न्या य नि र्ण य
द्वारा – मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्यक्षा
- तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 2019 चे कलम 35 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे—
वि.प.क्र.1 ही नोंदणीकृत सहकारी संस्था असून वि.प.क्र.2 ते 12 हे सदर संस्थेचे विदयमान नवनिर्वाचित संचालक मंडळ असून त्यामध्ये अ.क्र.2 ते 4 व 10 हे भूतपूर्व संचालक असून नवनिर्वाचित संचालक मंडळात आहेत. वि प क्र.13 ते 22 हे भूतपूर्व संचालक असून त्यांच्या कारकिर्दीमध्ये तक्रारदार यांनी ठेवींचा व्यवहार केलेला होता. वि प क्र.23 हे व्यवस्थापक आहेत. तसेच सदया सदर संस्थेवर अवसायकांची नेमणूक माहे जुलै-2018 मध्ये झालेली आहे. तक्रारदार यांनी वि.प.क्र.1 संस्थेमध्ये खालीलप्रमाणे दामदुप्पट ठेव रक्कमा ठेवलेल्या आहेत.
कोष्टक क्र.1
अ.क्र. | ठेवपावती खाते क्र. | ठेव ठेवलेचा दिनांक | मुदत संपलेचा दि. | ठेव ठेवलेली रक्कम | मुदतीनंतर मिळणारी रक्कम |
1 | 2042 | 10/11/2001 | 09/11/2006 | 10000/- | 20000/- |
2 | 3412 | 19/03/2003 | 19/08/2008 | 10000/- | 20000/- |
3 | 3413 | 19/03/2003 | 19/08/2008 | 10000/- | 20000/- |
4 | 3414 | 19/03/2003 | 19/08/2008 | 10000/- | 20000/- |
5 | 3415 | 19/03/2003 | 19/08/2008 | 10000/- | 20000/- |
6 | 5978 | 10/01/2006 | 10/10/2012 | 9500/- | 19000/- |
7 | 5979 | 10/01/2006 | 10/10/2012 | 9500/- | 19000/- |
8 | 5980 | 10/01/2006 | 10/10/2012 | 9500/- | 19000/- |
9 | 5981 | 10/01/2006 | 10/10/2012 | 9500/- | 19000/- |
10 | 5982 | 10/01/2006 | 10/10/2012 | 9500/- | 19000/- |
11 | 5983 | 10/01/2006 | 10/10/2012 | 9500/- | 19000/- |
12 | 5984 | 10/01/2006 | 10/10/2012 | 9500/- | 19000/- |
13 | 5985 | 10/01/2006 | 10/10/2012 | 9500/- | 19000/- |
14 | 5986 | 10/01/2006 | 10/10/2012 | 9000/- | 18000/- |
15 | 6115 | 09/03/2006 | 09/12/2012 | 8000/- | 16000/- |
16 | 6116 | 10/01/2006 | 10/10/2012 | 8000/- | 16000/- |
17 | 6117 | 10/01/2006 | 10/10/2012 | 8000/- | 16000/- |
18 | 6118 | 10/01/2006 | 10/10/2012 | 8000/- | 16000/- |
19 | 6119 | 10/01/2006 | 10/10/2012 | 8000/- | 16000/- |
तक्रारदार यांनी वि.प.क्र.1 संस्थेमध्ये खालीलप्रमाणे मुदतबंद ठेव रक्कमा ठेवलेल्या आहेत.
कोष्टक क्र.2
अ.क्र. | ठेवपावती खाते क्र. | ठेव ठेवलेचा दिनांक | मुदत संपलेचा दि. | ठेव ठेवलेली रक्कम | व्याजदर |
1 | 2354 | 20/03/1998 | 91 दिवस | 9500/- | 16 % |
2 | 2355 | 20/03/1998 | 91 दिवस | 9500/- | 16 % |
3 | 2356 | 20/03/1998 | 91 दिवस | 9500/- | 16 % |
4 | 2381 | 20/03/1998 | 91 दिवस | 9500/- | 16 % |
5 | 2382 | 20/03/1998 | 91 दिवस | 9000/- | 16 % |
6 | 2383 | 20/03/1998 | 91 दिवस | 9000/- | 16 % |
7 | 2384 | 20/03/1998 | 91 दिवस | 9000/- | 16 % |
8 | 2385 | 20/03/1998 | 91 दिवस | 9000/- | 16 % |
9 | 2386 | 20/03/1998 | 91 दिवस | 9000/- | 16 % |
10 | 2387 | 20/03/1998 | 91 दिवस | 9000/- | 16 % |
11 | 2388 | 20/03/1998 | 91 दिवस | 9000/- | 16 % |
12 | 2389 | 20/03/1998 | 91 दिवस | 9000/- | 16 % |
13 | 2390 | 20/03/1998 | 91 दिवस | 9000/- | 16 % |
14 | 2391 | 20/03/1998 | 91 दिवस | 9000/- | 16 % |
15 | 2392 | 20/03/1998 | 91 दिवस | 9000/- | 16 % |
16 | 2393 | 20/03/1998 | 91 दिवस | 9000/- | 16 % |
17 | 2394 | 20/03/1998 | 91 दिवस | 9000/- | 16 % |
18 | 2395 | 20/03/1998 | 91 दिवस | 9000/- | 16 % |
19 | 2396 | 20/03/1998 | 91 दिवस | 9000/- | 16 % |
20 | 2397 | 20/03/1998 | 91 दिवस | 9000/- | 16 % |
21 | 2398 | 20/03/1998 | 91 दिवस | 9000/- | 16 % |
22 | 2399 | 20/03/1998 | 91 दिवस | 9000/- | 16 % |
23 | 1647 | 26/12/1998 | 91 दिवस | 10000/- | 16 % |
24 | 1446 | 28/01/1999 | 91 दिवस | 5000/- | 16 % |
25 | 209 | 04/05/1999 | 91 दिवस | 10000/- | 16 % |
26 | 210 | 04/05/1999 | 91 दिवस | 5000/- | 16 % |
27 | 213 | 05/05/1999 | 91 दिवस | 10000/- | 16 % |
28 | 2175 | 22/11/1999 | 91 दिवस | 9000/- | 16 % |
29 | 2176 | 22/11/1999 | 91 दिवस | 9000/- | 16 % |
30 | 2177 | 22/11/1999 | 91 दिवस | 4000/- | 16 % |
31 | 2510 | 04/01/2000 | 91 दिवस | 2000/- | 14 % |
32 | 2941 | 12/02/2000 | 91 दिवस | 10000/- | 15 % |
33 | 2942 | 12/02/2000 | 91 दिवस | 10000/- | 15 % |
34 | 2943 | 12/02/2000 | 91 दिवस | 10000/- | 15 % |
35 | 2944 | 12/02/2000 | 91 दिवस | 10000/- | 15 % |
36 | 2945 | 12/02/2000 | 91 दिवस | 10000/- | 15 % |
37 | 3776 | 16/05/2000 | 91 दिवस | 10500/- | 15 % |
सदर ठेवीची मुदत संपली असून तक्रारदारांनी अनेक वेळा वि.प. यांचेकडे व्याजासह होणा-या रकमेची मागणी केली असता वि.प. यांनी सदरची रक्कम परत करण्यास टाळाटाळ केली. तक्रारदारयांनी वि प यांचेशी वेळोवेळी संपर्क साधला असता वि प यांनी उध्दट वर्तन केलेले आहे. शेवटी दि.16/0/2018 रोजी वि प क्र. 1 ते 23 यांना तक्रारदारांनी वकीलामार्फत नोटीस पाठविली परंतु तरीही वि.प. यांनी त्यास कोणतेही उत्तर दिलेले नाही. सबब, वर नमूद तपशीलाप्रमाणे तक्ता क्र.1 मधील दामदुप्पट ठेवीची रक्कम व तक्ता क्र.2 मधील मुदत ठेवीची रक्कम व त्यावरील व्याजासह होणारी एकूण रक्कम रु.17,63,792/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रु. 25,000/- व मानसिक शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.75,000/- देणेचा आदेश वि.प. यांना व्हावा अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
2. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत ठेवपावतीची प्रत, तक्रारदारांनी वि.प. यांना पाठविलेली नोटीस, सदर नोटीसची पोस्टाची पावती व पोहोच पावती, वि प संस्थेच्या संचालकांची यादी इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रारदाराने पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
3. प्रस्तुतकामी वि.प. क्र.1, 2, 4 ते 7, 9 ते 14, 16 ते 23 यांना नोटीस लागू होउुनही ते सदर कामी गैरहजर असलेने सदर वि प क्र. 1, 2, 4 ते 7, 9 ते 14, 16 ते 23 यांचे विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला. वि प क्र.3, 8 व 15 हे मयत असलेने त्यांना प्रस्तुत प्रकरणातून वगळण्याचा दि.17/12/2021 रोजी तक्रारदाराने अर्ज दिला. त्याप्रमाणे तक्रारदाराने वि प क्र.3, 8 व 15 यांना प्रस्तुत प्रकरणातून वगळण्यात आले.
6. तक्रारदारांचा तक्रारअर्ज, दाखल केलेली अनुषंगिक कागदपत्रे, पुराव्याचे शपथपत्र तसेच वि.प. यांचे म्हणणे व कागदपत्रे यांचा विचार करता निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदाराचा तक्रार अर्ज मुदतीत आहे काय ? | होय |
2 | तक्रारदार हे वि प यांचे ग्राहक आहेत काय? | होय. |
3 | वि प यांनी तक्रारदारांना दयावयाचे सेवेत त्रुटी केली आहे काय ? | होय वि प क्र.1 यांनी |
4 | तक्रारदार हे ठेवींची व्याजासहीत होणारी रक्कम व मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
5 | अंतिम आदेश काय ? | अंशतः मंजूर. |
मुद्दा क्र. 1 –
7. प्रस्तुत कामी तक्रारदार यांनी विलंब माफीचा अर्ज दाखल केला होता. सदर अर्जातील कारणांचा विचार करता या आयोगाने सदरचा अर्ज मंजूर केलेला आहे. तसेच वि प यांनी तक्रारदाराच्या ठेवीच्या रक्कमा तक्रारदारास अदा केलेल्या नसलेने continue cause of action सुरु आहे. सबब मुद्दा क्र.1 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र. 2 –
8. प्रस्तुतकामी तक्रारदार यांनी वि.प. संस्थेमध्ये ठेव ठेवलेली आहे. तक्रारदार यांनी तक्रारीसोबत दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारीसोबत ठेवपावतीची सत्यप्रत दाखल केली आहे. सदर पावतीचे अवलोकन केले असता, त्यावर वि.प.क्र.1 संस्थेचे नांव नमूद आहे. तसेच सदर पावत्यांवर संस्थेच्या सभापती, सेक्रेटरी यांच्या सहया आहेत. वरील सर्व बाबींवरुन तक्रारदार यांनी वि.प.क्र.1 पतसंस्थेत ठेव ठेवलेली आहे ही बाब सिध्द होते. त्याकारणाने ठेव स्वरुपात गुंतवलेल्या रकमेचा विचार करता, तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.3 व 4
9. तक्रारदाराचे कथनानुसार, तक्रारदारांनी वि.प.क्र.1 यांचेकडे वर नमूद रकमेची मागणी केली असता वि.प. यांनी सदरची रक्कम देणेस टाळाटाळ केली. वि.प. यांनी त्यांचे लेखी म्हणण्यामध्ये तक्रारदाराची ठेव रक्कम परत न करण्याबाबत जी कारणे नमूद केली आहेत, ती कारणे कायदेशीर कारणे नाहीत. ठेवीदाराने मागणी केल्यानंतर किंवा ठेवींची मुदत संपल्यानंतर ठेवपावतीमध्ये नमूद केल्याप्रमाणे ठेव रक्कम व्याजासह परत मिळण्याचा तक्रारदाराचा अधिकार आहे. तक्रारदार यांनी ठेवीदार या नात्याने वि.प. संस्थेत ठेवी ठेवलेल्या आहेत व ठेवीदार म्हणून सदर ठेवींची रक्कम परत मिळण्याचा त्यांना अधिकार आहे. ठेवींची मुदत संपल्यानंतर तक्रारदार यांची ठेव रक्कम व्याजासहीत परत करणेची जबाबदारी वि.प. यांची होती. तथापि सदरची कायदेशीर देय असणारी रक्कम तक्रारदार यांना अदा न करुन वि.प. क्र.1 यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.3 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
10. सदर कामी वि प क्र.3, 8, 15 मयत असलेने तक्रारदाराने सदर वि प यांना प्रस्तुत कामातून वगळलेले आहे. प्रस्तुतकामी तक्रारदाराने वि.प.क्र.2 ते 23 यांना तक्रारदारांची ठेव रक्कम परत करण्यात जबाबदार धरण्यात यावे अशी मागणी केली आहे. परंतु ठेवीदारांच्या रकमा परत करण्यास पतसंस्थेस जबाबदार धरण्यात यावे, पतसंस्थेच्या पदाधिका-यांना जबाबदार धरता येणार नाही असा दंडक वरिष्ठ न्यायालयांनी घालून दिला आहे. सदरकामी खालील वरिष्ठ न्यायालयांचे न्यायनिवाडयाचा आधार हे आयोग घेत आहे.
- Revision petition No. 985/2017, N.C.Delhi
- Revision Petition No. 3350 of 2018 National Commission, New Delhi
K.B. Magdum Vs. Balesh Shivappa Sasalatt
However, so far as members of the Managing Committee/Directors are concerned, they stand on a different footing and unless the procedure prescribed under the Special enactment i.e. Maharashtra Cooperative Societies Act, 1960 is followed and unless the liability is fixed against them, they cannot be held responsible in respect of payment of any dues recoverable from the society.
- 2017 (3) CPJ 645
Revision Petition No. 975 and 986/2017 dated 16/8/2017 National
Commission
V.C. Sindhwani (Vazir Chand Sindhwani)
Vs.
The PNB Employee Cooperative Thrift and Credit Society.
Consumer complaint against office bearers – allowed – Revision petition – office bearers of any cooperative society do not fall in category of service provider in respect of dealing with society – No evidence on record that petitioner has personally defrauded complainant in any manner – complaint dismissed against petitioner.
It is clear that a cooperative society on registration is a rendered body corporate, meaning thereby that it acquires an identity distinct from its member shareholders or the office bearers. Therefore, in our considered view, if a consumer has availed of services of the cooperative credit society for consideration, the cooperative credit society alone would be service provider qua that consumer and the office bearers of the said society who by virtue of being elected to the said position to manage the affairs of the society would have no privity of contract with the consumer and could not be termed as service provider. In our aforesaid view, we find support from the judgment of Bombay High Court in the matter of Sou. Varsha Ravindra Isai Vs. Sou. Rajashri Rajkumar Chaudhari & Ors.
सबब, वरील न्यायनिवाडयातील दंडकाचा विचार करता, ग्राहकाने पतसंस्थेकडून सेवा घेतली असेल तर तो पतसंस्थेचा ग्राहक होईल. पतसंस्थेच्या पदाधिकारी यांनी फसवणूक केली नसेल तर ते जबाबदार नाहीत असा दंडक मा. वरिष्ठ न्यायालयांनी घालून दिला आहे. तक्रारदाराने याकामी वि प क्र.3, 8 व 15 यांना कामातून वगळलेले आहे. सबब सदर वि प क्र.3, 8 व 15 यांना याकामी जबाबदार धरता येणार नाही. तसेच वि प क्र.2 ते 7, 9 ते 14 व 16 ते 23 यांना सदरकामी जबाबदार धरता येणार नाही या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, वरील सर्व कारणांचा विचार करता तक्रारदार हे वि.प.क्र.1 पतसंस्थेकडून ठेवरक्कम परत मिळण्यास पात्र आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
10. सबब, तक्रारदार हे वि.प.क्र.1 पतसंस्थेकडून तक्रारदारांच्या न्यायनिर्णय कलम 1 मध्ये नमूद केलेल्या कोष्टक क्र.1 मधील दामदुप्पट ठेव पावतीवरील दामदुप्पट रक्कम मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. तसेच मुदत संपले तारखेनंतर संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत सदर पावत्यांवरील मूळ ठेव रक्कमेवर द.सा.द.शे.6 टक्के व्याज मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. तसेच कोष्टक क्र.2 मधील मुदतबंद ठेव पावतीवरील मुदतीनंतर व्याजासह देय असलेली रक्कम मिळणेस पात्र आहेत. तसेच सदर ठेवीची मुदत संपलेनंतर सदर ठेवीचे मूळ रकमेवर सदरची संपूर्ण रक्कम तक्रारदार यांना मिळेपावेतो द.सा.द.शे. 6 टक्के प्रमाणे व्याज मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
11. प्रस्तुत कामी वि.प.क्र.1 पतसंस्था यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेने तक्रारदार यांना मानसिक त्रास व शारिरिक त्रास झाला तसेच सदरचे तक्रारअर्जासाठी खर्च करावा लागला. त्याकारणाने तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्कम रु. 5,000/- वि.प.क्र.1 पतसंस्थेकडून मिळणेस पात्र आहेत. सबब, मुद्दा क्र. 3 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे. सबब, याकामी खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्यात येतो.
| - आ दे श - - तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
- वि.प.क्र.1 पतसंस्थेने तक्रारदारांना न्यायनिर्णय कलम 1 मध्ये नमूद केलेल्या कोष्टक क्र.1 मधील दामदुप्पट ठेव पावतीवरील दामदुप्पट रक्कम अदा करावी. तसेच मुदत संपले तारखेनंतर संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत सदर पावत्यांवरील मूळ ठेव रक्कमेवर द.सा.द.शे.6 टक्के व्याज अदा करावे. तसेच कोष्टक क्र.2 मधील मुदतबंद ठेव पावतीवरील मुदतीनंतर व्याजासह देय असलेली रक्कम अदा करावी. तसेच सदर ठेवीची मुदत संपलेनंतर सदर ठेवीचे मूळ रकमेवर सदरची संपूर्ण रक्कम तक्रारदार यांना मिळेपावेतो द.सा.द.शे. 6 टक्के प्रमाणे व्याज अदा करावे.
- वि.प.क्र.1 पतसंस्थेने तक्रारदारांना मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्कम रु. 5,000/- अदा करावी.
- वि प क्र.2 ते 7, 9 ते 14 व 16 ते 23 यांना याकामी जबाबदार धरण्यात येत नाही. तसेच वि प क्र.3, 8 व 15 हे मयत असलेने तक्रारदाराने त्यांना सदर कामातून वगळलेले असलेने त्यांचे विरुध्द कोणतेही आदेश नाहीत.
- जर वरील ठेवींपोटी काही रक्कम वि.प. यांनी यापूर्वी तक्रारदारास अदा केली असेल तर ती वळती करुन घेण्याचा वि.प. यांचा हक्क सुरक्षित ठेवण्यात येतो.
- वर नमूद सर्व आदेशांची पुर्तता वि.प.क्र.1 यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.
- विहीत मुदतीत आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदयातील तरतुदींप्रमाणे वि.प. विरुध्द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
- आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.
|