Ashitosh Anil Kale - Complainant(s)

Versus

Levi's Core Store, Chintamani's Garments (Unit 2) - Opp.Party(s)

23 Mar 2015

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, KOLHAPUR
Central Administrative Building, Second Floor,
South Side, Kasaba Bawada Road, Kolhapur.
Phone No. (0231) 2651327, Fax No. (0231) 2651327
.
 
Complaint Case No. CC/13/260
 
1. Ashitosh Anil Kale
Plot No.20/164, Shashtrinagar, Kolhapur
Kolhapur
...........Complainant(s)
Versus
1. Levi's Core Store, Chintamani's Garments (Unit 2)
Ram-Janai Complex, Shop No.5/6, Rajarampuri 4th Lane, Main Road, Kolhapur.
Kolhapur
2. Levi's Stars India Pvt.Ltd.,
4th Floor, Raheja Plaza, 17/1-1, Commustraight Road, Banglore
Karnataka
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. Sanjay P. Borwal PRESIDENT
 HON'ABLE MR. Dinesh S. Gavali MEMBER
 HON'ABLE MRS. Rupali D. Ghatage MEMBER
 
For the Complainant:
Adv.Pooja Katake
 
For the Opp. Party:
Adv.S.B. Gukalkar & Adv.A.S.Jadhav O.P. No.1
 
ORDER

    

 निकालपत्र :- (दि. 23-03-2015)(द्वारा-श्री. संजय पी. बोरवाल, अध्‍यक्ष)

       प्रस्‍तुतची तक्रार  तक्रारदारांनी ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 कलम 12 अन्‍वये लिव्‍हाईस कोअर स्‍टोअर्स यांचेकडून खरेदी केलेली टी शर्टची नुकसानभरपाई मिळण्‍यासाठी दाखल केलेली आहे.

1)    प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन वि.प. यांचेविरुध्‍द नोटीसचा आदेश झाला.  वि.प. नं. 2 यांना नोटीस लागू होऊन हजर होऊन म्‍हणणे दाखल केले नाही.  त्‍यामुळे वि.प.क्र. 2 विरुध्‍द दि. 19-04-2014 रोजी ‘एकतर्फा’ आदेश पारीत केले.  वि.प. न. 1 यांनी लेखी म्‍हणणे दाखल केले.  तक्रारदार तर्फे लेखी युक्‍तीवाद दाखल.  वि. प.  नं. 1 हजर युक्‍तीवाद केला.    

2)    तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी की,

      तक्रारदार हे कोल्‍हापूर शहरातील रहिवाशी आहेत. तसेच वि.प. नं. 2 हे भारतातील ब्रँण्‍डेड कपडयाचे वितरक असून वि.प. नं. 1 चिंतामणीज गारमेंटस हे कोल्‍हापूरातील वि.प. नं. 2 कंपनीचे विक्रेते आहेत.  तक्रारदारांनी दि. 4-04-2013 रोजी वि.प. नं. 1 कडुन लिव्‍हाईस कंपनीचा 1 टी शर्ट स्‍टाईल नं. 94400-0010 साईज XL रक्‍कम रु. 1,299/- देऊन कॅश मेमो नं. 16 ने खरेदी केला होता. तक्रारदारांनी टी शर्ट वापरलेनंतर धुतला व प्रथम धुलाईनंतरच टी शर्ट ढिला पडून खराब झाला आहे.  तक्रारदारांनी टी शर्टची हमी दिलेली असल्‍यामुळे वि.प. कडे बदलून मागितला असता वि.प. यांनी टी शर्ट धुलाई नियमांचे पालन न करता धुतलेचे खोटे कारण सांगून खराब टी शर्ट बदलून देणेस वि.प. यांनी नकार दिला.  तक्रारदारांनी टी शर्ट धुलाई नियमांचे पालन करुनच धुतला तरीदेखील टी शर्ट ढिला पडला.   तक्रारदारांनी टी शर्ट बदलणेसाठी दि. 10-06-2013 रोजी वि.प. कडे गेले असता टी शर्ट ठेवून घेतला व त्‍यानंतर तक्रारदारांनी धुलाई नियमांचे पालन न करता टी शर्ट खराब झालेचे खोटे आशयाचे पत्र तक्रारदारांना दिले.  वि.प. हे ब्रँडेड कंपनीचे तयार कपडे विकणेचे व्‍यवसाय करतात.  वि.प. नं. 1 यांनी तक्रारदारांना टी शर्ट खरेदीचे बिल दिले.  सदर बिलावर कस्‍टमर सर्व्‍हीस पॉलिसी मध्‍ये जर खरेदी केलेला प्रॉडक्‍ट काही कारणास्‍तव खराब झाला अथवा खराब निघाला तर तो खरेदी तारखेपासून तीन महिन्‍यात बदलून मिळेल असा स्‍पष्‍ट उल्‍लेख असतानाही वि.प. यांनी तक्रारदारांना खराब टी शर्ट बदलून न देऊन तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत देणेत कसूर केली आहे.  सबब, वि.प. क्र.1 यांचेकडून खरेदी केलेल्‍या लिव्‍हाईस टी शर्टची किंमत रक्‍कम रु. 1,299/- परत मिळावेत व तक्रार खर्च रु. 2,000/- व मानसिक व आर्थिक त्रासाबद्दल रक्‍कम रु. 10,000/- मिळावेत म्‍हणून तक्रारदारांनी तक्रार अर्जात विनंती मंचास केली आहे.                    

3)    तक्रारदारांनी तक्रारीसोबत एकूण 3 कागदपत्रे दाखल केली आहेत.   अ.क्र. 1 कडे तक्रारदारांनी कॅश मेमो क्र. 16 वि.प. कडून खरेदी केलेल्‍या टी शर्टचे बिल दि. 4-04-2013, अ.क्र. 2 कडे लिव्‍हाईस कोअर स्‍टोअर वि.प. क्र. 2 यांनी तक्रारदारांना दिलेले पत्र, अ.क्र. 3 कडे तक्रारदाराचे ओळखपत्र दाखल केलेले आहे. व तक्रारीसोबत तक्रारदारांनी शपथपत्र दाखल केले आहे.  

4)  वि.प. नं. 1 यांनी तक्रारीस म्‍हणणे दाखल करुन तक्रारदाराची तक्रार परिच्‍छेदनिहाय नाकारली आहे.  तक्रारदार यांनी वि.प. कडून लिव्‍हाईस कंपनीचा 1 टी शर्ट खरेदी केला हे मान्‍य असून टी शर्ट प्रथम धुलाईनंतरच ढिला पडला व खराब झाला हे चुकीचे व लबाडीचे आहे.   वि.प. हे नामंकित कंपनीचे गारमेंट वितरक असून प्रत्‍येक गारमेंट हे उच्‍च प्रतीचे व चांगल्‍या कच्‍च्‍या मालापासून तयार केलेले असतात, त्‍यामुळे प्रथम धुलाईतच गारमेंट खराब होणेचा प्रश्‍नच उद्दभवत नाही.  तक्रारदारांनी वि.प. यांचेकडून खरेदी केलेला टी शर्ट वि.प. कंपनीने धुलाई नियमांचे पालन न करता धुतला गेलेमुळे खराब झालेला आहे.  त्‍यामुळे टी शर्ट बदलून देणेचा प्रश्‍नच उद्दभवत नाही.  वि.प. हे त्‍यांचेकडून  विकत घेतलेला गारमेंटची विकलेल्‍या तारखेपासून 3 महिन्‍यांचे आत अदलाबदल करतात.  तक्रारदारांनी वि.प. कडून खरेदी केलेला गारमेंट हा तीन महिन्‍यानंतर वि.प. यांचेकडून बदलून मागितला आहे, त्‍यामुळे वि. प. यांनी दिले नाहीत.  तक्रारदार हे वि.प. यांचे पुर्वीचे ग्राहक आहेत.  तक्रारदार यांनी यापुर्वी वि.प. कडून खरेदी केलेले गारमेंट तक्रारदारांना बदलून घेऊन गेले आहेत.  तक्रारदारांचे चुकीचे कृत्‍यामुळे गारमेंट धुलाई केलेमुळे खराब झाले आहे. प्रस्‍तुत वि. प. यांना मुळ वितरक वि.प. नं. 2 कडून गारमेंट बदलून न मिळालेमुळे तक्रारदार यांना गारमेंट बदलून देता आलेले नाही.  तथापि, तक्रारदार हे वि.प. यांना धमकावून जबरदस्‍तीने गारमेंट बदलून घेणेच्‍या प्रयत्‍नात आहेत.  वि.प. यांनी वाद होऊन नयेत म्‍हणून तक्रारदार यांना यापुर्वी गारमेंट बदलून दिलेले आहेत.   तक्रारदार यांचे चुकीचे कृत्‍यामुळे गारमेंट खराब झालेने गारमेंट बदलून देणेची जबाबदारी वि.प. नं. 1 यांची नाही.  वि. प. नं. 1 हे वि.प. नं. 2 कंपनीचे वितरक आहेत.  वि.प. नं. 2 यांनी गारमेंट तयार केलेले आहे.  तक्रारदारांचे तक्रारीस कोणतेही कारण घडलेले नाही. वि.प. यांनी तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत कसूर केलेली नाही.  सबब, तक्रारदारांचा तक्रार अर्ज खर्चासह नामंजूर करणेत यावा अशी विनंती वि.प. यांनी केली आहे.           

5)    तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्रे, शपथपत्र व उभय पक्षकारांचे वकिलांचे युक्‍तीवाद, वि.प. यांचे म्‍हणणे यांचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्‍वाचे मुद्दे निष्‍कर्षासाठी मंचापुढे उपस्थित होतात.

              मुद्दे                                                               उत्‍तर

 

 1.  वि.प. यांनी तक्रारदारांना द्यावयाच्‍या सेवेत त्रुटी

ठेवेली आहे काय ?                                                         होय

2.   तक्रारदार कोणता अनुतोष/नुकसानभरपाई

मिळणेस पात्र आहेत ?                                                     होय    

3.    काय आदेश ?                                                          अंतिम आदेशाप्रमाणे. 

               

                          वि वे च न

मुद्दा क्र. 1:   

     तक्रारदार यांनी वि.प. नं. 1 यांचे चिंतामणीज गारमेंटस येथून दि. 4-04-2013 रोजी लिव्‍हाईस कंपनीचा 1 टी शर्ट स्‍टाईल नं.94400-0010 साईज XL रक्‍कम रु. 1,299/- कॅश मेमो नं. 16 सह खरेदी केला आहे.  तक्रारदारांनी या कामी अ.क्र. 1 कडे खरेदी केलेल्‍या बिलाची प्रत दाखल केली आहे यावरुन असे दिसून येते की तक्रारदार हे  वि. प. यांचे ग्राहक आहेत. सदरचा टी शर्ट तक्रारदारांनी घेतल्‍यानंतर सुमारे दोन महिन्‍यानंतर सदरचा टी शर्ट प्रथम धुलाईनंतर टी शर्ट ढिला पडला व खराब झाला.  तक्रारदारांनी टी शर्ट धुलाई नियमांचे पालन करुनच धुतला असताना टी शर्ट ढिला पडला, त्‍यामुळे तक्रारदार हे टी शर्ट बदलणेसाठी दि. 10-06-2013 रोजी वि.प. यांचे दुकानात गेले असताना टी शर्ट ठेवून घेतला. परंतु बदलून दिला नाही. वि.प. यांनी त्‍यांचे म्‍हणणे विकत दिलेल्‍या गारमेंटची आदलाबदल विकलेल्‍या तारखेपासून 3 महिनेचे आतच करतात. तथापि, तक्रारदारांनी 3 महिनेनंतर बदलुन मागितला. तसेच तक्रारदार यांनी चुकीचे धुलाई केल्‍यामुळे टी-शर्ट खराब झालेला आहे.  त्‍यामुळे अशावेळी वि.प. नं. 1 यांना मुळ विक्रेत्‍याकडून म्‍हणजेच वि.प. नं. 2 कडून शर्ट बदलून न मिळाल्‍याने त्‍यांना तक्रारदारांना शर्ट बदलून देता आलेला नाही.  सबब, तक्रारदारांची तक्रार वि.प. नं. 1 यांचेविरुध्‍द नामंजूर करणेत यावी.  तक्रारदारांनी दाखल अ.क्र. 1 कडे दाखल केलेल्‍या कॅशमेमोवरील बिलावर कस्‍टमर सर्व्‍हीस पॉलिसी मध्‍ये असे नमूद आहे की, (2) However in the unlikely event that you find the product flawed you may exchange it within 3 months of purchase.  तक्रारदाराने वि.प. यांचेकडे खरेदी तारखेपासून तीन महिन्‍याचे आत टी शर्ट खराब झालेबाबतची सुचना दिली होती तरी देखील वि.प. यांनी तक्रारदारांना सदरचा टी शर्ट बदलून दिला नाही,व रक्‍कमही परत केली नाही.  वरील सर्व बाबींचा विचार करता वि.प. यांनी तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत त्रुटी ठेवून अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केला आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे,  म्‍हणून मुद्दा क्र. 1 चे उत्‍तर होकारार्थी देत आहोत.   

मुद्दा क्र. 2   :     

     वर नमूद मुद्दा क्र. 1 मधील विवेचनाचा विचार करता वि.प. यांनी तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत त्रुटी ठेवलेमुळे तक्रारदारांना मानसिक, आर्थिक व शारिरीक त्रास सहन करावा लागला व तक्रार अर्जही दाखल करावा लागला. या सर्व बाबीचा विचार करता वि.प. यांनी तक्रारदारांना खरेदी दिलेल्‍या लिव्‍हाईस कंपनीचा टी शर्ट बदलून द्यावा.  किंवा टी शर्ट बदलून देणे शक्‍य नसलेस तक्रारदारांना रक्‍कम रु. 1,299/- अदा करावी.   तसेच मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्‍कम रु. 500/- व तक्रारीचा खर्च रक्‍कम रु. 500/- मिळण्‍यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे, म्‍हणून मुद्दा क्र. 2 चे उत्‍तर होकारार्थी  देत आहोत.    

मुद्दा क्र. 3- सबब, मंच या प्रकरणी पुढीलप्रमाणे आदेश देत आहोत.

                                दे

1.   तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करणेत येते.

2.   वि.प. नं. 1 व 2 यांनी तक्रारदारांना खरेदी दिलेला लिव्‍हाईस कंपनीचा टी शर्ट बदलून द्यावा.  किंवा लिव्‍हाईस कंपनीचा टी शर्ट बदलून देणे शक्‍य नसलेस तक्रारदारांना रक्‍कम रु. 1,299/-(अक्षरी रुपये एक हजार दोनशे नव्‍व्‍यानऊ फक्‍त) अदा करावी.

3.   वि.प. नं. 1 व 2 यांनी  तक्रारदारास  मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्‍कम रु. 500/-(अक्षरी रुपये पाचशे फक्‍त) व तक्रार अर्जाचा खर्च रक्‍कम रु. 500/-(अक्षरी रुपये पाचशे फक्‍त) अदा करावेत.

4.    वरील आदेशाची प्रमाणित प्रत मिळालेपासून वि.प. यांनी 30 दिवसांचे आत  पूर्तता करावी.

5.   सदर निकालपत्राच्‍या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना नि:शुल्‍क पाठविण्‍यात याव्‍यात. 

 

 
 
[HON'ABLE MR. Sanjay P. Borwal]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. Dinesh S. Gavali]
MEMBER
 
[HON'ABLE MRS. Rupali D. Ghatage]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.