Maharashtra

Kolhapur

CC/14/229

Balaso Bharma Kupade - Complainant(s)

Versus

Kanwad Gra. Bigarsheti Sah Pat Marya - Opp.Party(s)

S.M.Potdar

31 Dec 2014

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, KOLHAPUR
Central Administrative Building, Second Floor,
South Side, Kasaba Bawada Road, Kolhapur.
Phone No. (0231) 2651327, Fax No. (0231) 2651327
.
 
Complaint Case No. CC/14/229
 
1. Balaso Bharma Kupade
Jaysingpur, Tal. Shiroli
Kolhapur
2. Champabai Balaso Kupade
Jaysingpur, Tal Shiroli
Kolhapur
3. Kum. Pooja Dilip Kupade
Jaysingpur, Tal Shirol
Kolhapur
4. Sourabh Dilip Kupade
Jaysingpur, Tal Shirol
Kolhapur
...........Complainant(s)
Versus
1. Kanwad Gra. Bigarsheti Sah Pat Marya
Kanwad, Tal. Shirol,
Kolhapur
2. Aabaso Babaso Patil
Kanwad, Tal. Shirol
Kolhapur
3. Dadaso Akaram Patil
Kanwad, Tal. Shirol
Kolhapur
4. Dadapasha Babaso Patel
Kanwad, Tal. Shirol
Kolhapur
5. Sadashiv Aapu Shahapure
Kanwad, Tal. Shirol
Kolhapur
6. Mushaq Aabbas Inamdar
Kanwad, Tal. Shirol
Kolhapur
7. Sikandar Bandu Buran
Kanwad, Tal. Shirol
Kolhapur
8. Babso Dadu Naragachhe
Kanwad, Tal. Shirol
Kolhapur
9. Tatyaso Balaso Patil
Kanwad, Tal. Shirol
Kolhapur
10. Taygonda Rajaram Hegade-Patil
Kanwad, Tal. Shirol
Kolhapur
11. Dadaso Bapu Jadhav
Kanwad, Tal. Shirol
Kolhapur
12. Laxmibai Aannnaso Shahapure
Kanwad, Tal. Shirol
Kolhapur
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. Sanjay P. Borwal PRESIDENT
 HON'ABLE MR. Dinesh S. Gavali MEMBER
 HON'ABLE MRS. Rupali D. Ghatage MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

निकालपत्र : (दिनांक: 31-12-2014 ) (व्‍दाराः- मा. श्री. संजय पी. बोरवाल, अध्‍यक्ष)  

1.     तक्रारदार यांनी सामनेवाले कनवाड ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्‍था मर्या,. कनवाड, ता. शिरोळ, जि. कोल्‍हापूर या पतसंस्‍थेत दामदुप्‍पट ठेव स्‍वरुपात गुंतविलेली रक्‍कम मागणी करुनही परत दिली नाही म्‍हणून तक्रारदारांनी प्रस्‍तुतचा तक्रार अर्ज या मंचात दाखल केला आहे.

2.          तक्रारदार यांची थोडक्‍यात तक्रार अशी आहे की,   तक्रारदार हे एकाच कुटूंबातील आहेत. तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.1  सामनेवाले कनवाड ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्‍था मर्या,. कनवाड, ता. शिरोळ, जि. कोल्‍हापूर (यापुढे संक्षिप्‍तेसाठी “पतसंस्‍था” असे संबोधण्‍यात येईल) या पतसंस्‍थेत दामदुप्‍पट ठेव स्‍वरुपात गुंतविलेली होती त्‍याचा तपशील खालीलप्रमाणेः-

अ.क्र.

ठेव पावती

 क्र.

ठेव रक्‍कम

 रु.

ठेव ठेवलेची

 तारीख

मुदत संपलेची तारीख

मुदतीनंतर मिळणारी रक्‍कम /

व्‍याज दर %

1

135

   15,000/-

27-03-2006

26-11-2012

30,000/-

2

125

    2,000/-

12-09-2005

11-05-2012

 4,000/

 3.         तक्रारदार क्र. 1 व 3 यांच्‍या वि.प. कडे ठेव रक्‍कमांचा तपशिल असून तक्रारदार  क्र. 2 व 4 यांच्‍या  दामदुप्‍पट रक्‍कमांच्‍या पावत्‍यावंर तक्रारदार क्र. 2 व 4 यांनी कर्जाची उचल  केलेमुळे वि.प. यांनी ठेवीच्‍या मुळ पावत्‍या संस्‍थेच्‍या दप्‍तरी तारण म्‍हणून जमा करुन घेऊन तक्रारदार क्र. 2 व 4 यांना कर्जप्रकरणाच्‍या पावत्‍या दिलेल्‍या आहेत.   तक्रारदार यांना कर्ज पावती क्र. 146 व 145 अशा पावत्‍या दिलेल्‍या आहेत.  तक्रारदार यांनी मुदतपूर्ण ठेव रक्‍कमा परत मिळणेबाबत वारंवार वि.प. यांचेकडे मागणी केली परंतु वि.प. यांनी दिली नाही. तदनंतर तक्रारदार यांनी सामनेवाले क्र. 1- पतसंस्‍थेकडे दामदुप्‍पट ठेव स्‍वरुपात गुंतविलेली ठेवीच्‍या रक्‍कमांची मुदत संपलेनंतर रक्‍कमेची मागणी व्‍याजासह केली असता पतसंस्‍थेने रक्‍कमा दिल्‍या नाहीत तसेच सामनेवाले यांनी तक्रारदारांची फसवणुक केली. तक्रारदार यांनी पुढील आपले कुटुंबाचे भवितव्‍यासाठी व मुलांचे शिक्षणासाठी ठेवींच्‍या रक्‍कमा ठेवलेल्‍या होत्‍या.  तक्रारदारांनी त्‍यांचे कौंटुबिक अडी-अडीअडचणीसाठी, वृधत्‍वातील औषधोपचाराची तरतुद व शैक्षणिक खर्चासाठी रक्‍कमांची तक्रारदारांना ठेवींच्‍या रक्‍कमांची अत्‍यंत निकड होती.  तेव्‍हा तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे मुदत संपलेनंतर रक्‍कमांची मागणी केली असता, सामनेवाले पतसंस्‍था यांनी तक्रारदार यांना ठेवीच्‍या रक्‍कमा दिल्‍या नाहीत.  सामनेवाले यांनी वर नमूद ठेवीच्‍या रक्‍कमा देण्‍यास टाळाटाळ केली अशी तक्रारदार यांची तक्रार आहे.  सबब, सामनेवाले यांनी तक्रारदारास सामनेवाले यांचेकडून ठेव पावत्‍याच्‍या रक्‍कमा तसेच त्‍यावरील व्‍याजाची मागणी केली. तक्रारदारांनी त्‍यांचे वर नमूद परिच्‍छेद कलम-2 नुसार आज अखेर होणारी एकूण  दामदुप्‍पट ठेव + व्‍याज अशी एकुण ठेव पावतीच्‍या व्‍याजासह रक्‍कमा तक्रारदारांना वसुल होऊन मिळाव्‍यात अशी मागणी केलेली आहे.

4.    तक्रारदारांनी त्‍यांचे तक्रारीसोबत एकूण 7 कागदपत्रे दाखल केली आहेत.  अ. क्र.  1 ते 4  कडे दामदुप्‍पट ठेव पावती व ठेव कर्ज प्रकरणात दिलेली पावतीच्‍या सत्‍यप्रती, अ.क्र. 5 व 6 कडे  सहा. निबंधक यांचेकडे तक्रारदार यांनी दिलेला अर्ज अ.क्र. 7 कडे संचालक यादी इत्‍यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.  तक्रारीसोबत शपथपत्र दाखल केले आहे.  

5.  सामनेवाला नं. 1 ते 12  यांना मंचाची नोटीस लागू होऊन ते हजर झाले परंतु त्‍यांनी म्‍हणणे दाखल केले नाही.   त्‍यांचेविरुध्‍द दि. 30-12-2014 रोजी “नो-से” चा आदेश पारीत करणेत आला. 

 6.          तक्रारदार यांची तक्रार, दाखल कागदपत्रे तसेच अनुषांगिक कागदपत्रे, वि.प. म्‍हणणे तसेच तक्रारदार यांचे वकिलांचा युक्‍तीवादचा विचार करता, तक्रारीच्‍या न्‍यायनिर्णयासाठी खालील मुद्दे मंचापुढे उपस्थित होतात.

अ.क्र.

मुद्दे

    उत्‍तर

 1

तक्रारदार हे ग्राहक आहे‍त काय ?

    होय

2

सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दयावयाच्‍या सेवेत त्रुटी केली आहे काय ?

    होय

3

तक्रारदार कोणता मानसिक त्रासापोटी / अनुतोष मिळण्‍यास पात्र आहेत काय ?

अंतिम आदेशाप्रमाणे

 4

आदेश काय ?

तक्रार अंशतः मंजूर

विवेचन-

 मुद्दा क्र. 1 

      तक्रारदार यांनी  दामदुप्‍पट ठेव स्‍वरुपात  गुंतविलेल्‍या रक्‍कमेच्‍या पावतीच्‍या छायांकित प्रती सादर केल्‍या आहेत.  सामनेवाले यांनी तक्रारदार यांची ठेव स्‍वरुपात भरलेली रक्‍कम नाकारलेली नाही.  दामदुप्‍पट ठेव स्‍वरुपात गुंतविलेल्‍या रक्‍कमेचा विचार होता, तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे, म्‍हणुन मुद्दा क्र.1 चे उत्‍तर मंच होकारार्थी देत आहे.

  मुद्दा क्र. 2

         प्रस्‍तुत प्रकरणात तक्रारदार यांनी तक्रारीचे अनुषंगाने दाखल केलेली कागदपत्रे पाहता, तक्रारदार यांनी पतसंस्‍थेत दामदुप्‍पट ठेव स्‍वरुपात गुंतविलेली रक्‍कम ठेवलेली आहे ही बाब सिध्‍द होते. तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्‍याकडे  दामदुप्‍पट ठेव स्‍वरुपात गुंतविलेली रक्‍कम परत करणे हे पतसंस्‍थेचे कर्तव्‍य होते. तक्रारदार यांनी ठेवींची रक्‍कम अद्याप मागणी करुनही सामनेवाला यांनी दिलेली नाही.  त्‍यामुळे तक्रारी अद्यापी सातत्‍याने कारण घडत आहे.  सबब, प्रस्‍तुतची तक्रार मुदतीत आहे.   परंतु मागणी करुनही रक्‍कम न देणे ही सामनेवाले यांची तक्रारदार यांना दयावयाच्‍या सेवेतील त्रुटी आहे असे या मंचाचे मत आहे,  म्‍हणुन मुद्दा क्र. 2 चे उत्‍तर मंच होकारार्थी देत आहे.

 मुद्दा क्र. 3

      तक्रारदार यांनी दाखल केलेली ठेव रक्‍कमेवर व्‍याजासह होणारी रक्‍कम सामनेवाले क्र. 1 ते 12 यांच्‍याकडून मिळावी अशी विनंती केली आहे.  या संदर्भात मा. मुंबई उच्‍च न्‍यायालय, खंडपीठ औरंगाबाद यांनी रिट याचिका क्र.5223/09 सौ.वर्षा रविंद्र ईसाई विरुध्‍द राजश्री राजकुमार चौधरी  या न्‍यायिक दृष्‍टांतामध्‍ये पुढीलप्रमाणे मत व्‍यक्‍त केले आहे.

“As has been recorded above, I am of the view that a society registered under the provision of Maharashtra Co-operative Societies Act 1960, although can be proceeded against and a complaint under the provision of Consumer Protection Act is entertain able against the society, the Directors of members of the managing committee cannot be held responsible in view of the scheme of Maharashtra Co-operative Societies Act. To hold the Directors of the banks/members of the managing committee of the societies responsible, without observing the procedure prescribed under the Act, would also be against the principles of co-operation, which is the very foundation of establishment of the co-operative societies”.

       वरील न्‍यायिक दृष्‍टांतामध्‍ये संचालकांना ठेवीच्‍या रक्‍कमा देण्‍यासाठी वैयक्तिक व संयुक्तिकरित्‍या जबाबदार ठरविता येणार नाही असे तत्‍व विषद करण्‍यात आले आहे. त्‍यामुळे सामनेवाले क्र. 2 ते 12 यांना वैयक्तिक व संयुक्तिकरित्‍या जबाबदार ठरविता येणार नाही. तक्रारदार हे सामनेवाले क्र. 1 सामनेवाले कनवाड ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्‍था मर्या,. कनवाड, ता. शिरोळ, जि. कोल्‍हापूर यांच्‍याकडून वर  कलम  2 मध्‍ये नमूद दामदुप्‍पट ठेव स्‍वरुपात ठरलेप्रमाणे नमूद व्‍याजासह रक्‍कम द्यावी व त्‍यानंतर द.सा.द.शे. 6 टक्‍के व्‍याजासह मिळोपावेतो परत देण्‍यास सामनेवाले क्र. 1 पतसंस्‍था हे जबाबदार आहेत असे या मंचाचे मत आहे. 

            तसेच, तक्रारदार यांना सामनेवाले यांनी ठरलेप्रमाणे दामदुप्‍पट ठेव खात्‍यातील रक्‍कम न दिल्‍याने सेवेत त्रुटी केली आहे, त्‍यामुळे तक्रारदारांना मानसिक त्रास झाला तसेच सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले. त्‍यामुळे सामनेवाले पतसंस्‍था यांच्‍याकडून मानसिक त्रासापोटी रु. 2,000/- व अर्जाच्‍या खर्चापोटी रक्‍कम रु. 1,000/- वसुल होऊन मिळण्‍यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.

  मुद्दा क्र.4 -   सबब, मंच पुढीलप्रमाणे आदेश देत आहे.

                                             आदेश

1 .       तक्रारदारांचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्‍यात येतो.

2 .       सामनेवाले क्र. 1- सामनेवाले कनवाड ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्‍था मर्या,. कनवाड, ता. शिरोळ, जि. कोल्‍हापूर  यांनी तक्रारदार यांना न्‍यायनिर्णयातील परिच्‍छेद कलम- 2 मध्‍ये नमुद असलेली  दामदुप्‍पट ठेव खातेतील रक्‍कम ठरलेप्रमाणे व्‍याजासह अदा करावी व त्‍यानंतर द.सा.द.शे. 6 टक्‍के प्रमाणे संपूर्ण रक्‍कम व्‍याजासह मिळोपावेतो अदा करावी.

3.      सामनेवाले क्र. 1- सामनेवाले कनवाड ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्‍था मर्या,. कनवाड, ता. शिरोळ, जि. कोल्‍हापूर यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रु. 2,000/- (अक्षरी रुपये दोन हजार फक्‍त) तसेच तक्रार अर्जाचा खर्च रक्‍कम रु. 1,000/-(अक्षरी रुपये एक हजार फक्‍त) अदा करावेत.

4.   वर नमूद आदेश क्र. 2 मधील रक्‍कमेपैकी काही रक्‍कम अगर व्‍याज अदा केले असल्‍यास अथवा त्‍यावर कर्ज दिले असल्‍यास सदरची रक्‍कम वजावट करुन उर्वरीत रकमा अदा कराव्‍यात.    

5.     आदेशाच्‍या प्रमाणित प्रतीं उभय पक्षकारांना विनामुल्‍य पाठविण्‍यात याव्‍यात.

 

 
 
[HON'ABLE MR. Sanjay P. Borwal]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. Dinesh S. Gavali]
MEMBER
 
[HON'ABLE MRS. Rupali D. Ghatage]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.