जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर यांचे समोर
तक्रार अर्ज क्रमांक:-273/2011
दाखल तारीख:18/07/2011
कालावधी:-01वर्षे07म810दि निकालपत्र दिनांक:-28/02/2013
बाळकृष्ण भिमाचार्य ताशी
वय 50 वर्षे, धंदा व्यापार,
रा- व्दारा- लक्ष्मी एन्टरप्रायझेस,जी-7 मेहता टॉवर्स,
बुधवार पेठ,शिवाजी चौक,सोलापूर. तक्रारदार
विरुध्द
मा.व्यवस्थापक,
आयडीया सेल्युलर लि.नाडेल ऑफिस,सोलापूर. विरुध्द पक्ष
गणपुर्ती :- सौ. शशिकला श.पाटील, अध्यक्ष(अतिरिक्त कार्यभार)
सौ.विद्युलता.जे.दलभंजन, सदस्य
तक्रारदारतर्फे विधिज्ञ:-श्री.श.सो.मचाले
विरुध्दपक्षकारतर्फे विधिज्ञ:-एम.जी.अडम (एकतर्फा)
निकालपत्र
(आदेश पारीत दिनांक :28/02/2013)
सौ.विद्युलता.जे.दलभंजन, सदस्य यांचेव्दारा
1. अर्जदार बाळकृष्ण भिमाचार्य ताशी हे जी-7 मेहता टॉवर्स बुधवार पेठ शिवाजी चौक,सोलापूर येथील रहिवाशी आहेत. त्यांनी विरुध्दपक्ष आयडिया सेल्युलर लि.नाडेल ऑफिस सोलापूर यांचे विरुध्द नुकसान भरपाईची तक्रार दाखल केलेली आहे.
2. अर्जदाराच्या तक्रारीची थोडक्यात माहिती खालील प्रमाणे
अर्जदाराने स्वत:च्या कार्यालयासाठी व घरगुती वापराकरीता विरुध्द पक्षाकडून मोबाईल सेवा उपलब्ध करुन घेतली व एकुण 6 पोस्टपेड मोबाईल कनेक्शन विरुध्दपक्षाकडून घेतले व सर्व मोबाईलचे बिल विरुध्दपक्षाकडे भरलेले आहेत.
3. डिसेंबर 2010 पासून आयडिया मोबाईलची रेंज अर्जदाराच्या कार्यालयात येत नसल्याने अर्जदाराच्या ब-याच ग्राहकाच्या रेंज न येण्यामुळे तक्रारी केल्या त्यामुळे अर्जदारास अनंत अडचणीला तोंड द्यावे लागले असे अर्जदाराचे म्हणणे आहे.
(2) 273/2011
4. अर्जदाराच्या तक्रारीची दखल घेतली जात नाही हे पाहून सर्व मोबाईल कंपण्याव्दारे राबविण्यात येत असलेल्या पोर्ट बिलीटीच्या योजनेअंतर्गत पुर्वीचेच नंबर कायम ठेवून अर्जदाराने व्होडाफोन कंपणीची सेवा उपलब्ध करुन घेण्याचे ठरवले व त्यानुसार फेब्रुवारी 2011 मध्ये व्होडाफोन कंपनीकडे त्यांचा ग्राहक होणेसाठी रितसर अर्ज दिला.
5. अर्जातील तरतुदीनुसार व्होडाफोन कंपनीने अर्जदाराच्या थकबाकीबद्दल व अन्य कारणास्तव जाबदाराकडे विचारणा करताच जाबदार कंपनीने पुणे येथील अधिकारी पंकज शेंडे दि.14/02/2011 रोजी अर्जदाराचे कार्यालयाची भेट घेतले व मोबाईल सेवा बदलल्याचे कारण विचारले. अर्जदाराच्या अडचणीची व रेंज न येण्याचे तक्रारी रितसर चाचपणी केली व त्यातील तथ्य लक्षात येताच बुस्टर बसवून अडचणीचे निवारण करण्याची हमी दिली व अन्य कंपनीकडे कनेक्शन न देण्याची विनंती केली.
6. विरुध्दपक्षाच्या विनंतीनुसार वाट पाहुन देखील त्यांचे अधिकारी पंकज शेंडे यांनी बुस्टर बसविण्याची असमर्थता दाखविलयाने अर्जदाराने व्होडाफोन कंपनीची कनेक्टीव्हीटी घेण्याचे पक्के कंपनीमार्फत पोटेंबिलीटी योजनेअंतर्गत जाबदारास विनंती(Request Call) पाठविण्यात आला असता प्रत्येकवेळी कोणते ना कोणते कारण पुढे करुन अर्जदाराची विनंती अमान्य केली असे अर्जदाराचे म्हणणे आहे.
7. त्यानंतर दि.22/02/2011, 02/03/2011, 16/03/2011 व्होडाफोन कंपनीमार्फत विरुध्दपक्षास कनेक्टीव्हीटी बदलणेस नाहरकतीची मागणी केली असता दि.26/02/2011, 08/03/2011, 26/03/2011 रोजी अर्जदाराची विनवणी धुडकावली असे अर्जदाराचे म्हणणे आहे.
8. अर्जदाराने विरुध्दपक्षाकडे संपुर्ण बिल व्यवस्थित सेवा मिळत नसताना देखील वेळचेवेळी भरलेली आहे. तरी देखील बील पेंडींग आहे असे कारण पुढे करुन व्होडाफोन कंपनीकडे जाण्यावाचून विनाकारण रोकले व विरुध्दपक्षाची सेवा सुरळीत नसताना देखील अर्जदार हे विरुध्दपक्षास दरमहा किमान रु.3,000/- ते 32,000/- रक्कम भरत आलेले आहेत. असे असतांना अर्जदाराने दि.10/02/2011 रोजी विरुध्दपक्षास लेखी पत्र दिले. दि.04/03/2011, 17/03/2011 रोजी पत्रव्यवहार होऊन देखील विरुध्द पक्षाने कनेक्टीव्हीटी जोडण्यास अडथळा निर्माण केला, त्यामुळे कोणतेही सेवा 3 महिण्यापासून विरुध्दपक्षाकडून उपलब्ध झालेली नाही, त्रुटीयुक्त सेवा दिलेली आहे. म्हणून अर्जदाराने सदर तक्रारीव्दारे पोर्टेबिलीटी योजनेअंतर्गत व्होडाफोन कंपनीकडे आपले मोबाईल कनेक्शन तबदील करणेस अडथळा करुनये अशी ताकीद देण्यात यावी,
(3) 273/2011
त्रुटीयुक्ती सेवेबद्दल रक्कम रु.10,000/- विरुध्दपक्षाकडून देण्याचा हुकूम व्हावा अशी विनंती अर्जदाराने केलेली आहे.
9. विरुध्दपक्षाने त्यांचे लेखी म्हणणे दाखले केलेले नसलयाने मंचाने त्यांचे विरुध्द No Say चा आदेश दि.27/04/2012 रोजी पारीत करुन प्रकरण एकतर्फा चौकशीसाठी ठेवले.
10. अर्जदाराची तक्रार, शपथपत्र, अर्जदाराचे पत्र दि.10/02/2011, विरुध्द पक्षाचे उत्तर दि.28/03/2011, विरुध्दपक्षाचे उत्तर दि.28/03/2011, विरुध्दपक्षाचे उत्तर दि.28/03/2011, विरुध्दपक्षाचे उत्तर दि.28/03/2011, विरुध्दपक्षाची नोटीस चे विधिज्ञामार्फत दिलेले उत्तर इ.कागदपत्राचे सुक्ष्म अवलोकन केले असता सदर प्रकरणात खालील प्रमाणे मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
1)अर्जदार यांना देण्यात येणा-या सेवेत विरुध्दपक्षाने त्रुटी केली का? नाही
2)अर्जदार त्यांची तक्रार सबळ पुराव्याआधारे सिध्द करु शकले का? नाही.
3)अर्जदार नुकसान भरपाई मिळविण्यास पात्र आहेत का? नाही.
4)काय आदेश.? अंतिम आदेशाप्रमाणे
निष्कर्ष
मुद्दा क्र.1व2:- अर्जदाराने विरुध्द पक्षाकडे मोबाईल कनेक्शनची मागणी केली ती त्यांनी दिली नाही ही अर्जदाराची प्रमुख तक्रार आहे.
अर्जदाराने विरुध्दपक्षाकडून स्वत:साठी व घरगुती वापरासाठी व कार्यालयासाठी 6 पोस्टपेड कनेक्शन घेतलेले आहे. परंतू पोस्टपेड कनेक्शन घेतलेबाबत कोणतीही रिसिट मंचासमोर दाखल केलेली नाही. त्यामुळे अर्जदाराने विरुध्दपक्षाकडून 6 पोस्टपेड कनेक्शन घेतले हे सिध्द होत नाही व त्यासाठी कोणताही सबळ पुरावा दाखल केलेला नाही व अर्जदार यांनी सर्व मोबाईलचे संपुर्ण बिल विरुध्दपक्षाकडे भरलेले आहे असे म्हटलेले आहे. परंतू त्यापुष्टयार्थ कोणतेही बिल रेकॉर्डवर दाखल केलेले नाही. त्यामुळे बिल भरलेले आहे हे गृहीत धरता येणार नाही. असे असतांना व कोणताही पुरावा नसताना विरुध्दपक्षाने अर्जदाराला देण्यात येणा-या सेवेत त्रुटी केली हे म्हणणे संयुक्तीक वाटत नाही.
(4) 273/2011
वरील सर्व विवेंचनावरुन आम्ही या निष्कर्षापर्यंत पोहंचलो आहोत की अर्जदार त्यांची तक्रार सिध्द करुन शकले नाहीत. त्यामुळे अर्जदार त्यांचे मागणीप्रमाणे नुकसान भरपाई मागण्यास पात्र नाहीत हे सिध्द होते. त्यामुळे मुद्दा क्र.1,2,3 चे उत्तर आम्ही नकारार्थी देत आहोत व खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
-:आदेश:-
1) अर्जदाराची तक्रार नामंजूर करण्यात येते.
2) उभयपक्षकारांनी आपआपला खर्च स्वत: सोसावा.
(सौ.विदयुलता जे.दलभंजन) (सौ.शशिकला श.पाटील÷)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
दापांशिं0272130