जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर.
तक्रार अर्ज क्रमांक - 263/2011
तक्रार अर्ज दाखल तारीखः- 03/05/2011
तक्रार अर्ज निकाल तारीखः- 11/01/2016
1. श्री.दशरथ तुकाराम जावळे, .....तक्रारदार
उ व सज्ञान धंदा शेती,
2. श्री.रविंद्र तुकाराम जावळे,
दोघी रा.ममुराबाद ता.जि. जळगांव.
विरुध्द
देवेंद्र ट्रॅक्टर एजन्सीज, ....सामनेवाला.
प्रो.प्रा.राजेंद्र आर.भावसार,
उ व सज्ञान धंदा व्यापार,
रा.निलांबरी हॉटेलच्या बाजुला,
नविन रायपुरचे समोर,अजिंठारोड,
जळगांव ता.जि.जळगांव.
कोरम
श्री.व्हि.आर.लोंढे. अध्यक्ष.
श्रीमती.पुनम नि. मलिक. सदस्या.
तक्रारदार तर्फे अड.फरिद शेख.
सामनेवाला – एकतर्फा.
नि का ल प त्र
द्वारा – मा.श्रीमती पुनम नि मलिक,सदस्या.
तक्रारदार यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सामनेवाला यांनी तक्रारदार यांना सामनेवाले यांचेकडे बाकी असलेली रक्कम रु.1,70,000/- न देवुन सेवेत त्रुटी केली ती मिळण्यासाठी दाखल केलेली आहे.
तक्रारदार यांची तक्रार थोडक्यात येणेप्रमाणे.
तक्रारदार श्री.दशरथ तुकाराम जावळे रा.ममुराबाद ता.जि.जळगांव येथील असून त्यांची तक्रार अशी की, सामनेवाले हे देवेंद्र ट्रॅक्टर एजन्सीचे प्रोपायटर असुन करारनाम्यात दिलेल्या पत्यावर ट्रॅक्टर खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. तक्रारदारांचे मालकीचे एस्कॉर्ट कंपनीचे जुने ट्रॅक्टर 355 मॉडेल नं.97 पांसिंग नं.एम.एच.19/सी-7124 असा आहे. तक्रारदार यांना सदर जुने ट्रॅक्टर विकून सामनेवाला यांच्याकडून नविन ट्रॅक्टर घ्यावयाचे असल्याने तक्रारदार यांनी सदर जुने ट्रॅक्टर हे सामनेवाला यांच्याकडे दिला होता. दि.26/10/2009 रोजी सामनेवाला व तक्रारदार यांच्यात रु.100/- स्टॅम्पवर लेखी करारनामा झाला असून सदर करारनाम्याप्रमाणे सामनेवाला यांनी सदर जुन्या ट्रॅक्टरची किंमत रु.1,40,000/- ठरवून तक्रारदाराचे जुने ट्रॅक्टर स्वतःचे ताब्यात घेतले. सदर खरेदी विक्रीचा व्यवहार झाल्यानंतर सामनेवाला हे तक्रारदार यांना राहीलेली रक्कम परत देण्याचे ठरले होते. सामनेवाला यांनी तक्रारदार यांच्याकडून जुने ट्रॅक्टर रु.1,40,000/- ला जमा केल्यानंतर तक्रारदार यांनी नविन ट्रॅक्टरचे खरेदीपोटी सेंट्रल बँ ऑफ इंडिया शाखा ममुराबाद रक्कम रु.4,90,000/- रोजीचा डी.डी.सामनेवाला यांच्याकडे दिला. सदर डि.डी. हा तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्याकडून फॉर्मटॅक्ट हे नविन ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी दिला होता. नविन ट्रॅक्टरची किंमत रक्कम रु.4,60,000/- वजा जाता रक्कम रु.3,20,000/- रुपयाला नविन ट्रॅक्टर तक्रारदार यांना पडणार होते डि.डि.ची रक्कम रु.4,90,000/- मधुन रु.3,20,000/- वजा जाता रक्कम रु.1,70,000/- मात्र सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दयावयाचे होते. जुन्या ट्रॅक्टरची किंमत रु.1,40,000/- व ट्रीलरची किंमत रु.30,000/- होती. सामनेवाले यांनी तक्रारदाराकडून डिमांड ड्राप्टने रक्कम स्विकारुन नविन ट्रॅक्टर दिले. परंतु सदर व्यवहारातुन सामनेवाले यांच्याकडे तक्रारदाराची बाकी असलेली रक्कम रु.1,70,000/- मात्र तक्रारदाराने अनेक वेळा मागणी करुन सुध्दा दिली नाही. सामनेवाले यांनी तक्रारदारास लिहून दिलेल्या कराराप्रमाणे वागण्यात कसुर केला. सामनेवाला यांनी त्यांच्याकडे बाकी असलेली रक्कम रु.1,70,000/- मात्र देण्याचे नाकारले. सामनेवाले यांनी सदरचे कृत्य करुन अनुचीत व्यापारी प्रथेचा अवलंब करुन सेवा देण्यास कसुन केला आहे. म्हणुन तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडून रक्कम रु.1,70,000/- व त्यावर द.सा.द.सा.शे.12 टक्के प्रमाणे व्याज देण्याचा हूकुम करण्यात यावा. तसेच तक्रारदार यांना झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासापोटी व तक्रारीचा खर्च असे एकुण रक्कम रु. 25,000/- देण्याचा हुकूम व्हावा अशी मंचा समोर विनंती केलेली आहे.
सामनेवाले यांना मंचाची नोटीस मिळाली त्यांनी हजर होऊन आपला लेखी खुलासा सादर केला नाही. सबब त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात.
तक्रारदार यांची तक्रार त्यांनी दाखल केलेला पुरावा शपथपत्र कागदपत्र यांचे अवलोकन केले असता न्याय निर्णयासाठी खालील मुद्ये उपस्थित होतात.
मुद्ये उत्तर.
1. सामनेवाले यांनी तक्रारदारांना सेवा देण्यामध्ये कसुर केला आहे काय? नाही.
2. आदेश काय ? अंतीम आदेशाप्रमाणे
कारणमिमांसा
मुद्या क्र. 1 व 2
तक्रारदार यांची तक्रार त्यांनी दाखल केलेले कागदपत्र व शपथपत्र लक्षात घेतला. तक्रारदार यांना सामनेवालेकडून जुने ट्रॅक्टर विकुन नविन ट्रॅक्टर घ्यावयाचे होते त्यासाठी तक्रारदार यांनी सदर जुने ट्रॅक्टर हे सामनेवाला यांचेकडे दिले. दि.26/10/2009 रोजी सामनेवाला व तक्रारदार यांच्यात रु.100/- च्या स्टँप पेपरवर लेखी करार झाला असून सदर करारनाम्याप्रमाणे सामनेवाला यांना सदर जुने ट्रॅक्टरची किंमत रु.1,40,000/- ठरवुन तक्रारदाराचे जुने ट्रॅक्टर स्वतःच्या ताब्यात घेतले. त्यानंतर तक्रारदार यांनी नविन ट्रॅक्टरचे खरेदी पोटी सेंट्रल बॅक ऑफ इंडिया शाखा ममुराबाद रक्कम रु.4,90,000/- दि.22/02/2010 रोजीचा डि.डि.सामनेवाला यांचेकडे दिला. नविन ट्रॅक्टरची किंमत रु.4,60,000/- इतकी होती. रक्कम रु.4,60,000/- मधुन जुने ट्रॅक्टरची किंमत रु.1,40,000/- वजा जाता रक्कम रु.3,20,000/- ला तक्रारदाराला नविन ट्रॅक्टर पडणार होते. डि.डि.ची रक्कम रु.4,90,000/- मधुन रु.3,20,000/- वजा जाता रक्कम रु.1,70,000/- मात्र सामनेवाले यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे होते. जुने ट्रॅक्टरची किंमत रु.1,40,000/- व ट्रेलरची किंमत रु.30,000/- होती. म्हणुन तक्रारदाराची तक्रार आहे की, सामनेवाले यांनी डिमांड ड्राप्टने रक्कम स्विकारुन नविन ट्रॅक्टर दिले. परंतु सदर व्यवहारातुन सामनेवाले यांचेकडे तक्रारदाराचे बाकी असलेली रक्कम रु.1,70,000/- मात्र तक्रारदाराने अनेक वेळा मागणी करुन सुध्दा दिली नाही. तक्रारदाराने सदर तक्रारअर्जासोबत दाखल केलेले दस्तऐवजचे अवलोकन केले असता दस्तऐवज क्र.1 करारनामा हा दि.26/10/2009 रोजी झालेला दिसुन येत आहे. सदर करारनाम्यामध्ये लिहून घेणार व लिहून देणार यांची सही नसल्याने इंडियन कॉंट्रॅक्ट अॅक्ट प्रमाणे सदरचा करारनामा कायद्याने ग्राहय धरता येणार नाही याशिवाय तक्रारदाराने सामनेवाला यांना जुने ट्रॅक्टर दिलेले आहे यासंबंधी कुठलेही कागदपत्र मंचासमोर दाखल केलेले नाही. तक्रारदार हा मंचा समक्ष त्यांची तक्रार साबित करु शकला नाही. म्हणुन पुराव्याचे अभावी तक्रारदाराची तक्रार फेटाळण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे. म्हणुन मुद्या क्र.1 चे उत्तर आम्ही नकारार्थी देत आहोत. सबब खालिलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1. तक्रारदाराची तक्रार फेटाळण्यात येते.
2. तक्रारीचा खर्च ज्यांनी त्यांनी आपापला सोसावा.
4. उभयपक्षकारांना निकालाची प्रत विनाशुल्क देण्यात यावी.
जळगांव.
दि.11/01/2016.
(श्रीमती.पुनम नि. मलिक) (श्री.विनायक आर.लोंढे)
सदस्या अध्यक्ष.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगांव.