Maharashtra

Sangli

CC/13/179

KUM. PRADNYA PRADIP DEVKARE THROUGH GUARDIAN MOTHER MRS. PRABHA PRADIP DEVKARE - Complainant(s)

Versus

HON'BLE SUPERINTENDANT ENGINEER, MAHARASHTRA STATE ELECTRICITY DISTRIBUTION CO. LTD. ETC. 2 - Opp.Party(s)

ADV. M.D. BHOSALE

29 Apr 2015

ORDER

                                              नि.35

मे. जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर

मा.अध्‍यक्ष श्री ए.व्‍ही.देशपांडे

मा.सदस्‍या – सौ मनिषा कुलकर्णी

ग्राहक तक्रार अर्ज क्र. 179/2013

तक्रार नोंद तारीख   : 26/11/2013

तक्रार दाखल तारीख  :   05/12/2013

निकाल तारीख         :    29/04/2015

 

कु. प्रज्ञा प्रदीप देवकारे

अ.पा.क. आई सौ प्रभा प्रदीप देवकारे,

रा.100 फुटी रोड, पाकिजा मस्‍जीद मागे,

सांगली ता.मिरज जि. सांगली                                ....... तक्रारदार

 

विरुध्‍द

 

1.   अधिक्षक अभियंता,

     महाराष्‍ट्र राज्‍य विद्युत महावितरण कंपनी,

     विश्रामबाग, सांगली    

2.   उपकार्यकारी अभियंता

     महाराष्‍ट्र राज्‍य विद्युत महावितरण कंपनी लि.

     रिसाला रोड, शाखा सांगली                             ........ जाबदार     

 

                                 तक्रारदार  तर्फे : अॅड श्री एम.डी.भोसले

                                    जाबदार तर्फे   :  अॅड श्री एस.ए.मोहिते

 

- नि का ल प त्र -

द्वारा : मा. अध्‍यक्ष: श्री. ए.व्‍ही.देशपांडे  

 

1.    प्रस्‍तुतची तक्रार ऊपरनिर्दिष्‍ट अज्ञान तक्रारदाराने, आपली पालनकर्ता आई हिच्‍या मार्फत, ग्राहक संरक्षण कायदयाच्‍या कलम 12 खाली, जाबदारांनी तीस दिलेल्‍या दूषित सेवेबद्दल दाखल करुन नुकसान भरपाई दाखल तक्रारदाराने जाबदारांकडून एकूण रक्‍कम रु.1,75,000/- व तक्रारअर्जाचा खर्च म्‍हणून रक्‍कम रु.5,000/- ची मागणी केली आहे.

 

2.    थोडक्‍यात हकीकत अशी की, तक्रारदार ही तिच्‍या आईसोबत 100 फूटी रोड, पाकिजा मस्जिदमागे सांगली, तालुका मिरज जि. सांगली येथील महावीर राजगोंडा पाटील यांचे घरी भाडयाने रहात आहेत.  सदर घरात घरगुती वापराकरिता महावीर राजगोंडा पाटील यांचे नावे विद्युत कनेक्‍शन असून त्‍याचा ग्राहक क्र. 279940619224 असा आहे व सदर विद्युत कनेक्‍शनचा वापर तक्रारदार हे संभाव्‍य उपभोक्‍ता म्‍हणून करतात.  तक्रारदार प्रज्ञा ही दि.29/7/13 रोजी सकाळी पेपर आणण्‍याकरिता बाहेर गेली व ती पेपर घेवून घरी परत येत असताना अंगणात असलेल्‍या जिन्‍याजवळ आली असता खांबावरुन सदर घरापर्यंत विद्युत पुरवठा करणारी सर्व्हिस लाईन अचानकपणे तुटून प्रज्ञा हिच्‍या अंगावर पडली. त्‍यामुळे प्रज्ञास शॉक बसून तिला गंभीर दुखापत झाली.  तिला ताबडतोब वसंतदादा शासकीय रुग्‍णालय, सांगली येथे दाखल करण्‍यात येवून तिला अतिदक्षता विभागात ठेवून तिच्‍यावर उपचार करुन तिला ऑक्‍सीजनवर ठेवण्‍यात आले.  तिच्‍या डोक्‍यास मोठया प्रमाणात विजेचा धक्‍का बसल्‍याने तिच्‍या मेंदूला इजा झाली आहे.  डोक्‍यास मोठया प्रमाणात जखम झाल्‍याने तिच्‍यावर उपचार करुन टाके घातलेले असून तिच्‍या मेंदूचे सीटी स्‍कॅन करुन घेतलेले आहे.  तिच्‍याकरिता इंजेक्‍शन्‍स व औषधे विकत आणलेली असून तिच्‍यावर उपचार करण्‍यात आले आहेत व त्‍याकरिता तक्रारदारास एकूण रु.25,000/- खर्च आलेला आहे.  तक्रारदाराच्‍या आईचा तिच्‍या पतीने त्‍याग केलेला आहे त्‍यामुळे संपूर्ण मुलांचा सांभाळ तक्रारदारांची आई, तिचे वडील व भाऊ करतात.  तक्रारदार ही अत्‍यंत गरीब कुटुंबातील आहे.  सदर घटनेची नोंद सांगली शहर पोलीस स्‍टेशनमध्‍ये झाली आहे.  तक्रारदाराचा जबाब पोलीसांनी दि.29/7/13 रोजी नोंदवून घेतला आहे व घटनास्‍थळाचा पंचनामा दि.29/7/13 रोजी केला आहे.  सदरच्‍या अपघातामुळे तक्रारदार प्रज्ञा हीच्‍या डोक्‍यामध्‍ये प्रचंड वेदना होत असतात व ती वारंवार आजारी पडत आहे.  तिचेवर पुढेही औषधोपचार करणे गरजेचे आहे व ती घरीच विश्रांती घेत असून तीचे शारिरिक, मानसिक व शैक्षणिक तसेच तिच्‍या आईचेदेखील आ‍र्थिक, शारिरिक व मानसिक नुकसान झाले असून त्यास जाबदारांनी दिलेली दूषित सेवाच जबाबदार आहे.  तक्रारदारांनी जाबदार क्र.2 यांस दि.14/8/13 रोजी रजि.पोस्‍टाने नोटीस पाठविली असता जाबदारांनी दि.29/8/13 चे पत्राने त्‍याची जबाबदारी नाकारली असून दि.11/9/13 रोजी तक्रारदार यांनी जाबदार क्र.1 यांना पाठविलेली नोटीस जाबदारचे वरिष्‍ठांकडे दि.12/9/13 रोजी पोच झाली आहे.  सदरचे नोटीशीस जाबदारांनी उत्‍तरदेखील दिलेले नाही.  अशा प्रकारे जाबदारांनी तक्रारदारास दूषित सेवा दिलेली आहे.  त्‍यामुळे सदरचे तक्रारीस दाव्‍यास कारण निर्माण झाले असून ते रोजच्‍या रोज घडत आहे.  अशा कथनांवरुन तक्रारदारांनी वर नमूद केल्‍याप्रमाणे नुकसान भरपाईची मागणी या प्रकरणात केली आहे.

 

3.    तक्रारदाराने आपल्‍या तक्रार अर्जातील कथनांचे पुष्‍ठयर्थ नि.2 ला आपले शपथपत्र दाखल केले असून नि.4 च्‍या फेरिस्‍तसोबत एकूण 15 कागदपत्रे दाखल केली आहेत.

 

4.    सदर प्रकरणी उभय जाबदार हजर होवून त्‍यांनी आपली एकत्रित कैफियत नि.16 ला दाखल करुन तक्रारदाराची सर्व कथने व त्‍यांच्‍या मागण्‍या स्‍पष्‍टपणे अमान्‍य केल्‍या आहेत.  त्‍यांचे म्‍हणण्‍याप्रमाणे तक्रारदार हे जाबदार कंपनीचे वीज ग्राहक नाहीत.  प्रस्‍तुतचा तक्रारअर्ज खोडसाळपणाने दाखल केलेला आहे.  तथापि, महावीर राजगोंडा पाटील यांच्‍या नावे घरगुती वापराचे वीज कनेक्‍शन ग्राहक क्र. 279940619224 या अन्‍वये देण्‍यात आले आहे ही बाब जाबदारांनी मान्‍य केली आहे.  तक्रारअर्जातील कलम 2 व 6 मध्‍ये नमूद केलेला संपूर्ण मजकूर हा धादांत खोटा असून तो जाबदारांना मान्‍य व कबूल नाही.  तक्रारदारांनी पाठविलेल्‍या नोटीसा व तक्रारअर्जातील एकूण कथने यामध्‍ये प्रचंड तफावत आहे.  तक्रारदारांनी पाठविलेल्‍या दि.14/8/13 व 11/9/13 रोजीच्‍या नोटीसांमध्‍ये तक्रारदार प्रज्ञा देवकारे ही दि.27/7/13 रोजी पेपर आणण्‍याकरिता बाहेर गेली असता घराच्‍या अंगणात आल्‍यावर अचानकपणे डांबावरील विद्युत पुरवठा करणारी वायर तुटून प्रज्ञा हीच्‍या अंगावर पडली व तीस शॉक लागला असे नमूद केले आहे, तर तक्रारअर्जामध्‍ये तक्रारदारांनी कु.प्रज्ञा देवकारे ही दि.29/7/13 रोजी पेपर आणण्‍याकरिता बाहेर गेली असता व ती पेपर घेवून घरी येत असता घराच्‍या जिन्‍याजवळ आली असता, अचानकपणे डांबावरील विद्युत पुरवठा करणारी वायर तुटून तिच्‍या अंगावर पडली व तिला शॉक बसला असे नमूद केले असून दवाखाना डयूटी अंमलदार यांना दिलेल्‍या पत्रामध्‍ये कु.प्रज्ञा देवकारे हीला तिचे राहते घरी इलेक्‍ट्रीक शॉक बसल्‍याने तिला उपचाराकरिता दाखल केले आहे असे नमूद केले आहे,  तर प्रज्ञा देवकारे हीची आई श्रीमती प्रभा देवकारे यांचा जबाब जर बघीतला तर त्‍यांनी जबाबात असे नमूद केले असल्‍याचे दिसते की, दि.29/7/13 रोजी कु.प्रज्ञा ही पेपर आणण्‍याकरिता घरातून जिन्‍यावरुन खाली अंगणात गेली व प्रभा देवकारे या आंघोळीकरिता बाथरुममध्‍ये गेल्‍या, तेव्हा त्‍यांना शेजारील लोकांनी हाक मारुन खाली बोलावले असता मुलगी प्रज्ञा ही जिन्‍याच्‍या खाली पडली होती व तिच्‍या डोक्‍यास पाठीमागे मार लागून ती जखमी झाली होती व प्रभा देवकारे यांनी कु.प्रज्ञा हिला विचारले असता कु.प्रज्ञा हिने तीस सांगितले की, ती वर्तमानपत्र घेवून जिन्‍यावरुन बाहेर येत असताना जिन्‍याजवळील वायरचा तिला शॉक बसल्‍याने ती (प्रज्ञा) जिन्‍यावरुन खाली पडली.  अशा हकीकत प्रज्ञाने तीस सांगितली तसेच प्रभा देवकारे यांची सदर घटनेबाबत काही एक तक्रार नाही किंवा कोणाविरुध्‍द तक्रार देण्‍याची नाही असे नमूद केले आहे, तर पोलीसांनी काढलेला घटनास्‍थळाचा पंचनामा पाहिला तर सदर पंचनाम्‍यामध्‍ये घटनास्‍थळ हे प्रभा देवकारे यांनी पंचांना दाखविले असून सदरचे घटनास्‍थळ घराच्‍या जिन्‍याच्‍या पाचव्‍या पायरीवर आहे.  सदरची बिल्‍डींग ही दुमजली असून पाचव्‍या पायरीपासून पूर्वेस बिल्‍डींगच्‍या भिंतीवर वीज कनेक्‍शनची लोखंडी पाईप असून त्‍या पाईपमधून काळया रंगाची वायर दिसत आहे.  अशा प्रकारे तक्रारदारांनी केलेली कथने ही वेगवेगळी नमूद केली आहेत.  त्‍यामुळे सदरची घटना ही दि.27/7/13 रोजी घडली की दि.29/7/13 रोजी घडली, तसेच प्रज्ञा ही पेपर आणण्‍याकरिता घराच्‍या अंगणात गेली असताना घराच्‍या अंगणामध्‍ये सर्व्हिस वायर अंगावर पडून सदरची घटना घडली की घराच्‍या जिन्‍याजवळ आली असताना अंगणाबाहेर सर्व्हिस वायर अचानक अंगावर पडून सदरची घटना घडली की प्रज्ञा जिन्‍यावरुन वर जात असताना जिन्‍यातील पाचव्‍या पायरीजवळील इंटर्नल वायरचा शॉक लागून सदरची घटना घडली की घरात इलेक्‍ट्रीक शॉक बसल्‍याने घडली, याबाबत साशंकता निर्माण होते.  सदरची तथाकथित घटना बघणा-या कोणाही प्रत्‍यक्षदर्शी साक्षीदाराचा जबाब या कामात नमूद नाही.  तक्रारदार हीचा देखील जबाब नाही.  तक्रारदाराच्‍या आईने सदर घटनेबाबत काही तक्रार नाही की कोणाविरुध्‍द तक्रार देण्याची नाही असे आपल्‍या जबाबामध्‍ये नमूद केले असून तक्रारदार हीची आईने कोणाच्या तरी बदसल्‍ल्‍याला बळी पडून जाबदार विद्युत कंपनीविरुध्‍द खोटी केस दाखल केल्‍याने दिसून येते.  सदर घटनेबाबत जाबदार कंपनीचे कार्यालयामध्‍ये कोणतीही तक्रार तक्रारदार यांनी दाखल केलेली नाही.  जर तक्रारदार यांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे सर्व्हिस वायर तूटून कु. प्रज्ञा हीला शॉक बसला असे वादाकरिता मान्‍य केले तर सदरची तुटलेली सर्व्हिस वायर पुन्‍हा जोडण्‍याबाबत कोणाचीही कसलीही तक्रार/वर्दी नाही.  याचाच अर्थ सर्व्हिस वायर तुटून अंगावर पडून सदरची घटना घडली नसल्‍याचे शाबीत होते.  तसेच कु.प्रज्ञा हीला बर्न इंजुरी झाल्‍याचे तक्रारअर्जात नमूद नाही.  जाबदार वितरण कंपनीने आपल्‍या दि.29/7/13 चे पत्राने तक्रारदाराचे दि.14/8/13 रोजीच्या नुकसान भरपाई मागण्‍याचे नोटीसीस उत्‍तर देवून सदर घटनेस जाबदार कंपनी जबाबदार नसल्‍याचे कळविले आहे.  जाबदारचे कथनानुसार सदरची घटना कु.प्रज्ञा देवकारे ही जिन्‍यावरुन वर घरामध्‍ये जात असताना ती तोल जावून पडल्‍याने झाली असल्‍याचे दिसून येते.  त्‍यामुळे तक्रारदार यांनी सदर घटनेची नोंद जाबदार कंपनीचे कार्यालयात केलेली नाही.  सबब, तक्रारीस कोणतेही कारण घडलेले नाही.  अशा कथनांवरुन जाबदार क्र.1 व 2 यांनी प्रस्‍तुतची तक्रार खर्चासह फेटाळून लावावी अशी मागणी केली आहे.

 

5.    आपल्‍या लेखी कैफियतीतील कथनांचे पुष्‍ठयर्थ जाबदारांनी लेखी कैफियातीखालीच उपकार्यकारी अभियंता श्री दत्‍ताजी ग्‍यानोबा गायकवाड यांचे शपथपत्र दाखल केले आहे.  तथापि जाबदारांनी कोणताही कागदोपत्री पुरावा सदर कामी दाखल केलेला नाही.

 

6.    तक्रारदारांनी पुराव्‍याच्‍या कामी तक्रारदाराची अज्ञान पालनकर्ता आई सौ प्रभा देवकारे यांचे पुराव्‍याचे शपथपत्र नि.18 ला दाखल केले असून नि.23 ला डॉ सिध्‍दार्थ गोरखनाथ सावर्डेकर या कु. प्रज्ञा हिचेवर उपचार करणा-या डॉक्‍टरांचे शपथपत्र नि.23 ला दाखल करुन नि.24 या फेरिस्‍तसोबत डॉ सावर्डेकर यांनी हजर केलेला वैद्यकीय उपचाराचा दाखला व सदर इस्पितळातील मेडीकल केस रेकॉर्ड इत्‍यादींची कागदपत्रे दाखल केली आहेत.  जाबदारतर्फ नि.29 ला पुरसीस दाखल करुन त्‍यांनी लेखी कैफियतीसोबत दाखल केलेले शपथपत्र हेच आपले पुराव्‍याचे शपथपत्र/पुरावा समजावा व त्‍या व्‍यतिरिक्‍त अन्‍य कोणताही पुरावा जाबदारास द्यावयाचा नाही असे नमूद करुन आपला पुरावा थांबविलेला आहे.

 

7.    तक्रारदाराचे वतीने आपला लेखी युक्तिवाद नि.30 ला दाखल केला असून आम्‍ही जाबदारांचे विद्वान वकीलांचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेतला आहे.  प्रस्‍तुत प्रकरणामध्‍ये उभय पक्षांच्‍या पक्षकथनाच्‍या आणि पुराव्‍याच्‍या स्‍पष्‍टीकरणाकरिता व प्रस्‍तुत प्रकरणात असलेली संदिग्‍धता दूर करण्‍याच्‍या दृष्‍टीने उभय पक्षकारांनी घटनास्‍थळाचे छायाचित्र काढून व त्‍याचे स्‍केच काढून प्रस्‍तुत प्रकरणामध्‍ये दाखल करण्‍याचा आदेश दिला होता.  त्‍या आदेशानुसार तक्रारदारांनी घटनास्‍थळाचे एकूण 5 फोटोग्राफस दि.15/4/15 रोजी दाखल केले असून जाबदारांनी नि.34 या फेरिस्‍त सोबत स्‍केच व घरमालक महावीर पाटील यांना वीज कनेक्‍शन दिलेल्‍या जागेचे फोटोग्राफस तसेच तक्रारदाराची अज्ञान पालनकर्ता आई हीला दिलेल्‍या विद्युत पुरवठयाचे कनेक्‍शन दर्शविणारे फोटोग्राफस नि.34 सोबत दाखल केले आहेत. 

 

8.    सदर प्रकरणी खालील मुद्दे आमच्‍या निष्‍कर्षाकरिता उपस्थित होतात.

      मुद्दे                                                          उत्‍तरे

 

1. तक्रारदार हे ग्राहक संरक्षण्‍ध कायद्याच्‍या कलम 2(1)(ड) अन्‍वये

   ग्राहक होतात काय ?                                             होय.                    

 

2. तक्रारदाराने तक्रारअर्जात नमूद केल्‍याप्रमाणे, डांबावरुन येणारी सर्व्हिस

   वायर तुटून तिच्‍या अंगावर पडून तिला विजेचा शॉक बसला ही बाब

   शाबीत केली आहे काय ?                                               नाही.

  

3.  जाबदारांनी तीस दूषित सेवा दिली आहे ही बाब तक्रारदाराने शाबीत

    केली आहे काय ?                                                                                          नाही.             

4. तक्रारदारास तक्रारअर्जात मागणी केलेल्‍या मागण्‍या मिळण्‍यास ती

   पात्र आहे काय ?                                                  नाही.

     

5. अंतिम आदेश                                                   खालीलप्रमाणे.

 

 

9.    आमच्‍या वरील निष्‍कर्षाची कारणे खालीलप्रमाणे आहेत.

 

 आदेश

 

1.    प्रसतुतची तक्रार ही खारीज करणेत येत आहे.

2.    उभय पक्षकारांनी तक्रारीचा खर्च आपला आपण सोसणेचा आहे.

3.    या आदेशाच्‍या प्रती उभय पक्षकारांना विनाशुल्‍क देण्‍यात याव्‍यात.

 

सांगली

दि. 29/04/2015                        

   

        ( सौ मनिषा कुलकर्णी )                          ( ए.व्‍ही.देशपांडे )

              सदस्‍या                                              अध्‍यक्ष

 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.