जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर.
तक्रार अर्ज क्रमांक - 64/2011
तक्रार अर्ज दाखल तारीखः- 04/02/2011
तक्रार अर्ज निकाल तारीखः- 06/10/2015
श्री.मंगलदास सिताराम सपकाळे, ..........तक्रारदार
उ व सज्ञान धंदा नोकरी,
रा.आवास क्र.2108/बी,
आयुध निर्माणी इस्टेट,इटारसी (मध्यप्रदेश)
विरुध्द
1. जैन इरिगेशन सिस्टीम लि(मॅनेजर/प्रतिनीधी), .....सामनेवाला.
उ व सज्ञान धंदा नोकरी,
नॅशनल हायवे क्र.46,बांभोरी,जळगांव.
2. जैन इरिगेशन सिस्टीम लि,
(शेअर्स डिपार्टमेंट/माहितगार व्यक्ती)
जैन व्हॅली,शिरसोली रोड,जळगांव.
कोरम –
श्री.व्हि.आर.लोंढे. अध्यक्ष.
श्रीमती.पुनम नि. मलिक. सदस्या.
तक्रारदार तर्फे अड.श्रृध्दा एस.काबरा.
सामनेवाले तर्फे अड.आर.एन.पाटील.
नि का ल प त्र
द्वारा – मा.श्रीमती. पुनम नि.मलिक,सदस्या
तक्रारदार यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सामनेवाला यांनी तक्रारदारांना शेअर्सची रक्कम न देवुन सेवेत त्रुटी केली ती मिळण्यासाठी दाखल केलेली आहे.
तक्रारदार यांची तक्रार थोडक्यात येणेप्रमाणे.
तक्रारदार हे जैन व्हॅली ओनियन प्लॉंट मध्ये दि.17/12/1995 पासुन कार्यरत होते. त्यानंतर सामनेवाला यांनी आपल्या कंपनीच्या कार्यरत लोकांना 150 शेअर्सची वाटणी केली. परंतु सदर शेअर्स हे कमी प्रमाणात असल्यामुळे तक्रारदार यांना मिळु शकले नाही. सामनेवाले यांनी तक्रारदारास अश्वासन दिले की, थोडयाच दिवसात शेअर्सची रक्कम अदा करु. काही कालावधीनंतर ईएसओपी चे 150 शेअर्स व फ्री शेअर्सचे 100 शेअर्स असे दोन्ही शेअर्स ईएसओपी च्या लॉट मधुनच देण्यात आले. सदरचे शेअर्स कंपनीत कार्यरत असलेल्या 10 लोकांना अदा करण्यात आले होते. सदरच्या शेअर्सची बाजारमुल्य रक्कम रु.1,260/- इतके आहे सदरच्या शेअर्सची एकुण किंमत रु.3,15,000/- इतकी आहे. सदरच्या शेअर्सचा मोबदला 10 लोकांपैकी 9 लोकांना मिळाला आहे. तक्रारदार यांना शेअर्सची रक्कम देण्यास सामनेवाले हे टाळाटाळ करीत आहे. सदरचे शेअर्स 9 लोकांना मिळु शकतो तर तक्रारदार यांना का मिळु शकत नाही. तक्रारदार यांनी वेळोवेळी कंपनीच्या वरिष्ठांशी संपर्क केला तरी शेअर्स अदा करण्यात आले नाही. सामनेवाले यांनी तक्रारदारास शेअर्स न देवून सेवेत त्रुटी केली म्हणुन सामनेवालेकडून तक्रारदार यांना शेअर्स रक्कम रु.3,15,000/- व त्यावर 18 टक्के व्याज मिळावे व तक्रारदारास झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 50,000/- व तक्रारीचा खर्च रु.15,000/- देण्याचा हुकूम व्हावा अशी मंचा समोर विनंती केलेली आहे.
सामनेवाले क्र.1 व 2 यांना मंचाची नोटीस मिळाली त्यांनी हजर होऊन आपला लेखी खुलासा सादर केला त्यांचे कथन असे की, तक्रारदार यांचे म्हणणे खोटे व लबाडीचे असुन त्यांना कबुल नाही. तक्रारदाराची तक्रार कायद्याने चालू शकत नाही म्हणुन रद्य .करण्यात यावी. तक्रारदार हे सामनेवाले कंपनीमध्ये काही काळ नोकरीला होते तक्रारदाराचे हे म्हणणे बरोबर आहे. शेअर्सचा मोबदला 10 लोकापैकी 9 देण्यात आला हा मजकुर खोटा व लबाडीचा असून सामनेवाले यांना कबुल नाही. तक्रारदाराने कंपनीमधे काही काळ नोकरीला होते व चांगली नोकरी लागल्यामुळे तक्रारदाराने दि.08/02/08 रोजी घरगुती अडचणीमुळे राजीनमा दिला. तक्रारदार हे कंपनी सोडून गेल्यामुळे कंपनी तक्रारदारास शेअर्स देणे बंधनकारक नाही. कर्मचा-यांना शेअर्स दयावयाचा की नाही हे ठरविण्याचा अधिकार पुर्णपणे कॉम्पेनसेशन कमीटीचा आहे. कंपनीस सेवा देणारे व कथीत निकषास पात्र असणा-या कर्मचा-यासाठी एम्लॉइज स्टॉक ऑप्शन अण्ड शेअर्स प्लान 2005 (प्लान) जाहीर करण्यात आला त्याद्वारे सेबी गाईड लाइनचे आधारे कंपीनी शेअर्स देत असते व त्यांना त्याबाबत पुर्तता करण्याचे पत्र देवून विशिष्ट कालावधीत पुर्तता केल्यानंतर पात्र कर्मचा-यांना कंपनी शेअर्स वितरीत करावयाचे किंवा नाही त्याचा निर्णय घेत असते तक्रारदार कंपनीत काम करीत असतांना विशिष्ट कालावधीत अटी शर्तीची पुर्तता केली नाही म्हणुन त्यांना शेअर्स वितरीत करण्यात आलेले नाही. तसेच तक्रारदाराने चार वर्षापासुन राजीनामा देवून नोकरी सोडून गेले आहेत. अटी शर्तीची पुर्तता न करणा-या कर्मचा-यांना शेअर्स मिळालेच पाहीजे असा कायदेशिर हक्क नाही. तक्रारदार व सामनेवाले यांच्यात ग्राहक हे नाते नाही व तक्रारदार ग्राहक या सज्ञेत बसत नाही. तक्रारदाराने खोटी तक्रार दाखल केल्यामुळे फेटाळण्यात यावी. SEBI चे मंजुरीनुसार शेअर्सची रक्क्म रोख भरावी लागते मात्र तक्रारदाराने इएसओपी चे शेअर्स मंजुर केल्याबद्यलेचे कोणतेही कागदपत्र कंपनीचे निदर्शनास आणुन दिले नाही. तक्रारदाराने त्याचे सेवा कालावधीमध्ये वरील बाबींची पुर्तता झाल्याचे कळविले नाही व इएसओपी चे शेअर्सची रक्कम भरलेली नाही. कंपनी व तक्रारदार यांच्यात विनामुल्य शेअर्स देण्याचा कोणताही करार झालेला नाही. तक्रारदाराने सेवेत नसतांना इएसओपी शेअर्सची मागणी करता येत नाही. तक्रारदार व सामनेवाले यांचे उपभोक्ता व उत्पादकर किंवा सेवेदार असे नाते नाही सबब तक्रारदाराची तक्रार खोटी व लबाडीची असल्यामुळे रु.50,000/- खर्चासह फेटाळण्यात यावी अशी मंचासमोर विनंती केलेली आहे.
तक्रारदार यांचे शपथपत्र व दस्तऐवजांचे अवलोकन केले. सामनेवाले यांनी दाखल केलेले शपथपत्र व दस्तऐवज यांचे अवलोकन केले. सामनेवाले इंशुरन्स कंपनीने लेखी युक्तीवाद सादर केले त्यांचे अवलोकन केले असता न्यायनिर्णयासाठी खालील मुद्ये उपस्थित होतात.
मुद्ये उत्तर.
1.?
2 .काय आदेश ? अंतीम आदेशाप्रमाणे.
का र ण मि मां सा
मुद्या क्र. 1 व 2 –
तक्रारदाराची तक्रार, पुराव्याचे शपथपत्र त्यांनी दाखल केलेले कागदपत्र व सामनेवाला यांचा खुलासा व दोन्ही वकीलांनी केलेला युक्तीवाद ऐकले व दाखल कागदपत्रांचे बारकाईने अवलोकन केले असता, तक्रारदार हे सामनेवाले कंपनीचे शेअर होल्डर आहेत. तक्रारदाराने सामनेवाला कंपनीचे शेअर विकत घेतलेले आहे. सदरचे शेअर खरेदी केल्यामुळे तक्रारदार हा सामनेवाला कंपनीचा भागीदार झालेला आहे. म्हणुन तक्रारदाराचे सामनेवाला यांचेशी ग्राहकाचे नाते राहीलेले नाही. सदर तक्रारदार हा ग्राहक सरंक्षण कायदा कलम 2 (i) (d) नुसार ग्राहक या संज्ञेत बसत नाही. सबब तक्रारदाराची तक्रार फेटाळण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे. म्हणुन मुद्या क्र.1 चे उत्तर आम्ही नकारार्थी देत आहोत. सबब खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आ दे श
1. तक्रारदाराची तक्रार फेटाळण्यात येते.
2. तक्रारीचा खर्च ज्यांनी त्यांनी आपापला सोसावा.
3. उभयपक्षकार यांना निकालाच्या निःशुल्क देण्यात यावे.
जळगांव.
श्रीमती.पुनम नि. मलिक श्री.विनायक आर.लोंढे
सदस्या अध्यक्ष.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगांव.