जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.
ग्राहक तक्रार क्रमांक : 256/2015.
तक्रार दाखल दिनांक : 10/07/2015.
तक्रार आदेश दिनांक : 18/01/2019. कालावधी : 02 वर्षे 06 महिने 08 दिवस
(दिलीप धोंडोपंत कुलकर्णी, वय 66 वर्षे,
धंदा : शेती/वकिली, रा. 466, कासार गल्ली, कसबा पेठ,
बार्शी, ता. बार्शी, जि. सोलापूर) मयत वारस :-
(1) श्रीमती आरती भ्र. दिलीप कुलकर्णी, वय 65 वर्षे,
व्यवसाय : घरकाम, रा. डी-73, इंदिरा शंकर नगरी,
पौड रोड, कोथरुड, पुणे.
(2) अतुल पि. दिलीप कुलकर्णी, वय 36 वर्षे,
व्यवसाय : शेती व नोकरी, रा. वरीलप्रमाणे.
(3) अभिजीत पि. दिलीप कुलकर्णी, वय 32 वर्षे,
व्यवसाय : शेती व वकिली, रा. वरीलप्रमाणे. तक्रारकर्ता
विरुध्द
(1) कृषिधन सिडस् प्रा.लि., कृषिधन भवन, प्लॉट नं. डी-3 ते डी-6,
एम.आय.डी.सी., औरंगाबाद रोड, जालना – 431 213 (महाराष्ट्र)
(2) मे. विद्याचंद मोतीचंद गांधी, खते व बी-बियाणे विक्रेते,
उस्मानाबाद जनता सहकारी बँक मुख्य शाखेजवळ,
उस्मानाबाद, ता.जि. उस्मानाबाद. विरुध्द पक्ष
गणपुर्ती :- (1) श्री. इक्बाल अ. शेख, पिठासन सदस्य
(2) सौ. मेघा वि. गरुड, सदस्य
तक्रारकर्ता यांचे विधिज्ञ :- एच.ए. पाटील
विरुध्द पक्ष क्र.1 यांचे विधिज्ञ :- एन.व्ही. मिनियार
विरुध्द पक्ष क्र.1 यांचे विधिज्ञ :- देविदास वडगांवकर
आदेश
श्री. इक्बाल अ. शेख, पिठासन सदस्य यांचे द्वारे :-
1. सदरील प्रकरणामध्ये दि.7/5/2016 रोजी आमचे पूर्वपिठासन अधिकारी यांनी निर्णय दिला होता. त्यास विरुध्द पक्ष क्र.1 यांनी मे. राज्य आयोग, मुंबई यांचे परिक्रमा पीठ, औरंगाबाद येथे अपिल दाखल केले. त्यातील निर्णय दि.13/7/2018 रोजीप्रमाणे सदरील प्रकरण मागील निर्णय रद्द करुन पुन्हा निर्णयासाठी या मंचाकडे परत (remand) पाठविण्यात आले आणि त्यामध्ये असे निर्देश देण्यात आले की, उभय पक्षकारांनी दाखल केलेल्या पुरसीसप्रमाणे आवश्यक व नव्याने निर्णय पारीत करण्यात यावा.
2. दोन्ही पक्षकार या मंचात हजर झाल्यानंतर मा. राज्य आयोगाच्या निर्देशाप्रमाणे सदरील प्रकरण निकाली काढण्यात येईल, अशी त्यांना कल्पना देण्यात आली.
3. आम्ही उभय पक्षकारांनी दि.23/2/2016 रोजी दाखल केलेली एकत्रित तडजोड पुरसीस पाहिली असता त्यात विरुध्द पक्ष क्र.1 यांनी सर्व तक्रारकर्ता यांना रु.3,85,000/- देण्याचे ठरले व सदरील रकमेचा धनादेश तक्रारकर्ती क्र.1/1 यांच्या नांवाने एक महिन्याच्या आत द्यावयाचे ठरले होते. सदरील तडजोड पुरसीस पूर्वपिठासन अधिकारी यांनी दाखल करुन घेतल्याचे दिसते. सदरील प्रकरणामध्ये गुणवत्तेवर निर्णय होऊन अपिल दाखल झाले होते. याचा अर्थ असा होतो की, विरुध्द पक्ष यांनी आजपर्यंत सदरील रक्कम तक्रारकर्त्यांना दिलेली नाही. ही वस्तुस्थिती असताना सुध्दा सदरील प्रकरण तडजोड पुरसीसप्रमाणे निकाली काढण्यास मे. राज्य आयोगाचे आदेश असल्यामुळे प्रकरण निकाली काढण्यात बाधा येत नाही. म्हणून सदरील तडजोडीच्या अटीवर प्रकरण निकाली काढण्यात येत आहे. म्हणून खालीलप्रमाणे आदेश.
आदेश
- उभय पक्षकारांच्या दि.23/2/2016 रोजीच्या एकत्रित तडजोड पुरसीसप्रमाणे उभयतांनी अनुपालन करावे.
- तक्रार-अर्जाचे खर्चाबद्दल आदेश नाही.
(श्री. इक्बाल अ. शेख) (सौ. मेघा वि. गरुड)
पिठासन सदस्य सदस्य
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.
-oo-