तक्रारकर्त्यातर्फे वकील ः- श्री. अनंत दिक्षीत.
विरूध्द पक्षातर्फे वकील ः- श्री. योगेश हरीणखेडे
(युक्तीवादाच्या वेळेस)
निकालपत्रः- श्री. भास्कर बी. योगी अध्यक्ष, -ठिकाणः गोंदिया.
निकालपत्र
(दिनांक 12/04/2019 रोजी घोषीत )
1. तक्रारकर्ता यांनी ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये विरूध्द पक्ष बँक यांनी कर्ज मंजूर करण्याकरीता “No Due certificate” मध्ये तक्रारकर्त्याचे भाऊ “Defaulter” आहे असा शेरा मारल्यामूळे त्याला शासनाचे शेतीकरीता वित्तीय मदत मिळविता आली नाही. म्हणून ही तक्रार या मंचात दाखल केलेली आहे.
2. तक्रारकर्त्याची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणेः-
तक्रारकर्ता यांनी भारतीय सेनादलात सेवा दिल्यानंतर, सेवानिवृत्तीच्या वेळी मा. जिल्हाधिकारी भंडारा/गोंदिया यांनी तक्रारकर्त्याला बुरसीटोला नवेगांवबांध येथे 5.05 एकर शेतजमिन गट क्र. 186 Occupant Class II Nature दिली होती. शासनाने शेतक-यांसाठी Crop Loan Scheme राबविली होती. ज्यामध्ये Collateral Security सोडून दिले होते आणि परतफेडीसाठी हंगामी पिकाची तारीख तसेच पिकांची विक्री झाल्यानंतर परतफेड करावयाची सोय होती. तक्रारकर्त्याने दि. 17/04/2017 ला शासनाने राबविलेली योजनेचा लाभ घेण्याकरीता बॅक ऑफ इंडिया अर्जु्नी मोरगांव या शाखेत पिकाचे कर्जाकरीता (Crop Loan) रू. 75,000/-,चा अर्ज सादर केला. बँक ऑफ इंडिया यांनी तक्रारकर्त्याला इतर बँक व नोंदणीकृत सोसायटी यांच्याकडून “No Due certificate” आणण्याकरीता सांगीतले. तक्रारकर्त्याने बँक ऑफ इडियाच्या म्हणण्याप्रमाणे सर्व बँकेकडून NOC घेतली. परंतू विरूध्द पक्ष क्र 2 यांनी NOC देतेवेळी ‘तक्रारकर्त्याचे भाऊ श्री. सुभाषचंद्र के. उजवने हे थकीत रक्कम रू. 45,000/-, न दिल्याने डिफॉल्टर आहे’ अशी नोंद केली. विरूध्द पक्ष क्र 2 यांनी तक्रारर्त्याचा 35 वर्षाचा रेकॉर्ड बघितल्याशिवाय असा शेरा मारलेला आहे. तक्रारकर्त्यानूसार त्यांचे भाऊचा सदरचा पिक कर्जाशी कोणताही संबध नव्हता. तसेच हा पिक कर्ज संयुक्त परिवाराशीही संबधीत नव्हता. अशा परिस्थितीत कोणतेही कारण नसतांना विरूध्द पक्ष क्र 2 यांनी NOC देतांना त्यांचा भावाचा कोणताही संबध नसतांना अशी उलट टिपणी/विरूध्द मत करून दिल्याने तक्रारकर्त्याला बँक ऑफ इंडियाकडून पिक कर्ज घेता आला नाही आणि विरूध्द पक्षांनी केलेल्या अनुचित व्यापारी प्रथेमूळे त्यांना भरपूर आर्थिक नुकसान व मानसिक त्रास झाला आहे. म्हणून त्यांनी सदरची तक्रार योग्य न्याय मिळण्याकरीता या मंचात दाखल केली.
3. विरूध्द पक्ष क्र 1 व 2 हे बँक व ब्रॅन्च व्यवस्थापक श्री. बाबुराव निखाडे यांचेविरूध्द हि तक्रार दाखल केलेली असून त्यांच्यातर्फे विद्वान वकील श्री. जे.एल. परमार, विद्वान वकील श्री. एन.एस. पोपट, विद्वान वकील श्री. मौसीन एन. शेख यांनी दि. 26/06/2018 रोजी आपला वकालनतनामा सादर करून, लेखीजबाब दाखल करण्याकरीता वेळ मिळण्याकरीत अर्ज दाखल केला होता. मा. मंचाने विरूध्द पक्षांचे अर्ज दोनदा स्विकारून लेखीजबाब सादर करण्याकरीता त्यांना संधी दिली होती. त्यानूसार दि. 26/07/2018 रोजी त्यांनी त्यांचा लेखीजबाब दाखल केला. तक्रारकर्त्याने कलम 13 (4) (iii) नूसार आपला साक्षपुरावा सादर केल्यानंतर, विरूध्द पक्ष यांनी त्यांचा साक्षपुरावा दाखल न केल्यामूळे या मंचाने निशाणी क्रमांक 1 वर दि 07/03/2019 रोजी विरूध्द पक्षाच्या विरूध्द साक्षपुराव्याशिवाय तक्रार चालविण्याचा आदेश पारीत करण्यात आला. त्यानंतर तक्रारकर्त्याच्या विद्वान वकीलांनी आपला लेखीयुक्तीवाद नियम 13 (2) नूसार दाखल केला. विरूध्द पक्षाचे वकील हजर न झाल्यामूळे तक्रारकतर्याच्या अधिवक्त्याचा मौखीक युक्तीवाद ऐकल्यानंतर प्रकरण अंतिम आदेशाकरीता दि. 12/04/2019 ला राखीव ठवेले.
आज दि. 12/04/2019 रोजी विरूध्द पक्षातर्फे त्यांचे नविन अधिवक्ता श्री. योगेश एस. हरीणखेडे यांनी आपला वकालतनामा दाखल करून युक्तीवाद करण्याकरीता प्रार्थना केला. या मंचाने न्यायाचे दृष्टीने त्यांनी दाखल केलेले युक्तीवाद अभिलेखात घेतले तसेच त्यांचा मौखीक युक्तीवाद सुध्दा ऐकले.
4. तक्रारकर्त्याने त्यांच्या तक्रारीसोबत जोडलेले कागदपत्र तसेच तक्रारीच्या कथनाच्या पृष्ठार्थ दाखल केलेले पुराव्याचे शपथपत्र व लेखीयुक्तीवाद तसेच विरूध्द पक्ष यांनी दाखल केलेले लेखीजबाब व लेखीयुक्तीवाद यांचे मंचाने अवलोकन केले. मंचापुढे मौखीक युक्तीवाद व सादर केलेल्या दस्ताऐवजाच्या आधारे कारणासंहित आमचे निःष्कर्ष खालीलप्रमाणे आहेतः-
:- निःष्कर्ष -:
5. सदरच्या तक्रारीत एकच वाद आहे की, “No Due certificate” देतावेळी तक्रारकर्त्याच्या भाऊ डिफॉल्टर आहे हे नोंदविण्याचा अधिकार विरूध्द पक्ष क्र 1 व 2 यांना कायदयाच्या कोणत्या तरतुदीं अनुसार अधिकार आहे ? विरूध्द पक्ष यांचे विद्वान वकील श्री. योगेश हरीणखेडे यांनी आपल्या लेखीयुक्तीवादात दोन आक्षेप घेतले आहे – प्रथम आक्षेप तक्रारकर्ता ‘ग्राहक’ च्या संज्ञेत येत नाही व दुसरा आक्षेप “ नो डयू सर्टिफिकेट” क्रॉप लोनकरीता तक्रारकर्त्याने दि. 17/04/2017 रोजी विरूध्द पक्षांकडे अर्ज केला होता व त्याचा भाऊ श्री. सुभाष उजवणे डिफॉल्टर असून त्यांच्यावर रक्कम रू. 45,000/-, बाकी आहे जे परिनिती आहे त्याचा उल्लेख केला असून अर्जदारबद्दल काही म्हटला नाही अशी परिनितीमध्ये विरूध्द पक्षाची सेवेत कोणतीही कमरतरता नाही ” सदर तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी अशी विनंती केली.
6. तक्रारकर्ता यांनी भारतीय सेनादलामधून निवृत्तीच्या वेळी मा. राष्ट्रपती यांनी प्रमाणपत्र देऊन गॅझेटेड ऑफिसर म्हणून नेमले. तसेच तक्रारकर्त्याचा चांगल्या व्यवहार व सर्व्हिस रेकॉर्डमूळे मा. जिल्हाधिकारी भंडारा/गोंदिया यांनी तक्रारकर्त्याला बुरसीटोला नवेगांवबांध येथे 5.05 एकर शेतजमिन गट क्र. 186 Occupant Class II Nature दिली. तक्रारकर्ता यांचा बचत खाता विरूध्द पक्ष बँक यांच्याकडे असून त्यांचा बचत खाते क्र. 050210042087 आहे. म्हणून तक्रारकर्ता विरूध्द पक्ष बँक यांचे ‘ग्राहक’ आहे.
भारत सरकार यांनी शेतक-यांच्या फायदयासाठी क्रॉप लोन योजना राबविलेली होती. ज्यामध्ये किसान क्रेडिट कॉर्ड अकांऊट चालु होऊन मोफत एटीएम सोबत डेबीट कॉर्ड, रू. 3,00,000/-,पर्यंत कमी व्याज दर, तसेच द.सा.द.शे 3 टक्केप्रमाणे अतिरीक्त सुट, Collateral Security ची गरज नव्हती आणि परतफेडीसाठी हंगामी पिकाची तारीख तसेच पिकांची विक्री झाल्यानंतर परतफेड करावयाची सोय होती.
7. युक्तीवादाच्या वेळी या मंचाने विरूध्द पक्षाच्या विद्वान वकीलाला “No Due certificate” देता वेळी तक्रारकर्त्याच्या भाऊ डिफॉल्टर आहे हे नोंदविण्याचा अधिकार विरूध्द पक्ष क्र 1 व 2 यांना कायदयाच्या कोणत्या तरतुदीं अनुसार आहे ? विचारले असतांना त्यांनी कोणताही समाधानकारक उत्तर तसेच कायदयाची तरतुदी या मंचापुढे आणली नाही. जेणकरून हे सिध्द होईल की, विरूध्द पक्षाला “No Due certificate” देतांना अर्जदाराचे व्यतिरीक्त त्यांचे कुटूंबाचे कुणी व्यक्ती डिफॉल्टर आहे तसे नमूद करण्याचा अधिकार त्यांच्याकडे आहे.
या व्यतिरीक्त विरूध्द पक्ष क्र 1 व 2 यांना भरपूर संधी मिळूनही त्यांनी आपआपले साक्षपुरावे या मंचात दाखल न केल्यामूळे, त्यांच्याविरूध्द साक्षपुराव्याशिवाय तक्रार चालविण्याचा आदेश या मंचाने दि.07/03/2019 ला केलेला असून कायदयानूसार त्यांनी दाखल केलेला लेखीजबाब शपथपत्रावर पुराव्याशिवाय ग्राहय धरता येणार नाही. म्हणून त्याचे कथन मान्य करता येणार नाही.
तक्रारकर्त्याचा पूर्ण व्यवहार किंवा त्यांचेबद्दल चौकशी न करून विरूध्द पक्ष क्र 2 ब्रॅन्च मॅनेजर यांनी आपल्या शाखेत बसून “No Due certificate” वरती तक्रारकर्त्याचा भाऊ डिफॉल्टर आहे असे विरूध्द मत नोंदविले आहे. जेणे करून तक्रारकतर्याला भरपूर आर्थिक नुकसान व मानसिक त्रास सोसावा लागला. विरूध्द पक्ष क्र 1 व 2 यांनी या मंचात असे कोणतेही दस्ताऐवज दाखल केले नाही की, जेणेकरून हे सिध्द होईल की, तक्रारकर्त्याच्या भावानी घेतलेले कर्जासंबधी तक्रारकर्ता हमीदाता/Co - borrower आहे. म्हणून विरूध्द पक्ष क्र 1 व 2 यांनी तक्रारकर्त्याला सेवा देण्यात कसुर केला आहे तसेच त्यांचेविरूध्द अनुचित व्यापरी प्रथेचा अवलंब केल्यामूळे त्यांनी तक्रारकर्त्याला कोणताही विरूध्द मत (Adverse Remark) न नोंदविता नविन “No Due certificate” दयावा तसेच एक भारतीय सेनादलात आपले महत्वपूर्ण आयुष्य दिलेला माणसाला “No Due certificate” मध्ये विरूध्द मत नोंदवून भरपूर मानसिक त्रास दिला व तक्रारकर्त्याच्या प्रतिष्ठा व किर्तीला धक्का बसल्यामूळे रू. 50,000/-,दयावे असे या मंचाचे मत आहे. तसेच तक्रारकर्त्याला तक्रार दाखल करण्याकरीता अधिवक्ताची नेमणुक करावी लागली. म्हणून विरूध्द पक्ष क्र 1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या रू. 5,000/-,दयावे हे न्यायोचित होईल असेही या मंचाचे मत आहे.
वरील निष्कर्षास अनुसरून मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-// अंतिम आदेश //-
- तक्रारकर्त्याची तक्रार मंजूर करण्यात येते.
- विरूध्द पक्ष क्र 1 व 2 यांनी तक्रारकर्त्याला सेवा देण्यात कसुर केला आहे हे जाहिर करण्यात येते.
- विरूध्द पक्ष क्र 1 व 2 यांनी तक्रारकर्त्याला कोणताही विरूध्द मत (Adverse Remark) न नोंदविता नविन “No Due certificate” दयावा.
4. विरूध्द पक्ष क्र 1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारकर्त्याच्या प्रतिष्ठा व किर्तीला धक्का बसल्यामूळे रू. 50,000/-, तसेच तक्रारीचा खर्च रू. 5,000/-,दयावे.
5. विरूध्द पक्ष क्र 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी उपरोक्त आदेशाचे पालन आदेशाची प्रत प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसांचे आंत करावे. तसे न केल्यास, वरील नमूद आदेश क्र.(4) प्रमाणे रकमेवर द.सा.द.शे 6 टक्के व्याज अदा करावे.
6. आदेशाची प्रत उभय पक्षांना विनामूल्य पुरविण्यात यावी.
7. प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ प्रत तक्रारकर्त्याला परत करावी.