ग्राहक तक्रार अर्ज क्र.32/2015
तक्रार दाखल तारीख - 13/02/2015
निकाल तारीख – 04/08/2018
1. श्रीमती सविता तानाजी देसाई,
2. कु.तनिष्क तानाजी देसाई,
तर्फे अ.पा.क.
श्रीमती सविता तानाजी देसाई.
दोघे रा.कडगांव, ता.भुदरगड, जि.कोल्हापूर. ...तक्रारदार
विरुध्द
दत्त-सावित्री क्लिनीक करीता,
श्री.सदानंद दत्तात्रय दड्डीकर,
रा.कडगांव, ता.भुदरगड, जि.कोल्हापूर ...वि.प.
आदेश दि.04.08.2018 द्वारा:- मा. अध्यक्षा –सौ. सविता पी.भोसले.
निशाणी क्र.1 खालील
आदेश
प्रस्तुत तक्रार अर्जात तक्रारदार क्र.1 स्वत:करीता व तक्रारदार क्र.2 करीता अ.पा.क. हजर, तक्रारदार तर्फे पुरशीस दाखल करुन पुरशीसीत नमूद केलेप्रमाणे, प्रस्तुत कामी तक्रारदार व वि.प. यांचेत मे.मंचाचे बाहेर गावपातळीवर आपसांत तडजोड झाली आहे. त्यामुळे तक्रारदार यांना त्यांचा अर्ज वि.प.विरुध्द यापुढे चालविणेचा नाही. सदर अर्जाचे कामी वि.प.विरुध्द तक्रारदार यांना कोणताही पुरावा करणेचा नाही. तसेच मुळ अर्जात मागणी केलेल्या विषयासंदर्भात यापुढे भविष्यात तक्रारदार हे वि.प.विरुध्द कोणत्याही फेरमागणी संदर्भात तक्रार या मे.मंचात अगर अन्य कोणत्याही न्यायालयात दाखल करणार नाहीत. तक्रारदार यांचा मुळ अर्ज स्वखुशीने, कोणत्याही दडपणाविना काढून घेत आहे. सबब, तक्रारदार क्र.1 तर्फे पुरशिस व दाखल केलेली आहे. सदर पुरशीसवर तक्रारदार क्र.1 स्वत: करीता व तक्रारदार क्र.2 करीता अ.पा.क.म्हणून स्वाक्षरी आहे. तक्रारदारांना तक्रार अर्ज पुढे चालविणेचा नसलेमुळे तक्रार निकाली काढणेत यावी अशी पुरशीस देऊन विनंती केल्याने सदरहू तक्रार काढून घेणेस परवानगी देणेत येते. तक्रारदार यांना तोंडी विचारले असता, वरीलप्रमाणे मान्य व कबुली दिली, म्हणुन सदर तक्रार अर्ज पुढे चालविणेकरीता कोणतेही संयुक्तिक कारण व वाद राहीलेले नाहीत. सदरहू तक्रार अर्ज निकाली काढणेत येतो. प्रस्तुत प्रकरण नस्तीबंद करुन दफ्तरी दाखल करणेत येते.
- आ दे श –
1. तक्रारदाराचा तक्रार अर्ज निकाली काढणेत येतो.
2. सदर तक्रार अर्जामध्ये तक्रारदार यांनी दाखल केलेली पुरशीस ही या आदेशाचा एक भाग आहे.
3. सदर आदेशाच्या सही शिक्याच्या प्रतिलिपी उभय पक्षकारांना नि:शुल्क देण्यात याव्यात.
कोल्हापूर
दि.04/08/2018