Maharashtra

Nagpur

CC/13/130

सुश्रुत सुदीशकुमार शेटटी - Complainant(s)

Versus

Fiitjee लि. हाऊस 29- ए, कालु सराई - Opp.Party(s)

व्‍ही. बी. महंत

14 Oct 2015

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/13/130
 
1. सुश्रुत सुदीशकुमार शेटटी
वय 17 वर्षे व्‍यवसाय शिक्षण तर्फे पालनकर्ता आई नयना सुदीशकुमार शेटटी, वय 46 वर्षे, व्‍यवसाय नोकरी, रा.201, ताजश्री दुर्गा अपार्टमेंट, प्‍लाट नं. 13, पोस्‍टल ऑडीट कॉलनी, प्रतापनगर, नागपूर.
नागपूर
महाराष्‍ट्रा
...........Complainant(s)
Versus
1. Fiitjee लि. हाऊस 29- ए, कालु सराई
सर्व्रप्रिया विहार, नवी दिल्‍ली.
दिल्‍ली
दिल्‍ली
2. Fiitjee लि. गिन्‍नी बिल्‍डींग,
प्‍लाट नं. 210 ( चिल्‍ड्रन ट्राफीक पार्कच्‍या विरध्‍द) झेंडा चौक, धरमपेठ, नारगपूर.
नागपूर
महाराष्‍ट्रा
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. MANOHAR CHILBULE PRESIDENT
 HON'ABLE MR. PRADEEP PATIL MEMBER
 HON'ABLE MRS. MANJUSHREE KHANKE MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

श्री. मनोहर चिलबुले, मा. अध्‍यक्ष यांचे आदेशांन्‍वये.

 

                          आ दे श  -

 

 (पारित दिनांक – 14 ऑक्‍टोबर, 2015)

 

1.                तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या  कलम 12 अन्‍वये दाखल केलेल्‍या तक्रारीचे संक्षिप्‍त विवरण असे की, वि.प.क्र. 1 FIITJEE लि. ही विद्यार्थ्‍यांसाठी शिकवणी वर्ग चालविणारी कंपनी आहे. वि.प.क्र. 2 हे वि.प.क्र. 1 चे नागपूर येथील शाखा कार्यालय आहे. तक्रारकर्ता 2010 - 2011 मध्‍ये न्‍यू पनवले नवी मुंबई येथून 10 वी उत्‍तीर्ण झाल्‍यानंतर नागपूर येथे आला. त्‍याला 12 वी नंतर अभियांत्रिकी शाखेत प्रवेश घ्‍यावयाचा होता म्‍हणून AIEEE च्‍या तयारीसाठी शिकवणी वर्ग लावावयाचे असल्‍याने तक्रारकर्ता व त्‍याचे वडीलांनी वि.प.क्र. 2 ची भेट घेतली. वि.प.क्र. 2 ने तक्रारकर्त्‍याची AIEEE च्‍या  शिकवणी वर्ग प्रवेशासाठी चाचणी घेतली आणि तक्रारकर्त्‍याला AIEEE च्‍या शिकवणी वर्गासाठी प्रवेश दिला तसेच फीमधून रु.8,000/- ची सवलत दिली. तक्रारकर्त्‍याचा स्‍टुडंट आय डी क्र. BZ5773 आणि नोंदणी क्र. 1266491230004  आहे.

 

            तक्रारकर्त्‍याने वि.प.कडे 11.04.2012 ते 24.04.2012 पर्यंत शिकवणी फी बाबत एकुण रु.66,758/- जमा केले आहेत.  दि.12.04.2012 रोजी वि.प.क्र. 2 कडे तक्रारकर्ता शिकवणी वर्गासाठी रुजू झाला. परंतु वि.प.क्र. 2 ने त्‍याला AIEEE च्‍या टयुशन क्‍लासमध्‍ये न बसविता 6 दिवस सतत IIT च्‍या टयुशन क्‍लासमध्‍ये बसविले. तक्रारकर्त्‍याने वि.प.ला तो AIEEE च्‍या शिकवणी वर्गासाठी आलेला आहे असे सांगत असतांनाही, वि.प. हे नेहमीच AIEEE च्‍या नविन बॅचेस लवकर सुरु होतील व तशी व्‍यवस्‍था केल्‍या जाईल असे सांगत होते. काही विद्यार्थ्‍यांनी त्‍यास विरोधही केला. वि.प.कडे AIEEE च्‍या शिकवणी वर्गासाठी फक्‍त 5 मुलांनी प्रवेश घेतला होता. वि.प.क्र. 2 च्‍या म्‍हणण्‍यानुसार 5 मुलांकरीता शिकवणी वर्ग चालविणे त्‍यांना शक्‍य नाही. वि.प.क्र. 2 च्‍या या म्‍हणण्‍यावर तक्रारकर्त्‍याने AIEEE चा शिकवणी वर्ग बंद करुन प्रवेश रद्द केला. प्रवेश रद्द केल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने प्रवेश फी परत मागितली. प्रवेश फी परत मागण्‍याकरीता अर्जही केला. वि.प.क्र.2 चे कोर्स कोऑर्डीनेटर डेव्‍हीड टिमोटी यांनी वडिलांची ट्रांसफर झालेली आहे व त्‍यामुळे फी परत करावी असा अर्ज करावयास लावला, त्‍यानुसार तक्रारकर्त्‍याने अर्जही केला. कारण याच बाबीवर वृषभ रामटेके या विद्यार्थ्‍याला फी परत केली होती. परंतू तक्रारकर्त्‍याला फी परत करण्‍यास वि.प. टाळाटाळ करीत आहेत. वि.प.ला तक्रारकर्त्‍याने दि.25.10.2012 रोजी कायदेशीर नोटीसची बजावणी केली व फीची पूर्ण रक्‍कम परत मागितली, परंतू वि.प.ने अद्यापही तक्रारकर्त्‍याला फीची रक्‍कम परत केली नाही. म्‍हणून तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार मंचासमोर दाखल केली असून त्‍यांत खालीलप्रमाणे मागणी केली आहे. 

 

1.    वि.प. यांना आदेश द्यावा कि, त्‍यांनी तक्रारकर्त्‍याकडून फीची घेतलेली रक्‍कम   रु.66,759/- 24 टक्‍के व्‍याजासह परत करावी.

2.    शारिरिक व मानसिक त्रासाबाबत रु.2,00,000/- नुकसान भरपाई मिळावी. 

3.    तक्रार खर्च रु.50,000/- देण्‍याचा वि.प. विरुध्‍द आदेश व्‍हावा.

 

2.                वि.प.क्र. 1 व 2  यांना मंचाकडून रजिस्‍टर पोष्‍टाने पाठविलेली नोटीस प्राप्‍त होऊनही वि.प.क्र.2 हजर झाले नाही आणि आपले म्‍हणणे मांडले नाही, म्‍हणून प्रकरण त्‍यांच्‍या विरुध्‍द एकतर्फा चालविण्‍यांत आले. वि.प.क्र. 1 यांनी सदर प्रकरणी लेखी उत्‍तर दाखल केले.

 

3.                वि.प.क्र. 1 ने आपल्या लेखी उत्‍तरात म्‍हटले आहे कि,  तक्रारकर्ता हा बाहेरगावावरुन आलेला होता व नागपूरात नविन होता हे खोटे आहे.  नागपूरमधील व्‍ही.टी.कॉंन्‍वेंट ही त्‍याची अंतिम शाळा होती असे तक्रारकर्त्‍याने त्‍याच्‍या फॉर्ममध्‍ये नमूद केले आहे. तक्रारकर्ता आपल्‍या वडिलांसोबत नव्‍हे तर आईसोबत वि.प.क्र. 2 कडे एक वर्षाच्‍या आय.आय.टी. कोर्समध्‍ये प्रवेश घेण्‍यासाठी आला होता. त्‍यावेळी त्‍याला सांगितले होते कि, प्रवेश घेतल्‍यानंतर भरलेली फी परत मिळणार नाही. तशी अट प्रवेशअर्जात स्‍पष्‍टपणे नमुद असून तक्रारकर्ता व त्‍याच्‍या आईने ती मान्‍य असल्‍यामुळेच प्रवेशअर्ज भरुन सही केली आहे. तक्रारकर्त्‍याला सदर बाब माहिती असूनही  सदर खोटी तक्रार दाखल केली असल्‍याने खारीज करण्‍याची विनंती केली आहे.

4.                सदर तक्रारीच्‍या निर्णयासाठी खालिल मुद्दे मंचाच्‍या विचारार्थ घेण्‍यांत आले. त्‍यावरील मंचाचे निष्‍कर्ष व त्‍याबाबतची कारणमिमांसा पुढीलप्रमाणे.

 

            मुद्दे                                             निष्‍कर्ष

  1. विरुध्‍द पक्षाने सेवेत न्‍यूनतापूर्ण व्‍यवहार किंवा अनुचित व्‍यापार

   पध्‍दतीचा अवलंब केला आहे काय ?                               नाही.

2) तक्रारकर्ता मागणीप्रमाणे दाद मिळण्‍यांस पात्र आहे काय ?       नाही.

   3) अंतिम आदेश काय ?                                  अंतिम आदेशाप्रमणे

               

  •  कारणमिमांसा  -

 

5.                मुद्दा क्र.1 बाबत - सदरच्‍या प्रकरणात तक्रारकर्त्‍याने  वि.प.क्र. 1 FIITJEE लि. नागपूर येथे चालवित असलेल्‍या  शिकवणी वर्गासाठी  वि.प.क्र. 2  कडे प्रवेश घेतला व त्‍यासाठी रु.66,758/- इतकी फी जमा केल्‍याबाबत Enrollment Report Cum Acknowledgement दस्‍त क्र. 2 वर दाखल केली  आहे. Enrollment Contract  ची प्रत दस्‍त क्र. 2 वर दाखल केली आहे. त्‍यांत शिकवणीचा तपशील “Special One Year Classroom Programm”  आणि एकुण फी रु.66,759/- असे नमुद आहे. तक्रारकर्त्‍याच्‍या अधिवक्‍त्‍यांचा युक्तिवाद असा कि, तक्रारकर्ता   दि.12.04.2012 रोजी वि.प.क्र. 2 कडे  AIEEE च्‍या शिकवणी वर्गासाठी  रुजू झाला परंतु वि.प.क्र. 2 ने त्‍याला AIEEE च्‍या टयुशन क्‍लासमध्‍ये न बसविता 6 दिवस सतत IIT च्‍या टयुशन क्‍लासमध्‍ये बसविले. तक्रारकर्त्‍याने  तो AIEEE च्‍या शिकवणी वर्गासाठी आलेला आहे असे सांगितले असता वि.प.ने AIEEE च्‍या नविन बॅचेस लवकर सुरु होतील व त्‍याला त्‍या बॅचेसमध्‍ये बसण्‍याची  व्‍यवस्‍था केल्‍या जाईल असे सांगितले. वि.प.कडे AIEEE च्‍या शिकवणी वर्गासाठी फक्‍त 5 मुलांनी प्रवेश घेतला होता आणि IIT च्‍या टयुशन क्‍लासमध्‍ये बसण्‍यासाठी त्‍यांनी विरोध केला असता केवळ 5 मुलांकरीता AIEEE चा शिकवणी वर्ग चालविणे त्‍यांना शक्‍य नसल्‍याचे वि.प.ने सांगितले.  त्‍यामुळे वि.प.क्र. 2 च्‍या या म्‍हणण्‍यावर तक्रारकर्त्‍याने AIEEE चा शिकवणी वर्ग बंद करुन प्रवेश रद्द केला मात्र कोर्स कोऑर्डीनेटर डेव्‍हीड टिमोटी यांच्‍या सांगण्‍यावरुन  वडिलांची ट्रांसफर झालेली आहे व त्‍यामुळे फी परत करावी असा अर्ज सादर केला. याच बाबीवर वृषभ रामटेके या विद्यार्थ्‍याला फी परत केली करण्‍यांत आली, परंतु वि.प.ने तक्रारकर्त्‍यास फी परत केलेली नाही. वि.प.ने तक्रारकर्त्‍यास AIEEE च्‍या शिकवणी वर्गासाठी प्रवेश देवूनही सदर परिक्षेच्‍या पूर्वतयारीचे वर्ग सुरु केले नाही, त्‍यामुळे रद्द केलेल्‍या प्रवेशाची फी परत मिळण्‍यास तक्रारकर्ता पात्र असतांना मागणी करुनही ती परत न करणे ही सेवेतील न्‍युनता आणि अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब आहे. आपल्‍या युक्तिवादाच्‍या पुष्‍टयर्थ तक्रारकर्त्‍याच्‍या अधिवक्‍त्‍यांनी खालील न्‍यायनिर्णयांचा दाखला दिला आहे.

 

1. IV (2008) CPJ 148 (NC),

   Ranchi University & Anr. Vs. Nuzmat Sultana & Ors.

2. II(2005)CPJ 318 ,Gurunanak Dev University &  Anr. Vs. Jagjit Singh & Anr.

   PUNJAB State Consumer Disputes Redressal Commission, Chandigarh

3. II (2001) CPJ 71, Principal , Govt. Nutan Higher Secondary School  Vs. Deepak Pandya

   Rajsthan  State Consumer Disputes Redressal Commission, Jaipur.

4. I (2004) CPJ 292, Principal , Jagrut Nagrik & Anr.   Vs. Vice Chancellor, Sardar Patel   University & Anr.

   Gujrat  State Consumer Disputes Redressal Commission, Ahmedabad.

5.III(2003) CPJ 409, Himayoon Jalal    Vs. Jehlum Vally College

  Jammu & Kashmir State Consumer Disputes Redressal  Commission, Jammu.

6.III(2003) CPJ 584, Manager Study Circle Career Develoopment Institute    Vs. Syyad Juamir Usman & Ors. 

  Maharashtra  State Consumer Disputes Redressal  Commission, Mumbai.

 

वरील सर्व न्‍यायनिर्णयांत व्‍यक्‍त केलेल्‍या  अभिप्रायाचा सारांश  खालीलप्रमाणे आहे. 

 

“University and other Educational Institutions are not rendering services free of cost. If there is deficiency in service while imparting education by such educational institutions it gives rise to the comsumer dispute and the Consumer Acts comes into play.”

 

याउलट वि.प.क्र. 1 च्‍या अधिवक्‍त्‍यांनी आपल्‍या युक्तिवादात सांगितले कि, पूर्वी 12 वी नंतर अभियांत्रिकी प्रवेशासाठी AIEEE  आणि JEE अशा दोन स्‍वतंत्र प्रवेश परिक्षा होत्‍या. तक्रारकर्ता मार्च 2011 मध्‍ये 10 च्‍या परिक्षेस बसला व उत्‍तीर्ण झाला म्‍हणून 2013 साली तो अभियांत्रिकीच्‍या प्रवेश परिक्षेसाठी बसणार होता. 2013 मध्‍ये केंद्र शासनाने AIEEE  आणि JEE अशा दोन परिक्षांऐवजी  केवळ JEE  ही एकच परिक्षा JEE Main  आणि JEE Advance   अशा स्‍वरुपात घेण्‍याचे ठरविल्‍याने 2013 मध्‍ये अभियांत्रिकी प्रवेशासाठी AIEEE ही प्रवेश परिक्षा नव्‍हती. तक्रारकर्ता 2012 मध्‍ये 12 वीत गेला होता व म्‍हणून 2013 मध्‍ये होणा-या JEE परिक्षेच्‍या पूर्व तयारीसाठी  वि.प.कडे 1 वर्ष कालावधीचा On year Classroom Program for IIT-JEE  लावला होता. 2013 मध्‍ये AIEEE  ची प्रवेश परिक्षाच होणार नसल्‍यामुळे त्‍यासाठी तक्रारकर्त्‍याने  शिकवणी वर्ग लावण्‍याचा  प्रश्‍नच निर्माण झाला नाही. विरुध्‍द पक्षाने शिकवणी वर्ग चालविण्‍यासाठी खर्च केला आहे आणि तक्रारकर्ता मध्‍येच शिकवणी वर्ग सोडून गेल्‍याने वि.प.चे नुकसान झाले आहे. कोणत्‍याही कारणाने शिकवणी वर्ग सोडून गेल्‍यास भरलेली फी परत केली जाणार नाही असे तक्रारकर्ता व त्‍याच्‍या आईस सांगण्‍यांत आले होते व ते मान्‍य करुनच Enrollment Form  मध्‍ये तक्रारकर्ता व त्‍याच्‍या आईने Declaration 7  वर वाचून व समजून घेऊन सही केली असल्‍याने सदरचा करार त्‍यांच्‍यावर बंधनकारक आहे. सदर डिक्‍लरेशन खालीलप्रमाणे आहे -

 

”Declaration 7: In addition to the above, I understand without any ambiguity , that the fee once paid is not refundable at all, whatever the reasons be, neither is it adjustable towards any other exixting cources at FITJEE or any yet to be launched nor towards the fee of any other existing or prospective student.”

 

वरील कारणामुळे विरुध्‍द पक्षाची कोणतीही चुकी नसतांना तक्रारकर्त्‍याने स्‍वतः प्रवेश रद्द केला असल्‍याने भरलेली फी परत मिळण्‍यास तो पात्र नसल्‍याने वि.प.ने फी परत करण्‍याचे नाकारल्‍यामुळे सेवेत कोणताही न्‍युनतापूमर्ण व्‍यवहार किंवा अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब घडलेला नाही. तक्रारकर्त्‍याने दाखल दिलेल्‍या न्‍यायनिर्णयातील वस्‍तुस्थिती सदर प्रकरणाच्‍या वस्‍तुस्थितीशी पूर्णतः भिन्‍न असल्‍याने सदर न्‍यायनिर्णय प्रस्‍तुत प्रकरणात लागू होत नाही. वि.प.च्‍या अधिवक्‍त्‍यांनी आपल्‍या युक्तिवादाच्‍या पुष्‍टयर्थ खालील न्‍यायनिर्णयांचा दाखला दिला आहे.

 

       1. National Consumer Disputes Redressal Commission, New Delhi.

         R.P.NO. 2684 Of 2014

        FITJEE LTD. & Anr. Vs. I.S.Balvignesh

        Decided on 9th January 2015.

 

वरील प्रकरणांत मा. राष्‍ट्रीय आयोगाने खालीलप्रमाणे अभिप्राय नोंदविला आहे-

 

      “10. As regards the term stipulating that the student withdrawing from the coaching class midway will not be entitled to seek any refund of the fee deposited by him being an unfair trade practice, we are of the view that in a case where the seat vacated on account of withdrawal by a student during the currency of the course remains vacant and no other student is admitted against the vacant seat, the refusal of the coaching institute to refund the fee cannot be said to be unfair trade practice, though ]such a term may constitute and unfair trade practice in a case where the coaching institute admits a student in place of the student who withdraws from the coaching course and thereby suffers no financial loss.”

 

 

      2. 1. National Consumer Disputes Redressal Commission, New Delhi.

         R.P.NO. 24335 Of 2014

        Mayank Tiwari  Vs. FITJEE LTD.

        Decided on 08.12. 2014.

 

वरील प्रकरणांत मा. राष्‍ट्रीय  आयोगाने खालीलप्रमाणे अभिप्राय नोंदविला आहे-

 

“5. ....

It is not the case of the complainant or his father that the said declaration and undertaking were not signed by them or the same were got signed from them, by the Opposite Parties, under duress or coercion etc. In this view of the matter, we are of the considered view that once the candidate has entered into an agreement to abide by the rules and regulations and has voluntarily deposited the course fee, he (student) cannot at his weet will withdraw from the course and then demand the refund of fee on the plea that the method of teaching was not upto the mark as assured by the Opposite Parties. Instead, it was his responsibility to have ascertained the details with regard to the running of the course, by  the Institute, before depositing the course fee for beibng enrolled. Almost similar view was taken by the National Commission in R.P.No. 270/2006 Brillant Classes V. Shri Ashbel Sam, decided on 29.01.2010. Thus, the Opposite Parties  by not refunding the fee were neigher deficient in rendering service nor indulged into unfair trade practice.”

 

            विरुध्‍द पक्षाच्‍या अधिवक्‍त्‍यांनी सादर केलेल्‍या वरील दोन्‍ही न्‍यायनिर्णयातील वस्‍तुस्थिती आणि मंचासमोरील प्रकरणाची वस्‍तुस्थिती तंतोतंत जुळणारी असल्‍याने सदर न्‍यायनिर्णयातील अभिप्रायाप्रमाणेच सदरच्‍या प्रकरणांत वि.प.ने तक्रारकर्त्‍याने स्‍वतः प्रवेश रद्द केल्‍यावर प्रवेशाच्‍या अटी व शर्तीस अनुसरुन त्‍यांस फी परत करण्‍यास दिलेला नकार ही सेवेतील न्‍युनता किंवा अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब ठरत नाही. म्‍हणून मुद्दा क्र. 1 वरील निष्‍कर्ष नकारार्थी नोंदविला आहे.

 

6.          मुद्दा क्र. 2 व 3 बाबत - मुद्दा क्र. 1 वरील निष्‍कर्षाप्रमाणे वि.प. क्र. 1 किंवा 2 कडून सेवेत कोणताही न्‍युनतापूर्ण व्‍यवहार किंवा अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब झालेला नसल्‍याने तक्रारकर्ता मागणीप्रमाणे कोणतीही दाद मिळण्‍यास पात्र नाही. म्‍हणून मुद्दा क्र. 2 व 3 वरील निष्‍कर्ष त्‍याप्रमाणे नोंदविले आहेत.

 

           वरील निष्‍कर्षास अनुसरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.

 

आदेश

 

1)    तक्रारकर्त्‍याची ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 च्‍या कलम 12 खालील तक्रार         खारीज करण्‍यांत येते.

2)    उभय पक्षांनी आपआपला खर्च सहन करावा.

3)    उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निशुल्‍क द्यावी.

4)    तक्रारकर्त्‍यांना प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.

 
 
[HON'ABLE MR. MANOHAR CHILBULE]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. PRADEEP PATIL]
MEMBER
 
[HON'ABLE MRS. MANJUSHREE KHANKE]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.