निकालपत्र :- (दि.09/03/2012) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्या)
(1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला हे त्यांचे वकीलांमार्फत हजर होऊन त्यांनी लेखी म्हणणे दाखल केले आहे. उभय पक्षांच्या वकीलांचा युक्तीवाद ऐकला.
सामनेवाला बँकेने बेकायदेशीरपणे तक्रारदाराचे शेती कर्जाचे महाराष्ट्र शासनाने कर्जमाफी लाभांतर्गत संपूर्ण परतफेड करुनही पुन्हा थकबाकीसाठी सामनेवाला बॅकेने कार्यवाही केलेने सदरची तक्रार करणेत आली आहे.
(2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:- सामनेवाला ही सहकारी बॅक आहे. तक्रारदार व्यवसायाने शेतकरी असलेने शेतीसाठी आवश्यक असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉली करिता तक्रारदार व त्यांचे वडील श्री शंकर कृष्णा भंडारी यांनी मिळून जॉइन्ट कर्ज खातेवर दि.24/08/2002 रोजी रक्कम रु.2,30,000/- इतकी उचल केली होती. सदर कर्ज रक्कमेची परतफेड दि.20/08/2007 रोजीपर्यंत करणेची होती. तक्रारदार व त्यांचे वडील सदरचे कर्जाची रक्कम शेतीतून मिळणारे कमी उत्पन्न व आर्थिक व कौटूंबिक अडचणीमुळे दिलेल्या मुदतीत कर्ज फेड करु शकले नाहीत. त्यामुळे सदर कर्ज खाते थकीत गेले. अशा परिस्थितीत महाराष्ट्र शासनाकडून सन 2008 मध्ये शेती कर्ज सवलत व कर्ज माफी योजना आली होती व सदर योजनेमध्ये दि.29/02/2008 पर्यंत फेडण्यात न आलेल्या कर्जांचा समावेश होता. सदर योजनेमध्ये तक्रारदाराच्या कर्जाचा समावेश होत होता. सदर योजनेप्रमाणे सामनेवाला यांनी दि.22/07/2008 रोजी शेती कर्ज सवलत व कर्ज माफी योजना-2008 माफीचा दाखला देऊन सदर योजनेप्रमाणे ओटीएस च्या अंतर्गत तक्रारदार यांचा वाटा रक्कम रु.89,854/- इतका असलेचे सामनेवाला यांनी तक्रारदार यांना कळवून सदर दाखल्याप्रमाणे दि.22/07/2008 रोजी सदरची ओटीएस रक्कम रु.89,854/- दि.30/06/09 पर्यंत फेडण्याबाबतचे वचनपत्र लिहून दिले होते. सदर वचनपत्रानुसार नमुद मुदतीत सदर रक्कम भरु शकले नसल्यास सदर योजनेचा लाभ मिळणार नाही असे नमुद करणेत आले होते. तक्रारदाराने दि.30/6/09 पूर्वी सदर रक्कमेची परत फेड केलेने सदर योजनेप्रमाणे तक्रारदाराचे कर्जाची संपूर्ण कर्जफेड झालेली आहे. त्यामुळे तक्रारदाराने सामनेवालांकडे कर्जफेडीच्या दाखल्याची (एनओसी)मागणी केली.पंरतु सामनेवाला यांनी दाखला देणेस टाळाटाळ करुन दि.20/01/11 रोजी रु.78,147/-इतकी थकबाकी भरणेबाबतचे पत्र पाठवून तक्रारदारास धक्का दिला आहे. कर्जाची संपूर्ण परतफेड झाली असतानाही जादा रक्कम उकळण्याच्या दृष्टीने असे थकबाकीच्या रककमेचे पत्र पाठवून सामनेवाला तक्रारदारास मानसिक व शारिरीक त्रास देत आहेत. त्यामुळे दि.07/2/2011 रोजी सामनेवाला यांना कायदेशीर नोटीस पाठवून कर्जफेडीच्या दाखल्याची मागणी केली. त्यास कोणतेही उत्तर सामनेवाला यांनी दिलेले नाही. अशाप्रकारे कर्जाची संपूर्ण फेड करुनही थकबाकीची नोटीस पाठवून सामनेवाला यांनी सेवात्रुटी केलेने प्रस्तुतची तक्रार मे. मंचात दाखल केली आहे. सबब तक्रारदाराची तक्रार मंजूर करुन सामनेवाला बँकेस तक्रारदार यांना संपूर्ण कर्जफेडीचा दाखला (एनओसी) देणेबाबत आदेश व्हावेत. सामनेवाला यांचे सेवात्रुटीमुळे तक्रारदारास झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु.50,000/- तक्रारीच्या खर्चापोटी रु.15,000/- व नोटीसीच्या खर्चापोटी रु.1,000/- तक्रारदारास देणेबाबत सामनेवाला यांना हुकूम व्हावा अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे.
(03) तक्रारदाराने आपल्या तक्रारीच्या पुष्यर्थ कर्जमाफीचा दाखला, वेळोवेळी रक्कमा जमा केल्याच्या पावत्या, सामनेवाला यांनी तक्रारदारास पाठविलेली पत्रे, तक्रारदारने सामनेवाला यांना दिलेली कायदेशीर नोटीस व त्याची पोहोच इत्यादी कागदपत्र दाखल केली आहेत.
(04) सामनेवाला यांनी दाखल केलेल्या लेखी म्हणणेनुसार तक्रारदाराची तक्रार मान्य केले कथनाखेरीज परिच्छेदनिहाय नाकारलेली आहे. सामनेवाला पुढे असे प्रतिपादन करतात की, नाबार्डचे सहाय्याने केंद्र सरकारने कर्ज सवलत योजना दिलेली होती. मात्र योजना संपूर्ण कर्ज माफ करणेबाबत नव्हती. सदर योजनेचा हेतू हा कर्जाची थकीत रक्कमेच्या सवलतीबाबत असून तसेच हप्त्यामधून सवलत होती. मात्र संपूर्ण कर्ज माफ करणेबाबतची सदरची सवलत नव्हती. दि.22/07/2008 चे प्रमाणपत्राचे अवलोकन केले असता रु.1,19,805/- इतकी रक्कम माफ करणेत आलेली आहे. उर्वरित रक्कम रु.89,854/- तक्रारदाराने दिलेली आहे. उर्वरित रक्कम नाबार्डकडून मिळावयाची होती. प्रस्तुत प्रमाणपत्रे आरबीआय चे निर्देशाप्रमाणे दिलेली होती व ती कंडीशनल वेवरची होती. सदर कर्जाची संपूर्ण माफी झालेली नसून नमुद तक्रारदाराचे मुद्दल रक्कमेचे कर्ज खाते सुरुच होते. तक्रारदाराने दि.30/6/09 अखेर रु.89,854/- भरले असलेचे सामनेवाला यांनी मान्य केलेले आहे. तसेच उर्वरित परतफेडीसाठी तक्रारदाराने सामनेवाला बँकेकडे पूर्वीचे कर्ज रिन्यू करणेसाठी विनंती केली. त्यासाठी त्याने दि.10/3/08 रोजी लेखी अर्ज दिलेला आहे. त्याप्रमाणे दि.26/3/08 रोजी ठराव क्र.3 व्दारे रक्कम रु.1,25,000/- तीन वर्षामध्ये परतफेड करणेचे मुदतीने कर्जमंजूरी देणेत आली आहे. त्याअनुषंगाने त्याने शपथपत्र, डिमांड प्रॉमिसरी नोट, कर्ज रोखा, कंटीन्यू गॅरंटी लेटर, डिक्लरेशन, मिळकतीसंबंधी शपथपत्र, प्रो नोट अंडरटेकींग, लेटर ऑफ लीन, तसेच सेट ऑफ इत्यादी कागदपत्रे दि.31/03/08 रोजी देऊन प्रस्तुत कर्ज रक्कम रु.1,25,000/-द.सा.द.शे. 17 टक्के व्याजाने परत फेड करणेबाबत मान्यता दिलेली आहे. सबब तक्रारदाराचे पूर्वीचे खाते रु.2,30,000/- बदं होऊन सदर नवीन कर्ज चालू झाले. सदर कर्जाची रक्कम ही मूळ कर्ज खातेकडे वर्ग केली. सदर मूळ कर्ज खाते बंद झालेमुळे त्याबाबत तक्रारदारास वाद करता येणार नाही; रु.1,25,000/- कर्ज रक्कमेबाबत नवीन करार झालेला आहे.
दि.20/01/2011 रोजी सामनेवाला बॅंकेने रु.78,147/- थकबाकीची पत्राव्दारे केलेली मागणी बरोबर आहे. सदर कर्जखाते उतारा म्हणणेसोबत दाखल केलेला आहे. तक्रारीस कोणतेही कारण घडलेले नाही. तक्रारदाराने कधीही कर्जाची पूर्णफेड केलेले नाही; पूर्वीचे कर्ज खाते क्र.460020 बंद होऊन दि.31/03/08 रोजी कर्ज खाते क्र.51054 अन्वये रु.1,25,000/- इतकी कर्ज रक्कम व रक्कम रु.1,000/- तक्रारदाराचे वर नमुद कर्जखातेस वर्ग करणेत आलेली आहे. तक्रारदाराने सदर नवीन कर्जाबाबतची कोणतेही हप्ते भरलेले नाहीत. सामनेवाला यांचा पैसे उकळण्याचा उद्देश नाही. तक्रारदाराने सामनेवाला यांना कायदेशीर नोटीस पाठवलेचे मान्य केलेले आहे. मात्र सदरची नोटीस करारकर्तव्याविरुध्द असलेमुळे सामनेवाला सदर नोटीसला उत्तर देणेस बांधील नाही. तक्रारदाराने सामनेवालांकडे कर्जफेडीबाबत एनओसी मागिलेली नाही. कर्जमाफी योजनेअंतर्गत सदरचे कर्ज येत नाही याची माहिती तक्रारदारास आहे. त्यामुळे तक्रारीस कारण घडलेले नाही. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी. पूर्वीचे कर्ज दि.20/08/2007 पर्यंत परतफेड करणेचे होते. कर्ज माफी योजना ही दि.22/07/2008 रोजी मंजूर झालेली आहे. दि.26/3/2008 रोजी कर्जाचे रिन्यूअल केलेले आहे. सदर तारखांचे बाहेर जाता येणार नाही. दि.20/1/011 रोजी नोटीस पाठवून सदरची तक्रार मुदतीत आणता येणार नाही. सबब प्रस्तुतची तक्रार मुदतीत नसलेने फेटाळणेस पात्र आहे. तक्रारदाराने तक्रार अर्ज कलम 12 मध्ये उपस्थित केलेला मंचाचे अधिकारक्षेत्राचा मुद्दा चुकीचा आहे. तक्रारदार हा थकबाकीदार असलेमुळे त्यास मे. मंचाकडे दाद मागता येणार नाही. त्यासाठी त्याला महाराष्ट्र सहकार संस्था कायदयाअंतर्गत दाद मागावी लागेल. सबब मे. मंचास प्रस्तुतची तक्रार चालवणेचे अधिकारक्षेत्र येत नाही. तक्रारदाराची कोणतीही मागणी मान्य करता येणार नाही. सबब तक्रारदार हे मंचाची दिशाभूल करीत आहेत. सामनेवाला यांनी कोणतीही सेवात्रुटी केली नसलेने तक्रारदाराची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी व सामनेवाला यांना कॉम्पेसेंटरी कॉस्ट रु.50,000/- तक्रारदाराकडून देणेबाबत हुकूम व्हावा अशी विंनती सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे.
(05) सामनेवाला यांनी आपले म्हणणेच्या पुष्टयर्थ कर्ज मागणी अर्ज, प्रॉमिसरी नोट, कर्ज बॉन्ड, कंटीन्युटींग गॅरंटी लेटर, प्रॉपर्टी हक्कदाराचे प्रतिज्ञापत्र, प्रो-नोट अंडरटेकींग फॉर्म, लेटर ऑफ जीन अॅन्ड सेट ऑफ, कर्ज खाते उतारा, पॉवर ऑफ अॅटोर्नी इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
(06) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवालांचे लेखी म्हणणे उभय पक्षकारांचे वकीलांचा तोंडी युक्तीवाद इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात.
1. तक्रार मे. मंचात चालणेस पात्र आहे काय ? ---होय.
2. सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? ---होय.
3. काय आदेश ? ---शेवटी दिलेप्रमाणे.
मुद्दा क्र.1:- सामनेवाला यांनी तक्रारदारास सामनेवाला यांनी आपले लेखी म्हणणेमधील कलम 11 मध्ये मुदतीचा मुद्दा उठवलेला आहे. तक्रारदार व त्यांचे वडीलांचे नांवे असलेले ट्रॅक्टर वाहन कर्ज रु.2,30,000/- हे दि.24/08/02 रोजी अदा केले गेले होते. प्रस्तुतचे कर्जापोटी काही रक्कमांचा भरणा केला आहे. मात्र तदनंतर प्रस्तुतचे खाते हे थकीत गेलेले आहे व सदर कर्जखाते हे केंद्रशासनाचे कर्जमाफी योजनेअंतर्गत समाविष्ट झाले होते. त्याप्रमारणे सामनेवाला यांनी दि.22/07/08 रोजी सदर योजनेअंतर्गत ओटीएसचा वाटा रु.89,854/- भरणेबाबत तक्रारदारास कळवलेले आहे. तसेच दि.27/05/09 रोजी सामनेवाला बॅकेने सदर वाटयाची उर्वरित रक्कम रु.50,610/- दि.30/06/09 अखेर भरणेबाबत कळवलेले आहे. तक्रारदाराने सदरची रक्कम दि.15/06/09 रोजी भरलेली आहे. सदर वस्तुस्थितीचा विचार करता दि.30/06/09 रोजी सदर रक्कम भरणेची मुदत संपत असलेने सदर कालावधीपासून दोन वर्षाचे आत म्हणजेच दि.28/06/2011 रोजी तक्रारदाराने तक्रार दाखल केली असलेने प्रस्तुत तक्रारीस मुदतीची बाधा येत नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तसेच सामनेवाला यांनी प्रस्तुत मंचात प्रस्तुतची तक्रार चालवणेचे अधिकार क्षेत्र नसलेचे त्यांचे लेखी म्हणणेतील कलम 12 मध्ये नमुद केलेले आहे. ग्राहक संरक्षण कायदा कलम 3च्या तरतुदीचा विचार करता प्रस्तुत तक्रार चालवणेचे अधिकारक्षेत्र मे. मंचास येते. तसेच सामनेवाला यांनी तक्रारदार हा त्यांचा ग्राहक नसलेचा आक्षेप घेतलेला आहे. सदर आक्षेपाचा विचार करता तक्रारदार हा सामनेवाला यांचा कर्जदार आहे. त्यामुळे कर्जासंबंधीची सेवा देणेची जबाबदारी सामनेवाला यांनी स्विकारलेली असलेने तक्रारदार हा सामनेवालांचा ग्राहक आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. वरील विस्तृत विवेचनाचा विचार करता प्रस्तुतची तक्रार मंचात चालणेस पात्र आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
मुद्दा क्र.2 व 3:- सामनेवाला यांनी आपले म्हणणेमध्ये तक्रारदार व त्यांचे वडील श्री शंकर कृष्णा भंडारी यांचे नांवे रु.2,30,000/-चे दि.24/08/02 रोजी ट्रॅक्टर ट्रॉलीकरिता कर्ज घेतलेची वस्तुस्थिती सामनेवाला यांनी मान्य केलेली आहे. तसेच प्रस्तुत कर्ज थकीत गेले. त्यामुळे शासनाच्या कर्जमाफी योजनेअंतर्गत सदर कर्जाचा समावेश होता. मात्र प्रस्तुत दाखल प्रमाणपत्रावरुन सदर योजनेअतर्गत रु.1,19,805/-इतकी रक्कम माफ करणेत आलेली आहे व त्यापैकी रक्कम रु.89,854/-इतकी रक्कम तक्रारदाराने भरणेचे होते व उर्वरित रक्कम नाबार्ड कडून येणे होती. सदरची सवलत ही कंडिशनल होती. तक्रारदाराने दि.30/06/09 अखेर रु.89,854/-भरलेचे सामनेवाला यांनी मान्य केलेले आहे व उर्वरित रक्कमेसाठी कर्जाचे नुतनीकरण करणेची विनंती करुन त्यासंबंधातील कागदपत्रे दिलेली आहेत. दि.26/03/08 चे ठराव क्र.3 नुसार रु.1,25,000/- तीन वर्षाचे परतफेडीच्या मुदतीने कर्ज मंजूर केलेले आहे. त्यासंबंधातील सर्व आवश्यक कागदपत्रे तक्रारदाराने पूर्ण करुन दिलेली आहेत. त्यामुळे पूर्वीचे कर्ज बंद झालेने सदर नवीन कर्जामध्ये सदर बाबींचा समावेश करता येणार नाही असे प्रतिपादन केले आहे.
सामनेवाला यांनी मान्य केली वस्तुस्थिती,प्रतिपादन व दाखल कागदपत्रांचा विचार करता दि.22/07/08 चे शेती कर्ज सवलत व कर्जमाफी योजना 2008 इतर शेतक-यांसाठी माफीचा दाखला या सामनेवालांचे कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारदाराचे कर्जखाते क्र.46/20 असून 2.23 हेक्टर आर भूधारक आहे. मूळ धन म्हणजेच कर्ज रु.2,30,000/- ची नोंद आहे. प्रस्तुतचे कर्ज ट्रॅक्टर साठी घेतलेले आहे. दि.31/12/2007 पर्यंत अतिदेय रक्कम उपयुक्त कर्जासंबंधी जे दि.29/02/2008 पर्यंत फेडण्यात आलेले नाही अशी रक्कम रु.1,19,805/- असून ओटीएस च्या अंतर्गत शेतक-याचा वाटा रु.89,854/- इतका आहे. सदर कर्जमाफी मंजूर करणेत आलेली आहे. दाखल वचनपत्राप्रमाणे दि.30/06/09 अखेर रु.89,854/- भरणेचे होते. सदर वेळेत रक्कम न फेडल्यास माफीचा अधिकार राहणार नाही. तसेच दि.01/03/08 पासून देय व्याजाचे रक्कमेसह संपूर्ण अतिदेय रक्कम तक्रारदाराकडून वसूल करणेत येईल असे नमुद केलेले आहे. त्याप्रमाणे रु.29,951/- दोन व रु.29,952/- चा एक अशा तीन हप्त्यामध्ये तक्रारदाराने रक्कम अदा करणेच्या होत्या. दि.27/05/09चे सामनेवालांकडील रेफरन्स नं.52/809 चे पत्रानुसार रु.1,19,805 पैकी निवेश कर्ज अतिदेय हप्ता रक्कमेपैकी रु.39,243/- भरलेली असून दि.30/06/09 अखेर उर्वरित हप्त्याची रक्कम रु.50,610/- भरुन सहकार्य करावे अन्यथा सदर योजनेअंतर्गत लाभास पात्र समजले जाणार नाही याची नोंद घेणेबाबत कळवले आहे. त्यास अनुसरुन तक्रारदाराने दि.15/06/09 रोजी रु.50,610/- रोखीत भरलेचे दाखल भरणा पावतीवरुन निदर्शनास येते. यावरुन सदर योजनेचा लाभ तक्रारदारास मिळालेला आहे व सामनेवाला बॅकेने कळवलेप्रमाणे तक्रारदाराने त्याचे हिश्याची रक्कम मुदतपूर्व भरलेली आहे ही वस्तुस्थिती निर्विवाद आहे.
सामनेवाला यांनी दि.10/08/11 रोजी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारदाराने वाहन नजरगहाण कर्ज रक्कम रु.1,30,000/- ची मागणी केलेली आहे. सदर कर्ज ट्रॅक्टर 30सिटी 2002 मॉडेलचा आणि एचएमटी 3022 कंपनीचा रजिस्टर नं.MH-09-U-8369 या वाहनासाठी केलेचे दिसून येते. सदरचा अर्ज दि.10/03/08 रोजी दिलेला आहे. दि.26/03/08 रोजीचे ठराव क्र.3 ने तारण कर्ज रु.1,25,000/- मंजूर केलेचे दिसून येते. त्याअनुषंगाने तक्रारदाराने दि.31/03/08 रोजी रु.1,25,000/-चे प्रॉमिसरी नोट तसेच कर्जरोखा सामनेवाला बॅंकेस लिहून दिलेला आहे. तसेच कंन्टीन्युइंग गॅरंटी लेटर लिहून दिलेले आहे. सदर कर्जास राजाराम दत्तात्रय भंडारी व बबन नारायण भंडारी जामीन आहेत ही वस्तुस्थिती दाखल कागदपत्रावरुन दिसून येते. सामनेवाला यांनी दाखल केलेले एस.के.भंडारी व ए.एस.भंडारी यांचे नांवे असणारा संयुक्त कर्ज खातेउता-याचे अवलोकन केले असता वाहन हायपोथिकेशन कर्ज 46000220 असून मंजूर कर्ज रक्कम रु.2,30,000/- आहे. प्रस्तुतचे कर्ज दि.20/08/2007 ची डयू डेट आहे. तसेच प्रस्तुत कर्ज खाते उतारा हा दि.24/08/02 ते 02/08/11 अखेरच्या कालावधीची नोंद दिसून येते. दि.24/08/02 रोजी रु.2,30,000/- इतके वाहन तारण कर्ज दिलेले आहे. प्रस्तुत कर्जापोटी काही रक्कम भरलेल्या दिसून येतात. मात्र सदरचे कर्ज तदनंतर कोणत्याही रक्कमा न भरलेने थकीत गेलेले आहे. दि.31/03/08 रोजी प्रस्तुत कर्जप्रकरणी रु.1,25,000/- रक्कम भरुन प्रस्तुतचे कर्जखाते निरंक झालेचे दिसून येत आहे. सदरची रक्कम ही नवीन वाहन कर्जाची रक्कम रु.1,25,000/- सदर खातेवर वर्ग करुन निरंक करणेत आलेचे दिसून येते. सामनेवाला यांनीच दाखल केलेल्या खातेउता-यावरुन दि.31/03/08 रोजी रु.2,30,000/- चे कर्जाची परतफेड झालेने ते निरंक झालेची वस्तुस्थिती निर्विवाद आहे. प्रस्तुतचे कर्ज हे तक्रारदार व त्यांचे वडीलांचे नांवे असलेची वस्तुस्थिती निर्विवाद आहे. सामनेवाला यांनी एकत्रितरित्या दाखल केलेला खातेउतारा पान क्र.1/6 ते 6/6 अशा एकूण 6 पानांचा आहे. तसेच सामनेवाला यांनी दि.31/03/08 ते 02/08/11 अखेर 1/5 ते 5/5 अशा एकूण पाच पानांचा तक्रारदाराचे नांवे असलेला सेक्यूर्ड लोन क्र.51054 मंजूर रक्कम रु.1,25,000/- डयू डेट दि.31/03/11 नोंद आहे. सदर कर्जखातेउतारा हा दि.31/03/11 ते 02/08/11 अखेरचा आहे. प्रस्तुत कर्जखातेवर दि.31/03/08 रोजी रु.1,26,000/- इतकी कर्ज रक्कम दिसून येते. तदनंतर दि.31/01/09 पर्यंत कोणतीही रक्कम भरणा केलेली नाही. सदर खातेवर दि.11/02/09रोजी रु.8,000/-, दि.28/3/09 रोजी रु.5,000/- दि.31/03/09 रोजी रु.15,000/- दि.20/05/09 रोजी रु.3,150/- दि.27/05/09 रोजी रु.8,093/- व दि.15/06/09 रोजी रु.50,610/- रक्कमेचा भरणा केलेचा दिसून येतो. तदनंतर सदर खातेवर कोणताही भरणा केला नसलेने प्रस्तुत खातेवर दि.29/06/11 अखेर रु.78,551/- इतकी थकबाकी दिसून येते. सदरची वस्तुस्थिती दाखल कागदपत्रांवरुन निर्विवाद आहे.
सामनेवाला यांनी जुने कर्ज खाते रक्कम रु.2,30,000/- संपुष्टात आलेले आहे. तसेच रु.1,25,000/- हे नवीन कर्ज आहे असे प्रतिपादन केलेले आहे. दि.31/12/07 अखेर जुने कर्जखाते रक्कम रु.2,30,000/- हे थकीत होते ही वस्तुस्थिती निर्विवाद आहे. तसेच प्रस्तुत कर्जखाते हे नवीन वाहन कर्ज रक्कम रु.1,25,000/-घेऊन सदरची रक्कम सदर कर्जखातेवर वर्ग करुन दि.31/03/08 रोजी निरंक करणेत आलेली आहे. अशी वस्तुस्थिती असतानाही सामनेवाला यांनी दि.22/07/08रोजी तक्रारदारास वर नमुद केलेप्रमाणे माफी दाखला पाठवून ओटीएस अंतर्गत त्याचे वाटयास येणारी रक्कम रु.89,854/-हे त्याचे जुने कर्ज खातेमध्येच जमा करुन घेणे कायदयाने अपेक्षीत असतानाही सामनेवाला यांनी दि.31/03/08रोजी आर्थिक वर्षाचे शेवटच्या दिवशी नमुद ट्रॅक्टरवर नव्याने वाहन कर्ज करुन सदरची रक्कम मूळ कर्ज खात्यास वर्ग करुन घेऊन सदर खाते निरंक करुन घेतलेले आहे व योजनेच्या लाभांतर्गत ओटीएस अंतर्गत तक्रारदारचे वाटयाची रक्कम रु.89,854/-नवीन कर्ज खातेवर भरुन घेतलेले आहेत. या वस्तुस्थितीची सामनेवाला यांना पूर्ण माहिती व ज्ञान असतानाही दि.22/07/08 रोजी तक्रारदारास माफीनामा पाठवून योजनेचा लाभ दिलेला आहे. मात्र प्रस्तुत योजनेचा लाभ हा जुने कर्जासाठी आहे. कारण सदरचे कर्ज हे दि.31/12/07अखेर थकीत देय होते. तसेच ते दि.29/02/08 अखेर फेडण्यात आलेले नव्हते. सामनेवालांचे म्हणणेप्रमाणे नवीन कर्ज हे दि.31/03/08 रोजी दिले असलेने सदर कर्जाचा व सदर योजनेचा कोणताही संबंध येत नाही.
सामनेवाला यांनी आर्थिक वर्षाचे शेवटच्या दिवशी म्हणजेच दि.31/03/2008 रोजी पूर्वी दिलेल्या ट्रॅक्टरवर पुन्हा नव्याने कर्ज दिलेबाबतची कागदपत्रे दाखल केलेली आहेत. तक्रारदाराने कर्ज मागणी केलेची बाब नाकारली आहे. वस्तुत: बँकींग व्यवहाराप्रमाणे आर्थिक वर्षाचे शेवटच्या दिवशी नफातोटा पत्रक, व तेरीजपत्रक इत्यादी कागदपत्रांची पूर्तता करणेचे असलेचे वर्षाचे शेवटच्या दिवशी सर्व कर्जाबाबतचे आर्थिक व्यवहार शक्यतो केले जात नाहीत. तरीही वादाकरिता सदरचा व्यवहार गृहीत धरला तरी सदरचे नवीन कर्ज हे सदर लाभांतर्गत येत नाही ही वसतुस्थिती नाकारता येत नाही.
सामनेवाला यांनी जुने कर्ज तसेच ठेवून सदर कर्जावरच प्रस्तुत योजनेचा लाभ घ्यावयास हवा होता. तसे न करता सामनेवाला यांनी तक्रारदारास सदर जुन्या कर्जाअंतर्गत कर्जमाफी योजनेअतंर्गत ओटीएसची रक्कम भरुन घेतलेली आहे. सदरची रक्कम ही तक्रारदाराने दि.30/06/09पूर्वी रोखीत भरणा केलेली आहे. सदर कर्जफेडीच्या एनओसीची मागणी तक्रारदाराने केलेली असून तशी दि.07/02/11 रोजी नोटीस पाठवून मागणी केलेली असूनही सामनेवाला यांनी त्यास जुने कर्ज खाते निरंक झालेबाबतचे प्रमाणपत्र दिलेचे दिसून येत नाही ही सामनेवालांचे सेवेतील गंभीर त्रुटी आहे. तसेच तक्रारदाराकडून ओटीएसपोटी रक्कम भरुन घेऊनही त्यास रु.1,25,000/- इतके वाहन कर्जाचा बोजा त्याचे डोक्यावर ठेवलेला आहे. तसेच प्रस्तुत नवीन कर्जापोटीचे रक्कम रु.1,25,000/- हे तक्रारदारास रोखीत दिलेले नाहीत. तर ते तक्रारदार व त्यांचे वडीलांचे संयुक्त जुने कर्ज खातेस परस्पर वर्ग केलेले आहे. सदर रक्कम परस्पर वर्ग करण्यास सामनेवाला यांनी तक्रारदारास कोणताही पूर्व सुचना दिलेचे दिसून येत नाही.
सामनेवाला बँकेच्या सदर वर्तनावरुन सामनेवाला बँकेने तक्रारदाराची दिशाभूल केलेची वस्तुस्थिती नाकारता येत नाही. कारण ओटीएस अंतर्गतचा वाटा हा जुन्या कर्जापोटी भरुन घेणे क्रमप्राप्त असतानाही तसेच सदरचा वाटा हा दि.30/06/09 पर्यंत भरणेबाबत मुदत दिलेली होती. सदर वस्तुस्थिती असतानाही सामनेवाला बँकेने सदर तारखेपर्यंत वाट न पाहता दि.31/3/08 रोजी तक्रारदाराकडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करुन घेऊन नवीन कर्जाचे नावाखाली सदर रक्कम जुन्या कर्जास वर्ग करुन घेऊन तसेच लाभांतर्गत रक्कम मात्र नवीन कर्जामधून वजा करुन उर्वरित कर्ज रक्कमेची मागणी सामनेवाला यांनी केलेली आहे. त्यासंबंधातील थकीत रक्कम रु.78,147/- ची नोटीस प्रस्तुत प्रकरणी दाखल आहे. सदर वस्तुस्थितीवरुन सामनेवाला बॅकेने स्वत:बरोबर तक्रारदाराची फसवणूक केलेली आहे. ही सामनेवालांचे सेवेतील गंभीर त्रुटी आहे. तक्रारदाराने सामनेवाला बँकेस त्या संदर्भात नोटीस पाठविलेली आहे. वस्तुत: प्रस्तुत तक्रारदार व त्यांचे वडीलांचे नांवे असलेले संयुक्त कर्ज हे कर्ज माफी योजनेत समाविष्ट असताना तसेच सदर योजनेचे ज्ञान सामनेवाला बॅकेस असतानाही सामनेवालांचे सदरचे वर्तन हे संशयास्पद आहे. एका बाजूस सामनेवाला नमुद ट्रॅक्टरवर नवीन वाहन रक्कम रु.1,25,000/- चे कर्ज देऊन सदर रक्कम जुने कर्ज रक्कम रु.2,30,000/- चे कर्ज खातेस दि.31/03/08 रोजी वर्ग करुन घेऊन प्रस्तुतचे कर्ज निरंक झालेचे प्रतिपादन करते. मात्र दुस-या बाजूस नवीन कर्ज रक्कम रु.1,25,000/- लाभांतर्गत पात्र नसतानाही सदर कर्जापोटी ओटीएस अंतर्गतची रक्कम रु.89,815/- भरुन घेऊन उर्वरित रक्कम रु.78,551/- व त्यावरील व्याज इतयादीची मागणी करत आहे. सामनेवालांचे कथने व सदरचा व्यवहार व वर्तन हे सदर योजनेअंतर्गत कर्ज माफी सवलतीच्या लाभास छेद देणारा आहे. सबब सामनेवाला यांनी सेवेत अक्षम्य अशी त्रुटी ठेवली आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
तक्रारदार म्हणतात त्याप्रमाणे तक्रारदाराने तक्रारी कथन केलेप्रमाणे ट्रॅक्टर या वाहनाच्या तारणापोटी घेतलेली कर्ज रक्कम रु.2,30,000/- चे कर्जखाते थकीत गेलेले होते. दि.31/12/07 अखेर अतिदेय रक्कम उपयुक्त कर्जासंबंधी जे दि.29/002/08अखेर फेडण्यात आलेली नाही अशी रक्कम रु.1,19,805/- होती व सदर रक्कम फेडणेसाठी सदर कर्जदार शेतक-याचा वाटा ओटीएस अंतर्गत रु.89,854/- इतका होता. नमुद दि.30/06/09 निर्धारित वेळेपूर्वी प्रस्तुत वाटा हा रोखीत अदा केलेला आहे. त्यामुळे प्रस्तुत कर्ज नियमाप्रमाणेच निरंक झाले असलेने त्यासंबंधीचा कर्जफेड दाखला मागणी करुनही सामनेवाला बॅकेने तक्रारदारास दिलेला नाही ही वस्तुस्थिती निर्विवाद आहे. सबब ही सामनेवालांचे सेवेतील गंभीर त्रुटी आहे. याउलट सामनेवाला बँकेने तक्रारदाराकडून नवीन वाहनाच्या कर्जापोटी कागदपत्रे पूर्ण करुन घेऊन सदर नवीन कर्जाची रक्कम रु.1,25,000/- जुने कर्ज रु.2,30,000/- जे कर्जमाफी योजनेअतंर्गत पात्र होते ते निंरक करुन सेवेत अक्षम्य त्रुटी ठेवलेली आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तसेच नवीन दिलेले कर्ज तक्रारदारास रोखीत दिलेले नाही तर ते जुन्या कर्ज खातेस वर्ग करुन घेतलेले आहे. तसेच तक्रारदार कर्जदाराचा ओटीएस अंतर्गतचा वाटा वगळता उर्वरित रक्कम नाबार्ड कडून मिळणेची होती या सामनेवालांचे प्रतिपादनाचा विचार करता सामनेवाला यांनी आपले लेखी म्हणणेत प्रस्तुत रक्कम नाबार्डकडून मिळालेली नाही असे कुठेही कथन केलेले नाही अथवा त्याअनुषंगीक पुरावा दिलेला नाही. याचा अर्थ सदर कर्जमाफी अंतर्गत सदर रक्कम सामनेवालांना नाबार्डकडून प्राप्त झालेली आहे असे म्हणणे चुकीचे होणार नाही. सदर योजनेअंतर्गत तक्रारदार हा लाभार्थी असतानाही तक्रारदारास नवीन कर्ज घेणेस प्रवृत्त करुन व सदरचे नवीन कर्ज जुन्या कर्जास वर्ग करुन घेऊन सामनेवाला यांनी तक्रारदाराची दिशाभूल केलेची वस्तुस्थिती सदर मंचाचे निदर्शनास आलेली आहे. तक्रारदारावर प्रस्तुत योजनेअंतर्गत जुने कर्ज निरंक होत असतानाही नवीन कर्जाचा बोजा निर्माण करुन तक्रारदारास आर्थिकदृष्टय अडचणीत आणलेले आहे तसेच प्रस्तुतचे कर्ज तक्रारदारास रोखीत अदा केलेले नाही तर सदर कर्जाची योजनेअंतर्गत पूर्णत: फेड होत असलेची माहिती असतानाही सामनेवाला यांनी तक्रारदाराची दिशाभूल करुन तक्रारदाराकडून नवीन कर्जासाठीची कागदपत्रांची पूर्तता करुन घेतलेली आहे या वस्तुस्थितीकडे मंचास दूर्लक्ष करता येणार नाही. सबब तक्रारदार सामनेवाला संस्थेचे कोणत्याही प्रकारे कोणत्याही कर्जापोटी रक्कम देणे लागत नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब तक्रारदार हा सामनेवालाकडून प्रस्तुत कर्जापोटीचे निरंक प्रमाणपत्र मिळणेस पात्र आहे. सामनेवाला बँकेने अशाप्रकारे नमुद केलेले व्यवहार सदर योजनेअंतर्गत तक्रारदारास दिलेला लाभ याचा विचार करता यासाठी सामनेवाला बँकच जबाबदार आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब सामनेवाला यांचे सेवेतील अक्षम्य त्रुटीमुळे तक्रारदारास मानसिक व शारिरीक त्रास सोसावा लागला आहे. सबब तक्रारदार मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहे. तसेच तक्रारीचा खर्च मिळणेस पात्र आहे. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करणेत येते.
2) सामनेवाला बँकेने तक्रारदारास संपूर्ण कर्जफेडीचा दाखला दयावा.
3) सामनेवाला बॅंकेने तक्रारदारास मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.5,000/-(रु.पाच हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.1,000/-(रु.एक हजार फक्त)