Maharashtra

Kolhapur

CC/21/35

Taravva Danappa Lamani - Complainant(s)

Versus

ICICI Lombard General Insurance Co.Ltd. And Other - Opp.Party(s)

D.A.Benlaki

20 Jan 2023

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION,KOLHAPUR
Central Administrative Building, Second Floor,
South Side, Kasaba Bawada Road, Kolhapur.
Phone No. (0231) 2651327, Fax No. (0231) 2651327
.
 
Complaint Case No. CC/21/35
( Date of Filing : 19 Jan 2021 )
 
1. Taravva Danappa Lamani
At.Nadani Naka, Dharngutti, Tal.Shirol
Kolhapur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. ICICI Lombard General Insurance Co.Ltd. And Other
Prabhadevi, Mumbai
Mumbai
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. Savita P. Bhosale PRESIDENT
 HON'BLE MRS. Rupali D. Ghatage MEMBER
 HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 20 Jan 2023
Final Order / Judgement

न्‍या य नि र्ण य

 

व्‍दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्‍यक्षा 

 

1.     तक्रारदारांनी प्रस्‍तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 2019 चे कलम 34 व 35 प्रमाणे दाखल केला आहे.  तक्रार अर्जातील कथन थोडक्‍यात पुढीलप्रमाणे—

 

      तक्रारदार क्र.1 व 2 यांना गणेश दानाप्‍पा उर्फ ज्ञानेश्‍वर लमाणी नावाचा मुलगा होता.  वि.प.क्र.2 हा तक्रारदाराचे घराशेजारी राहणारा आहे.  त्‍याचे मालकीची मोटार सायकल असून तिचा नं. एमएच-09-ईएस-5631 असा आहे.  मयत गणेश हा लागेल त्‍यावेळी वि.प. क्र.2 ची मोटार सायकल कामानिमित्‍त घेवू जात असे. वि.प.क्र.2 यांच्‍या सदर वाहनाचा विमा वि.प.क्र.1 विमा कंपनीकडे उतरविलेला असून त्‍याचा क्र. 3005/38742837/11420/000 असा आहे.  दि. 27/08/2018 रोजी मयत गणेश हा वि.प.क्र.2 ची मोटरसायकल घेवून सांगलीकडे निघाला होता.  त्‍यावेळी समोरुन येणा-या टेंपोने चुकीच्‍या साईडला येवून मयत गणेश याच्‍या मोटार सायकलला धडक दिली. त्‍यामध्‍ये गणेश हा जखमी होवून त्‍याचे निधन झाले.  सदरचा अपघात हा टेम्‍पो चालक अशोक हाळींगळे यांचे चुकीने झालेचे स्‍पष्‍ट होवून त्‍याचेवर गुन्‍हा नोंद करणेत आला आहे.  सदर अपघातानंतर तक्रारदारांनी वि.प.क्र.1 व 2 यांना नोटीस पाठवून पर्सनल अॅक्‍सीडेंट पॉलिसीची रक्‍कम मिळणेकरिता मागणी केली.  परंतु सदरच्‍या नोटीसीस वि.प. क्र.1 व 2 यांनी कोणतेही उत्‍तर दिले नाही अथवा विमा रक्‍कम दिली नाही.  वि.प.क्र.2 यांच्‍या परवानगीने मयत गणेश याने मोटार सायकल नेलेली होती व वि.प. क.2 यांनी पी.ए. पॉलिसीची आवश्‍यक ती रक्‍कम भरलेली असलेने बेनिफिशिअरी नात्‍याने तक्रारदारांना सदरची तक्रार दाखल करण्‍याचा हक्‍क प्राप्‍त झाला आहे.  सबब, वि.प. यांनी विमा रक्‍कम न देवून तक्रारदारास सेवात्रुटी दिलेने तक्रारदाराने प्रस्‍तुतचा तक्रारअर्ज या मंचात दाखल केला आहे.    

 

2.    प्रस्‍तुतकामी तक्रारदाराने वि.प.क्र.1 ते 3 यांचेकडून विमा रक्‍कम रु. 1,00,000/-व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रु.30,000/- मिळावेत अशी विनंती केली आहे.

 

3.    तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्‍हीट, कागदयादी सोबत अ.क्र.1 ते 8 कडे अनुक्रमे प्रथम खबरी अहवाल, पंचनामा, पोस्‍ट मॉर्टेम, इंक्‍वेस्‍ट पंचनामा, विमा पॉलिसी, वाहनाचे आर.सी., वि.प. यांना पाठविलेली नोटीस, नोटीसची पोचपावती वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत.  तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.

 

4.    वि.प.क्र.1 व 3 यांनी सदरकामी म्‍हणणे/कैफियत व अॅफिडेव्‍हीट, कागदयादीसोबत पॉलिसी अटी व शर्ती, इंडिया मोटार टॅरिफ जनरल रेग्‍युलेशन्‍स दाखल केले आहेत.  वि.प.क्र.1 व 3 यांनी त्‍यांचे म्‍हणण्‍यामध्‍ये तक्रारअर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत.  वि.प. क्र.1 व 3 यांनी तक्रारदाराचे तक्रारअर्जावर पुढील आक्षेप घेतलेले आहेत.

 

i)          तक्रारदाराचा तक्रारअर्ज व त्‍यातील सर्व मजकूर मान्‍य व कबूल नाही.

 

ii)    वादातील विमा पॉलिसीला व वेगवेगळया कव्‍हरला Indian Motor Tariff Regulations प्रमाणेच्‍या मर्यादा/अटी/शर्ती लागू आहेत व त्‍याप्रमाणे विमा कंपनीची मर्यादित जबाबदारी आहे.  सदरचे विमा पॉलिसीतील कव्‍हर/प्रिमियम Indian Motor Tariff Regulations नियमावलीच्‍या GR 36B व IMT 18 यांस अनुसरुन आहेत.  त्‍यानुसार प्रति रु. 7/- मध्‍ये रु. 10,000/- ची रिस्‍क कव्‍हर होते.  सबब, रु. 28/- मध्‍ये रु. 40,000/- ची मर्यादित रिस्‍क कव्‍हर होते.  सबब, रु.1 लाखची रिस्‍क वि.प. विमा कंपनीने घेतली होती हे तक्रारदाराचे कथन निराधार आहे. 

 

iii)        तक्रारदार वा वाहन मालक यांचेकडून वि.प. कडे विमा दावा आलेला नव्‍हता.  विमा पॉलसीचे अट क्र.1 प्रमाणे अपघाताची माहिती विमा धारकाकडून अथवा तक्रारदाराकडून वि.प. यांना मिळालेली नव्‍हती.  अपघाताची माहिती उशिरा मिळाल्‍याने सर्व्‍हे वा चौकशी करण्‍याची संधी वि.प. यांना मिळालेली नाही. 

 

iv)        विमा पॉलिसीप्रमाणे वाहन चालकाचे वैध ड्रायव्‍हींग लायसेन्‍स असणे बंधनकारक आहे.  परंतु अपघातावेळी मयत गणेशकडे सदरचे लायसेन्‍स नव्‍हते.  सबब, पॉलिसीचे अटींचा भंग झाला आहे. सबब, वि.प. यांची कोणतीही कायदेशीर जबाबदारी येत नाही.   सबब, तक्रारदाराची तक्रार नामंजूर करावी अशी मागणी वि.प.क्र.1 व 3 यांनी केली आहे.  अशा स्‍वरुपाचे आक्षेप वि.प. क्र.1 व 3 यांनी तक्रारअर्जावर घेतलेले आहेत.

 

5.    वि.प.क्र.2 यांनी याकामी विहीत मुदतीत म्‍हणणे दाखल केले नसलेने त्‍यांचेविरुध्‍द नो से आदेश करण्‍यात आला.

 

6.   वर नमूद तक्रारदार व वि.प. क्र.1 व 3 यांनी दाखल केलेल्‍या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.

 

­अ. क्र.

                मुद्दे

उत्‍तरे

1

तक्रारदार व वि.प. हे नात्‍याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ?

होय.

2

वि.प. यांनी तक्रारदारास द्यावयाचे सेवेत त्रुटी केली आहे काय ?

नाही.  

3

अंतिम आदेश काय ?

खालील नमूद आदेशाप्रमाणे.

 

 

 

 

वि वे च न

 

7.    वर नमूद मुद्दा क्र.1 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी दिले आहे कारण वि.प.क्र.2 चे मालकीची वादातील मोटार सायकल असून तिचा नं. एमएच-09-ईएस-5631 असा आहे.  वि.प.क्र.2 यांच्‍या सदर वाहनाचा विमा वि.प.क्र.1 विमा कंपनीकडे उतरविलेला असून त्‍याचा क्र. 3005/38742837/11420/000 असा आहे.  सदरची बाब वि.प. यांनी नाकारलेली नाही.  मयत गणेश हा लागेल त्‍यावेळी वि.प. क्र.2 ची मोटार सायकल कामानिमित्‍त घेवू जात असे.  दि. 27/08/2018 रोजी मयत गणेश हा वि.प.क्र.2 ची मोटरसायकल घेवून सांगलीकडे निघाला होता. त्‍यावेळी समोरुन येणा-या टेंपोने चुकीच्‍या साईडला येवून मयत गणेश याच्‍या मोटार सायकलला धडक दिली व त्‍यामध्‍ये गणेश हा जखमी होवून त्‍याचे निधन झाले.  तक्रारदाराचे म्‍हणण्‍याप्रमाणे मयत गणेश हा वि.प.क्र.2 ची मोटरसायकल वि.प.क्र.2 चे परवानगीने घेवून कामानिमित्‍त जात असता त्‍याचा अपघात झाला व अपघातामध्‍ये तो मयत झाला.  त्‍यामुळे मयत गणेश लमाणी हा वादातील मोटारसायकलचा मालक होतो.  कारण नमूद मोटार सायकलचे मालक वि.प.क्र.2 ने सदर वाहनाची विमा पॉलिसी घेतली असून वैयक्तिक अपघात विम्‍याचा जादा हप्‍ताही वि.प.क्र.1 कडे जमा केला आहे.  सबब, Borrower stands in the shoes of owner हे कायद्याचे तत्‍व असलेने तक्रारदार हे लाभधारक या नात्‍याने वि.प.क्र.1 चे ग्राहक होतात असे या आयोगाचे मत आहे.  सबब, तक्रारदार व वि.प.क्र.1 व 3 हे नात्‍याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत ही बाब निर्विवादपणे स्‍पष्‍ट व सिध्‍द झालेली आहे.  सबब, मुद्दा क्र.1 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी दिले आहे.

 

 

 

8.    वर नमूद मुद्दा क्र.2 चे उत्‍तर आम्‍ही नकारार्थी दिले आहे कारण नमूद मोटार सायकलचे मालक वि.प.क्र.2 ने सदर वाहनाची विमा पॉलिसी घेतली असून वैयक्तिक अपघात विम्‍याचा जादा हप्‍ताही वि.प.क्र.1 कडे जमा केला आहे.  सबब, Borrower stands in the shoes of owner हे कायद्याचे तत्‍व असलेने तक्रारदार हे लाभधारक या नात्‍याने P.A. Policy ची रक्‍कम मिळणेस पात्र आहेत,  सबब, तक्रारअर्ज मंजूर करावा असे तक्रारदाराचे कथन आहे.  परंतु मयत गणेश लमाणी यांचे ड्रायव्‍हींग लायसेन्‍स तक्रारदाराने याकामी हजर केलेले नाही. याउलट तक्रारदाराने मयताचे ड्रायव्‍हींग लायसेन्‍स दाखल करणेची जबाबदारी वि.प. विमा कंपनीची आहे असे म्‍हटले आहे.  तथापि वि.प. ने याकामी पी.ए. कव्‍हरबाबत Indian Motor Tariff Regulations ची नियमावलीचा GR 36 – Personal Accident (P.A) Cover under Motor policy मधील Part A दाखल कले आहेत.  त्‍यामध्‍ये

Part A – Compulsory personal Accident cover for owner driver –

Compulsory personal accident cover shall be applicable under both liability only and package policies.  The owner of Insured vehicle holding an effective driving license is termed as owner driver for purposes of this section.  Cover is provided to the Owner-Driver whilst driving the vehicle including mounting into/dismounting from or travelling in the insured vehicle as a co-driver. 

 

            This provision deals with Personal Accident cover and only the registered owner in person is entitled to the compulsory cover where he/she holds an effective drivng license.  Hence, personal accident cover cannot be granted where the owner-driver does not hold an effective driving license.  In all such cases, compulsory PA cover cannot be granted.  असे नमूद केले आहे. 

 

9.    याकामी अपघातात मयत गणेश लमाणी यांचे ड्रायव्‍हींग लायसेन्‍स याकामी दाखल नाही.  त्‍यांचे ड्रायव्‍हींग लायसेन्‍स होते की नाही ? ही बाब सिध्‍द झालेली नाही.  सबब, तक्रारदार हे पी.ए. पॉलिसीप्रमाणे विमा रक्‍कम मिळणेस पात्र नाहीत या निष्‍कर्षाप्रत हे आयोग येत आहे.

 

10.   तक्रारदाराने याकामी वरिष्‍ठ न्‍यायालयांचे निवाडे दाखल केले आहेत.  परंतु सदरकामी अपघातावेळी मयताचे वैध ड्रायव्‍हींग लायसेन्‍स नसल्‍याने सदरचे निवाडे प्रस्‍तुत प्रकरणास लागू होत नाहीत असे या आयोगाचे मत आहे.

 

 

11.      वि.प. यांनी याकामी खालील वरिष्‍ठ न्‍यायालयाचा निवाडा दाखल केला आहे.

 

 

            (2019) 2 CPJ 333

            Liberty General Insurance Ltd.

                        Vs.

            Pranali Popat Suryavanshi

 

I hold that in the event of death of the insured himself, in an accident at the time, he is driving a vehicle without holding a valid and effective driving license, no benefit under such a policy would be available.  Had the accident resulted in death of someone other than the insured himself, or had he himself not been driving the vehicle, the position would have been entirely different.  But, there the insured himself is driving a vehicle without possessing a valid driving license, and the vehicle meets with an accident resulting in his death, no benefit under such a policy would be available.

 

      वरील निवाडयातील दंडक प्रस्‍तुत प्रकरणात तंतोतंत लागू होतो.  सबब, वि.प. यांनी तक्रारदारास सेवात्रुटी दिली ही बाब तक्रारदाराने शाबीत केलेली नाही या निष्‍कर्षाप्रत हे आयोग येत आहे.  सबब, प्रस्‍तुतची तक्रार नामंजूर करणेचे निष्‍कर्षाप्रत हे आयोग येत आहे.  सबब, मुद्दा क्र.2 चे उत्‍तर आम्‍ही नकारार्थी दिले आहे.

 

      सबब, प्रस्‍तुतकामी आम्‍ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.

 

आदेश

 

 

1)     तक्रारदाराचा तक्रारअर्ज नामंजूर करणेत येतो.

 

2)    खर्चाबाबत आदेश नाहीत.

 

3)    आदेशाच्‍या सत्‍यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्‍य पाठवाव्‍यात.

 
 
[HON'BLE MRS. Savita P. Bhosale]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. Rupali D. Ghatage]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.