(मंचाचे निर्णयान्वये, सौ. मोहिनी जयंत भिलकर, सदस्या)
(पारीत दिनांक : 29 जानेवारी 2011)
... 2 ... (ग्रा.त.क्र.22/2010)
अर्जदाराने सदर तक्रार, गैरअर्जदाराचे विरुध्द ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अंतर्गत दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्यात खालील प्रमाणे.
1. अर्जदार मय्यत समय्या वल्द मल्ला उर्फ मलय्या दुर्गम यांचा मुलगा असून समय्या यांचा दि.25.6.07 रोजी विहिरीमध्ये पडून आकस्मात मृत्यु झाला. या अपघाती मृत्यु संबंधाने अर्जदाराने शेतकरी अपघाती विमा योजने अंतर्गत नुकसान भरपाई मिळण्याबाबत गैरअर्जदार क्र.3 चे मार्फतीने दि.28.9.07 ला अर्ज सादर केला होता व अर्जासोबत आवश्यक सर्व दस्ताऐवज सुध्दा गैरअर्जदाराकडे पाठविले होते. गैरअर्जदार क्र.1 ने दावा क्र. 260600/47/06/9690001354 दि.23.2.09 ला अर्जदाराचा अर्ज नामंजूर केला. अर्जदाराच्या वडिलाच्या मृत्युनंतर 7/12 मध्ये त्याच्या नावाची नोंद केल्याचे चुकीचे कारण दर्शवून गैरअर्जदार क्र.1 ने दावा नामंजूर केला. त्यामुळे, अर्जदाराला शारीरीक, मानसीक ञास सहन करावा लागला. गैरअर्जदाराने, अर्जदारास मुळ दावा रुपये 1,00,000/- व त्यावरील व्याज 28,000/- व्याजासह द्यावा. दावा दाखल करण्याचा खर्च रुपये 10,000/-, मानसीक ञासापोटी रुपये 25,000/- व तक्रार दाखल करण्याकरीता लागलेला खर्च रुपये 5,000/- असे एकुण रुपये 1,68,000/- द्यावे, अशी मागणी केली आहे.
2. अर्जदाराने, तक्रारीच्या कथना पृष्ठयर्थ नि.4 नुसार 14 दस्ताऐवज दाखल केले. अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन, गैरअर्जदारांविरुध्द नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार हजर होवून गैरअर्जदार क्र.1 ने नि.13, गैरअर्जदार क्र.2 ने नि.10, गैरअर्जदार क्र.3 ने नि.9 नुसार दाखल केले.
3. गैरअर्जदार क्र.1 ने लेखी बयान नि.क्र.13 नुसार रेकॉर्डवर दाखल केले आहे. त्यात ते म्हणतात की, अर्जदार यांच्या क्लेमच्या तपासणीवरुन आणि इन्वेस्टीगेटरच्या रिपोर्टवरुन असे सिध्द झाले की, अर्जदाराच्या वडीलांच्या मृत्युनंतर 7/12 मध्ये त्यांच्या नावाची नोंद केलेली आहे. त्यामुळे, दावा नामंजूर करण्यात आला आहे. अर्जदाराने दाखल केलेली तक्रार ही मुदतीत नाही. त्यामुळे अर्जदाराची तक्रार ही रुपये 25,000/- दंडासह खारीज करण्यांत यावी.
4. गैरअर्जदार क्र. 2 ने लेखी बयाणात नमुद केले की, तक्रारदार हे आमचे ग्राहक होऊ शकत नाही. शेतक-यांचा विमा दावा अर्ज तालुका कृषी अधिकारी/ तहसिलदार मार्फत आमच्याकडे आल्यावर विमा दावा अर्ज योग्यपणे भरला आहे कां ?, सोबत जोडलेली कागदपञे विमा कंपनीने मागणी केल्याप्रमाणे
... 3 ... (ग्रा.त.क्र.22/2010)
आहे कां ?, नसल्यास तालुका कृषीधिकारी, तहसिलदार यांना कळवून त्यांची पुर्तता करवून घेणे व सर्व योग्य कागदपञे मिळाल्यावर योग्य त्या विमा कंपनीकडे पाठवून देणे व विमा कंपनीकडून दावा मंजुर होवून आलेला धनादेश संबंधीत वारसदारांना देणे, एवढाच आहे. यासाठी, गैरअर्जदार क्र.2, राज्य शासन वा शेतकरी यांच्याकडून कोणताही मोबदला घेत नाही. सदरील प्रस्ताव आमच्या कार्यालयास प्राप्त झाल्यानंतर तो नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि., मुंबई यांना पाठविण्यात आला. यांनी दावा क्र.26060/47/07/9690001354 प्रमाणे त्याची नोंदणी केली. परंतु, विमा कंपनीने दि.23.2.09 च्या पञाव्दारे दावा अर्ज नामंजूर केल्याचे अर्जदाराला कळविण्यात आले. त्यामुळे, सदर दाव्यातुन निर्दोष मुक्तता करावी. दोषी कडून कारण नसतानांही तक्रारीस सामोरे जाण्यास भाग पाडल्याने या अर्जाचा खर्च रुपये 5,000/- देण्याचा आदेश व्हावा, अशी मागणी केली.
5. गैरअर्जदार क्र.3 ने लेखी बयानात नमूद केले की, मय्यत समय्या वल्द मल्ला उर्फ मलय्या दुर्गम अर्जदाराचा मुलगा असून दि.25.6.07 रोजी विहिरीत पडून आकस्मिक मृत्यु झाल्याने शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत नुकसान भरपाई मिळण्याकरीता विहीत नमुन्यातील दावा मंजूरी करीता पञ क्र.कावि/कलि/सामान्य/ 1137/2007 दि.26.9.07 अन्वये गैरअर्जदार क्र.2 कडे सादर करण्यात आला. परंतु, कंपनीने हा दावा नामंजूर केला. अर्जदाराचा दावा चुकीच्या कारणाने नामंजूर केला. अर्जदाराच्या वडिलाचे मृत्युनंतर 7/12 मध्ये त्याच्या नावाची नोंद केल्याचे कारण दर्शवून गैरअर्जदार नं.1 ने दावा नामंजूर केला. समय्या मलय्या दुर्गम हे नाव सात बा-यांत स्पष्ट दिसत आहे. परंतु, कंपनीने मृत्युनंतर 7/12 मध्ये नांव नमूद करण्यात आले असे सांगून दावा नामंजूर केला आहे.
// कारण मिमांसा //
6. अर्जदार समय्या वल्द मल्ला उर्फ मलय्या दुर्गम यांचा दि.25.6.07 रोजी विहिरीत पडून मृत्यु झाला. अर्जदार हा मृतकाचा वारसदार असल्यामुळे क्लेम फार्म सोबत सर्व दस्ताऐवज जोडून गैरअर्जदार यांचेकडे प्रस्ताव सादर केला. परंतु, गैरअर्जदार क्र.1 यांनी 7/12 हा मृत्युनंतर काढलेला असल्यामुळे नुकसान भरपाई क्लेम नाकारला. त्यामुळे, अर्जदार यांनी तक्रार दाखल केलेली आहे.
7. अर्जदाराने, दाखल केलेल्या कागदपञांचे अवलोकन केले असता, नि.क्र.4 अ-1, 2 वर अर्जदाराच्या वडीलाचा मृत्यु हा विहिरीत काम करतांना दोरीच्या
... 4 ... (ग्रा.त.क्र.22/2010)
सहाय्याने वर चढत असतांना तोल जावून खाली पडल्यावर उपचारादरम्यान झाला, असे दिसून येते. त्यामुळे, अर्जदाराच्या वडीलाचा मृत्यु हा नैसर्गीक नसून अपघाती आहे, हे सिध्द होते.
8. अर्जदाराचा शेतकरी अपघात विमा दावा हा अर्जदाराचे वडीलाचे नांव त्याच्या मृत्युनंतर 7/12 वर चढविलेले आहे. या कारणाने नामंजूर केलेले आहे. परंतु, नि.क्र.4 अ-10 चे अवलोकन केले असता, मय्यत समय्या दुर्गम याच्या वडीलाचा मृत्यु दि.14.9.95 रोजी झाला. त्यानंतर फेरफार नोंदवहीत वारसान नोंदणी करणे बाबत फेरफारक्र.209 हे पञ तलाठ्याच्या सहीने दि.30.5.06 रोजीचे आहे. सात-बारा नि.क्र. अ-13 वर सुध्दा फेरफार क्र.209 व 210 ची नोंद दि.30.5.06 रोजी केलेली दिसून येते. यावरुन, अर्जदाराच्या वडीलाचे नांव हे मृत्यु पूर्वीच राजस्व विभागाच्या रेकॉर्डवर आहे, हे सिध्द होते. यावरुन, अर्जदार हा शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत नुकसान भरपाई मिळण्यास पाञ आहे, असे या न्यायमंचाचे मत आहे.
9. गैरअर्जदार क्र.2 यांनी नि.क्र.10 वर सांगितले आहे की, शेतक-याचा विमा दावा अर्ज तहसिलदार मार्फत आल्यावर विमादावा योग्यपणे भरलेला आहे का ? जोडलेली कागदपञे मागणी केल्याप्रमाणे आहे की नाही व नसल्यास त्याची पुर्तता करवून घेणे व सर्व कागदपञे ही विमा कंपनीकडे पाठवून देणे व दावा मंजूर होवून आल्यावर धनादेश अर्जदारास देणे एवढेच काम गैरअर्जदार क्र.2 यांचे आहे. मा. राज्य ग्राहक तक्रार आयोग, मुंबई यांच्या औरंगाबाद खंडपिठाने सुध्दा आपला अपील क्र.1114/2008 दि.16.3.09 व्दारे गैरअर्जदार क्र.2 यांचे म्हणणे ग्राह्य धरलेले आहे. गैरअर्जदार क्र.2 यांचे म्हणणे ग्राह्य धरण्यास पाञ आहे, असे या मंचाचे मत आहे.
10. गैरअर्जदार क्र.3 ने दाखल केलेल्या दि.26 व 28.9.2007 या पञाचे अवलोकन केले असता, गैरअर्जदार क्र.2 ला 1 ते 46 पानाचे कागदपञ सर्व प्रमाणपञासह पाठविल्याचे दिसून येते. गैरअर्जदार क्र.2 ने प्रस्ताव गैरअर्जदार क्र.1 कडे पाठविला व त्यांना तो मिळाला, हे त्यांनी नामंजूर केलेले दि.23.2.09 च्या पञावरुन दिसून येते. शासन परिपञकानुसार राज्यातील कोणत्याही नैसर्गीक आपत्तीने होणा-या अपघातात त्याचे कुंटूंबातील कमावता पुरुष मरण पावल्याने आर्थिक अडचण होऊ नये म्हणून शासनाने उदात्त हेतूने ही योजना अंमलात आणली. गैरअर्जदार क्र.1 यांनी, अर्जदाराला सेवा देण्यात न्युनता केली असल्याचे सिध्द होते, त्यामुळे तक्रार मंजूर करण्यास पाञ आहे, या निष्कर्षाप्रत हे न्यायमंच आले आहे.
... 5 ... (ग्रा.त.क्र.22/2010)
11. गैरअर्जदार क्र.2 व 3 यांनी अर्जदाराचा प्रस्ताव सर्व दस्ताऐवजासह गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे पाठवून योग्य ती सेवा दिलेली आहे. त्यामुळे, गैरअर्जदार क्र.2 व 3 यांच्या सेवेत न्युनता आहे, असे म्हणता येणार नाही. त्यामुळे, त्यांचे विरोधात तक्रार खारीज करण्यास पाञ आहे.
वरील कारणे व निष्कर्षा नुसार तक्रार मंजूर करण्यास पाञ आहे, या निर्णयाप्रत हे न्यायमंच आले असल्यामुळे तक्रार मंजूर करुन खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यांत येत आहे.
// अंतिम आंदेश //
(1) अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर.
(2) गैरअर्जदार क्र.1 ने, मृतक समय्या वल्द मल्ला उर्फ मलय्या दुर्गम याचा अपघाती मृत्युबाबत शेतकरी विमा योजनेची रक्कम रुपये 1,00,000/- तक्रार दाखल दि.26.7.2010 पासून द.सा.द.शे. 9 % व्याजाने आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांचे आंत अर्जदारास द्यावे.
(3) गैरअर्जदार क्र.1 ने, अर्जदारास झालेल्या मानसीक, शारीरक ञासापोटी रुपये 1500/- व ग्राहक तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 500/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांचे आंत द्यावे.
(4) गैरअर्जदार क्र.2 व 3 चे विरुध्द तक्रार खारीज. त्यांनी आपआपला खर्च सहन करावा.
(5) उभयतांना आदेशाची प्रत देण्यात यावी.
गडचिरोली.
दिनांक :- 29/1/2011.