नि.33
मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – श्री ए.व्ही.देशपांडे
मा.सदस्या – सौ मनिषा कुलकर्णी
ग्राहक तक्रार अर्ज क्र. 253/2014
तक्रार नोंद तारीख : 11/11/2014
तक्रार दाखल तारीख : 17/11/2014
निकाल तारीख : 11/12/2015
1. श्री मारुती सखाराम काटकर
2. सौ सुलाताई मारुती काटकर
3. श्री दत्तात्रय मारुती काटकर
4. श्री रुपेश मारुती काटकर
5. सौ सुलाताई मारुती काटकर
सर्व रा. अग्रण धुळगांव, ता.कवठेमहांकाळ जि. सांगली ....... तक्रारदार
विरुध्द
1. दिनानाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सांगली
मुख्य शाखा कोल्हापूर रोड, सांगली,
2. श्री नामदेव गणपती मोहिते, अध्यक्ष
रा. गणेशकृपा, हरिपूर रोड, सांगली
3. श्री अरुण पिराजी पोळ, उपाध्यक्ष
प्रशिक चौक, हरीपूर रोड, गांवभाग, सांगली
ता.मिरज जि.सांगली
4. श्री सुखदेव सिताराम मोहिते, संचालक
मु.पो. मोहिते गल्ली, समडोळी रस्ता, सांगलीवाडी,
ता.मिरज जि. सांगली
5. श्री गजानन हरी फाकडे,
मु.पो. हरीपूर, ता.मिरज जि. सांगली
6. श्री सलीम अब्बास पन्हाळकर,
रा. पन्हाळकर बिल्डींग, कोल्हापूर रोड, सांगली
7. श्री फत्तेसिंगराव शंकरराव राजेमाने,
रा.गोल्डन केमिकल, वसंत मार्केट यार्ड, सांगली
ता.मिरज जि. सांगली
8. आण्णासो दुंडाप्पा कोरे,
रा.गणेश कॉलनी, एस.टी.स्टँडचे मागे,
कोल्हापूर रोड, सांगली
9. श्री अशोकराव दशरथ मोहिते,
रा.हरीपूर, ता.मिरज जि. सांगली
10. श्री गणपतराव शामराव पाचुंदे,
रा.पत्रकार नगर, एस.टी.स्टँडचे पिछाडीस, सांगली
12. श्री संजय गणपती बावधनकर, संचालक
रा.253/3, भोई गल्ली, खणभाग, सांगली
ता.मिरज जि. सांगली ...... जाबदार
तक्रारदार तर्फे : अॅड श्री एम.एन.शेटे
जाबदार क्र.4, 5, 7 व 12 : एकतर्फा
जाबदार क्र.1, 2, 3, 6, 8 ते 10 : अॅड श्री व्ही.पी.रावळ
- नि का ल प त्र –
द्वारा : मा. अध्यक्ष: श्री. ए.व्ही.देशपांडे
1. प्रस्तुतची तक्रार, ऊपरनिर्दिष्ट तक्रारदाराने, जाबदार क्र.1 ते 12 यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 नुसार, जाबदारांनी दिलेल्या दूषित सेवेबद्दल दाखल केली आहे.
2. थोडक्यात हकीकत अशी की, जाबदार क्र.1 संस्था ही सहकार कायद्यानुसार नोंदणीकृत संस्था असून जाबदार क्र.2 हे तिचे अध्यक्ष, जाबदार क्र.3 हे उपाध्यक्ष व जाबदार क्र.4 ते 12 हे तिचे संचालक आहेत. तक्रारदारांनी जाबदार क्र.1 संस्थेमध्ये विविध ठेव योजनेअंतर्गत रकमा गुंतविल्या आहेत. त्यांचा तपशील खालीलप्रमाणे -
परिशिष्ट
अ.क्र. | खातेदाराचे नाव | खाते नं. | पावती नं. | रक्कम ठेवल्याचा दिनांक | रक्कम परतीचा दिनांक | व्याजाचा दर | ठेव रक्कम रु. | देय रक्कम रु. |
1 | मारुती सखाराम काटकर | 1483 | 11429 | 7/12/05 | 7/06/12 | दामदुप्पट | 15,000 | 30,000 |
2 | मारुती सखाराम काटकर | 1484 | 11430 | 7/12/05 | 7/06/12 | दामदुप्पट | 15,000 | 30,000 |
3 | दत्तात्रय मारुती काटकर | 1211 | 9249 | 4/08/04 | 4/02/11 | दामदुप्पट | 20,000 | 40,000 |
4 | सौ सुलाबाई मारुती काटकर | 9720 | 41254 | 2/04/05 | 2/11/06 | 10 | 16,575 | 16,575 |
5 | सुलाताई मारुती काटकर | 9735 | 41269 | 4/08/05 | 4/11/06 | 10 | 16,575 | 16,575 |
6 | दत्तात्रय मारुती काटकर | 9734 | 41268 | 4/08/05 | 4/11/06 | 10 | 16,575 | 16,575 |
| | | | | | एकूण रक्कम | | 149725/- |
वर नमूद ठेवींची मुदत संपलेनंतर सदर देय व्याजासह देय झालेल्या रकमेची मागणी तक्रारदारांनी जाबदारांकडे केली. परंतु त्यांनी कसलीही परतफेड न करता तक्रारदारांना दूषित सेवा दिली आहे. जाबदार संस्थेविरुध्द महाराष्ट्र सहकार कायदा कलम 83 प्रमाणे चौकशी पूर्ण झाली आहे व कलम 88 प्रमाणे संचालकांवर जबाबदारी निश्चित केली आहे. जाबदार संस्थेच्या संचालकांनी स्वतःचे व नातलगांचे फायद्यासाठी संस्थेतील ठेवीचा दुरुपयोग केला आहे. संस्थेचे व्यवस्थापन व्यवस्थित केलेले नाही. त्यामुळे जाबदार संस्था ही आर्थिकदृष्टया डबघाईला येवून सध्या संस्थेची शाखा कार्यालये बंद झालेली आहेत. सध्याचे संचालकांमधील श्री नामदेवराव मोहिते, सलीम पन्हाळकर, आण्णासो कोरे, गणपतराव पाचुंदे यांना वैयक्तिक व संयुक्तरित्या जबाबदार धरलेले आहे. इतर संचालक नं. 2, 3, 4, 5, 7, 9, 11 व 12 हे सर्व जाबदार संस्थेमध्ये गैरव्यवहार आहे, संस्थेचा कारभार मनमानीप्रमाणे चाललेला आहे, संस्था सध्या आर्थिक दृष्टया डबघाईला आलेली आहे, हे समजून उमजूनही संचालक झालेले आहेत. त्यामुळे ते तक्रारदारांच्या ठेवी परत करण्याकरिता जबाबदार आहेत. अशा कथनांवरुन तक्रारदाराने परिशिष्टात नमूद केलेली मुदत ठेव व सेव्हिंग्ज खातेवरील एकूण रक्कम रु.1,49,725/- व त्यावर 18 टक्के व्याजासह रक्कम, मानसिक व आर्थिक त्रासाबद्दल रु.40,000/- व अर्जाचा खर्च रु.5,000/- मिळावा अशी मागणी जाबदारांकडून केली आहे.
3. तक्रारदारांनी आपल्या तक्रारीचे पुष्ठयर्थ नि.2 ला आपले शपथपत्र दाखल केले असून नि.4 या फेरिस्त सोबत संबंधीत ठेव पावत्याच्या प्रमाणीत नकला, जाबदार संस्थेचा चौकशी अहवाल व जाबदार संस्थेची संचालक मंडळाची यादी इ. कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
4. जाबदार क्र.1 यांनी नि.22 ला लेखी म्हणणे दाखल करुन तक्रारदाराच्या तक्रारअर्जातील मजकूर खरा व बरोबर असल्याचे कथन केले आहे. जाबदार हे नियमानुसार ठेव रकमा देणेस तयार आहेत. जाबदारांनी तक्रारदारांना कोणत्याही प्रकारची दुषित सेवा दिलेली नाही. तक्रारदारांनी जाबदार संस्थेकडे ठेव मिळणेसाठी लेखी मागणी केलेली नाही. तक्रारदारांची रक्कम एकरकमी देणे अशक्य असलेने ज्याप्रमाणे वसुली होईल त्याप्रमाणे रक्कम देण्यास जाबदार संस्था तयार आहे. जाबदार संस्थेस कायदेशीर बंधनाप्रमाणे वेगवेगळया संस्थेत वेगवेगळया खात्यावर काही प्रमाणात रकमा गुंतवाव्या लागतात व उर्वरीत रक्कम गरजू सभासदांना कर्ज पुरविणेसाठी वापरावी लागते. त्याप्रमाणे जाबदार संस्थेने त्यांच्याकडील ठेवी कर्जरुपाने वाटलेल्या आहेत. सदर कर्जांची एकरकमी वसुली होत नाही. कर्जदार सभासदांची परतफेडीची क्षमता कमी झालेली आहे. वेगवेगळया संघटनांनी कर्जाऊ रकमेच्या वसुलीत हस्तक्षेप करुन अडथळे उभे केले आहेत. समाजातील लोकांची सहकारी संस्था बाबतची भूमिका व दृष्टीकोन बदलल्याने सर्व ठेवीदारांनी एकाच वेळी सर्व ठेवी काढून घेणेचा प्रयत्न सुरु केला. त्यामुळे ठेव रकमा परत करणे अशक्य झाले. ठेवीदारांच्या ठेवीची वैयक्तिक अगर संयुक्तिक जबाबदारी जाबदार क्र.1 यांची येत नाही. सबब तक्रारअर्ज नामंजूर करावा अशी मागणी जाबदार क्र.1 यांनी केली आहे.
5. जाबदार क्र.1 यांनी त्यांचे लेखी म्हणण्यातील कथनांचे पुष्ठयर्थ त्यांचे सेक्रेटरी श्री दिलीप तुकाराम गोरे यांचे शपथपत्र कैफियतीखालीच दाखल केले आहे.
6. प्रस्तुत प्रकरणात जाबदार क्र.9 यांनी नि.24 ला आपले लेखी म्हणणे दाखल केले असून जाबदार क्र.2, 3, 6, 8 व 10 यांनी सदरचे म्हणणे स्वीकारत असलेबाबतची पुरसीस नि.25 ला दाखल केली आहे. जाबदार क्र. 2, 3, 6 व 8 ते 10 यांनी त्यांचे लेखी म्हणण्यामध्ये तक्रारअर्जातील मजकूर नाकारला आहे. त्यांचे कथनानुसार तक्रारदाराची तक्रार चालणेस पात्र नाही, तक्रारअर्जास कोणतेही कारण घडलेले नाही. तक्रारदार व जाबदार यांचेमध्ये ग्राहक या संज्ञेखाली नाते निर्माण होत नाही, त्यामुळे जाबदारांनी दूषित सेवा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. महाराष्ट्र सहकारी कायद्यातील तरतुदीनुसार जाबदार यांची रक्कम परतफेड करण्याची कोणतीही जबाबदारी नाही. तक्रारदारांनी ज्यावेळेस ठेव ठेवली, त्यावेळेस वेगळे संचालक मंडळ अस्तित्वात असणेची शक्यता आहे. सदर संस्था सभासदांनी स्थापन केली आहे. त्यामुळे ते संस्थेचे मालक आहेत. संचालक मंडळ त्यांचे सल्ल्याने व मार्गदर्शनाने कामकाज करते, त्यामुळे त्यांना संस्थेचे मालक म्हणणे अयोग्य आहे. आर्थिक जबाबदारी संचालकांवर कलम 83 व 88 अन्वये ठेवली गेली नसल्याने संचालकांना जबाबदार धरता येणार नाही. संस्थेचे संचालक मंडळ केवळ सहकारी संस्थेस होणा-या नुकसानीस जबाबदार असू शकते. मात्र इतर कोणत्याही सोसायटीच्या देण्यास जबाबदार होत नाही. सबब, तक्रारअर्ज फेटाळणेत यावा अशी मागणी जाबदारांनी केली आहे.
7. जाबदार क्र.9 यांनी आपले लेखी कैफियतीतील कथनांचे पुष्ठयर्थ कैफियतीखालीच आपले शपथपत्र दाखल केले आहे.
8. जाबदार क्र. 4, 5, 7 व 12 यांना प्रस्तुत तक्रारीची नोटीस लागू होवूनही ते याकामी हजर न राहिल्याने त्यांचेविरुध्द प्रकरण एकतर्फा चालविण्याचा हुकूम करण्यात आला.
9. तक्रारदार यांनी त्यांनी तक्रारअर्जासोबत जे शपथपत्र दाखल केले आहे, तेच पुराव्याचे शपथपत्र म्हणून वाचणेत यावे अशी पुरसीस नि.26 ला दाखल केली आहे. जाबदार क्र.1 ने नि.28 ला शपथपत्र दाखल केले असून जाबदार क्र.9 ने नि.29 ला शपथपत्र दाखल केले आहे. जाबदार क्र. 2, 3, 6, 8, व 10 यांनी, जाबदार क्र.9 ने शपथपत्राद्वारे जो पुरावा दाखल केला आहे, तोच पुरावा जाबदार क्र.2, 3, 6, 8 व 10 यांचा समजणेत यावा अशी पुरसीस नि.30 ला दाखल केली आहे. जाबदार क्र.1, 2, 3, 6 व 8 ते 10 यांनी त्यांचा पुरावा नि.31 च्या पुरसीसने संपविलेला आहे.
10. आम्ही उभय पक्षांचे विद्वान वकीलांचा युक्तिवाद ऐकून घेतला आहे.
11. सदर प्रकरणी खालील मुद्दे आमच्या निष्कर्षाकरिता उपस्थित होतात.
मुद्दे उत्तरे
1. तक्रारदार हे जाबदारचे ग्राहक होतात काय ? होय.
2. तक्रार मुदतीत आहे काय ? होय.
3. जाबदार यांनी तक्रारदारास सदोष सेवा दिली आहे हे शाबीत होय.
झाले आहे काय ?
4. तक्रारदारांनी तक्रारअर्जात केलेल्या मागण्या मंजूर होण्यास पात्र होय, जाबदार क्र.1 ते
आहेत आहे काय ? असल्यास कोणाकडून ? 12 यांचेकडून.
5. अंतिम आदेश खालीलप्रमाणे.
12. आमच्या वरील निष्कर्षाची कारणे खालीलप्रमाणे आहेत.
- < > - आदेश
1. तक्रारदाराची तक्रार ही अंशतः मंजूर करणेत येत आहे.
2. जाबदार क्र.1 ते 12 यांनी वैयक्तिक व संयुक्तरित्या तक्रारदारास या आदेशाचे तारखेपासून 45 दिवसांत वर परिशिष्टात नमूद केलेल्या ठेवपावती क्र.11429, 11430 व 9249 या ठेवपावत्यांच्या मुदतीअंती देय झालेल्या दामदुप्पट रकमा अदा कराव्यात व सदर ठेवींच्या मूळ ठेव रकमेवर ठेवीची मुदत संपलेनंतरचे तारखेपासून ते संपूर्ण रक्कम वसूल होईपावेतो द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज द्यावे.
3. जाबदार क्र.1 ते 12 यांनी वैयक्तिक व संयुक्तरित्या तक्रारदारास या आदेशाचे तारखेपासून 45 दिवसांत वर परिशिष्टात नमूद केलेल्या ठेवपावती क्र.41254, 41269 व 41268 या ठेवपावत्यांच्या मूळ ठेव रकमा अदा कराव्यात व सदर ठेवींच्या मूळ ठेव रकमेवर ठेव ठेवले तारखेपासून ते तक्रार दाखल तारखेपर्यंत द.सा.द.शे.10 टक्के दराने व तदनंतर संपूर्ण रक्कम वसूल होईपावेतो द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज द्यावे.
4. जाबदार क्र.1 ते 12 यांनी वैयक्तिक व संयुक्तरित्या तक्रारदारास मानसिक व आर्थिक त्रासाबद्दल रक्कम रु.10,000/- या आदेशाच्या तारखेपासून 45 दिवसांत द्यावी.
5. जाबदार क्र.1 ते 12 यांनी वैयक्तिक व संयुक्तरित्या तक्रारदारास दाव्याचा खर्च म्हणून रक्कम रु.1,000/- या आदेशाच्या तारखेपासून 45 दिवसांत द्यावी.
6. विहीत मुदतीत आदेशाचे पालन न झाल्यास तक्रारदारास ग्राहक संरक्षण कायदयातील कलम 25(3) किंवा 27 खाली योग्य ती कारवाई करण्याची मुभा राहील.
7. या आदेशाच्या प्रती उभय पक्षकारांना विनाशुल्क देण्यात याव्यात.
सांगली
दि. 11/12/2015
सौ मनिषा कुलकर्णी ए.व्ही. देशपांडे
सदस्या अध्यक्ष