Maharashtra

Mumbai(Suburban)

CC/159/2016

LT. COLONER RAJVIR SINGH BASWAN - Complainant(s)

Versus

DURIAN INDUSTRIES LTD. - Opp.Party(s)

11 Jul 2016

ORDER

CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, MUMBAI SUBURBAN DISTRICT
ADMINISTRATIVE BLDG, NEAR DR.BABASAHEB AMBEDKAR GARDEN , BANDRA (E), MUMBAI-400051
 
Complaint Case No. CC/159/2016
 
1. LT. COLONER RAJVIR SINGH BASWAN
M 386,TARAPORE TOWERS OSHIWARA NEW LINK ROAD ANDHERI WEST, MUMBAI
...........Complainant(s)
Versus
1. DURIAN INDUSTRIES LTD.
DURIAN ESTATE GOREGAON MULUND LINK ROAD. GOREGAON EAST MUMBAI 400 063
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. M.Y.MANKAR PRESIDENT
 HON'ABLE MR. S.R.SANAP MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

तक्रारदार     -  स्‍वतः  

 

आदेश - मा. एम.वाय.मानकर, अध्‍यक्ष,          ठिकाणः बांद्रा (पू.)

 

                तक्रार दाखलकामी आदेश

 

1.तक्रारदारांना तक्रार दाखल कामी ऐकण्‍यात आले.

 

2.  तक्रार व सोबत दाखल करण्‍यात आलेले कागदपत्रे पाहण्‍यात आली. तक्रारदारांनी ही केस सोफा बनविणा-या नामांकित कंपनी विरूध्‍द दाखल केली आहे. तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्‍याकडून मागणी नोंदवून रू. 86,538/-, अदा करून सोफासेट विकत घेतला होता. 4,5 महिन्‍यांनी त्‍या सोफ्याची दुर्दशा होऊ लागली. सोफ्यामध्‍ये भेगा दिसू लागल्‍या व रंग फिका होऊ लागला तक्रारदार यांना जानकार लोकांकडून सांगण्‍यात आले की, सोफ्याकरीता वापरलेले साहित्‍य हे चांगल्‍या दर्जाचे नाही. तक्रारदारांना 5 वर्षाची वारंटी दिली होती. त्‍याप्रमाणे तक्रारदारांनी दिनांक 07/09/2012 ला सामनेवाले यांच्‍याकडे तक्रार नोंदविली. सामनेवाले यांनी काही सोपस्‍कार केल्‍यानंतर तक्रारदार यांनी दुरूस्‍तीसाठी रू. 33,000/-, अदा करावे असे सांगीतले. व सोफे बदलवून मिळणार नाही हे स्‍पष्‍ट केले. सबब, तक्रारदारानी ही तक्रार दाखल केली.

 

3.   तक्रारदारानी सोफे दिनांक 20/12/2011 ला विकत घेतले व लगेच 4,5 महिन्‍यामध्‍ये त्‍यामधील दोष त्‍यांना आढळून आला. तशी लेखी तक्रार दिनांक 07/09/2012 ला केली. आमच्‍या मते तक्रारदाराला सोफ्याबद्दल जी तक्रार होती त्‍याबाबत त्‍यांनी सोफे खरेदी केल्‍यापासून दोन वर्षाचे आत तक्रार दाखल करणे आवश्‍यक होते. ही तक्रार दिनांक 28/03/2016 ला दाखल करण्‍यात आली. त्‍यामुळे तक्रारदार दाखल करण्‍यास 2 वर्षापेक्षा जास्‍त विलंब झालेला आहे. तक्रारीचे कारण दिनांक 07/09/2012 जर गृहित धरण्‍यात आले तर तक्रार दाखल करण्‍यास दिड वर्षापेक्षा जास्‍त कालावधी झालेला आहे. विलंब क्षमापित करण्‍याकरीता कोणताही अर्ज दाखल नाही. त्‍यामुळे विलंब क्षमापित करता येत नाही.   सबब खालील आदेश.

                      आदेश   

  1.  तक्रार क्र 159/2016 ही ग्राहक संरक्षण कायदा कलम 24(अ) प्रमाणे दाखल करून घेता येत नाही व ती फेटाळण्‍यात येते.
  2.  खर्चाबाबत आदेश नाही.
  3. आदेशाच्‍या प्रती उभयपक्षांना विनामुल्‍य पाठविण्‍यात याव्‍या.
  4. अतिरीक्‍त संच तक्रारदार यांना परत करण्‍यात यावे. 
  5. npk/-
 
 
[HON'BLE MR. M.Y.MANKAR]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. S.R.SANAP]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.