Maharashtra

Chandrapur

CC/19/74

Shri.Sharad Waman Rane - Complainant(s)

Versus

Devendra Umate, Devendra Vastra Bhandrar Chandrapur - Opp.Party(s)

SELF

05 Feb 2020

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTE REDRESSAL FORUM
CHANDRAPUR
 
Complaint Case No. CC/19/74
( Date of Filing : 10 Jun 2019 )
 
1. Shri.Sharad Waman Rane
R/o Urjanagar Colony, Chandrapur Qua.No F-52/2
CHANDRAPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. Devendra Umate, Devendra Vastra Bhandrar Chandrapur
Devendra Vastra Bhandar, Golbazar, Chandrapur
CHANDRAPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Atul D.Alsi PRESIDENT
 HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil MEMBER
 HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 05 Feb 2020
Final Order / Judgement

::: नि का :::

   (मंचाचे निर्णयान्‍वये,  मा. सौ. कल्‍पना जांगडे (कुटे) मा.सदस्‍या)

(पारीत दिनांक : 05/02/2020)

 

1.    तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्‍वये दाखल केली आहे.  सदर तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालील प्रमाणे.

 

2.    तक्रारकर्त्‍याने दिनांक 9/5/2019 रोजी सायंकाळी 6 ते 7 चे दरम्‍यान विरूध्‍द पक्ष यांचे दुकानातून दोन साडया रू.5,000/- किमतीस खरेदी केल्‍या. मात्र त्‍यातील एका साडीच्‍या रंगाबाबत रात्रीचे लाईट्स चे प्रकाशात कल्‍पना न आल्‍याकारणाने तक्रारकर्ता दुसरे दिवशी विरूध्‍द पक्ष यांचे दुकानात बदलवून घेण्‍यासाठी सदर साडी घेवून गेले. मात्र विरूध्‍द पक्षाने साडीची घडी मोडली असल्‍याचे कारण सांगून ती बदलवून तर दिलीच नाही उलट तक्रारकर्त्‍याचा अपमान केला. प्रत्‍यक्षात विरूध्‍द पक्षानेच साडी तक्रारकर्त्‍यास दाखवितांना तिची घडी मोडली होती. तक्रारकर्त्‍याने सदर साडी जवळच्‍या नात्‍यातील लग्‍नासाठी घेतलेली होती, मात्र विरूध्‍द पक्षाने ती बदलवून न दिल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याला वेळेवर रू.5000/- खर्च करून दुसरीसाडी वेळेवर विकत घ्‍यावी लागली व त्‍यामुळे नुकसान झाले. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने विरूध्‍द पक्षांस पत्र पाठविले. मात्र विरूध्‍द पक्षाने दखल न घेतल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरुद्ध पक्षा विरुध्‍द मंचासमक्ष तक्रार दाखल करुन त्‍यामध्‍ये मागणी केली आहे कि, तक्रारकर्त्‍याला वि.प. यांनी तक्रारकर्त्‍याला सदर साडी बदलवून द्यावी अथवा साडीची किंमतीची रक्‍कम रु.5,000/- तसेच तक्रारकर्त्‍यास झालेल्‍या मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई रु. 5,000/- व तक्रार खर्चापोटी रक्‍कम रु.5,000/- वि.प. यांनी तक्रारकर्त्‍यास देण्‍याचा आदेश व्‍हावा, अशी विनंती केली.

3.     तक्रारकर्त्‍याची तक्रार स्विकृत करून विरुध्‍द पक्ष यांना मंचातर्फे नोटीस काढण्‍यात आली. परंतु वि.प. ला नोटीस प्राप्‍त होवून देखील प्रकरणात हजर न राहिल्याने त्यांचेविरुद्ध दि. 5/11/2019 रोजी निशानी क्र.1 वर एकतर्फा आदेश पारित करण्यात आले.

4.   तक्रारकर्त्यांची तक्रार, दस्‍तावेज, शपथपत्र पुरावा व तोंडी युक्‍तीवाद तसेच तक्रारीतील कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्‍या विचारार्थ घेण्‍यात आले. त्‍याबाबतची कारणमिमांसा आणी निष्‍कर्ष पुढील प्रमाणे.

 

 

मुद्दे                                            निष्‍कर्ष

 

1)    तक्रारकर्ता विरूध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?       :          होय

2)    विरूध्‍दपक्ष यांनी तक्रारकर्त्‍याप्रति न्‍युनता पूर्ण सेवा

      दिली आहे काय ?                                   होय

3)    आदेश काय ?                            :  अंतिम आदेशाप्रमाणे.

 

कारण मिमांसा

मुद्दा क्र. 1 बाबत :-

5.    तक्रारकर्त्याने दि. 9/05/2019 रोजी वि.प. यांचेकडून रु.5,605/- ला दोन साडया विकत घेतल्‍या. या संदर्भात तक्रारकर्त्‍याने नि. क्र.3 वर दस्‍त क्र. 2 खरेदी पावती दाखल केली आहे. यावरून तक्रारकर्ता हा वि.प.चा ग्राहक आहे हे सिध्‍द होते. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.

मुद्दा क्र. 2 बाबत :-

6.    तक्रारकर्त्‍याने दिनांक 9/5/2019 रोजी सायंकाळी 6 ते 7 चे दरम्‍यान विरूध्‍द पक्ष यांचे दुकानातून दोन साडया रू.5,000/- किमतीस खरेदी केल्‍या. मात्र त्‍यातील एका साडीच्‍या रंगाबाबत रात्रीचे लाईट्स चे प्रकाशात कल्‍पना न आल्‍याकारणाने तक्रारकर्ता दुसरे दिवशी विरूध्‍द पक्ष यांचे दुकानात साडी बदलवून घेण्‍यासाठी सदर साडी घेवून गेले असा तक्रारकर्त्‍याने साडीची घडी मोडली असल्‍याचे कारण सांगून वि.प.ने ती बदलवून देण्‍यांस नकार दिला. सबब तक्रारकर्त्‍याने दिनांक 10/5/2019 रोजी विरूध्‍द पक्षांस पंजीबध्‍द डाकेने पत्र पाठविले. याबाबत सदर पत्राची नक्कल प्रत प्रकरणात दस्‍त क्र.1 वर तसेच वि.प.ला पत्र प्राप्‍त झाल्‍याची पोस्‍टाची पोचपावती दस्‍त क्र.4 वर दाखल आहे.  मात्र तरीसुद्धा विरूध्‍द पक्षाने दखल घेतली नाही. तक्रारकर्त्‍याचे तक्रारीतील आक्षेपांबाबत मंचाचा नोटीस प्राप्‍त होवूनदेखील विरूध्‍द पक्षाने कोणताही बचाव दाखल केलेला नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याचे तक्रारीतील कथन मंचास विश्‍वासार्ह वाटते. सबब विरूध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍यास साडी बदलवून न देवून सेवेत न्‍युनता केली आहे असे मंचाचे मत आहे. मात्र तक्रारकर्त्‍याने विकत घेतलेल्‍या दोन साडयांपैकी केवळ एका साडीबाबत त्‍याचा विवाद असला तरीदेखील देयकात नोंद असलेल्‍या नेमक्‍या कोणत्‍या साडीबाबत विवाद आहे हे त्‍याने स्‍पष्‍ट केलेले नाही. त्‍यामुळे विवादीत साडी परत घेवून सदर साडीची पावतीनुसार किमतीची रक्‍कम परत करण्‍याचे आदेश करणे न्‍यायोचीत होईल या निष्‍कर्षाप्रत मंच आलेले आहे. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.

 

मुद्दा क्र. 3 बाबत :-  

7.   वरील मुद्दा क्र.1 व 2 च्‍या विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.

अंतीम आदेश

1. तक्रारकर्त्याची ग्राहक तक्रार क्र. 74/2019 अंशतः मान्‍य करण्‍यात येते.

2. वि.प. यांनी तक्रारकर्त्‍याकडील विवादीत एक साडी परत घेवून तक्रारकर्त्‍याला सदर साडीच्‍या किमतीची रक्‍कम पावतीनुसार परत करावी.

3. वि.प. यांनी तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाई तसेच तक्रारखर्चापोटी एकत्रीत रक्‍कम रू.5,00/- द्यावेत.

4. उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्‍काळ पाठविण्‍यात यावी .

 

 

 

(श्रीमती कल्‍पना जांगडे(कुटे))  (श्रीमती किर्ती वैदय (गाडगीळ))  (श्री.अतुल डी. आळशी)                     

      सदस्‍या                     सदस्‍या                    अध्‍यक्ष 

                जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर.

 

 

 

 
 
[HON'BLE MR. Atul D.Alsi]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.