तक्रारदारातर्फे वकील ः- श्री. डि.एस. पाथोडे
सामनेवाले क्र 1 तर्फे वकील ः- श्री. एस.व्ही. खानतेड
सामनेवाले क्र 2 तर्फे वकील ः- श्री. एन.एस. पोपट
युक्तीवादाच्या वेळी
निकालपत्रः- श्री. भास्कर बी. योगी अध्यक्ष, -ठिकाणः गोंदिया.
निकालपत्र
(दिनांक 06/08/2018 रोजी घोषीत )
1. तक्रारदार यांचे वडिल यांनी ट्रॅक्टर आणि ट्रॉली ही विरूध्द पक्ष क्र 3 कडून रू.5,55,000 + 1,30,000 किंमत असलेली रू. 2,07,000/-,देऊन विकत घेतली होती. विरूध्द पक्ष क्र 3 यांनी तक्रारदारांच्या वडिलांचे नावे ट्रॅक्टर व ट्रॉलीचे विरूध्द पक्ष क्र 2 यांच्याकडून फायनांन्स करून घेतला आहे. तक्रारदार यांचे असे म्हणणे आहे की, ट्रॅक्टर त्यांच्या वडिलांच्या नावानी असल्यामूळे त्यांची इंन्शुरंन्स पॉलीसी त्यांच्याच नावाने असायला पाहिजे होती. विरूध्द पक्ष क्र 1 व 2 यांनी तसे न करता, तक्रारदाराला Co-hirer बनवून तक्रारदारांच्या नावानी इंन्शुरंन्स पॉलीसी दोन महिन्यानंतर काढली. तक्रारदारांच्या वडिलाच्या नावानी असलेले ट्रॅक्टर ते आजपर्यंत ट्रॉन्सपर करून दिला नाही आणि विरूध्द पक्ष क्र 1 व 2 हे तक्रारदाराकडून कर्जाची परतफेड करण्याकरीता त्यांना नाहक त्रास देत आहेत. ट्रॅक्टर विकत घेतल्यानंतर, एक महिन्यानी त्यांच्या वडिलांना पॅरालिसीसचे अटॅक आल्यामूळे मल्टीऑरगन्स फेल झाल्यानी ते दि. 26/06/2015 ला मरण पावले. विरूध्द पक्ष क्र 1 व 2 यांनी चुकीचे दस्ताऐवज बनवून बनावटी आणि लबाडी करून त्यांना नाहक त्रास दिला असल्यामूळे ही तक्रार नुकसान भरपाईकरीता दाखल केली. विरूध्द पक्ष क्र 1 व 2 यांनी आपली लेखीकैफियत सादर करून, तक्रारदार यांचे म्हणणे नाकबुल केले. तसेच, विरूध्द पक्ष क्र 3 यांना नोटीस पाठवून सुध्दा ते मंचात उपस्थित झाले नाही. म्हणून विरूध्द पक्ष क्र 3 यांचेविरूध्द एकतर्फा चालविण्याचा आदेश दि. 26/07/2016 ला पारीत केला आहे. तक्रारदारानी तक्रारीसोबत आवश्यक कागदपत्रे सादर केली. तसेच, विरूध्द पक्षांनी सुध्दा काही कागदपत्रे सादर केली.
2. तक्रारदारानूसार विरूध्द पक्ष क्र 3 चे कर्मचारी श्री. उपवनशी दि. 29/05/2015 मध्ये त्यांच्या घरी येऊन, त्यांच्या वडीलांचे व त्याचे को-या कागदावरील तुम्हचे लोनचे प्रोसीजर करावयाचे असे सांगून सही घेऊन गेले. तक्रारदारांच्या वडिलांना पॅरालिसीसचे अटॅक आल्यामूळे मल्टीऑरगन्स फेल झाल्यानी ते दि. 26/06/2015 रोजी मरण पावले. तक्रारदारानी विरूध्द पक्ष क्र 2 यांनी त्यांचे वडील मरण पावले अशी सूचना दि. (13/07/2015) ला दिली. आणि कर्जफेडीबद्दल आता विरूध्द पक्ष क्र 1 जबाबदार राहतील म्हणून योग्य ती कार्यवाही करावी. विरूध्द पक्ष क्र 2 यांनी त्यांच्या कलकत्याच्या ऑफिसमधून पाठविलेले इंन्शुरंन्सचे दस्ताऐवज/कागदपत्रे तक्रारदाराना दि. 24/09/2015 रोजी मिळाले. तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले की, विरूध्द पक्ष क्र 1 व 2 यांनी आपसात मिळून बनावटी Hire purchase Agreement date 27/06/2015 (well come note) दि. 24/09/2015 सोबत पाठविले. तक्रारदारानी विरूध्द पक्ष क्र 2 यांना वेळोवेळी विनंती केली की, इंन्शुरंन्सचे पैसे विरूध्द पक्ष क्र 1 कडून वसुल करा. तक्रारदारांचे असे म्हणणे आहे की, ट्रॅक्टर त्यांच्या वडीलांच्या नावानी असल्यामूळे तो नियमाप्रमाणे रोडवरती चालवू शकत नाही. तसेच, त्यांना इंग्रजी भाषेचे ज्ञान नसल्यामूळे, विरूध्द पक्ष क्र 1 व 2 यांनी त्यांची फसवणुक केलेली आहे. अशा परिस्थितीत तो ट्रॅक्टर त्यांच्या रोजगारासाठी वापरता येत नसल्याने काहीच उपयोगाच नाही. जर विरूध्द पक्ष क्र 3 हे ट्रॅक्टर त्यांच्या नावाने ट्रॉन्सपर करण्यास असमर्थ असेल तर तो भाडयाने विकत करार (HPA) काही कामाचा नाही. तसेच, विरूध्द पक्ष क्र 1 यांनी भाडयाने विकत घेणे अधिनियम 1972 च्या तरतुदींचे पालन केलेले नाही. तक्रारदारांचे असेही म्हणणे आहे की, दस्ताऐवज दि. 24/09/2015 अनूसार पहिला हप्ता हा 10/06/2015 ते 09/07/2015 भरावयाचे होते याचा अर्थ असा निघतो की, विरूध्द पक्ष क्र 2 यांना दि. 10/06/2015 मध्ये कर्जाची रक्कम दिली असावी. परंतू जर Hire purchase Agreement चा करार दि. 27/06/2015 मध्ये झाला आहे तर पृ.क्र 7,8 आणि 10 यावर तारीख आणि जागा नमूद केलेले नाही. ट्रॅक्टर आणि टॉलीची पूर्ण रक्कम विरूध्द पक्ष क्र 3 यांना दिली असल्यामूळे आणि त्यांच्या वडीलांच्या नावाने इंन्श्युरंन्स करायला पाहिजे होती जेणेकरून विरूध्द पक्ष क्र 1 हे तक्रारदारांच्या वडीलाचे मयत झाल्यानंतर कर्जाच्या परतफेडीसाठी पूर्णतः जबाबदार असायला पाहिजे होते. परंतू विरूध्द पक्ष क्र 1 व 2 यांनी आपसात मिळून बनावटी कागदपत्र तयार करून, त्यांच्या वडीलांच्या ऐवजी तक्रारदारांच्या नावाने इंन्शुरंन्सवरती त्यांचे नाव नोंदविल्यामूळे एका बाजुने त्यांच्या डोक्यावरीत कर्जाचा बोझा आला व दुसरी बाजुने ट्रॅक्टर त्यांच्या वडीलांच्या नावे असल्यामूळे तो त्याचा वापरही करू शकला नाही .त्यामुळे तक्रारदारांना खुप जास्त आर्थिक, शारीरीक, मानसिक त्रास सोसावा लागला. म्हणून त्यांची हि तक्रार या मंचात दाखल केली. सबब, तक्रारदारानी ही तक्रार दाखल करून, विरूध्द पक्ष क्र 1 कडून रू.1,03,170/-, विरूध्द पक्ष क्र 1 व 2 कडून नुकसान भरपाई दाखल रू. 3,72,000/-, तसेच मानसिक त्रासाकरीता रू. 1,00,000/-, आणि विरूध्द पक्ष क्र 3 यांनी ट्रॅक्टर त्यांच्या नावानी करून दयायचे अशी मागणी केली आहे.
3. विरूध्द पक्ष क्र 1 हे कलम 3 इंन्शुरंन्स अधिनियम 1938 खाली रजिस्ट्रर कंपनी आहे. विरूध्द पक्ष क्र 1 यांनी प्राथमीक आक्षेप घेतला आहे. त्यांना आजपर्यंत क्लेमच्या संदर्भात काही कल्पना नव्हती. तसेच, हि तक्रार मंचाला दिशाभूल करण्यासाठी दाखल केलेली आहे. तक्रारदारानी क्लेम इंटिमेशन न देता, कानुनी नोटीस दि. 25/04/2016 रोजी पाठविली तेव्हा त्यांना कळले की, तक्रारदारांचे वडिल हे मयत झाले आणि नोटीसमध्ये पॉलीसीचा नंबर, लोन अकॉंऊट इत्यादीचा खुलासा दिलेला नव्हता. तसेच विरूध्द पक्ष क्र 2 व 3 हे मुख्य जबाबदार आहेत. त्यांनी मा. सर्वोच्च न्यायालयाचा Ravneet singh Bagga V/s KLM Rolay Dutch Airlines 2000 (1) SCC 66 या निकालपत्राचा आधार घेऊन, त्यामध्ये असे नमूद केले आहे की, अकार्यक्षमता, योग्य काळजीची कमतरता, प्रामाणिकपणाची अनुपस्थिती, खळबळीतपणा, घाई किंवा चुक असे घटक, सेवा प्रक्षेपित करण्याची कमतरता याचा पुराव्याचा ओझा त्याच्यावरती असतो जो आरोप करतोय. विरूध्द पक्ष क्र 1 नूसार त्यांचा विम्याचा करार हे गृप पॉलीसी क्र जी.ए-000036 आणि कोटक गृप अशुअर प्लॅन या नावानी आहे. त्यांचे अटी व शर्ती दोघांवरती लागु आहे. त्यांना विरूध्द पक्ष क्र 2 (पॉलीसी होल्डर) कडून तक्रारदाराच्या वतीने (सदस्य) विम्याचा प्रिमीयम मिळालेला आहे. सदस्यांनी आपले चांगले आरोग्य घोषणापत्र दाखल करून, विमा संरक्षण घेऊ शकतो. त्यांनी असेही म्हटले आहे की, त्यांना सदस्यांची माहिती विरूध्द पक्ष क्र 2 हे पुरवित असे. त्याप्रमाणे विरूध्द पक्ष क्र 2 यांनी श्री. घनश्याम सुखदेव पाथोडे यांच्या नावानी लोनची सूचना दिली होती आणि त्यांच्याच माहितीप्रमाणे विरूध्द पक्ष क्र 1 यांनी लोन आय.डि.नं PG/0184/A/14/000017 हे 13/06/2015 पासून दि. 12/06/2020 पर्यंत संरक्षित करण्यात आले होते. तसेच, तक्रारदार यांनी स्वतः चांगले आरोग्य घोषणापत्रावर सही करून स्वतःची सर्व माहिती पाठविली होती. विरूध्द पक्ष क्र 1 यांनी असेही नमूद केले की, सदस्यांबद्दल ज्याप्रमाणे माहिती विरूध्द पक्ष क्र 2यांनी दिली त्याप्रमाणे विमा संरक्षण केलेला आहे. जर तक्रारदाराला हि पॉलीसी घ्यावयाची नव्हती तर त्यांनी 30 दिवसाच्या आत( Free look Period ) विरूध्द पक्ष क्र 1 यांना विमा रद्द करण्यासाठी सांगायला पाहिजे होते तसे न केल्यामूळे विम्याची अटी व शर्ती त्यांच्यावर लागु आहे. श्री. सुखदेव गोपालराव पाथोडे (तक्रारदारांचे वडिल) यांनी विरूध्द पक्ष क्र 2 यांच्याकडून कर्ज घेतला होता आणि ते दि. 26/06/2015 ला मयत झाले. तरी सुध्दा आजपर्यंत ते मयत झाले अशी कोणतीही सूचना मिळाली नाही. त्यांच्या नावानी पॉलीसी नसल्याने ते मरण पावल्यानंतर कर्जाची परतफेड करणे आमची जबाबदारी नाही असे आम्ही तक्रारदाराना कळविले आहे. म्हणून विरूध्द पक्षांनी असे नमूद केले की, तक्रारदारानी लावलेले आरोप फेटाळून लावले पाहिजे. विरूध्द पक्षानूसार त्यांनी तक्रारदाराना सेवा देण्यात कोणताही कसुर केलेला नाही व तक्रार खारीज करण्यात यावी. सामनेवाले क्र 1 यांनी आपल्या लेखीजबाबासोबत त्यांनी Membership From Cum Declaration of good Health, विमा प्रमाणपत्र आणि विमा पॉलीसी दाखल केली.
4. विरूध्द पक्ष क्र 2 हि कंपनी अधिनियम 1956 खाली नोंदणीकृत फॉयनांन्स कंपनी आहे. आणि ते भाडे खरेदी, वाहनाचे वित्तीय सहाय्यत्ता पुरविण्याचे व्यवसाय करते. त्यांनी असे नमूद केले आहे की, या मंचाला हि तक्रार ऐकण्याचा अधिकार क्षेत्र प्राप्त होत नाही कारण की, विषय विवाद, लवाद अधिनियम 1940 च्या खाली येतो. तसेच, या मंचाला प्रादेशीक अधिकार क्षेत्र नसल्याने हि तक्रार या मंचात चालविण्याचा अधिकार नाही. विरूध्द पक्ष क्र 2 यांनी कबुल केले की, तक्रारदारांचे वडिल यांनी त्यांना कर्जाच्या संदर्भात संपर्क साधला होता. आणि त्यांचा कर्जाकरीता अर्ज घेऊन आम्ही त्यांना रू. 5,64,747/-,वाटप केले होते त्याची परतफेडणी 60 हप्त्यात करावयाची होती आणि एकुण रू. 8,68,228/-, हे दयायचे होते. विरूध्द पक्ष क्र 2 यांनी असेही म्हटले आहे की, तक्रारदारांचे वडिलांनी विरूध्द पक्ष क्र 3 कडून रू. 6,85,000/-, मोलाचा ट्रॅक्टर विकत घेतला होता. विरूध्द पक्ष क्र 2 यांचे असे म्हणणे आहे की, विमा पॉलीसीच्या अटीप्रमाणे कमाल नोंद वय 60 असल्याकारणानी तक्रारदारांच्या वडिलांच्या नावाची विमा पॉलीसी काढू शकत नाही. म्हणून त्यांना समज दिल्यानंतर त्यांची सही घेऊन, त्यांनी विमा बद्दल विरूध्द पक्ष क्र 1 यांनी सदंस्यांची माहिती पाठविली होती. विरूध्द पक्ष क्र 2 यांनी पुढे असेही कथन केले आहे की, तक्रारदाराने त्यांचे वडिल मयत झाल्याबद्दलची माहिती पुरविली नाही. तसेच, तक्रारदार यांना चांगल्या प्रकारे माहिती होते की, त्यांना इंन्शुरंन्सचा फायदा मिळू शकत नाही. कारण की, तक्रारदाराचे वडिल हे वयोवृध्द (67) होते. त्यांनी हे मान्य केले की, कर्जाचा करार दि. 27/06/2015 हा खरे आणि योग्य आहे. तसेच, तक्रारदार हा त्यांच्या वडिलासोबत सहभाडेकरू आहे. तक्रारदारांनी त्यांच्या स्वतःच्या नावे असलेला जमिनीचा कोणताही पुरावा दिलेला नाही. विरूध्द पक्ष क्र 2 यांनी असेही कथन केले आहे की, आर.टी.ओ च्या नियमानूसार ट्रॅक्टर आणि टॉली हे तक्रारदारांच्या नावाने जर करायचा असेल तर त्याची कार्यपध्दती अशी आहे की, अगोदर नविन कर्ज तक्रारदारांच्या नावाने हस्तांतरण केल्यानंतर, उरलेली कालावधी आणि पि.ओ.एस हे वारसदार यांचे नावाने करायला पाहिजे. त्याचबरोबर कर्ज हस्तांतरण करतेवेळी सर्व थकबाकी परतफेड करणे आवश्यक होते. परंतू तक्रारदारानी असे काही केले नाही म्हणून त्यांचे नाव आर.टी.ओ च्या रेकार्ड मध्ये बदल करता आले नाही. विरूध्द पक्ष क्र 2 यांनी असेही म्हटले आहे की, तक्रारदार हा सुरूवातीपासून नेहमीचा डिफॉल्टर आहे. त्यांच्यावर वारंवार बजावण्यात आलेली नोटीस आणि रिमांडरचा कोणताही जबाब दिलेला नाही. तसेच, त्यांनी कर्ज खात्याचे नियमीकरण करून घेतलेला नाही. म्हणून त्याला दि. 11/07/2016 मागणीसह संपुष्ठात आणल्याची नोटीस दुर्लक्षीत केले. त्यानंतर दि. 08/10/2016 रोजी लवाद अधिनियम 1940 च्या नियमानूसार दावा दाखल केलेला आहे आणि ग्रा.सं.कायदयाखाली कायदयाचे गुतांगुतीचे प्रश्न असल्यामूळे, हि तक्रार दिवाणी न्यायालयात दाखल करायला पाहिजे होती. तक्रारदार क्र 2 यांचे नाव (मॅग्मा फीनक्रॉप फॉयनॉंन्स कंपनी आणि इंन्शुरंन्स सर्टिफिकेट हा मॅग्मा एच.डि.आय जनरल इंन्शुरंन्स या नावानी दिलेला आहे. म्हणून नॉन जॉईन्ड ऑफ नेसेसरी पार्टी मूळे हि तक्रार खारीज करण्यासारखी आहे. त्यांनी त्यांच्या लेखी जबाबसोबत कर्जाचे स्टेटमेंट सादर केलेले आहेत. बाकी सर्व मजकुर खोटे, लबाडीचे व चुकीचे असल्यामूळे मान्य नाही. म्हणून हि तक्रार रू. 10,000/-च्या खर्चासह खारीज करण्यात यावी.
5. तक्रारदारांनी त्यांचे पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तीवाद सादर केला. तसेच विरूध्द पक्ष क्र 1 व 2 यांनी पुराव्याचे शपथपत्र व लेखीयुक्तीवादकरीता पुरसीस दाखल केली व निवेदन केलें की, त्यांचा लेखी जबाब हाच पुराव्याचे शपथपत्र व लेखीयुक्तीवाद समजण्यात यावा. तक्रारदार यांचे वकील श्री. डि.एस. पाथोडे व विरूध्द पक्ष क्र 1 करीता वकील श्री. एस.व्ही. खानतेड आणि विरूध्द पक्ष क्र 2 तर्फे वकील श्री. एन.एस. पोपट यांचा तोंडीयुक्तीवाद ऐकण्यात आला. मंचानी विरूध्द पक्ष क्र 3 यांचेविरूध्द दि. 26/07/2016 रोजी एकतर्फा आदेश पारीत केला.
6. उपरोक्त बाबी विचारात घेता, खालील बाबी मान्य आहेत असे समजता येईल.
(1) विरूध्द पक्षांना मान्य आहे की, ट्रॅक्टर हे तक्रारदारांच्या वडिलांच्या नावे आहे. विरूध्द पक्ष क्र 2 यांनी हे मान्य केले आहे की, तक्रारदारांचे वडिल हे वयोवृध्द असल्यामूळे त्यांच्या नावाने कर्ज देऊ शकत नाही. तसेच त्यांनी हेही मान्य केले की, तक्रारदारांच्या नावे शेत जमिन आणि उत्पन्नाचा स्त्रोत नाही. तरी देखील विरूध्द पक्षांनी पाठविलेले इंन्शुरंन्स पॉलीसी आणि इतर दस्ताऐवज तयार केलेले आहे आणि ज्यादिवशी ट्रॅक्टर विकत घेतला त्यादिवशी न देता, चार महिन्यानंतर पाठविला आहे. विरूध्द पक्ष क्र 2 यांनी दि. 13/06/2015 रोजीची इंन्शुरंन्स पॉलीसी हि (Well Come note) दि. 24/09/2015 सोबत पाठविला होता. भाडे खरेदी अर्थ करार दि. 27/06/2015, तक्रारदारांच्या वडिलांच्या नावाचे विमा प्रमाणपत्र पॉलीसी नं.P0016400002/4107/136216, (ट्रॉलीसाठी) दि.13/06/2015, पॉलीसी नं. P0016400002/4107/136217, (स्वराज 735 एफई ट्रॅक्टर) दि.13/06/2015, तसेच तक्रारदारांच्या वडिलाचे नावेInsurance Cover Note No 111140184070003 दि.13/06/2015, तक्रारदारांच्या वडिलांचे मृत्यु प्रमाणपत्र, (दि.26/06/2015), विरूध्द पक्ष क्र 1 चे दस्ताऐवज Membership Form cum Declaration of Good Health तक्रारदारांच्या नावाने Loan Account No PG/0184/A/14/ तसेच विमा प्रमाणपत्र, विरूध्द पक्ष क्र 1 यांनी जारी केलेले पत्र, आणि गृप अशुअर पॉलीसीचे दस्ताऐवज दि. 24/06/2011 आणि तक्रारदारांचे वकीलांनी पाठविलेल्या नोटीसचा जबाब दि. 04/05/2016 इ. कागदपत्रे सादर केली आहेत.
7. ही तक्रार निकाली काढण्याकरीता खालील बाबीवर चर्चा होणे आवश्यक आहे.
(अ) विरूध्द पक्ष यांनी तक्रारदारांना सेवा देण्यात कसुर केला हे सिध्द करतात का ?
विरूध्द पक्ष क्र 1 व 2 यांच्यामध्ये Re-Insurance सन 2011 पासून करार आहे. तसेच विरूध्द पक्ष क्र 2 हे आपले व्यवसाय दोन नावाने करतात. 1) मॅग्मा फीनक्रॉप फॉयनॉंन्स कंपनी आणि 2) मॅग्मा एच.डि.आय जनरल इंन्शुरंन्स कं.लि. त्यांनी तक्रारदारांच्या वडिलांच्या नावानी कर्जाची रक्कम विरूध्द पक्ष क्र 3 यांना वाटप केली आहे. तसेच, तक्रारदारांच्या वडिलांच्या नावाने दि. 13/06/2015 रोजी ट्रॅक्टर (IDV of Vehicle) रू. 5,22,500/-,आणि ट्रॉली (IDV of Vehicle) रू. 1,28,250/-,एकुण किंमत रू. 6,50,750/-,इतक्या रकमेचा विमा केलेला आहे. तसेच तक्रारदारांचे वडिल मयत श्री. सुखदेव गोपालराव पाथोडे यांचा मृत्यु दि. 26/06/2015 रोजी पॅरालीसीसच्या अटॅकमूळे मल्टीपल ऑरगन फेलीअरमूळे झालेला आहे आणि विरूध्द पक्षांनी याबद्दल कोणताच आक्षेप घेतलेला नाही. म्हणून हि बाब सिध्द होते की, विमा असतांना तक्रारदारांच्या वडिलांचे मृत्यु झाल्याने विरूध्द पक्ष क्र 2 यांनी रू. 6,50,750/-, हे तक्रारदाराला कर्जाची परतफेडसाठी क्रेडिट दयायला पाहिजे होता. परंतू असे न केल्याने तसेच विरूध्द पक्ष क्र 2 यांना सन 2011 पासून, सामनेवाले क्र 1 यांच्याशी Re-Insurance कराराबद्दलची अटी व शर्ती माहित असतांना देखील तक्रारदारांच्या नावाने दि. 13/06/2015 पासून कर्ज विमा, बनावटी, भाडे खरेदी अर्थ करार सादर करून, विरूध्द पक्ष क्र 1 ला दिशाभूल केलेला दिसून येतो. एकाच वेळी म्हणजे दि. 13/06/2015 ला दोन इंन्शुरंन्स पॉलीसी एक तक्रारदारांच्या नावे व दुसरी तक्रारदारांच्या वडिलांच्या नावे असल्याने आणि इंन्शुरंन्स पॉलीसी चालु असतांना तक्रारदारांचे वडिल मयत झाले अशा कारणामूळे विरूध्द पक्ष क्र 2 यांनी विम्याप्रमाणे रू. 6,50,750/-,हि रक्कम तक्रारदाराला (वारसदार) यांना दयायला हवे होते तसे न केल्यामूळे विरूध्द पक्ष क्र 2 यांनी तक्रारदाराला सेवा देण्यात कसुर केला आहे. तसेच, ट्रॅक्टर तक्रारदारांच्या वडिलांच्या नावानी असल्यामूळे तक्रारदारांची इंन्शुरंन्स पॉलीसी हि पण त्यांच्याच नावाने असायला पाहिजे होती. विरूध्द पक्ष क्र 2 यांनी तसे न करता, तक्रारदाराला Co-hirer बनवून तक्रारदारांच्या नावानी इंन्शुरंन्स पॉलीसी काढली. हेही चुकीची व्यापार पध्दत आहे. हे सिध्द होते. विरूध्द पक्ष क्र 2 यांनी विम्याची रक्कम दिली नसल्याने सामनेवाले क्र 3 यांनी तक्रारदारांच्या वडिलांचे नावे असलेले ट्रॅक्टर आणि ट्रॉली हे तक्रारदारांच्या नावाने ट्रॉन्सपर करू शकले नाही. अशा परिस्थितीत विरूध्द पक्ष क्र 2 यांनी सेवेत कसुर केल्यामूळे तक्रारदाराला मानसिक, शारीरीक, आर्थिक त्रास सहन करावा लागला. यासाठी तक्रारदारांनी या मंचासमोर दाद मागितल्यामूळे विरूध्द पक्ष क्र 2 यांना विम्याची रक्कम रू. 6,50,750/-, तसेच मानसिक, शारीरीक, आर्थिक त्रासाबद्दल रू. 20,000/-, व तक्रारीचा खर्च रू. 5,000/-, देणे योग्य व न्यायोचित होईल. तसेच, प्रार्थना क्लाज ‘सी’ आणि ‘ई’ यांच्याबद्दल कोणताही पुरावा दिला नसल्याने नाकारण्यात येते.
8. वरील चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन आम्ही खालील आदेश पारित करीत आहोत.
आदेश
1. तक्रार क्रमांक 61/2016 अंशतः मंजुर करण्यात येते.
2. विरूध्द पक्ष क्र 2 यांनी तक्रारदार यांना सेवा देण्यात कसुर केला व अनुचित व्यापार पध्दत अवलंबीली असे जाहीर करण्यात येते.
3. विरूध्द पक्ष क्र 2 यांनी तक्रारदाराना (Beneficiary) विम्याची रक्कम रू. 6,50,750/-, द.सा.द.शे 9 टक्के व्याजासहीत दि. 26/06/2015 पासून गणना करून, तक्रारदाराच्या वडिलांचे कर्ज खाते क्र. PG/0184/A/14/000017 क्रेडिट करावे. तसेच, त्यांचे कर्ज खाते बंद करून, त्यांना No Due Certificate, नाहरकत प्रमाणपत्र व इतर कागदपत्रे देण्यात यावे.
4. विरूध्द पक्ष क्र 2 यांनी तक्रारदार यांना मानसिक व शारीरीक त्रासाकरीता रू. 20,000/-(विस हजार) व तक्रारीचा खर्च म्हणून रू. 5,000/-, (पाच हजार )अदा करावे.
5. उपरोक्त क्लॉज 3, 4 मधील आदेशीत रक्कम 30 दिवसाचे आत अदा न केल्यास त्या रकमेवर द.सा.द.शे 12 टक्के व्याज अदा करेपर्यंत लागु राहील.
6. विरूध्द पक्ष क्र 3 यांना आदेश देण्यात येतो की, ट्रॅक्टर आणि ट्रॉली हे कागदपत्र मिळाल्यानंतर 30 दिवसात तक्रारदाराचे नावे करून दयावे.
7. विरूध्द पक्ष क्र 1 यांच्याविरूध्द कोणताही आदेश नाही.
8. आदेशाची प्रत उभय पक्षांना विनामुल्य पाठविण्यात यावी.
9. अतिरीक्त संच असल्यास, तक्रारदारांना परत करावे.