Maharashtra

Osmanabad

CC/15/315

Smt. Pallavi Bhaskarrao Devale - Complainant(s)

Versus

Executive Engineer Maharashtra State Electricity Distribution Co. ltd. - Opp.Party(s)

Adv. S.S. Nikam

01 Mar 2017

ORDER

DISTRICT CONSUMER REDRESSAL FORUM OSMANABAD
Aria of Collector Office Osmanabad
 
Complaint Case No. CC/15/315
 
1. Smt. Pallavi Bhaskarrao Devale
R/o Barshi Naka Osmanabad
Osmanabad
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. Executive Engineer Maharashtra State Electricity Distribution Co. ltd.
MSEDCL Osmanabad
Osmanabad
Maharashtra
2. Dupty Engineer MSEDCL
MSEDCL Osmanabad
Osmanabad
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. M.V. Kulkarni. PRESIDENT
 HON'BLE MR. M.B. Saste MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 01 Mar 2017
Final Order / Judgement

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्‍मानाबाद.

 

 

ग्राहक तक्रार क्रमांक : 315/2015.

तक्रार दाखल दिनांक : 26/08/2015.

                                                           तक्रार आदेश दिनांक : 01/03/2017.                                निकाल कालावधी: 01 वर्षे 06 महिने 06 दिवस   

 

 

 

श्रीमती पल्‍लवी भ्र. भास्‍करराव ढेंगळे,

वय 50 वर्षे, व्‍यवसाय, घरकाम,

रा. बार्शी नाका, उस्‍मानाबाद, ता.जि. उस्‍मानाबाद.                   तक्रारकर्ती

                   विरुध्‍द                          

 

(1) कार्यकारी अभियंता, म.रा.वि.वि. कंपनी मर्या.,

    उस्‍मानाबाद, ता.जि. उस्‍मानाबाद.

(2) उपकार्यकारी अभियंता, म.रा.वि.वि. कंपनी मर्या.,

    शहर उपविभाग, उस्‍मानाबाद, ता.जि. उस्‍मानाबाद.                विरुध्‍द पक्ष

 

 

 

                   गणपुर्ती  :-   श्री. एम.व्‍ही. कुलकर्णी, अध्‍यक्ष

                      श्री. मुकूंद बी. सस्‍ते, सदस्‍य 

 

                   तक्रारकर्ती यांचेतर्फे विधिज्ञ :  एस.एस. निकम

                   विरुध्‍द पक्ष यांचेतर्फे विधिज्ञ : व्‍ही.बी. देशमुख

 

न्‍यायनिर्णय

 

श्री. एम.व्‍ही. कुलकर्णी, अध्‍यक्ष यांचे द्वारा :-

 

1.    तक्रारकर्ती यांचेद्वारे उपस्थित वादविषय थोडक्‍यात असा आहे की, त्‍यांची उस्‍मानाबाद नगर परिषद हद्दीमध्‍ये नगर भुमापन क्रमांक 5651 घरजागा आहे. त्‍या घरजागेमध्‍ये तक्रारकर्ती यांचे पती भास्‍करराव ढेंगळे यांचे नांवे विरुध्‍द पक्ष यांचेकडून विद्युत पुरवठा घेतलेला असून त्‍यांचा नवीन ग्राहक क्रमांक 590010092487 व जुना ग्राहक क्रमांक 009248 आहे. विद्युत पुरवठा घेतल्‍यापासून त्‍यांनी नियमीतपणे वीज देयकांचा भरणा केला. परंतु विरुध्‍द पक्ष यांनी त्‍यांना जास्‍त व चुकीचे रिडींग दर्शवून वीज देयक दिले. त्‍याबाबत तक्रारकर्ती यांनी देयक दुरुस्‍तीबाबत अर्ज केला असता त्‍याकडे दुर्लक्ष करण्‍यात आले. त्‍यामुळे तक्रारकर्ती यांनी विरुध्‍द पक्ष यांच्‍याविरुध्‍द या जिल्‍हा मंचामध्‍ये ग्राहक तक्रार क्र.29/2013 दाखल केली असता विरुध्‍द पक्ष यांनी मीटर बदलून देण्‍यासह वीज देयकाची दुरुस्‍ती करण्‍याचे आश्‍वासन दिल्‍यामुळे तक्रार काढून घेतली. परंतु विरुध्‍द पक्ष यांनी त्‍यांच्‍या देयकाची दुरुस्‍ती केली नाही आणि मीटरही बदलून दिले नाही.

 

2.    तक्रारकर्ती यांचे पुढे असे वादकथन आहे की, विरुध्‍द पक्ष हे त्‍यांना वेळेवर देयके देत नाहीत आणि रिडींगप्रमाणे देयक देण्‍याऐवजी मोघम व अंदाजे देयक देण्‍यात येत आहेत. तक्रारकर्ता यांनी देयक दुरुस्‍ती करुन देणे व मीटर बदलून देण्‍याबाबत विनंती अर्ज करुनही दखल घेण्‍यात आली नाही. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्ती यांच्‍या मागणीकडे दुर्लक्ष करीत बेकायदेशीपणे विद्युत पुरवठा खंडीत केला. तक्रारकर्ती यांनी तक्रारीमध्‍ये माहे डिसेंबर 2014 ते जुलै 2015 पर्यंत मागील रिडींग व चालू रिडींगसह देयक रकमेचा तपशील नमूद केला आहे.

 

3.    तक्रारकर्ती यांचे पुढे असे वादकथन आहे की, विरुध्‍द पक्ष यांनी त्‍यांना चूक देयक दिलेले असून त्‍याचा भरणा न केल्‍यास विद्युत पुरवठा खंडीत करण्‍याची धमकी दिली. त्‍यामुळे तक्रारकर्ती यांनी नाईलाजाने डिसेंबर 2014 चे देयक रु.8,000/- दि.17/1/2015 रोजी भरणा केले. त्‍यानंतर जानेवारी व फेब्रुवारीचे रु.2,500/- देयक भरणा केले. मार्च 2015 मध्‍ये देयक न देता एप्रिलमध्‍ये 1361 असे चूक युनीट दर्शवून थकबाकीसह रु.17,140/- देयक देण्‍यात आले. त्‍याबाबत रु.7,000/- रकमेचा भरणा तक्रारकर्ती यांनी दि.27/5/2015 रोजी केला. तक्रारकर्ती यांचे मीटर जून 2015 मध्‍ये बदलण्‍यात येऊनही जुलै 2015 चे चूक देयक देण्‍यात आले.

 

4.    अशाप्रकारे वरील वादविषयाचे अनुषंगाने तक्रारकर्ती यांनी विरुध्‍द पक्ष यांच्‍याकडून देण्‍यात आलेली डिसेंबर 2014 ते जुलै 2015 पर्यंत चूक, मोघम व अंदाजे देण्‍यात आलेली वीज आकार देयके रद्द करुन जून 2015 पासून नवीन मीटरप्रमाणे नोंदलेल्‍या रिडींगप्रमाणे देयक आकारणी करावे, अशी विनंती केली आहे. तसेच त्‍यांनी भरणा केलेली रक्‍कम रु.17,500/- जून 2015 पासून देण्‍यात आलेलया देयकातून वजावट करुन उर्वरीत रक्‍कम देण्‍याचा व मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.30,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.10,000/- देण्‍याचा विरुध्‍द पक्ष यांना आदेश करण्‍यात यावा, अशी विनंती केली आहे.

 

5.    विरुध्‍द पक्ष यांनी अभिलेखावर लेखी उत्‍तर दाखल केले आहे. त्‍यांच्‍या कथनाप्रमाणे तक्रारकर्ती यांनी स्‍वत:चे नांवे विद्युत पुरवठा करुन घेतला नाही आणि त्‍यांना ग्राहक नात्‍याने तक्रार करता येणार नाही. तक्रारकर्ती यांनी विद्युत देयकाचा संपूर्ण भरणा केलेला नसून हप्‍ते करुन त्‍यांनी देयकांची रक्‍कम भरलेली आहे. त्‍या नेहमीच थकबाकीत राहिल्‍या आहेत. तक्रारकर्ती यांना योग्‍य देयके दिल्‍यामुळे ग्राहक तक्रार क्र.29/2013 काढून घेतली होती. तक्रारकर्त्‍या थकबाकीत राहिल्‍या आणि त्‍यांनी थकबाकीचा हप्‍ता करुन रु.8,000/- चा भरणा केला. तसेच दि.10/5/2015 रोजी थकबाकीपैकी रु.7,000/- भरले आहेत. तक्रारकर्ती यांचे मीटर त्‍यांनी बदलले असून जुन्‍या मीटरचे देयक त्‍यांना देण्‍यात आलेले नाही. तक्रारकर्ती यांनी वापरलेल्‍या युनीटचे देयक देण्‍यात आलेले होते. त्‍यामुळे देयक रद्द करण्‍याचा किंवा रक्‍कम परत करण्‍याचा प्रश्‍न उदभवत नाही. त्‍यांच्‍या सेवेमध्‍ये त्रुटी निर्माण झालेली नाही. त्‍यांचे पुढे असे कथन आहे की, तक्रारकर्ती यांच्‍या वीज वापरानुसार पाहणी केली असता मे 2015 ते फेब्रुवारी 2016 या कालावधीत वापरलेल्‍या युनीटप्रमाणे देयके दिलेले नसून कमी-जास्‍त वापर दर्शवून देयके देण्‍यात आली होती. त्‍यामुळे मे 2015 ते फेब्रुवारी 2016 या 10 महिन्‍यात (युनीट 3983) विभागणी करुन दिलेले असून सरासरी प्रतिमहा 398 युनीटचा वापर दिसून येतो. तक्रारकर्ती यांना वापरलेल्‍या युनीटप्रमाणे त्‍यावर दंड व व्‍याज आकारणी न करता देयक दुरुस्‍त करुन दिलेले आहे. तक्रारकर्ती यांची तक्रार खोटी असल्‍यामुळे खर्चासह नामंजूर करण्‍यात यावी, अशी विरुध्‍द पक्ष यांनी विनंती केली आहे.

 

6.    तक्रारकर्ती यांची तक्रार, विरुध्‍द पक्ष यांचे लेखी उत्‍तर व अभिलेखावर      दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारीमध्‍ये उपस्थित वादविषयाचे निवारणार्थ उपस्थित होणा-या वादमुद्दयांची कारण‍मीमांसा त्‍यांच्‍यापुढे दिलेल्‍या उत्‍तराकरिता खालीलप्रमाणे देण्‍यात येते.

 

            मुद्दे                                    उत्‍तर

 

1. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्ती यांना द्यावयाच्‍या सेवेमध्‍ये

     त्रुटी केल्‍याचे सिध्‍द होते काय ?                                                                होय.    

2. तक्रारकर्ती अनुतोषास पात्र आहेत काय ?                       होय.

3. काय आदेश ?                                        अंतिम आदेशाप्रमाणे.

 

कारणमीमांसा

 

7.    मुद्दा क्र. 1 व 2 :- असे दिसते की, या तक्रारकर्तीने पूर्वी तक्रार क्र.29/2013 दाखल केली होती. मात्र ती काढून घेतली. तक्रारकर्तीचे म्‍हणणे आहे की, विरुध्‍द पक्षाने मीटर बदलून देण्‍याचे व दुरुस्‍त करुन देण्‍याचे आश्‍वासन दिल्‍यावरुन ती तक्रार काढून घेण्‍यात आली. विरुध्‍द पक्षाला हे कबूल नाही. तक्रारकर्तीने एप्रिल 2015 चे बिलापोटी रु.7,000/- दि.27/5/2015 रोजी भरणा केले, असे म्‍हटलेले आहे. मात्र डिसेंबर 2014 पासून मोघम व चुकीचे बिले दिली, अशी तक्रारकर्तीची तक्रार आहे. सदरकामी तक्रारकर्तीतर्फे मीटर तपासणीचा अर्ज देण्‍यात आला होता. दि.10/8/2016 चे आदेशानुसार तक्रारकर्तीने खर्च नियमानुसार व अटीनुसार तो मंजूर करण्‍यात आला होता. मात्र तक्रारकर्तीने मीटर तपासून घेतल्‍याचे दिसत नाही.

 

8.    विरुध्‍द पक्षाचे म्‍हणण्‍याप्रमाणे तक्रारकर्तीने संपूर्ण बील कधीच भरले नाही. बील न भरल्‍यामुळेच विरुध्‍द पक्षाने वीज पुरवठा कायदेशीररित्‍या खंडीत केला. तक्रारकर्तीने तक्रारीसोबत अंतरीम अर्ज दिला होता. त्‍यावर दि.27/8/2015 रोजी आदेश होऊन तक्रारकर्तीने रु.3,000/- भरण्‍याच्‍या अटीवर विरुध्‍द पक्षाने वीज पुरवठा खंडीत करु नये, असा आदेश दिलेला होता. मात्र विरुध्‍द पक्षाने दि.29/6/2016 रोजी तक्रारकर्तीचा वीज पुरवठा तोडला. म्‍हणून तक्रारकर्तीने अर्ज दाखल केल्‍यानंतर दि.30/7/2016 रोजी विरुध्‍द पक्षाने विद्युत पुरवठा सुरु करण्‍याचे कबूल केले. तसेच दि.30/6/2016 चे आदेशानुसार तक्रारकर्तीने रु.5,000/- भरण्‍याच्‍या अटीवर विरुध्‍द पक्षाला त्‍याखाली वीज पुरवठा सुरु करण्‍यास आदेश करण्‍यात आला. विरुध्‍द पक्षाने मीटर तपासणी करावी व सुस्थितीतील मीटर बसवावे, असा पण आदेश देण्‍यात आला होता. विरुध्‍द पक्षाने तसे केले किंवा नाही, याबद्दल काहीही पुरावा नाही.

 

9.    तक्रारकर्तीची तक्रार डिसेंबर 2014 चे बिलापासून सुरु होते. पूर्वीची तक्रार तक्रारकर्तीने सोडून दिलेली आहे. विरुध्‍द पक्षातर्फे कंझ्युमर पर्सनल लेजरचा उतारा हजर केलेला आहे. डिसेंबर 2014 मध्‍ये मागील रिडींग 16744, चालू रिडींग ‘उपलब्‍ध नाही’, वापर 323 युनीट व बील रु.2,685/- थकबाकीसह रु.11,826/- दाखवलेले आहे. त्‍यानंतर जानेवारी 2015 मध्‍ये मीटर रिडींग मिळाली असून वापर 54 युनीट, फेब्रुवारीमध्‍ये 132 युनीट व मार्चमध्‍ये 1316 युनीट असा वापर दाखवला आहे. मार्च 2016 मध्‍ये चालू रिडींग 18114 दाखवले आहे. एप्रिल 2015 मध्‍ये 406 युनीट, मे 2015 मध्‍ये 445 युनीट वापर दाखवला आहे. त्‍यानंतर रिडींग 18965 वर थबकल्‍याचे दिसते. जुलै 2015 मध्‍ये नवीन मीटर बसवले व चालू रिडींग 777 तर वापर 781 युनीट पुढे मीटर 777 युनीटवर थबकले आहे. आक्‍टोंबरमध्‍ये 2175 रिडींग मिळून वापर 1358 युनीट दाखवले आहे. पूर्वीच्‍या 2 महिन्‍यात 275 युनीट वापर दाखवला. नोव्‍हेंबरमध्‍ये 248 युनीट व डिसेंबरमध्‍ये 431 युनीट असा वापर दाखवला आहे.

 

10.   जुलै 2015 मध्‍ये जरी मीटर बदलले असले तरी एकाच महिन्‍या 781 युनीट वापर कसा काय झाला, त्‍यानंतर पुढचे 2 महिने मीटर का पळाले नाही, याचा खुलासा विरुध्‍द पक्षाने देणे जरुर होते. असे दिसून येते की, विरुध्‍द पक्षाच्‍या कर्मचा-याने प्रत्‍यक्ष मीटर रिडींग न घेता आपल्‍या मनाप्रमाणे वापर नोंदवला व बिले दिली. त्‍यानंतर जेव्‍हा रिडींग घेण्‍यात आले, तेव्‍हा सुध्‍दा मागील बिलाचा विचार न करता संपूर्ण वापराबद्दलच्‍या बिलाची मागणी केली आहे. हे खरे आहे की, मे 2012 पासून तक्रारकर्तीचा वापर दोन-अडीचशे किंवा त्‍यापेक्षा जास्‍त युनीट दिसून आलेला आहे. कदाचित तक्रारकर्तीचा मोठ्या प्रमाणात वापर असू शकतो. मात्र नियमीतपणे रिडींग न घेता अॅव्‍हरेज बेसीसवर बिले देऊन पुन्‍हा एकदा अचानक रिडींग घेऊन अधिकचे मोठ्या रकमेचे बील देऊन विरुध्‍द पक्षाने सेवेत त्रुटी केली, असे आमचे मत आहे. म्‍हणून आम्‍ही मुद्दा नं.1 व 2 चे उत्‍तर होकारार्थी देतो व खालीलप्रमाणे आदेश करतो.

ग्राहक तक्रार क्र.315/2015.

 

आदेश

 

(1) तक्रारकर्तीला दिलेले डिसेंबर 2014 व त्‍यापुढची बिले रद्द करण्‍यात येतात. त्‍याऐवजी तक्रारकर्तीने डिसेंबर 2014 पूर्वी 36 महिने नोंदवलेला तक्रारकर्तीचा सरासरी वापर काढून त्‍यानुसार डिसेंबर 2014 चे बील द्यावे व त्‍याच प्रमाणात प्रत्‍यक्ष वापराप्रमाणे तक्रारकर्तीला पुढील बिले द्यावीत.

(2) विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला या तक्रारीचा खर्च रु.5,000/- द्यावा.               

 

                                                                               

(श्री. मुकूंद बी. सस्‍ते)                                  (श्री. एम.व्‍ही. कुलकर्णी)

       सदस्‍य                                               अध्‍यक्ष

       जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्‍मानाबाद.

-00-

 
 
[HON'BLE MR. M.V. Kulkarni.]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. M.B. Saste]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.