Maharashtra

Nagpur

CC/726/2018

JyASHREE MANOHAR TARKUNDE - Complainant(s)

Versus

FIRST FLIGHT COURIERS LTD - Opp.Party(s)

ADV. ASHUTOSH JOSHI

04 Dec 2019

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/726/2018
( Date of Filing : 11 Dec 2018 )
 
1. JyASHREE MANOHAR TARKUNDE
29, SHIVAJI NAGAR, NAGPUR 440010
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. FIRST FLIGHT COURIERS LTD
1001/02, LOTUS CORPORATE PARK, OFF JAY COACH FLYOVER, WESTERN EXPRESS HIGHWAY, GOREGAON EAST MUMBAI 400063 AND BRANCH OFFICE AT GOLDEN PLALCE BESIDE SUDAMA THEATRE, WEST HIGH COURT NAGPUR 440010
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 04 Dec 2019
Final Order / Judgement

(आदेश पारीत व्‍दारा- श्री सुभाष आर. आजने, मा. सदस्‍य)

  1. तक्रारकर्तीने प्रस्‍तुत तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा, १९८६ चे कलम १२ अन्‍वये दाखल केली आहे.
  2. तक्रारकर्ती ही नागपूर येथील रहिवासी असून तिचा लेडीज फॅशनेबल कपडे विकण्‍याचा घुंगरु या नावाने तीचे राहते घरी व्‍यवसाय आहे. विरुध्‍द  पक्षाचा कुरीयर चा व्‍यवसाय असून ते त्‍यांचे भारतभर असलेल्‍या ऑफिस नेटवर्क द्वारे पार्सल नोंदविते आणि संबंधीत पार्सल भारतात आणि परदेशात स्विकारणा-यांना पोहचविते. तक्रारकर्ती लेडीज फॅशनेबल कपडे व्‍यवसायात प्रसिद्ध असून तीचा हा मागिल ३० वर्षापासुनचा व्‍यवसाय आहे. तक्रारकर्ती ग्राहकांचे दुरध्‍वनी द्वारे ऑर्डर स्विकारते आणि ऑर्डर प्रमाणे ग्राहकाचे कपडे डिझाइन करुन आणि शिलाई करुन संबंधीतांना त्‍यांनी नमुद केलेल्‍या पत्‍त्‍यावर पार्सल करुन पाठविते.
  3. न्‍यु दिल्‍ली येथील तक्रारकर्तीचे ग्राहक श्रीमती परवीन पॉल यांनी तक्रारकर्ती यांचेकडे एक पारसी एम्‍ब्रॉयडरी सुट ज्‍याची किंमती ९,२००/- १७/१०/२०१८ चे कार्यक्रमाकरीता ऑर्डर नोंदविला आणि तक्रारकर्तीला तो सुट त्‍यांचे पत्‍त्‍यावर पाठविण्‍याबाबत सांगितले. तक्रारकर्तीने कोणतीही आगाऊ रक्‍कम न स्विकारता ग्राहकाचा सुट तीच्‍या स्‍पेसीफीकेशन प्रमाणे पाठविण्‍याकरीता तयार केला. तक्रारकर्तीने ग्राहकाला पाठविण्‍याकरीता तयार केलेला ड्रेस बिलासोबत पॅक केला आणि विरुध्‍द पक्षाचे शाखेला पोहचविला. तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्षाला कुरियर शुल्‍क रुपये ३००/- दिनांक १०/१०/२०१८ ला अदा करुन ग्राहकाचा पार्सल त्‍यांचे दिलेल्‍या न्‍यु दिल्‍ली येथील पत्‍यावर  पाठविण्‍याकरीता नोंदणी केला आणि त्‍याची पावती प्राप्‍त केली. विरुध्‍द पक्षाचे बुकींग कार्यालयाने कबुल केले की, पार्सल त्‍यांचे ठरलेल्‍या पत्‍यावर  दोन दिवसात पोहचेल.तक्रारकर्तीचे ग्राहकाकडुन संबंधीत पार्सल बाबत विचारणा झाल्‍यावर तक्रारकर्तीने ग्राहकाला पार्सल बुक केले आहे व ते आपणास १७ ऑक्‍टोबर पूर्वी प्राप्‍त होईल असे सांगितले. तक्रारकर्ती पुःनश्‍य विरुध्‍द पक्षाचे कार्यालयात गेली तेव्‍हा तेथील उपस्थित माणसाने तक्रारकर्तीला सांगितले की, आपण बुक केलेले पार्सल न्‍यु दिल्‍ली येथे पोहचले आहे आणि ते लवकरच देण्‍यात येईल. त्‍यानंतर दिनांक १७/१०/२०१८ ला न्‍यु  दिल्‍ली येथून तक्रारकर्तीचे ग्राहकाचा दुरध्‍वनी आला की, त्‍याला अद्याप पार्सल पोहचले नाही तेव्‍हा ग्राहकाने तक्रारकर्तीला सांगितले की, तुम्‍ही ड्रेस त्‍वरीत पाठवा अन्‍यथा ऑर्डर रद्द करा. त्‍यानंतर तक्रारकर्ती विरुध्‍द पक्षाचे कार्यालयात गेली व पार्सल बाबत विचारणा केली, तेव्‍हा संबंधीत व्‍यक्‍तीने पार्सल गहाळ झाल्‍याचे तक्रारकर्तीला सांगितले व ते त्‍याचा शोध घेत आहे व जेव्‍हा ते प्राप्‍त होईल तेव्‍हा ते परत करण्‍यात येईल.
  4. तक्रारकर्तीने दिनांक २३/१०/२०१८ ला विरुध्‍द पक्षाचे कार्यालयाला पञ दिले आणि तक्रारकर्तीचे तक्रारीचे निवारण करण्‍याबाबत सांगितले. विरुध्‍द पक्षाला पञ प्राप्‍त होऊनही त्‍यांनी त्‍याची दखल घेतली नाही त्‍यामुळे तक्रारकर्तीने मा. मंचासमोर तक्रार दाखल करुन खालिलप्रमाणे मागणी केलेली आहे.
  1. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला दोषपूर्ण सेवा देऊन अनुचित व्‍यापार पद्धतीचा अवलंब केला आहे असे घोषित करावे.
  2. विरुध्‍द पक्षाला निर्देश दयावे की, त्‍यांनी तक्रारकर्तीला झालेल्‍या नुकसान भरपाई बद्दल व मानसिक, शारीरिक ञासाबद्दल रुपये २,४३,०००/-, १८ टक्‍के व्‍याजासह तक्रारकर्तीला रक्‍कम प्रत्‍यक्ष अदायगीपर्यंत अदा करावे.
  1. मंचातर्फे नोटीस पाठविण्‍यात आली परंतू अनेक संधी देऊनही विरुध्‍द पक्षाने मंचासमोर त्‍याचा लेखी जबाब सादर केला नाही करीता मंचाने दिनांक १२/०७/२०१९ ला विरुध्‍द पक्षाविरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश पारीत केला.
  2. तक्रारकर्तीने तक्रारीसोबत निशानी क्रमांक २ वर दाखल दस्‍ताऐवज व तोंडी युक्‍तीवाद ऐकल्‍यावर  निकालीकामी खालिलप्रमाणे मुद्दे उपस्थित करुन त्‍यावरील निष्‍कर्षे खालिलप्रमाणे नोंदविले आहे.

     अ.क्र.                           मुद्दे                                                          उत्‍तर

I.      तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?             होय

II.     विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा

                   दिली काय ?                                                                       होय

III.   काय आदेश ?                                                      अंतिम आदेशाप्रमाणे

 

कारणमिमांसा

  1. तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्षाचे कार्यालय, वेस्‍ट हायकोर्ट नागपूर येथील शाखेतुन न्‍यु दिल्‍ली येथील तक्रारकर्तीचे ग्राहक श्रीमती परवीन पॉल यांचे नावाने पारसी एम्‍ब्रॉयडरी सुट, किंमत रुपये ९,२००/- पार्सल द्वारे ग्राहकाचे न्‍यु दिल्‍ली येथील पत्‍त्‍यावर पाठविण्‍याकरीता दिनांक १०/१०/२०१८ रुपये ३००/- अदा करुन कुरीअर ने पाठविण्‍याकरीता विरुध्‍द  पक्षाकडे नोंदणी केली. त्‍यापोटी विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला पैसे मिळाल्‍याची पावती अदा केली. तक्रारकर्तीने निशानी क्रमांक २ वर सादर केलेल्‍या दस्‍तऐवजाचे अवलोकन केल्‍यावर स्‍पष्‍ट होते की, तक्रारकर्ती हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे. तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्षाचे नागपूर येथे कार्यालयात दिनांक १०/१०/२०१८ ला बुक केलेले पार्सल दोन दिवसात न्‍यु दिल्‍ली येथील तक्रारकर्तीचे ग्राहकाला दिलेल्‍या पत्‍त्‍यावर पोहचवून द्यावयास पाहिजे होते. परंतू सदर नोंदविलेले पार्सल विरुध्‍द पक्षाने न पोहचविता गहाळ केले ही विरुध्‍द पक्षाची तक्रारकर्ती प्रती दोषपूर्ण  सेवा असून अनुचित व्‍यापार पद्धतीचा अवलंब करणारी कृती आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. त्‍यामुळे तक्रारकर्तीची मानहानी होऊन तिच्‍या धंद्याचे नुकसान होऊन तिच्‍या व्‍यवसायावर परिणाम झाला.विरुध्‍द पक्षाला नोटीस प्राप्‍त होऊनही त्‍यांनी त्‍यांचा जबाब सादर केला नाही व आपले बचावात म्‍हणणे मांडले नाही करीता तक्रारकर्तीची मागणी मंजूर करुन खालिलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्तीची तकार अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे.
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला दिलेल्‍या दोषपूर्ण सेवेकरीता विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला रुपये ९,२००/- (सुट किंमत) व रुपये ३००/- (कुरीअर चार्जेस) असे एकूण रुपये ९,५००/- या रकमेवर दिनांक १०/१०/२०१८ पासून ९ टक्‍के व्‍याजासह तक्रारकर्तीला रक्‍कम प्रत्‍यक्ष अदायगीपर्यंत अदा करावे.
  3. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला झालेल्‍या मानसिक, शारीरिक व आर्थिक नुकसान भरपाईपोटी रुपये ५,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये ५,०००/- अदा करावे.
  4. वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून एक   महिन्‍याच्‍या आत विरुध्‍द पक्षाने करावी.
  5. उभयपक्षांना आदेशाची प्रत निशुल्‍क देण्‍यात यावी.
  6. तक्रारकर्त्‍याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.