(मंचाचे निर्णयान्वये, सौ. मोहिनी ज. भिलकर, सदस्या)
(पारीत दिनांक : 29 जानेवारी 2011)
... 2 ... (ग्रा.त.क्र.23/2010)
1. अर्जदाराने सदर तक्रार, गैरअर्जदाराचे विरुध्द ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अंतर्गत दाखल केली असून, गैरअर्जदाराचे विरोधात शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गंत रुपये 1,00,000/- नुकसान भरपाई मिळण्याकरीता दाखल केलेली आहे. तक्रारीचा आशय थोडक्यात खालील प्रमाणे.
2. अर्जदार श्रीमती वैशाखा मारक्का गोपाल ही मय्यत गोपाल याची विधवा पत्नी आहे. गोपाल याचा दि.10.6.06 रोजी नाल्याच्या पाण्यात बुडून आकस्मीक मृत्यु झाला. अर्जदाराने शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गंत नुकसान भरपाई मिळविण्याकरीता गैरअर्जदार क्र.3 तहसिलदार सिरोंचा यांचे मार्फत दि.10.6.08 ला आवश्यक दस्ताऐवजासह गैरअर्जदार क्र.2 कडे पाठविला होता. दि.20.2.09 ला अर्जदाराने कागदपञाची पुर्तता केलेली नाही, या कारणाने फाईल बंद केलेली आहे असे चुकीचे कारण देवून गैरअर्जदार क्र.1 ने अर्जदाराचा दावा नामंजूर केला. गैरअर्जदाराने सर्व कागदपञे पूर्ण तपासणी न करताच दावा नामंजूर केला आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदाराला सेवा देण्यात कमतरता ठेवली आहे. अर्जदाराला गैरअर्जदाराचे वर्तणामुळे शारीरीक, मानसीक ञास सहन करावा लागला आहे.
3. अर्जदार मागणी करतात की, शेतीकरी अपघात विमा मुळ दाव्याची रक्कम रुपये 1,00,000/- दि.10.8.06 ते 10.6.10 पर्यंतचे व्याज रुपये 20,000/-, दावा दाखल करण्याचा खर्च रुपये 10,000/-, मानसीक ञासापोटी रुपये 25,000/-, तक्रार दाखल करण्याकरीता आलेला खर्च रुपये 5000/- हा सर्व गैरअर्जदाराकडून वसूल करण्यात यावा.
4. अर्जदाराने नि.4 नुसार 10 दस्ताऐवज दाखल केले. अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन, गैरअर्जदारांविरुध्द नोटीस काढण्यात आले.
5. गैरअर्जदार क्र. 2 ने निशाणी क्र.10 नुसार लेखी उत्तर सादर केले आहे. त्यांच्या मतानुसार गैरअर्जदार क्र.3 यांनी पाठविलेले दस्ताऐवज गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे पाठविणे ऐवढेच काम त्याचे आहे. त्यामुळे, तक्रारदार हे आमचे ग्राहक होऊ शकत नाही. त्यामुळे, तक्रारीतून निर्दोष मुक्तता करण्यात यावी.
6. गैरअर्जदार क्र.3 ने नि.9 नुसार लेखी उत्तर सादर केले आहे. अर्जदार यांनी केलेला दावा प्रकरण मंजूरी करीता या कार्यालयाचे पञ क्र.कावि/कलि/ सामान्य/333/2007 दि.30.3.07 अन्वये गैरअर्जदार क्र.2 कडे सादर करण्यात आले. तसेच, ञुटीची पूर्तता करीता या कार्यालयाचे पञ क्र.कावि/कालि/सामान्य/
... 3 ... (ग्रा.त.क्र.23/2010)
1224/07, दि.19.10.07 अन्वये परत सादर करण्यात आले. 1) घटनास्थळ पंचनामा, 2) मर्ग खबरी आकस्मीक मृत्युची फिर्याद, 3) शवविच्छेदन अहवाल, 4) गांव नमुना सात, 5) धारण जमीनीची नोंद वही नमुना 8-अ, 6) गांव नमुना सहा क, 7) रहिवासी प्रमाणपञ (सचिव व तलाठी), 8) मृत्यु प्रमाणपञ, मुळ अर्जासह प्रकरण सादर करण्यात आलेले आहे. तरीही दावा नाकारला आहे. गैरअर्जदार यांनी आपल्या लेखी बयानासोबत गैरअर्जदार क्र.2 ला पाठविलेल्या पञाची व दस्ताऐवजाची झेरॉक्स प्रत दाखल केली आहे.
7. गैरअर्जदार क्र.1 ने, नि.क्र.15 नुसार आपले लेखी बयान सादर केले. त्यानुसार, अर्जदाराने कागदपञाची पूर्तता केली नाही, त्यामुळे फाईल बंद केल्याचे स्पष्ट केले. अर्जदार यांची तक्रार ही मुदतीत नसल्यामुळे तक्रार खारीज करण्यात यावी, अशी मागणी केलेली आहे.
8. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले दस्ताऐवज, तसेच अर्जदार व गैरअर्जदार यांनी केलेल्या युक्तीवादावरुन खालील कारणे व निष्कर्ष निघतात.
// कारणे व निष्कर्ष //
9. अर्जदार हिचे पती गोपाल यांचा दि.10.6.06 रोजी नाल्यात बुडून आकस्मीक मृत्यु झाल्याचे अर्जदाराने दाखल केलेल्या पोलीस दस्त ऐवजात दिसून येते. अर्जदार ही मृतकाची वारसदार पत्नी असल्यामुळे क्लेम फार्म सोबत सर्व दस्ताऐवज जोडून गैरअर्जदार क्र.3 कडे प्रस्ताव सादर केला. परंतु, नुकसान भरपाई न मिळाल्यामुळे अर्जदाराने तक्रार दाखल केली आहे.
10. गैरअर्जदार क्र.2 ने, आपल्या लेखी बयाणात असे सांगितले की, सदर प्रस्ताव दि.18.1.07 रोजी प्राप्त झाला. त्यानंतर, तो नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि., मुंबई यांना पाठविला. त्यांनी दावा क्र.26060/47/07/9690000895 प्रमाणे नोंदणी केली. परंतु, विमा कंपनीने दि.20.2.2009 च्या पञाव्दारे सदर दावा अर्ज बंद केल्याचे कळविण्यात आले. तहसिलदार यांचेकडून योग्य त्या कागदपञांची पुर्तता करवून सर्व कागदपञे मिळाल्यास विमा कंपनीकडे पाठवून देणे व विमा कंपनी कडून मंजूर होऊन आलेला धनादेश संबंधीत वारसदारांना देणे एवढेच काम गैरअर्जदार क्र.2 यांचे आहे, हे गैरअर्जदार क्र.2 यांचे म्हणणे ग्राह्य धरण्यास पाञ आहे, असे या न्यायमंचाचे मत आहे.
... 4 ... (ग्रा.त.क्र.23/2010)
11. गैरअर्जदार क्र.3 ने नि.9 नुसार लेखी उत्तर दाखल केले, त्यात असे मान्य केले की, अर्जदाराकडून नुकसान भरपाई संदर्भात प्राप्त झालेला प्रस्ताव त्याचे कार्यालय पञ क्र.कावि/कलि/सामान्य/333/2007, दि.30.3.07 नुसार गैरअर्जदार क्र.2 च्या कार्यालयात पाठविण्यात आला. नंतर परत ञुटीची पुर्तता करुन दि.19.10.07 रोजी गैरअर्जदार क्र.2 ला सादर करण्यात आला. गैरअर्जदार क्र.3 चे वरील म्हणणे ग्राह्य धरण्यास पाञ आहे. गैरअर्जदार क्र.3 ने दाखल केलेल्या दि.30.3.2007 च्या पञाचे अवलोकन केले असता, गैरअर्जदार क्र.2 ला पान क्र. 1 ते 26 पर्यंतचे कागदपञे पाठविल्याचे नमूद आहे. शासन परिपञकानुसार राज्यातील कोणत्याही नैसर्गीक आपत्तीने होणा-या अपघातात त्याचे कुंटूंबातील कमावता पुरुष मरण पावल्याने आर्थिक अडचण होऊ नये म्हणून शासनाने उदात्त हेतूने ही योजना अंमलात आणली. गैरअर्जदाराने प्रस्ताव सादर केल्यावर अर्जदार लाभधारक असल्याने शेतकरी विमा योजनेअंतर्गंत लाभ मिळण्यास पाञ आहे. अर्जदाराने सर्व दस्ताऐवज गैरअर्जदार क्र.3 कडे दिले व गैरअर्जदार क्र.3 यांनी पूर्ण दस्ताऐवज जोडून प्रस्ताव गैरअर्जदार क्र.2 कडे सादर केला. गैरअर्जदार क्र.2 यांनी तो प्रस्ताव गैरअर्जदार क्र.1 कडे दाखल केला. गैरअर्जदार क्र.2 व 3 यांनी अर्जदाराचा प्रस्ताव सर्व दस्ताऐवजासह गैरअर्जदार क्र.1 याचेकडे पाठवून योग्य ती सेवा दिली आहे. त्यामुळे, त्यांच्या सेवतेत न्युनता आहे असे म्हणता येत नाही. त्यामुळे त्यांचे विरोधात तक्रार खारीज होण्यास पाञ आहे.
12. गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदार यांचा दावा कागदपञांची पुर्तता न केल्यामुळे नामंजूर केला. परंतु योग्य ती कागदपञे शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे दाव्यासोबत जोडून पाठवलेले गैरअर्जदार क्र.3 यांच्या 30.3.07 च्या पञावरुन,तसेच रेकॉर्डवरुन दिसून येते. यावरुन,गैरअर्जदार क्र.1 यांनी, बेकायदेशिरपणे कागदपञाची पुर्तता केली नाही म्हणून दावा बंद करुन, अर्जदारास सेवा देण्यात ञुटी केली असल्याचे सिध्द होते.
वरील कारणे व निष्कर्षा नुसार तक्रार मंजूर करण्यास पाञ आहे, या निर्णयाप्रत हे न्यायमंच आले असल्यामुळे तक्रार मंजूर करुन खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यांत येत आहे.
// अंतिम आंदेश //
(1) अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर.
(2) गैरअर्जदार क्र.1 ने, मृतक गोपाल याचा अपघाती मृत्युबाबत शेतकरी विमा योजनेची रक्कम रुपये 1,00,000/- तक्रार दाखल दि.26.7.10
... 5 ... (ग्रा.त.क्र.23/2010)
पासून द.सा.द.शे. 9 % व्याजाने आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांचे आंत अर्जदारास द्यावे.
(3) गैरअर्जदार क्र.1 ने, अर्जदारास झालेल्या मानसीक, शारीरक ञासापोटी रुपये 1500/- व ग्राहक तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 500/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांचे आंत द्यावे.
(4) गैरअर्जदार क्र.2 व 3 चे विरुध्द तक्रार खारीज. त्यांनी आपआपला खर्च सहन करावा.
(5) उभयतांना आदेशाची प्रत देण्यात यावी.
गडचिरोली.
दिनांक :- 29/1/2011.