जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर यांचे समोर.
तक्रार क्रमांक :19/2010
तक्रार दाखल दिनांक:19/01/2010
तक्रार आदेश दिनांक:30/07/2015
निकाल कालावधी 05वर्षे06म11दि
श्री.सुरेश बंडू शिरसवार,
वय 65 वर्षे, धंदा- कांही नाही,
रा.66, न्यु ति-हेगांव, फॉरेस्ट,सोलापूर. ....तक्रारकर्ता/अर्जदार
विरुध्द
मा.मुख्य कार्यकारी अभियंता,
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं.लि.मर्या.,
बिजली भवन,जुनी मिल कंपौंड,सोलापूर.
(यात सा.वालास नोटीस मुख्य कार्यकारी अधिकारी
शहर सोलापूर यांचे नांवे बजावण्यात यावी.) ...विरुध्दपक्ष /गैरअर्जदार
उपस्थिती:- श्री.मिलिंद बी.पवार(हिरुगडे),अध्यक्ष
श्री.ओंकारसिंह जी.पाटील, सदस्य
सौ. बबिता एम.महंत-गाजरे,सदस्या
अर्जदार तर्फे विधिज्ञ :-श्री.आर.पी.मैंदर्गीकर
विरुध्दपक्षातर्फे विधिज्ञ:-श्री.उ.कि.केकडे
-:निकालपत्र:-
(पारीत दिनांक:-30/07/2015)
मा.श्री.मिलिंद बी.पवार(हिरुगडे),अध्यक्ष यांचेव्दारा :-
-: आ दे श :-
1. अर्जदार यांचा गैरअर्जदार विरुध्दचा तक्रार अर्ज अशंत: मंजुर करण्यात येत आहे.
2. गैरअर्जदार यांनी फेब्रुवारी 2008 ते जुलै,2008 पर्यंतची दिलेली बिले तसेच जुलै 2009 ते नोव्हेंबर 2009 पर्यंतची दिलेली बिले रद्द करणेत येतात.
3. वर नमुद रद्द केलेल्या महिन्याचे बिलाची आकारणी दरमहा 182 युनिट प्रमाणे करणेत यावी. व नवीन बिले तक्रारकर्ता यांना द्यावीत, त्यामध्ये कोणतेही दंड व व्याज, बिलंब आकार यांची आकारणी करु नये. तसेच तक्रारकर्ता यांनी वर नूद रद्द केलेल्या बिलाचे कालावधीमध्ये भरलेल्या बिलाच्या रक्कमा त्यामधून वजावट करावी व उर्वरीत रक्कम पुढील बिलात समायोजित करावी.
4. गैरअर्जदार यांनी अर्जदारास मानसिक व शारीरिक त्रासापोटी रुपये 2,000/- (रु.दोन हजार फक्त) व तक्रार अर्जाचा खर्च रु.2,000/-(रु.दोन हजार फक्त) द्यावे.
5 .निकालपत्राच्या प्रति सर्व संबंधीत पक्षांना माहितीस्तव व उचित कार्यवाहीकरीता पाठविण्यात याव्यांत.
(श्री.ओंकारसिंह जी.पाटील) (सौ. बबिता एम.महंत-गाजरे) (श्री.मिलिंद बी.पवार(हिरुगडे)
सदस्य सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
दापांशिंस्व0293107150