| Complaint Case No. CC/195/2019 | | ( Date of Filing : 25 Mar 2019 ) |
| | | | 1. SMT ASHA PRAKASH CHIMULKAR | | TRIVENI NAGAR, BEHIND NEW BUS STAND , NAWARGAON RAOD SINDEWAHI DIST CHANDRAPUR | | CHANDRAPUR | | MAHARASHTRA |
| ...........Complainant(s) | |
| Versus | | 1. HAPPY HOME DEVELOPERS THROUG HITS OWNER AMMOL DEVAJI WALKE | | 65, HINDUSTAN COLONY, WARDHA ROAD, NAGPUR | | NAGPUR | | MAHARASHTRA |
| ............Opp.Party(s) |
|
|
| Final Order / Judgement | Final Order / Judgement आदेश मा. सदस्य, श्री. सुभाष रा. आजने यांच्या आदेशान्वये – - तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 अन्वये दाखल केली असून त्यात असे नमूद केले की, त्याने विरुध्द पक्षाकडून मौजा- चारगांव, खसरा क्रं. 143/2, प.ह.नं. 25 मधील प्लॉट क्रं. 22 एकूण क्षेत्रफळ 1453 स्के. फुट. रुपये 2,39,745/- मध्ये विकत घेण्याचा दि. 05.12.2011 ला विक्रीचा करारनामा केला व प्लॉट खरेदी पोटी रुपये 96,000/- विरुध्द पक्षाला अदा केले असून उर्वरित रक्कम रुपये 5,990/- च्या मासिक हप्त्याप्रमाणे दि. 13.10.2011 ते 13.10.2013 या कालावधीपर्यंत अदा करावयाचे ठरले. त्याप्रमाणे तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाला दिनांक 30.08.2013 पर्यंत एकूण रक्कम रुपये 1,44,000/- अदा केली व सदरची रक्कम मिळाल्या असल्याबाबतची विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला पावत्याही दिलेल्या आहेत.
- तक्रारकर्त्याने पुढे असे नमूद केले की, त्याने विरुध्द पक्षाला प्लॉट पोटी एकूण रक्कम रुपये 1,44,000/- अदा केली असून उर्वरित रक्कम 95,745/- विक्रीपत्राच्या वेळेस देण्यास तयार होता व याकरिता तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाच्या कार्यालयात अनेक वेळा वि.प. ची भेट घेऊन प्लॉटचे विक्रीपत्र करुन देण्याबाबत विनंती करुन ही विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याच्या विनंतीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे दिनांक 16.02.2019 रोजी विरुध्द पक्षाला वकिला मार्फत कायदेशीर नोटीस पाठविली. सदरची नोटीस प्राप्त होऊन ही विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याच्या तक्रारीची दखल न घेतल्यामुळे तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार मंचासमक्ष दाखल केलेली आहे.
- तक्रारकर्त्याने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याकडून प्लॉटच्या विक्रीपोटी स्वीकारलेली रक्कम रुपये 1,44,000/- द.सा.दशे. 12 टक्के व्याजासह तक्रारकर्त्याला परत करण्याचे आदेश द्यावे. तसेच शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसानभरपाई व तक्रारीचा खर्च देण्याचा ही आदेश द्यावा.
- विरुध्द पक्ष यांना मंचा मार्फत पाठविण्यात आलेली नोटीस प्राप्त होऊन ही विरुध्द पक्ष मंचासमक्ष हजर न झाल्यामुळे त्यांच्या विरुध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश दि. 23.07.2019 रोजी पारित करण्यात आला.
- तक्रारकर्त्याने तक्रारी सोबत दाखल केलेले दस्तावेज व त्यांच्या वकिलांनी केलेला तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्यावर मंचाने खालील मुद्दे विचारार्थ घेतले व त्यावरील कारणमिमांसा खालीलप्रमाणे नमूद केले.
मुद्दे उत्तर - तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे काय ॽ होय
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला दोषपूर्ण सेवा देऊन
अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला काय ॽ होय - काय आदेश ॽ अंतिम आदेशानुसार
- मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत - तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडून मौजा- चारगांव, खसरा क्रं. 143/2, प.ह.नं. 25 मधील प्लॉट क्रं. 22 एकूण क्षेत्रफळ 1453 स्के. फुट. रुपये 2,39,745/- मध्ये विकत घेण्याचा दि. 05.12.2011 ला विक्रीचा करारनामा केला. सदरचा करारनामा नि.क्रं. 2 (1) वर दाखल केलेला आहे. तसेच विरुध्द पक्षाला प्लॉट विक्रीपोटी तक्रारकर्त्याकडून रुपये 1,44,000/- मिळाले असल्याबाबतचा तपशील निशाणी क्रमांक 2(2) वर दाखल केलेला आहे. यावरुन तक्रारकर्ता विरुध्द पक्षाचा ग्राहक असल्याचे स्पष्ट होते. तसेच मा. सर्वोच्च न्यायालयाच्या .M/s. Narne Construction P. Ltd. Etc. Vs. Union of India and ors. Etc. II (2012) CPJ 4 (SC) या प्रकरणातील निर्णयाप्रमाणे या मंचाला प्रस्तुत प्रकरण चालविण्याचे अधिकार आहे.
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला करारनाम्यातील अटी व शर्तीप्रमाणे सदर ले-आऊट ला अकृषकची परवानगी संबंधित विभागाकडून व नगर रचना विभागाकडून मिळून देण्याची जबाबदारी स्वीकारलेली होती. तसेच संबंधित ले-आऊटला काही कारणास्तव अकृषक व नगर रचना विभागाची मंजुरी मिळाली नाही तर विरुध्द पक्ष प्लॉट विकत घेणा-यास त्याच क्षेत्रफळाचा दुसरा प्लॉट त्याच सारख्या क्षेत्रात उपलब्ध करुन देईल असे करारनामात ही नमूद केलेले आहे. तक्रारकर्ता प्लॉटची उर्वरित असलेली रक्कम देण्यास तयार असतांना ही विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला प्लॉटचे विक्रीपत्र करुन दिले नाही अथवा करारात नमूद केल्याप्रमाणे त्याच क्षेत्रातील दुसरा प्लॉट ही उपलब्ध करुन दिला नाही किंवा तक्रारकर्त्याकडून प्लॉट विक्री पोटी स्वीकारलेली रक्कम ही परत केली नाही ही विरुध्द पक्ष यांच्या सेवेतील त्रुटी असून अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब करणारी कृती असल्याचे मंचाचे स्पष्ट मत आहे .
सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित. अंतिम आदेश - तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याकडून वादग्रस्त प्लॉट पोटी स्वीकारलेली रक्कम रुपये 1,44,000/- व त्यावर दि. 30.08.2013 पासून द.सा.द.शे. 12 टक्के दराने व्याजासह रक्कम प्रत्यक्ष अदायगीपर्यंत तक्रारकर्त्याला अदा करावे.
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रुपये 20,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 10,000/- द्यावे.
- वरील आदेशाची अंमलबजावणी आदेशाची प्रत प्राप्त झाल्याच्या तारखेपासून 30 दिवसाच्या विरुध्द पक्ष यांनी करावी.
- तक्रारकर्त्याला तक्रारीची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
| |