Maharashtra

Chandrapur

CC/18/121

Shri Subhash Ramkushan Shegokar - Complainant(s)

Versus

City Mobaile Shopy Proprater chandrapur - Opp.Party(s)

Self

15 Oct 2018

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTE REDRESSAL FORUM
CHANDRAPUR
 
Complaint Case No. CC/18/121
( Date of Filing : 24 Aug 2018 )
 
1. Shri Subhash Ramkushan Shegokar
Vir Sawarkar Nagar Chandrapur
chandrapur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. City Mobaile Shopy Proprater chandrapur
Lokmanya tilak School main road Chandrapur
chandrapur
maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Atul D.Alsi PRESIDENT
 HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil MEMBER
 HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 15 Oct 2018
Final Order / Judgement

 

::: नि का ल प ञ:::

(मंचाचे निर्णयान्‍वये,  मा. सौ. कल्‍पना जांगडे (कुटे)    मा.सदस्‍या) (पारीत दिनांक :- 15/10/2018)

 

 

 

1.     तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 अंतर्गत गैरअर्जदाराविरूध्‍द प्रस्‍तूत तक्रार दाखल केली आहे. 

2.   विरुध्‍द पक्ष क्र. 1 हे आयटेल आयटी 1700 मोबाईलचे अधिकृत विक्रेता असून विरुध्‍द पक्ष क्र. 2 हे सदर मोबाईलचे अधिकृत दुरुस्ती केंद्र आहे. तक्रारकर्त्याने दि. 5.7.2018 रोजी विरुध्‍द पक्ष क्र. 1 यांचेकडून आय टी ई एल आय टी 1700 हा मोबाईल रू.11,000/- ला विकत घेतला. सदर मोबाईल विकत घेतल्यानंतर त्यामध्ये पाच दिवसांतच बिघाड निर्माण झाल्याने तक्रारकर्त्यानेदि.10.7.2018 रोजी वि.प.क्र.2 यांचेकडे सदर मोबाईल दरूस्ती करण्याकरीता  दिला. परंतू  वि.प. यांनी सदर मोबाईल दुरूस्त करून दिला नाही तसेच तक्रारकर्त्याने वि.प.कडे वारंवार जाऊन तसेच लेखी पत्र  दिल्या नंतरसुध्दा वि.प यानी तक्रारकर्त्याला प्रतिसाद दिला नाही.

         तक्रारकर्ता 100 टक्के अंध आहेत व त्याचा विरूध्द पक्षांनी पूर्णपणे फायदा घेतला.वि.प.नी तक्रारकर्त्याला मोबाईल दुरूस्त करून न दिल्याने तक्रारकर्त्याचे आर्थीक नुकसान झाले तसेच शारिरीक व मानसीक त्रास झाला.  त्‍यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्‍द पक्षांविरुद्ध मंचासमक्ष तक्रार दाखल करुन त्‍यामध्‍ये अशी मागणी केली आहे कि, तक्रारकर्त्याला वि.प.क्र. 1 व 2 यांनी संयुक्तपणे अथवा वैयक्तीकपणे तक्रारकर्त्‍यास नुकसान भरपाई रु. 10,000/-  तसेच नोटीस व तक्रार खर्चापोटी एकुण रक्‍कम रु. 5,000/- विरुध्‍द पक्षक्र. 1 व 2 यांनी तक्रारकर्त्‍यास देण्‍याचा आदेश व्‍हावा, अशी विनंती केली.

4.  तक्रारकर्त्याची तक्रार स्विकृत करून विरुध्‍द पक्ष क्र. 1 व 2 यांना मंचातर्फे नोटीस काढण्‍यात आली. परंतु विरुध्‍द पक्ष क्र. 1 व 2 यांना नोटीस प्राप्त होऊन व ते प्रकरणात हजर होवूनही त्यांनी लेखी उत्तर दाखल न केल्यामुळे त्यांचेविरुद्ध लेखी उत्तराशिवाय प्रकरण पुढे चालविण्यात यावे असा दि. 11.10.2018 रोजी नि.क्र.1 वर आदेश पारित.

५.   तक्रारकर्त्याची तक्रार दस्तावेज व तक्रारअर्जातील कथन व दस्तावेज यालाच तक्रारकर्त्याचा पुरावा शपथपत्र समजण्यांत यावे अशी नि.क्र.9 वर पुर्सीस दाखल, तक्रारकर्त्याचे तक्रारीतील लेखी कथन व उभय पक्षांच्या युक्‍तीवादावरून मंचाचे निर्णयास्तव खालील मुद्दे कायम करण्‍यात येत आहे.

मुद्दे                                                             निष्‍कर्ष

 

1. तक्रारकर्ता वि.प.1 व 2 यांचा ग्राहक आहे काय?                                होय

2. विरुध्‍द पक्ष क्र. 1 व 2 यांनी तक्रारकर्त्याला सेवेत न्युनता

   केल्याची  बाब तक्रारकर्ता सिद्ध करतात काय ?                             होय

3.  आदेश काय ?                                                                       अंशत: मंजूर

 

कारण मिमांसा

मुद्दा क्र. १ बाबत :-

 ६.   तक्रारकर्त्याने दि. 5.7.2018 रोजी विरुध्‍द पक्ष क्र. 1 यांचेकडून आय टी ई एल आय टी 1700 हा मोबाईल रू.11,000/- ला विकत घेतला. सदर मोबाईल विकत घेतल्यानंतर त्यामध्ये पाच दिवसांतच बिघाड निर्माण झाल्याने तक्रारकर्त्याने दि.10.7.2018 रोजी वि.प.क्र.2 यांचेकडे सदर मोबाईल दरूस्ती करण्याकरीता  दिला. यासंदर्भातील बिल व मोबाईल दुरूस्तीला दिल्याचे दस्तावेज तक्रारकर्त्याने प्रकरणात दाखल केले आहेत. यावरुन तक्रारकर्ता हा वि.पक्ष क्र.1 व 2 चा ग्राहक आहे हे सिध्द होते.  सबब, मुद्दा क्र. 1 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.

मुद्दा क्र. २ बाबत :- 

तक्रारकर्त्याने प्रकरणात दाखल केलेल्या दस्तावेजांचे अवलोकन केले असता असे निदिर्शनांस येते की तक्रारकर्त्याने दि. 5.7.2018 रोजी विरुध्‍द पक्ष क्र. 1 यांचेकडून मोबाईल विकत घेतल्यानंतर पाच दिवसांतच त्यात बिघाड निर्माण झाल्याने तक्रारकर्त्याने दि.10.7.2018 रोजी वि.प.क्र.2 यांचेकडे सदर मोबाईल दरूस्ती करण्याकरीता  दिला.  वि.प. क्र.2 यांनी दिलेल्या जॉबकार्डमध्ये कंप्लेंटच्या कॉलममध्ये “हँडसेट नॉट वर्कींग” तर रिमार्क्स च्या कॉलममध्ये “वॉरंटी” असे नमूद आहे. यावरून सदर मोबाईलमध्ये दोष आहे हे सिदध होते. तक्रारकर्त्याने सदर मोबाईल वि.प.कडे दरूस्ती करण्याकरीता  दिल्यानंतर त्यांनी स्वत:कडे 24 तास मोबाईल ठेवूनही त्यांनी सदर मोबाईल दुरूस्त न करता परत केला. त्यामुळे तक्रारकर्त्याने दिनांक.19.7.2018 रोजी वि.प.ला लेखी पत्र पाठवून सुध्दा मागणी केली, परंतु वि.प.यांनी पुर्तता केली नाही. यासंदर्भात तक्रारकर्त्याने  दिनांक.19.7.2018 रोजीचे पत्र,वि.प.क्र.2 यांनी दिलेले कार्ड दाखल केले आहे. यावरुन उपरोक्त मोबाईलमध्ये वॉरंटी कालावधीमध्ये दोष निर्माण झाल्यानंतर तो वि.प. कडे दुरूस्तीला दिल्यानंतरही त्यांनी दुरूस्त करून न देवून तक्रारकर्त्याप्रती न्युनतापूर्ण सेवा दिली आहे हे सिध्द होते. सबब,मुद्दा क्र. 2 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.

मुद्दा क्र. 3 बाबत :- 

     वि.पक्षाचे अधिवक्ता यांनी वि.प.हे तक्रारकर्त्यास दुसरा नवीन मोबाईल देण्यांस तयार आहे असे युक्तीवादादरम्यान सांगितले. त्यामुळे उपरोक्त मोबाईलमध्ये दोष असल्याने तक्रारकर्ता हा मोबाईल मिळण्यांस तसेच तक्रारकर्ता हे पुर्णता अंध असूनही त्यांना लेखी पत्र पाठवून तसेच वि.प.कडे वारंवार जाऊन मागणी केल्यानंतरही विरूदध पक्षांनी सदर मोबाईल दुरूस्त करून वा  बदलवून न दिल्यामुळे  तक्रारकर्ता त्यांना झालेल्या शारिरीक व मानसीक त्रासापोटी ते वि.प.कडून नुकसान भरपाई मिळण्यांस पात्र आहेत. परंतु तक्रारकर्त्याचे आर्थीक नुकसान किती झाले हे तक्रारकर्त्याने दस्तावेजांसह सिदध केलेले नाही. त्यामुळे त्याबाबत तक्रारकर्ता नुकसान भरपाई मिळण्यांस पात्र नाही असे मंचाचे मत आहे. सबब  मुद्दा क्र. 1 व 2 च्‍या विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. 

अंतीम आदेश

 
 

      (1) तक्रारकर्त्‍याची तक्रार क्र.121/2018 अंशत: मंजूर करण्‍यात येते.

     (2) तक्रारकर्त्याने त्याचेकडील विवादीत आय टी ई एल आय टी 1700 हा मोबाईल वि.प.क्र.1 कडे जमा करावा व त्यानंतर विरूध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी वैयक्तीक व संयुक्तीकपणे, तक्रारकर्त्यास, तक्रारकर्त्यास त्याचा सदोष मोबाईल बदलून त्याच मॉडेलचा नवीन मोबाईल द्यावा.  

     (3) विरूध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी वैयक्तीक व संयुक्तीकपणे, तक्रारकर्त्यास, शारिरीक व मानसीक त्रासापोटी नुकसान भरपाई रक्कम रू.2000/- व तक्रार खर्च रू.1000/- अदा करावी.

     (4)  उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्‍काळ पाठविण्‍यात यावी .

 

 

चंद्रपूर

दिनांक – 15/10/2018

 

 

                             

(श्रीमती.कल्‍पना जांगडे(कुटे))  (श्रीमती. किर्ती वैदय (गाडगीळ))  (श्री. श्री.अतुल डी. आळशी)                     

      सदस्‍या                     सदस्‍या                      अध्‍यक्ष 

                जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर.

 
 
[HON'BLE MR. Atul D.Alsi]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil]
MEMBER
 
[HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.