Maharashtra

Osmanabad

CC/15/292

Bharat Annarao Alkunde - Complainant(s)

Versus

Duputy Executive Engineer MSEDCL - Opp.Party(s)

Adv. S.G. Deshpande

03 Dec 2016

ORDER

DISTRICT CONSUMER REDRESSAL FORUM OSMANABAD
Aria of Collector Office Osmanabad
 
Complaint Case No. CC/15/292
 
1. Bharat Annarao Alkunde
R/o Pathrud Galli near Bangad Oil Mill, Osmanabad
OSMANABAD
MAHARASHRA
...........Complainant(s)
Versus
1. Duputy Executive Engineer MSEDCL
MSEDCL Near Tajmahal Tokis Osmanabad Tq. & Dist. osmanabad
Osmanabad
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. M.V. Kulkarni. PRESIDENT
 HON'BLE MR. M.B. Saste MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 03 Dec 2016
Final Order / Judgement

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्‍मानाबाद.

 

 

ग्राहक तक्रार क्रमांक : 292/2015.

तक्रार दाखल दिनांक : 10/08/2015.

                                                           तक्रार आदेश दिनांक : 03/12/2016.                                निकाल कालावधी: 01 वर्षे 03 महिने 23 दिवस   

 

 

 

भारत आण्‍णाप्‍पा अलकुंटे, वय 60 वर्षे, व्‍यवसाय : मजुरी,

रा. पाथ्रुड गल्‍ली, बांगड ऑईल मीलसमोर, प्रविण किराणा

दुकानामागे, सोलापूर रोड, उस्‍मानाबाद, ता.जि. उस्‍मानाबाद.            तक्रारकर्ता

                   विरुध्‍द                          

 

उपकार्यकारी अभियंता, महाराष्‍ट्र राज्‍य विद्युत वितरण कंपनी,

ताजमहल टॉकीजजवळ, उस्‍मानाबाद, ता.जि. उस्‍मानाबाद.             विरुध्‍द पक्ष

 

 

                   गणपुर्ती  :-   श्री. एम.व्‍ही. कुलकर्णी, अध्‍यक्ष

                      श्री. मुकूंद बी. सस्‍ते, सदस्‍य 

 

                   तक्रारकर्ता यांचेतर्फे विधिज्ञ :  एस.जी. देशपांडे

                   विरुध्‍द पक्ष यांचेतर्फे विधिज्ञ : व्‍ही.बी. देशमुख

 

न्‍यायनिर्णय

 

श्री. एम.व्‍ही. कुलकर्णी, अध्‍यक्ष यांचे द्वारा :-

 

1.    तक्रारकर्ता याचेद्वारे उपस्थित वादविषय थोडक्‍यात असा आहे की, त्‍याने विरुध्‍द पक्षाकडून घरगुती वापरासाठी वीज पुरवठा घेतलेला असून त्‍याचा ग्राहक क्रमांक 590010426814 आहे. त्‍याला मे 2015 या महिन्‍याचे रु.8,090/- चे चुकीचे बील आले आणि ते दुरुस्‍त करण्‍यासाठी प्रस्‍तुत तक्रार दाखल केली आहे. ऑगस्‍ट 2013 ते सप्‍टेंबर 2014 मध्‍ये त्‍याला बील देण्‍यात आले नाही. मागणी करुनही त्‍याला बील देण्‍यात आले नाही आणि पूर्वसूचना न देता त्‍याचा वीज पुरवठा खंडीत केला. त्‍याच्‍या बिलाप्रमाणे कधी वापर 22 युनीट तर कधी 239 युनीट दर्शवण्‍यात आला असून मीटर दोषयुक्‍त आहे. विरुध्‍द पक्ष यांच्‍या सेवेतील त्रुटीमुळे प्रस्‍तुत तक्रार दाखल करुन मे 2015 चे रु.8,090/- चे देयक वीज वापराप्रमाणे दुरुस्‍त होऊन मिळावे आणि रु.10,000/- नुकसान भरपाईसह रु.10,000/- तक्रार खर्च देण्‍याबाबत विरुध्‍द पक्ष यास आदेश करण्‍यात यावा, अशी विनंती केली आहे.

 

2.    तक्रारकर्त्‍याने तक्रारीसोबत दि.1/6/2015 चे वादकथित बील, दि.29/12/2014 व 24/11/2014, 30/7/2014 चे वीज बिलासह विरुध्‍द पक्ष यांना दिलेले अर्ज दाखल केले आहेत.

 

3.    विरुध्‍द पक्ष यांनी अभिलेखावर लेखी उत्‍तर दाखल केले असून तक्रारीतील विधाने व मजकूर अमान्‍य केला आहे. त्‍यांच्‍या कथनाप्रमाणे तक्रारकर्त्‍याला मे 2015 या महिन्‍याचे दिलेले रु.8,090/- चे देयक योग्‍य आहे आणि त्‍याची दुरुस्‍ती करुन मागण्‍याचा तक्रारकर्त्‍याला अधिकार नाही. त्‍यांनी तक्रारकर्त्‍याला दि.16/7/2013 रोजी वीज पुरवठा दिलेला आहे. परंतु विद्युत पुरवठयाची नोंद त्‍याच्‍या खात्‍यावर फेब्रुवारी 2014 मध्‍ये झाली. त्‍यावेळी तक्रारकर्त्‍याचा वीज वापर 415 युनीट दिसून आला आणि 7 महिन्‍यामध्‍ये त्‍याची विभागणी करुन, तसेच दंड व व्‍याज आकारणी न करता रु.1,933.38 पैसे रकमेचे बील दिले. परंतु तक्रारकर्त्‍याला मागणी करुनही बाकी न भरल्‍यामुळे वीज पुरवठा खंडीत केला. मीटर योग्‍य असल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याच्‍यसा वीज वापराप्रमाणे बिले देण्‍यात आलेली असून बिले दुरुस्त करण्‍याचा प्रश्‍न निर्माण होत नाही. तक्रारकर्ता याने वीज पुरवठा घेतल्‍यापासून आजपर्यंत फक्‍त दि.2/9/2014 रोजी रु.2,000/- भरणा केलेला आहे. तक्रारकर्ता याची तक्रार खोटी असल्‍यामुळे खर्चासह नामंजूर करण्‍यात यावी, अशी विनंती विरुध्‍द पक्ष याने केलेली आहे.

 

4.    विरुध्‍द पक्ष याने आपले लेखी उत्‍तरासोबत तक्रारकर्त्‍याचे सी.पी.एल. दाखल केले आहे.

 

5.    तक्रारकर्ता यांची तक्रार, विरुध्‍द पक्ष यांचे लेखी उत्‍तर व अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता, तसेच विरुध्‍द पक्ष यांचे विधिज्ञाचा मौखिक युक्तिवाद ऐकल्‍यानंतर तक्रारीमध्‍ये उपस्थित वादविषयाचे निवारणार्थ उपस्थित होणा-या मुद्दयांची कारण‍मीमांसा त्‍यांच्‍यापुढे दिलेल्‍या उत्‍तराकरिता खालीलप्रमाणे देण्‍यात येते.

 

            मुद्दे                                    उत्‍तर

 

1. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना द्यावयाच्‍या सेवेमध्‍ये

     त्रुटी केल्‍याचे सिध्‍द होते काय ?                                                                नाही.    

2. तक्रारकर्ता अनुतोषास पात्र आहेत काय ?                       नाही.

3. काय आदेश ?                                        अंतिम आदेशाप्रमाणे.

 

 

कारणमीमांसा

 

6.    मुद्दा क्र. 1 व 2 :- तक्रारकर्त्‍याच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे त्‍याला मे 2015 या महिन्‍याचे बील रु.8,090/- हे चुकीचे आले आहे; जे बील तक्रारकर्त्‍याने हजर केले आहे. ते दि.20/4/2015 ते 20/5/2015 या कालावधीचे असून ते 65 युनीट वीज वापरासाठी रु.438.11 चे बील आहे. थकबाकी रु.7,649.34 पैसे दाखवलेली आहे. मागील 11 महिन्‍याचा वीज वापर युनीटमध्‍ये 102, 47, 26, 29, 22, 45, 69, 30, 239, 91, 137 असा दाखवलेला आहे. या बिलात मागील रिडींग 1671 तर चालू रिडींग 1739 दाखवलेली आहे. तक्रारकर्त्‍याने नोव्‍हेंबर 2014 व डिसेंबर 2014 चे पण बील हजर केले आहे. पहिल्‍या बिलात मागील रिडींग 1403 चालू रिडींग 1448 व वापर 45 युनीट तर दुस-या बिलात मागील रिडींग 1448 चालू रिडींग 1470 व वापर 22 युनीट दाखवलेला आहे. पहिल्‍या बिलात थकबाकी रु.5,643/- दाखवलेली आहे. थकबाकी न भरल्‍यामुळे बिलाच्‍या रकमा वाढत गेल्‍या, हे उघड होत आहे.

 

7.    तक्रारकर्त्‍याची तक्रार आहे की, सन 2014 मध्‍ये त्‍याला जवळजवळ वर्षभर बील देण्‍यात आले नाही. मागणी केल्‍यानंतर त्‍याला अवास्‍तव बील देण्‍यात आले व त्‍याचा वीज पुरवठा खंडीत करण्‍यात आला. पुढे म्‍हटले आहे की, त्‍याने ऑगस्‍ट 2013 मध्‍ये नवीन वीज पुरवठा घेतला. बिलावर वीज पुरवठयाची तारीख 16/7/2013 अशी दाखवण्‍यात आली आहे. म्‍हणजे जुलै 2013 मध्‍ये तक्रारकर्त्याला वीज पुरवठा देण्‍यात आला होता. मात्र त्‍याने ऑगस्‍ट 2013 मध्‍ये वीज पुरवठा दिल्‍याचे म्‍हटले आहे.

 

8.    तक्रारकत्‍याचे म्‍हणणे आहे की, त्‍याचा वीज पुरवठा कधी 22 युनीट तर कधी 239 युनीट दाखवण्‍यात आला. यावरुन मीटर दोषयुक्‍त आहे. वर म्‍हटल्‍याप्रमाणे ऑगस्‍ट 2014 मध्‍ये 239 युनीट वीज वापर दाखवला आहे. जुन 2014 मध्‍ये 137 युनीट तर एप्रिल 2015 मध्‍ये 102 युनीट वीज वापर नोंदवलेला आहे. इतर महिन्‍यात कमी वीज वापर नोदवला आहे. ज्‍या त्‍या महिन्‍यात जो वीज वापर केला गेला, तोच मीटरवर नोंदवला जाते. विरुध्‍द पक्षाच्‍या कर्मचा-याने चुकीचा वीज वापर नोंदवला, अशी तक्रारकर्त्‍याची तक्रार नाही. पण मीटर फॉल्‍टी आहे, अशी तक्रार आहे. मीटर तपासणीसाठी तक्रारकर्त्‍याने अर्ज दिल्‍याचे दिसून येत नाही. आपल्‍या घरामध्‍ये काय वीज पुरवठा आहे, याचा उल्‍लेख तक्रारकर्त्‍याने तक्रारीत केलेला नाही. दि.25/2/2015 चे अर्जामध्‍ये तक्रारकर्त्‍याने म्‍हटले आहे की, घरात 1 बल्‍ब, झिरो बल्‍ब व टी.व्‍ही. आहे. मात्र असा कोणताही पंचनामा झालेला दिसत नाही. विरुध्‍द पक्षाचे म्‍हणण्‍याप्रमाणे मीटर हे योग्‍य आहे. तक्रारकर्त्‍याला त्‍याच्‍या वापराप्रमाणे बिले दिलेली आहत. जरी वीज पुरवठा दि.16/7/2013 पासून दिला होता, तरी वीज पुरवठयाच्‍या वापराची नोंद फेब्रुवारी 2014 मध्‍ये झाली व वापर 415 युनीट दिसून आला. सदर वापर 7 महिन्‍यात विभागून व्‍याज, दंड न लावता तक्रारकर्त्‍याला रु.1,937/- चे बील देण्‍यात आले, ते त्‍याने भरलेले नाही.

9.    विरुध्‍द पक्षातर्फे तक्रारकर्त्‍याचे पर्सनल लेजर अकाऊंटचा उतारा हजर केलेला आहे. फेब्रुवारी 2014 पासून वीज पुरवठा नोंदवल्‍याचे दिसते. तक्रारकर्त्‍यच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे सुध्‍दा ऑगस्‍ट 2013 पासून वीज पुरवठा सुरु झाला होता. मार्च 2014 पासून दरमहा नोंदलेला वीज वापर पुढीलप्रमाणे आहे. 77, 124, 220, 137, 91, 239. सप्‍टेंबर 2014 पासून नोंदवलेला वीज वापर पुढीलप्रमाणे आहे. 30, 69, 45, 22, 29, 26, 47. सप्‍टेंबर 2014 पासून वीज वापर का कमी झाला, याचे कारण तक्रारकर्त्‍याने दिलेले नाही. त्‍यापूर्वी जास्‍त वीज वापर का नोंदला गेला, याबद्दल तक्रारकर्त्‍याचे म्‍हणणे आहे की, मीटर दोषपूर्ण होते. मीटर दोषपूर्ण असल्‍याबद्दल मीटरची तपासणी करण्‍यासाठी तक्रारकर्त्‍याने कोणताही प्रयत्‍न केलेले नाही. तक्रारकर्त्‍याने रु.2,000/- बील दि.2/9/2014 रोजी भरल्‍याचे दिसते. त्‍याच्‍या आधी कोणतेही बील भरले नाही, अगर त्‍यानंतर कोणतेही बील भरलेले नाही.

 

10.   तक्रारकर्त्‍याची मागणी आहे की, मे 2015 चे बील वापराप्रमाणे दुरुस्‍त व्‍हावे. मात्र ते बील वापराप्रमाणे नाही, असे म्‍हणणयस काहीही आधार दिसून येत नाही. जरी विद्युत पुरवठा दिल्‍यानंतर सुरुवातील जास्‍त वीज वापर नोंदवला गेला व नंतर कमी वीज वापर नोंदवला गेला तरी यामध्‍ये विरुध्‍द पक्षाच्‍या कर्मचा-यांनीच कर्तव्‍यात कसूर केला, असे म्‍हणता येणार नाही. तक्रारकर्त्‍याचे तसे म्‍हणणेही नाही. त्‍याची तक्रार फक्‍त मीटर सदोष असल्‍याची आहे. मात्र त्‍यासाठी पुरेसा पुरावा नाही. म्‍हणून आम्‍ही मुद्दा नं.1 व 2 चे उत्‍तर नकारार्थी देतो व खालील आदेश करतो.

 

आदेश

 

(1) तक्रारकर्त्‍याची तक्रार नामंजूर करण्‍यात येते.

      (2) खर्चासंबंधी आदेश नाहीत.

      (3) उभय पक्षकारांना आदेशाची प्रथम प्रत नि:शुल्‍क पुरवण्‍यात यावी.         

                                                                               

(श्री. मुकूंद बी. सस्‍ते)                                  (श्री. एम.व्‍ही. कुलकर्णी)

       सदस्‍य                                               अध्‍यक्ष

       जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्‍मानाबाद.

-00-

(संविक/स्‍व/श्रु/301116)

 
 
[HON'BLE MR. M.V. Kulkarni.]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. M.B. Saste]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.