सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
तक्रार क्र. 47/2010
श्रीमती रेखा अंकुश पावसकर
उ.व.68, धंदा – शेती,
रा.पिंगुळी, ता.कुडाळ,
जि.सिंधुदुर्ग ... तक्रारदार
विरुध्द
कोरगांवकर आणि कंपनी तर्फे
1) प्रोप्रा. लक्ष्मण गोविंद कोरगावकर
2) प्रोप्रा. रामचंद्र गोविंद कोरगावकर
रा.कोरगावकर आणि कंपनी, बाजारपेठ,
ता.कुडाळ, जि.सिंधुदुर्ग
3) मॅनेजर,
किर्लोस्कर ब्रदर्स लि.
रेल्वे स्टेशन समोर उज्जयन रोड,
देवस – 455 018 (मध्य प्रदेश)
राज्य – मध्यप्रदेश ... विरुध्द पक्ष.
तक्रारदारातर्फेः- विधिज्ञ श्री आर.डी. बिले, श्री संजय व्ही. खानोलकर.
विरुद्ध पक्षातर्फे- विधिज्ञ श्री एस.के. तायशेटे
(आदेश निशाणी 1 वर )
(दि.07/08/2010)
1) मा.राज्य आयोग, मुंबई यांच्या ई-मेलद्वारे प्राप्त आदेश क्र. O.W.NO.SC/D.F./Cases Transfer/2010/1671 Dated : 5/8/2010 अन्वये सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक मंचातील रेग्युलर तक्रार क्रमांक 47/2010 (रेखा पावसकर विरुध्द कोरगांवकर अँड कंपनी) हे तक्रार प्रकरण सिंधुदुर्ग ग्राहक मंचातून रत्नागिरी जिल्हा ग्राहक मंचात वर्ग करण्याचे आदेश पारीत केले आहेत. त्यानुसार सदरचे प्रकरण सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक मंचातून रत्नागिरी जिल्हा मंचात वर्ग करण्यात येत असून सदर तक्रारीतील संपूर्ण कागदपत्रे (मुळ तक्रार अर्ज व त्यासोबतची कागदपत्रे व सदस्यांचे वेगळे दोन संच) तातडीने पाठविण्यात यावेत.
2) मा.प्रबंधक, सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक मंच, सिंधुदुर्ग यांना निदेश देण्यात येतात की, त्यांनी सदर प्रकरणातील रोझनाम्याच्या झेरॉक्स प्रती व मा.राज्य आयोगाचा आदेश व मंचाने आज पारीत केलेला नि.1 वरील आदेशाची प्रत आपले माहितीसाठी मंचात जतन करुन ठेवावी.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 07/08/2010
सही/- सही/-
(महेन्द्र म.गोस्वामी) ( वफा खान)
अध्यक्ष, सदस्या,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग