तक्रारकर्त्यातर्फे त्यांचे वकील : श्री. जी.सी.साखरे हजर.
विरूध्द पक्ष : एकतर्फा.
(युक्तीवादाच्या वेळी)
निकालपत्रः- श्री.सु.रा.आजने सदस्य , -ठिकाणः गोंदिया
न्यायनिर्णय
(दिनांक14/12/2018 रोजी घोषीत)
1. तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये दाखल केलेल्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणेः-
2. तक्रारकर्त्याने असे कथन केले आहे की, तक्रारकर्ता व विरूध्द पक्षकार हे वरील नमूद पत्यावर राहतात. तक्रार करण्याचे कारण वाद हे मा. ग्राहक मंचाचे अधिकार क्षेत्रामध्ये येत आहे. त्यामुळे सदर तक्रार मंचात दाखल करण्यात आली.
3. विरूध्द पक्षकार श्री. केवल बाबुलाल दमाहे हे डेकोरशन चालविण्याचा व्यवसाय करतात. आणि लग्नासाठी मंडप व जेवणाचे सामान किरायाने देण्याचा व्यवसाय करतात. विरूध्द पक्षकार श्री. केवल बाबुलाल दमाहे हे लग्न समारंभाकरीता किरायाने लागणारे प्रत्येक कॅटरींग आणि मंडप डेकोरेशन सामाजिक कार्यक्रमात देऊन किराया घेतात. श्री. केवल बाबुलाल दमाहे हे आपला डेकोरेशन आणि कॅटरींगचे सामान देण्यासाठी अॅडव्हान्समध्ये बुकींग करतात. त्यामुळे विरूध्द पक्षकार हा ग्राहकांना सेवा देऊन त्याच्या बदल्यामध्ये पेसै कमविण्याचा व्यवसाय करतो. दि. 23/03/2016 ला श्री. केवल बाबुलाल दमाहे हे तक्रारकर्त्याच्या घरी ग्राम दरेकसा येथे आले. तक्रारकर्ता यांच्या मुलीच्या लग्नाच्या कार्यक्रमासाठी दि. 23/05/2016 आणि दि. 24/05/2016 च्या दोन दिवस लग्न मंडप व जेवणाचे बर्तन किरायाने देण्यासाठी अॅडव्हान्समध्ये बुकींग केली. त्यासाठी विरूध्द पक्षकारांनी त्याचदिवशी तक्रारकर्त्याकडून रू. 1,000/-,दि. 23/03/2016 ला घेतले. लग्नाच्या पूर्वी सर्व सामान आणून लग्नाचे व्यवस्थापन करणे आणि आवश्यकतानूसार सर्व व्यवस्था करावे लागेल हे विरूध्द पक्षकारांनी मान्य केले होते.
4. विरूध्द पक्षकारानी श्री. केवल बाबुलाल दमाहे यांनी दिलेल्या आश्वासन आणि करारानूसार तक्रारकर्ता यांनी आपल्या मुलीचे लग्न पत्रिका छापून आपले नातेवाईक तसेच मानवाईक लोकांना आमंत्रण देण्यात आले. लग्नमंडप व कॅटरींग बुकींग केल्यानंतर तक्रारकर्ता पूर्णपणे लग्नाच्या कार्यक्रमात व्यस्त राहिला. तक्रारकर्ता यांनी लग्नाच्या एक दिवसापूर्वी दि. 23/05/2016 ला त्याच्या घरी डेकोरेशनचे सामान न आल्यामूळे विरूध्द पक्षकाराला तक्रारकर्ता यांनी मोबाईलद्वारे विचारले. परंतू श्री. केवल बाबुलाल दमाहे यांनी काही उत्तर दिले नाही. आणि सामान सुध्दा आणले नाही. त्यामुळे तक्रारकर्ता स्वतः दि. 23/05/2016 ला विरूध्द पक्षकाराच्या घरी मुक्काम अंबेडा (बु.) पो. बहेला. ता. लांझी. जि. बालाघाट येथे रात्री 10.00 वाजात जाऊन विनंती केली की, त्यांनी जर आपला मंडप डेकोरेशन आणि जेवनाचे बर्तन आणले नाही तर त्यांच्या मुलीचे लग्न होऊ शकणार नाही. परंतू विरूध्द पक्षकार श्री. केवल बाबुलाल दमाहे यांनी म्हटले की, मला आपल्या घरच्या लग्नाची आठवण राहिली नाही. मला काही लोकांनी सांगीतले की, आपले गांव दरेकसा हे नक्षल भागात असल्याने मी आपला मंडप डेकोरेशन आणि तसेच जेवण बनविण्याचे सामान आणु शकणार नाही व मी आपल्या घरच्या लग्नाचे कार्यक्रमाचे काम करू शकत नाही. आणि मी दुस-या लग्नाची बुकींग केली आहे. म्हणून आपला सामान आणु शकत नाही.
5. विरूध्द पक्षकाराला हे सर्व माहित होते की, डेकोरेशन बुकींग झाल्यावर संपूर्ण काम करणे व आावश्यकतेनूसार सेवा देणे गरजेचे असते. गावातील
लग्न समारंभात मुलीच्या पक्षाची काय समस्या असतात हे विरूध्द पक्षकार यांना माहित असतांना सुध्दा जाणुनबूजून लापवार्हीने व कार्यक्रमासाठी अॅडव्हानस रकमेची पावती देऊन सुध्दा आपली सेवा तक्रारकर्त्याच्या मुलीच्या लग्नात दिली नाही व काम केले नाही. विरूध्द पक्षाला आपली चुक माहित असून त्यांनी सेवा देण्यास नकार दिला आणि अॅडव्हान्स रक्कम परत केली नाही. विरूध्द पक्षाला संबधीत लापवार्ही व सेवा न दिल्याबद्दल नोटीस दि. 10/06/2016 ला पाठविण्यात आली. परंतू विरूध्द पक्षकारांनी त्याचा जबाब सुध्दा दिला नाही. म्हणून तक्रारकर्त्याला मंचामध्ये तक्रार दाखल करण्यास भाग पडले.
6. तक्रारकर्ता हा ग्रा.सं.कायदा 1986 अंतर्गत ‘ग्राहक’ या संज्ञेत मोडत असल्यामूळे या मंचाला प्रकरण चालविण्याचा अधिकार आहे. त्या पृष्ठर्थ तक्रारकर्त्याने मा. राष्ट्रीय ग्राहक तक्रार आयोग यांनी दि. 21/03/1991 मध्ये एच.आर गिल विरूध्द सुर्यवंशी क्षत्रीय न्याती समाज Laws (NCD)-1991-3-35 या प्रकरणामध्ये दिलेल्या न्यायनिवाडयाची प्रत सादर केली आहे.
7. तक्रारकर्त्याचे वकील श्री.जी.सी.साखरे यांचा तोंडीयुक्तीवाद ऐकण्यात आला. विरूध्द पक्षकार यांचे वकील तोंडीयुक्तीवादाच्या वेळेस गैरहजर. मंचाने दि. 13/08/2018 ला विरूध्द पक्षाविरूध्द विना लेखीकैफियतीचा आदेश पारीत केला आहे आहे/होता.
8. विरूध्द पक्षांनी लेखीयुक्तीवाद मंचात सादर केला नाही. प्रस्तुत मंचाने तक्रारकर्त्यांचे पुराव्याचे शपथपत्र, लेखीयुक्तीवाद या मंचानी वाचन केले आहे त्यावरून तक्रारीचे निकालकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र.. | मुद्दे | उत्तर |
1 | तक्रारकर्ता हा ग्रा.सं.कायदा कलम 2(1),डी प्रमाणे ग्राहक होतात काय? | होय. |
2. | विरूध्द पक्षांनी तक्रारकर्त्याला सेवा देण्यात कसुर केली ही बाब तक्रारकर्ता सिध्द करतात काय? | होय. |
3 | अंतीम आदेश | तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. |
कारण मिमांसा
मुद्दा क्र. 1 व 2 ः-
9. मंचातर्फे विरूध्द पक्षाला या मंचाचे कार्यालयीन आदेश क्र./जावक क्र.जि.ग्रा.मं.गोंदिया/आस्था/341/दि. 29/04/2017 अन्वये नोटीस बजावण्यात आली व सोबत तक्रारकर्त्याने मंचात दाखल केलेल्या तक्रारीची प्रत पाठविण्यात आली. नोटीसद्वारे तक्रार अर्जात आपणांविरूध्द केलेल्या आरोपा संदर्भात उत्तरादाखल आपले लेखी निवेदन दि. 26/05/2017 ला दुपारी 11.00 वाजता मा. प्रबंधक जिल्हा ग्राहक तक्रार गोंदिया यांच्याकडे सादर करण्याबाबत सूचविण्यात आले. तक्रारकर्त्याने ग्राहक कलम अधिनियम 28 (A) प्रमाणे अभिसाक्षीचे शपथेवर हलपनाम्यावर मंचामध्ये सादर केले की, अभिसाक्षी यांनी
सदर तक्रार ग्रा.सं.कायदा कलम 1986 अंतर्गत दाखल केली आहे. सदर कोर्टातुन रजिष्टर पोस्टाद्वारे कोर्टाची नोटीस विरूध्द पक्षकार यांना पाठविण्यात आली होती. ती मिळाल्यावर श्री. केवळ बाबुलाल दमाहे यांनी अर्जदाराला फोन करून सांगीतले की, मी आपले झालेले नुकसान भरून देणार आहे. परंतू आपण माझ्या विरूध्द दाखल केलेली तक्रार मागे घ्या. गोंदियाच्या ग्राहक तक्रार निवारण केंद्राची नोटीस मिळाली आहे. विरूध्द पक्षकाराला मंचातर्फे नोटीस पाठवून विरूध्द पक्षकार मंचात हजर झाले नाहीत. तक्रारकर्त्याने मंचामध्ये सादर केलेल्या ग्रा.सं.अधिनियम कलम 28 (A) प्रमाणे सादर केलेल्या अभिसाक्षीचे शपथेवर हलपनाम्यानूसार मंचाने दि. 13/08/2018 ला विरूध्द पक्षाविरूध्द विना लेखीकैफियतीचा आदेश पारीत केला.
10. तक्रारकर्ता सहदेव बालाराम मोहबे मु. जामकुडो पो.दरेकसा ता. सालेकसा जि. गोंदिया यांनी त्यांचे मुलीच्या लग्नाप्रित्यर्थ दि. 23/05/2016 व दि. 24/05/2016 या कालावधीकरीता दमाहे डेकारेशन अंबेडा (बु.) प्रोप्रा. केवल बाबुलाल दमाहे यांच्याकडे दि. 23/03/2016 ला रू. 1,000/-,आगाऊ रक्कम देऊन, लग्न मंडप व जेवणाचे बर्तन किरायाने देण्यासाठी अॅडव्हान्समध्ये बुकींग केली होती. लग्न समारंभाकरीता लागणारे लग्न मंडप व जेवणाचे बर्तन किरायने देण्यासाठी केवल बाबुलाल दमाहे तक्रारकर्त्याचे घरी ग्राम. दरेकसा येथे आले व बुकींग घेऊन तक्रारकर्त्याला पावती दिली. त्यावर विरूध्द पक्षकार व तक्रारकर्ता यांची स्वाक्षरी आहे. सदरचे बिल नं. 72 तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत सादर केले आहे. तक्रारकर्त्याने विरूध्द पक्षकार श्री. केवल बाबुलाल दमाहे यांनी दिलेल्या आश्वासन व करारानूसार आपल्या मुलीचे लग्न पत्रिका छापून आपले नातेवाईक तसेच मानवाईक लोकांना आमंत्रण दिले. लग्न मंडप व कॅटरींग बुकींग केल्यानंतर तक्रारकर्ता हा पूर्णपणे लग्नाच्या कार्यक्रमात व्यस्त राहिला. तक्रारकर्ता यांनी लग्नाच्या एक दिवसापूर्वी दि. 23/05/2016 ला त्याच्या घरी डेकारेशनचा सामान न आल्यामूळे विरूध्द पक्षकाराला तक्रारकर्ता यांनी मोबाईल द्वारे विचारणा केली परंतू श्री. केवल बाबुलाल दमाहे यांनी काही उत्तर दिले नाही व सामान सुध्दा आणले नाही. त्यामुळे तक्रारकर्ता स्वतः दि. 23/05/2016 ला विरूध्द पक्षकाराच्या घरी मु. अंबेडा, (बु.) पो. बहेला,ता. लांझी, जि. बालाघाट (म.प्र.) येथे रात्री 10.00 वाजता जाऊन विनंती केली की, जर त्यांनी आपला मंडप, डेकारेाशन तसेच जेवणाचे बर्तन आणले नाही तर आमच्या मुलीचे लग्न होऊ शकणार नाही. परंतू विरूध्द पक्षकार श्री. केवल बाबुलाल दमाहे यांनी म्हटले की, मला आपल्या घरच्या लग्नाची आठवण राहिली नाही. मला काही लोकांनी सांगीतले की, आपले गांव दरेकसा हे नक्षल भागात असल्याने मी आपला मंडप डेकोरेशन आणि तसेच जेवण बनविण्याचे सामान आणु शकणार नाही व मी आपल्या घरच्या लग्नाचे कार्यक्रमाचे काम करू शकत नाही. आणि मी दुस-या लग्नाची बुकींग केली आहे. म्हणून आपला सामान आणु शकत नाही.
11. तक्रारकर्त्यानी विनंती करूनही, विरूध्द पक्षकाराने मोठयाने ओरडून व अपमानस्पद वागणुक देऊन तक्रारर्त्याला डेकोरेशन व जेवण बनविण्याचे सामान पुरविण्यास नकार दिला. तक्रारकर्ता याने दुस-या दिवशी दि. 24/05/2016 ला सकाळी 11.00 वाजता लग्नाची वरात येत असल्याने त्याच वेळी दि. 24/05/2016 सकाळी 4.00 वाजता दुसरा मंडप डेकोरशन, रमेश डेकारेरेशन अॅण्ड डि.जे. साऊंड सर्व्हिस पिपरखारकला (बोरतलाव) छत्तीसगढ यांचेशी संपर्क साधून डेकोरेशन व जेवण बनविण्याचे सामान आणून लग्न समारंभ घाईगर्दीत पार पाडला. त्यामुळे तक्रारकर्त्याला त्याची एैपत नसतांना जास्तीचा खर्च करावा लागला. तक्रारकर्त्यानी रमेश डेकारेरेशन अॅण्ड डि.जे. साऊंड सर्व्हिस पिपरखारकला (बोरतलाव) छत्तीसगढ यांचेकडून भाडे तत्वावर आणलेल्या सामानाची बिल क्र. 39 तक्रारीसोबत सादर केले आहे.
12. विरूध्द पक्षकाराला डेकोरेशनचे बुकींग झाल्यावर संपूर्ण काम करणे व आवश्यकतेनूसार सेवा देणे गरजेचे असते हे माहित असून सुध्दा तक्रारकर्त्याला मुलीच्या लग्नाकरीता बुकींगची रक्कम घेऊन, डेकोरशन व जेवणाचे सामान लग्न कार्याकरीता न पुरविणे, ही विरूध्द पक्षाच्या सेवेतील न्यूनता असून त्यामुळे तक्रारकर्त्याला मानसिक, शारिरिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला. तसेच त्याच्या प्रतिष्ठेला धक्का पोहचला.
सबब, प्रकरणातील वस्तुस्थिती व पुराव्याचा विचार करता, हा मंच मुद्दा क्र 1 व 2 चा निःष्कर्ष होकारार्थी नोंदवित आहोत.
वरील चर्चेवरून व नि:ष्कर्षावरून आम्ही खालील आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. तक्रारकर्त्याने विरूध्द पक्षाकडे जमा केलेली आगाऊ रक्कम रू.1,000/-,दि.23/03/2016 पासून द.सा.द.शे 6% टक्के व्याजासह अदा करावे. आणि तक्रारकर्त्याला मानसिक व अपमानास्पद वागणुक दिल्यामूळे त्याची प्रतिष्ठा धुळीस मिळाल्याबद्दल रू. 50,000/-, अदा करावे.
3. विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्याला दिलेल्या मानसिक, शारीरीक तसेच तक्रारीचा खर्च आणि आर्थिक नुकसानाबद्दल रू. 20,000/-,अदा करावे.
4. विरूध्द पक्षांना यांना आदेश देण्यात येतो की, उपरोक्त आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसाचे आत करावी. तसे न केल्यास, त्या रकमेवर द.सा.द.शे 9% टक्के व्याज अदा करेपर्यंत लागु राहील.
5. न्यायनिर्णयाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.
6. अतिरीक्त संच तक्रारकर्त्याला परत करण्यात यावे.