निकालपत्र : (दिनांक: 29-01-2015 ) (व्दाराः- मा. श्री. संजय पी. बोरवाल, अध्यक्ष)
प्रस्तुतच्या सर्व तक्रारीत तक्रारदार हे एकाच कुटूंबातील आहेत. सामनेवाला हे एकच आहेत. तक्रारदारांच्या सर्व तक्रारीचे व मागणीचे स्वरुप एकच असलेमुळे सर्व तक्रारींमध्ये एकत्रितरित्या निकालप्रत पारित करणेत येते.
1. तक्रारदार यांनी सामनेवाले इंदिरा नागरी सहकारी पतसंस्था मर्या,. कागल, ता. कागल, जि. कोल्हापूर या पतसंस्थेत कॉल ठेव, मुदत ठेव स्वरुपात व सेव्हिंग्ज खातेमधील गुंतविलेली रक्कम मागणी करुनही परत दिली नाही म्हणून तक्रारदारांनी प्रस्तुतचा तक्रार अर्ज या मंचात दाखल केला आहे.
2. तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की, तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.1 सामनेवाले इंदिरा नागरी सहकारी पतसंस्था मर्या,. कागल, ता. कागल, जि. कोल्हापूर (यापुढे संक्षिप्तेसाठी “पतसंस्था” असे संबोधण्यात येईल) या पतसंस्थेत कॉल ठेव, मुदत ठेव स्वरुपात व सेव्हिंग्ज खातेमधील गुंतविलेली होती त्याचा तपशील खालीलप्रमाणेः-
अ.क्र. | तक्रार क्र. | ठेव पावती क्र. | ठेव रक्कम रु. | ठेव ठेवलेची तारीख | ठेव |
1 | 169/2014 | 1382 | 13,000/- | 14-11-1993 | कॉल ठेव |
2 | 169/2014 | 0450 | 15,000/- | 03-03-1995 | कॉल ठेव |
3 | 169/2014 | 1709 | 50,000/- | 31-05-1995 | कॉल ठेव |
4 | 169/2014 | सेव्हिंग्ज खाते नं. 818 | 207/- | 17-02-2013 | - |
5 | 170/2014 | 0177 | 8,190/- | 25-10-1996 | कॉल ठेव |
6 | 170/2014 | 9524 | 9,600/- | 07-07-2000 | कॉल ठेव |
7 | 170/2014 | 9525 | 9,600/- | 07-07-2000 | कॉल ठेव |
8 | 170/2014 | 9526 | 9,600/- | 07-07-2000 | कॉल ठेव |
9 | 170/2014 | 9527 | 9,600/- | 07-07-2000 | कॉल ठेव |
10 | 170/2014 | 9528 | 9,600/- | 07-07-2000 | कॉल ठेव |
11 | 170/2014 | 9529 | 9,600/- | 07-07-2000 | कॉल ठेव |
12 | 170/2014 | 3577 | 9,500/- | 07-07-2000 | कॉल ठेव |
13 | 170/2014 | 3588 | 13,000/- | 14-08-2000 | कॉल ठेव |
14 | 170/2014 | खाते नं.1728 | 18,551/- | - | कॉल ठेव |
15 | 170/2014 | सेव्हिंग्ज खाते नं. 874 | 6,274/- | - | - |
16 | 171/2014 | 1365 | 13,000/- | 12-11-1993 | कॉल ठेव |
17 | 171/2014 | 1379 | 13,000/- | 14-11-1993 | कॉल ठेव |
18 | 171/2014 | 1189 | 12,000/- | 25-01-1994 | कॉल ठेव |
19 | 171/2014 | 7293 | 5,194/- | 07-04-1999 | कॉल ठेव |
20 | 172/2014 | 3479 | 16,000/- | 23-02-2000 | कॉल ठेव |
21 | 172/2014 | 3497 | 11,500/- | 11-03-2000 | कॉल ठेव |
22 | 172/2014 | 3578 | 9,500/- | 07-07-2000 | कॉल ठेव |
23 | 172/2014 | 9530 | 9,600/- | 07-07-2000 | कॉल ठेव |
24 | 172/2014 | 9531 | 9,600/- | 07-07-2000 | कॉल ठेव |
25 | 172/2014 | 9532 | 9,600/- | 07-07-2000 | कॉल ठेव |
26 | 172/2014 | 9533 | 9,600/- | 07-07-2000 | कॉल ठेव |
27 | 172/2014 | 9534 | 9,600/- | 07-07-2000 | कॉल ठेव |
28 | 172/2014 | 9535 | 9,600/- | 07-07-2000 | कॉल ठेव |
29 | 172/2014 | 9536 | 9,600/- | 07-07-2000 | कॉल ठेव |
30 | 172/2014 | 3589 | 12,000/- | 14-08-2000 | कॉल ठेव |
31 | 172/2014 | कॉल डिपॉझिट पासबुक नं. खाते नं. 1371 | 12,000/- | 2-09-2000 | कॉल ठेव |
32 | 172/2014 | 7650 | 22,150/- | 13-02-2001 | कॉल ठेव |
33 | 173/2014 | 1380 | 13,000/- | 14-11-1993 | कॉल ठेव |
34 | 173/2014 | 1168 | 13,000/- | 07-01-1994 | कॉल ठेव |
35 | 173/2014 | 1171 | 13,000/- | 07-01-1994 | कॉल ठेव |
36 | 173/2014 | 0978 | 5,000/- | 05-09-1997 | कॉल ठेव |
37 | 173/2014 | 2039 | 14,000/- | 03-08-1998 | कॉल ठेव |
38 | 173/2014 | 5745 | 11,185/- | 06-02-1999 | कॉल ठेव |
39 | 174/2014 | 1366 | 13,000/- | 12-01-1993 | कॉल ठेव |
40 | 174/2014 | 1172 | 13,000/- | 07-01-1994 | कॉल ठेव |
41 | 174/2014 | 1169 | 13,000/- | 07-01-1994 | कॉल ठेव |
42 | 174/2014 | 985 | 5,000/- | 13-09-1997 | कॉल ठेव |
43 | 174/2014 | 3587 | 10,000/- | 12-08-2000 | कॉल ठेव |
44 | 174/2014 | कॉल डिपॉझिट पासबुक नं. खाते नं. 1370 | 12,000/- | | कॉल ठेव |
45 | 175/2014 | 1316 | 15,000/- | 06-07-1996 | कॉल ठेव |
46 | 175/2014 | 2038 | 14,000/- | 03-08-1998 | कॉल ठेव |
47 | 175/2014 | 5788 | 5,000/- | 16-12-1999 | कॉल ठेव |
48 | 175/2014 | 3478 | 16,000/- | 23-02-2000 | कॉल ठेव |
49 | 175/2014 | 3496 | 11,500/- | 11-03-2000 | कॉल ठेव |
50 | 175/2014 | 9518 | 9,600/- | 07-07-2000 | कॉल ठेव |
51 | 175/2014 | 9519 | 9,600/- | 07-07-2000 | कॉल ठेव |
52 | 175/2014 | 9520 | 9,600/- | 07-07-2000 | कॉल ठेव |
53 | 175/2014 | 9521 | 9,600/- | 07-07-2000 | कॉल ठेव |
54 | 175/2014 | 9522 | 9,600/- | 07-07-2000 | कॉल ठेव |
55 | 175/2014 | 9523 | 9,600/- | 07-07-2000 | कॉल ठेव |
56 | 176/2014 | 1364 | 13,000/- | 12-11-1993 | कॉल ठेव |
57 | 176/2014 | 1381 | 13,000/- | 14-11-1993 | कॉल ठेव |
58 | 176/2014 | 1167 | 13,000/- | 07-01-1994 | कॉल ठेव |
59 | 176/2014 | 1381 | 15,000/- | 05-09-1996 | कॉल ठेव |
60 | 177/2014 | 1170 | 13,000/- | 07-01-1994 | कॉल ठेव |
61 | 177/2014 | 2037 | 15,000/- | 03-08-1998 | कॉल ठेव |
62 | 177/2014 | 5743 | 10,000/- | 06-12-1999 | कॉल ठेव |
63 | 177/2014 | 5744 | 10,000/- | 06-12-1999 | कॉल ठेव |
64 | 177/2014 | 9512 | 9,600/- | 07-07-2000 | कॉल ठेव |
65 | 177/2014 | 9513 | 9,600/- | 07-07-2000 | कॉल ठेव |
66 | 177/2014 | 9514 | 9,600/- | 07-07-2000 | कॉल ठेव |
67 | 177/2014 | 9515 | 9,600/- | 07-07-2000 | कॉल ठेव |
68 | 177/2014 | 9516 | 9,600/- | 07-07-2000 | कॉल ठेव |
69 | 177/2014 | 9517 | 9,600/- | 07-07-2000 | कॉल ठेव |
70 | 177/2014 | 4599 | 7,300/- | 02-09-2000 | कॉल ठेव |
71 | 177/2014 | कॉल डिपॉझिट पासबुक नं. खाते नं. 1368 | 5,400/- | 02-09-2000 | कॉल ठेव |
72 | 178/2014 | 9544 | 9,600/- | 07-07-2000 | कॉल ठेव |
73 | 178/2014 | 9545 | 9,600/- | 07-07-2000 | कॉल ठेव |
74 | 178/2014 | 9546 | 9,600/- | 07-07-2000 | कॉल ठेव |
75 | 178/2014 | 9547 | 9,600/- | 07-07-2000 | कॉल ठेव |
76 | 178/2014 | 9548 | 9,600/- | 07-07-2000 | कॉल ठेव |
77 | 178/2014 | 9550 | 9,600/- | 07-07-2000 | कॉल ठेव |
78 | 179/2014 | 9538 | 9,600/- | 07-07-2000 | कॉल ठेव |
79 | 179/2014 | 9539 | 9,600/- | 07-07-2000 | कॉल ठेव |
80 | 179/2014 | 9540 | 9,600/- | 07-07-2000 | कॉल ठेव |
81 | 179/2014 | 9541 | 9,600/- | 07-07-2000 | कॉल ठेव |
82 | 179/2014 | 9542 | 9,600/- | 07-07-2000 | कॉल ठेव |
83 | 179/2014 | 9543 | 9,600/- | 07-07-2000 | कॉल ठेव |
3. तक्रारदार यांनी सामनेवाले क्र. 1-पतसंस्थेकडे मुदत स्वरुपात गुंतविलेली ठेवीच्या रक्कमांची मुदत संपलेनंतर रक्कमेची मागणी व्याजासह केली असता पतसंस्थेने रक्कमा दिल्या नाहीत तसेच सामनेवाले यांनी तक्रारदारांची फसवणुक केली. तक्रारदार यांना त्यांच्या ठेवींच्या रक्कमांची अत्यंत निकड असलेने ठेवींच्या रक्कमांची मागणी केली. तेव्हा तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे मुदत संपलेनंतर रक्कमांची मागणी केली असता, सामनेवाले पतसंस्था यांनी तक्रारदार यांना ठेवीच्या रक्कमा दिल्या नाहीत, म्हणून दि. 05-03-2014 रोजी वकिलामार्फत नोटीस पाठवून ठेवीच्या रक्कमेची मागणी केली. सामनेवाले यांनी वर नमूद ठेवीच्या रक्कमा देण्यास टाळाटाळ केली अशी तक्रारदार यांची तक्रार आहे. सबब, सामनेवाले यांनी तक्रारदारास सामनेवाले यांचेकडून ठेव पावत्याच्या रक्कमा तसेच त्यावरील व्याजाची मागणी केली. तक्रारदारांनी त्यांचे वर नमूद परिच्छेद कलम-2 नुसार आज अखेर होणारी एकूण मुदत + व्याज अशी एकुण ठेव पावतीच्या व्याजासह रक्कमा तक्रारदारांना वसुल होऊन मिळाव्यात अशी मागणी केलेली आहे.
4. तक्रारदारांनी त्यांचे तक्रारीसोबत कागदपत्रे दाखल केली आहेत. मुदत ठेव पावतीच्या, सेव्हिंग्ज पासबुकाच्या सत्यप्रती, तक्रारदारांनी वकिलामार्फत पाठविलेली रजि.ए.डी. नोटीसीची प्रत, रजि.ए.डी.ने पाठविलेल्या नोटीसीच्या पोस्टाच्या पावत्या, वटमुखत्यार इत्यादी दाखल केले आहे. तक्रारदारांनी तक्रारीसोबत शपथपत्र दाखल केले आहे.
5. सामनेवाला नं. 1 ते 16 यांना मंचाची नोटीस लागू होऊन त्यांनी हजर होऊन म्हणणे दाखल करुन तक्रारदाराची तक्रार परिच्छदेनिहाय नाकारलेली आहे. सामनेवाला यांनी उर्वरीत तक्रारीतील मजकूर खोटा, चुकीचा असलेचे नमूद केले आहे. तक्रार अर्जातील कलम 3 मधील मजकूर बरोबर आहे. तक्रारदारांच्या तक्रार अर्जास नॉन कॉज ऑफ अॅक्शन या तत्वाची बाधा येत असलेने तक्रार चालणेस पात्र नसून नामंजूर करणेत यावा. तक्रारदारांचे अर्जाची सत्य वस्तुस्थिती अशी- वि.प. संस्थेचे कार्यक्षेत्र कोल्हापूर जिल्हयात आहे. वि.प. संस्था सभासदांकडून ठेवी स्विकारणे, जमीन व तारणावर कर्ज वितरीत करतात. वि.प. संस्थेचे आजही दैनंदिन व्यवहार सुरळीत चालू आहेत. तक्रारदार आजअखेर संस्थेमध्ये आलेले नाहीत. तक्रारदारांनी ठेवीच्या पावत्या संस्थेमध्ये कधीही मागणी केलेली नाही. वि.प.संस्थेला त्रास देणेचे हेतूने तकार अर्ज दाखल केला आहे. तक्रारदारांनी नमूद केलेल्या ठेवीवरील व्याजाच्या रक्कमेबाबत मोठया प्रमाणात व्याजदर कधीही घोषित केलेला नव्हता. रिझर्व्ह बँकेने जाहिर केलेल्या धोरणाप्रमाणे वि.प. यांनी सर्व ठेवीदारांना ठेवी परत घेऊन जाणेबाबत कळविले होते अशा ठेवी न घेऊन गेलेस पुढील कालावधीकरिता रक्कमेवर कोणत्याही प्रकारचे व्याज दिले नसलेची समज दिली आहे. ज्या ठेवींची मुदत संपते त्या ठेवीवर पुढील कालावधीमध्ये पुन्हा नवीन ठेव म्हणून ठेवाव्या लागतात व अशा ठेवींचे नुतनीकरण न केलेचे सदरची रक्कम संस्थेचे ठेवीदार मागतील त्यावेळी द्यावी लागत असलेने अशा ठेवीवर बँकींग नियमानुसार व्याज दिले जात नाही. तक्रारदारांनी त्यांचे ठेव रक्कमेबाबत वि.प. संस्थेकडे कळविले असते तर वसुली अधिका-यांनी त्यांची सर्व देयके पुर्ण केली असती. तक्रारदारांनी वि.प. यांना त्रास देणेच्या उद्देशाने तक्रार अर्ज दाखल केला आहे. वि.प. संस्थेमध्ये वसुली अधिका-याची नियुक्ती केली असलेने संस्थेचे व्यवहार त्यांचेमार्फत होतात. सबब, तकारदारांचा तक्रार नामंजूर करणेत यावा. य व तक्रारदारांना कडून वि.प. नं. 1 ते 16 यांना कॉम्पेनसेटरी कॉस्ट म्हणून रक्कम रु. 50,000/- मिळावेत अशी विनंती केली आहे.
6. तक्रारदार यांची तक्रार, दाखल कागदपत्रे तसेच अनुषांगिक कागदपत्रे, तसेच तक्रारदार यांचे वकिलांचा युक्तीवाद, सामनेवाला यांचे म्हणणे याचा विचार करता, तक्रारीच्या न्यायनिर्णयासाठी खालील मुद्दे मंचापुढे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | तक्रारदार हे ग्राहक आहेत काय ? | होय |
2 | सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दयावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे काय ? | होय |
3 | तक्रारदार कोणता मानसिक त्रासापोटी / अनुतोष मिळण्यास पात्र आहेत काय ? | अंतिम आदेशाप्रमाणे |
4 | आदेश काय ? | तक्रार अंशतः मंजूर |
विवेचन-
मुद्दा क्र. 1 –
तक्रारदार यांनी सेव्हिंग्ज खाते, कॉल व, मुदतबंद ठेव स्वरुपात गुंतविलेल्या रक्कमेच्या पावतीच्या छायांकित प्रती सादर केल्या आहेत. सामनेवाले यांनी तक्रारदार यांची ठेव स्वरुपात भरलेली रक्कम आजपावेतो दिलेली नाही. सेव्हिंग्ज खाते, कॉल, व मुदतबंद ठेव स्वरुपात गुंतविलेल्या रक्कमेचा विचार होता, तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे, म्हणुन मुद्दा क्र.1 चे उत्तर मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र. 2 –
प्रस्तुत प्रकरणात तक्रारदार यांनी तक्रारीचे अनुषंगाने दाखल केलेली कागदपत्रे पाहता, तक्रारदार यांनी पतसंस्थेत सेव्हिंग्ज खाते, कॉल, मुदत ठेव स्वरुपात गुंतविलेली रक्कम ठेवलेली आहे ही बाब सिध्द होते. तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडे सेव्हिंग्ज खाते, कॉल, मुदत ठेव स्वरुपात गुंतविलेली रक्कम परत करणे हे पतसंस्थेचे कर्तव्य होते. तक्रारदार यांनी ठेवींची रक्कम अद्याप मागणी करुनही सामनेवाला यांनी दिलेली नाही. त्यामुळे तक्रारी अद्यापी सातत्याने कारण घडत आहे. सबब, प्रस्तुतची तक्रार मुदतीत आहे. परंतु मागणी करुनही रक्कम न देणे ही सामनेवाले यांची तक्रारदार यांना दयावयाच्या सेवेतील त्रुटी आहे असे या मंचाचे मत आहे, म्हणुन मुद्दा क्र. 2 चे उत्तर मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र. 3 –
तक्रारदार यांनी दाखल केलेली ठेव रक्कमेवर व्याजासह होणारी रक्कम सामनेवाले क्र. 1 ते 16 यांच्याकडून मिळावी अशी विनंती केली आहे. या संदर्भात मा. मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद यांनी रिट याचिका क्र.5223/09 सौ.वर्षा रविंद्र ईसाई विरुध्द राजश्री राजकुमार चौधरी या न्यायिक दृष्टांतामध्ये पुढीलप्रमाणे मत व्यक्त केले आहे.
“As has been recorded above, I am of the view that a society registered under the provision of Maharashtra Co-operative Societies Act 1960, although can be proceeded against and a complaint under the provision of Consumer Protection Act is entertain able against the society, the Directors of members of the managing committee cannot be held responsible in view of the scheme of Maharashtra Co-operative Societies Act. To hold the Directors of the banks/members of the managing committee of the societies responsible, without observing the procedure prescribed under the Act, would also be against the principles of co-operation, which is the very foundation of establishment of the co-operative societies”.
वरील न्यायिक दृष्टांतामध्ये संचालकांना ठेवीच्या रक्कमा देण्यासाठी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या जबाबदार ठरविता येणार नाही असे तत्व विषद करण्यात आले आहे. त्यामुळे सामनेवाले चेअरमन व संचालक मंडळ यांना वैयक्तिक व संयुक्तिकरित्या जबाबदार ठरविता येणार नाही. तक्रारदार हे सामनेवाले इंदिरा नागरी सहकारी पतसंस्था मर्या,. कागल, ता. कागल, जि. कोल्हापूर यांच्याकडून वर कलम 2 मध्ये नमूद मुदत ठेव स्वरुपात ठरलेप्रमाणे नमूद व्याजासह रक्कम द्यावी व त्यानंतर द.सा.द.शे. 6 % व्याजासह मिळोपावेतो परत देण्यास सामनेवाले क्र. 1 पतसंस्था हे जबाबदार आहेत असे या मंचाचे मत आहे.
तसेच, तक्रारदार यांना सामनेवाले यांनी ठरलेप्रमाणे सेव्हिंग्ज खाते, कॉल, व मुदत ठेव स्वरुपातील रक्कम न दिल्याने सेवेत त्रुटी केली आहे, त्यामुळे तक्रारदारांना मानसिक त्रास झाला तसेच सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले. त्यामुळे सामनेवाले पतसंस्था यांच्याकडून प्रत्येक तक्रारीत तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रु. 3,000/- व अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु. 1,000/- वसुल होऊन मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.
मुद्दा क्र.4 - सबब, मंच पुढीलप्रमाणे आदेश देत आहे.
आदेश
1 . तक्रारदारांचे तक्रार अर्ज क्र. 169/2014 ते 179/2014 अंशतः मंजूर करण्यात येतात.
2 . सामनेवाले इंदिरा नागरी सहकारी पतसंस्था मर्या,. कागल, ता. कागल, जि. कोल्हापूर यांनी तक्रारदार यांना न्यायनिर्णयातील परिच्छेद कलम- 2 मध्ये नमुद असलेली सेव्हिंग्ज, कॉल, मुदत ठेव स्वरुपात रक्कम ठरलेप्रमाणे व्याजासह अदा करावी व त्यानंतर द.सा.द.शे. 6 % प्रमाणे संपूर्ण रक्कम व्याजासह मिळोपावेतो अदा करावी.
3. सामनेवाले इंदिरा नागरी सहकारी पतसंस्था मर्या,. कागल, ता. कागल, जि. कोल्हापूर यांनी प्रत्येक तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रु. 3,000/- (अक्षरी रुपये तीन हजार फक्त) तसेच तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रु. 1,000/-(अक्षरी रुपये एक हजार फक्त) अदा करावेत.
4. वर नमूद आदेश क्र. 2 मधील रक्कमेपैकी काही रक्कम अगर व्याज अदा केले असल्यास अथवा त्यावर कर्ज दिले असल्यास सदरची रक्कम वजावट करुन उर्वरीत रकमा अदा कराव्यात.
5. प्रस्तुतच्या सर्व तक्रारींचे निकालपत्र एकत्रितरित्या पारीत केले असले तरी तक्रारदारांना ग्राहक सरंक्षण कायदा,1986 कलम 25 व 27 अन्वये अमंलबजावणी अर्ज स्वतंत्ररित्या दाखल करणेची मुभा/संधी आहे.
6. आदेशाच्या प्रमाणित प्रतीं उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.