न्या य नि र्ण य
द्वारा – मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्यक्षा
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा 2019 कलम 34 व 35 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे—
वि प क्र.1 ही कंपनी ग्राहकाकडून हॉलिडे प्लॅन्स्च्या नावाखाली गुंतवणूक गोळा करुन ग्राहकांना हॉलिडेकरिता मोफत अॅकोमोडेशन उपलब्ध करुन देणे व मल्टीपल प्लॅन घेतला असता रक्कम रु.1,00,000/- पर्यंत अपघाती मृत्यू, अपघातातील अपंगत्वाची नुकसान भरपाई, वैदयकीय क्लेम, इत्यादी सेवा देण्याचा व्यवसाय करीत होती. यातील तक्रारदार यांनी खालीलप्रमाणे वि प यांचेकडे रक्कम गुंतवलेली आहे.
अ.क्र. | ठेव रक्कम | ठेव ठेवलेची तारीख | मुदत संपलेची तारीख | पावती नं. | मुदतीनंतर मिळणारी रक्कम |
1 | 5,000/- | 04/04/2014 | 04/04/2019 | 294574 | 
|
2 | 5,000/- | 04/04/2014 | 04/04/2019 | 290213 | |
3 | 5,000/- | 04/04/2014 | 04/04/2019 | 272948 | |
4 | 5,000/- | 04/04/2014 | 04/04/2019 | 257334 | |
5 | 5,000/- | 04/04/2014 | 04/04/2019 | 243816 | |
6 | 5,000/- | 04/04/2014 | 04/04/2019 | 238546 | |
7 | 5,000/- | 04/04/2014 | 04/04/2019 | 220444 | |
8 | 5,000/- | 04/04/2014 | 04/04/2019 | 213654 | 3,50,000/- |
9 | 5,000/- | 04/04/2014 | 04/04/2019 | 202492 | |
10 | 5,000/- | 04/04/2014 | 04/04/2019 | 181633 | |
11 | 5,000/- | 04/04/2014 | 04/04/2019 | 170588 | |
12 | 5,000/- | 04/04/2014 | 04/04/2019 | 168062 | |
13 | 5,000/- | 04/04/2014 | 04/04/2019 | 152581 | |
14 | 5,000/- | 04/04/2014 | 04/04/2019 | 142552 | |
15 | 5,000/- | 04/04/2014 | 04/04/2019 | बाय चेक | |
तक्रारदार यांनी वि प यांचेकडे एकूण रक्कम रु.75,000/- पाच वर्षाच्या मुदतीकरिता भरणा केलेली होती. मुदतीनंतर तक्रारदार यांना वि प यांनी रक्कम रु.3,50,000/- अगर वि प कंपनीच्या कार्यक्षेत्रात सदनिका अगर रो-बंगलो देणेचे मान्य केले होते. सदर कालावधीत तक्रारदार यांनी वि प यांचेकडून हॉलिडेबाबत कोणतीही सुविधा उपभोगलेली नव्हती. त्यामुळे मुदतीनंतर वि प यांनी रक्क्म रु.3,50,000/- तक्रारदारास देणे गरजेचे होते. मुदतीनंतर वि प यांनी तक्रारदारांना सदर रक्कम पावतीप्रमाणे अदा करणेचे मान्य व कबूल केले होते. तक्रारदार यांनी त्याप्रमाणे वि प यांचेकडे मुदतीनंतरची रक्कम मागणी केली असता वि प यांनी आजअखेर देय असलेली रक्कम देणेस जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत आहेत. सदरचे वि प यांचे कृत्य अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करणारे असून ग्राहकास दयावयाचे सेवेत त्रुटी ठेवणारी आहे. म्हणून प्रस्तुतची तक्रार दाखल करणे भाग पडले आहे.
वर नमूद तपशीलाप्रमाणे सर्व मुदत ठेवींची मुदतीनंतर मिळणारी एकूण रक्कम रु.3,50,000/- त्यावर दि.04/04/2019 पासून संपूर्ण रक्कम वसुल होईपर्यंत द.सा.द.शे. 10 टक्के व्याजासह रक्कम तक्रारदारांना देणेचा आदेश वि.प. यांना व्हावा तसेच शारिरीक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.25,000/- व तक्रारीचा खर्च रक्कम रु.250,000/- देणेचा आदेश वि.प. यांना व्हावा अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
2. तक्रारदाराने सदरकामी तक्रार अर्ज व त्यासोबतची कागदपत्रे हाच पुरावा युक्तीवाद समजावा अशी पुरसिस दाखल केली आहे.
3. प्रस्तुतकामी वि.प. क्र.1 व 2 यांना नोटीस लागू झालेबाबतचा पोष्टाचा ट्रॅक रिपोर्ट सदर कामी तक्रारदाराने दाखल केलेला असून वि प क्र.1 व 2 यांना सदर कामी नोटीस लागू होउुनही ते सदर कामी हजर झालेले नाहीत किंवा म्हणणेही दाखल केलेले नाही. सबब वि प क्र.1 व 2 यांचेविरुध्द दि.24/02/2022 रोजी ‘’एकतर्फा ‘’ आदेश पारीत करण्यात आला.
4. तक्रारदारांचा तक्रारअर्ज, दाखल केलेली अनुषंगिक कागदपत्रे, यांचा विचार करता निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार हे वि प यांचे ग्राहक आहेत का? | होय. |
2 | वि प यांनी तक्रारदार यांना दयावयाचे सेवेत त्रुटी केली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे ठेवींची रक्कम व्याजासहीत व मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | अंशतः मंजूर. |
मुद्दा क्र.1 –
5. प्रस्तुतकामी तक्रारदार यांनी वि.प. कंपनीमध्ये ठेवी ठेवलेल्या आहेत. तक्रारदार यांनी तक्रारीसोबत दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारीसोबत ठेवपावत्यांच्या प्रती दाखल केल्या आहेत. सदर पावत्यांचे अवलोकन केले असता, त्यावर वि.प. कंपनीचे नांव नमूद आहे. तसेच सदर पावत्यांवर वि प कंपनीचा शिक्का दिसून येतो. वरील सर्व बाबीं वरुन तक्रारदार यांनी वि.प. कंपनीत ठेवी ठेवलेल्या होत्या ही बाब सिध्द होते. त्याकारणाने ठेव स्वरुपात गुंतवलेल्या रकमेचा विचार करता, तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.2
6. तक्रारदाराचे कथनानुसार, तक्रारदार यांनी वि प यांचेकडे प्रत्येकी रक्कम रु.5,000/- प्रमाणे एकूण रक्कम रु.75,000/- पाच वर्षाच्या मुदतीकरिता दि.04/04/2014 रोजी भरणा केलेली होती. मुदतीनंतर म्हणजे दि.04/04/2019 रोजी तक्रारदार यांना वि प यांनी रक्कम रु.3,50,000/- अगर वि प कंपनीच्या कार्यक्षेत्रात सदनिका अगर रो-बंगलो देणेचे मान्य केले होते. सदर कालावधीत तक्रारदार यांनी वि प यांचेकडून हॉलिडेबाबत कोणतीही सुविधा उपभोगलेली नव्हती. त्यामुळे मुदतीनंतर वि प यांनी रक्क्म रु.3,50,000/- तक्रारदारास देणे गरजेचे होते. मुदतीनंतर वि प यांनी तक्रारदारांना सदर रक्कम पावतीप्रमाणे अदा करणेचे मान्य व कबूल केले होते. तक्रारदार यांनी त्याप्रमाणे वि प यांचेकडे मुदतीनंतरची रक्कम मागणी केली असता वि प यांनी आजअखेर देय असलेली रक्कम देणेस जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत आहेत. ठेवीदाराने मागणी केल्यानंतर किंवा ठेवींची मुदत संपल्यानंतर ठेवपावतीमध्ये नमूद केल्याप्रमाणे ठेव रक्कम व्याजासह परत मिळण्याचा तक्रारदाराचा अधिकार आहे.
तक्रारदाराने दाखल केलेले वि प कंपनीचे जाहिरात व प्लॅन्सचे कागदपत्रांचे अवलोकन करता तक्रारदार यांनी वि प यांचेकडील जेम प्लॅनमधील कॉम्बो प्लॅनमध्ये रक्कम गुंतवलेचे दिसून येते. सदरची रक्कम पाच वर्षानंतर परतावा देणार असे नमुद आहे. तसेच तक्रारदाराने दाखल केलेले वि प कंपनीचे ऑफर डॉक्युमेंट, डेफिनेशन टर्म्स अॅन्ड कंडीशन्स चे अवलोकन करता त्यामध्ये प्लॅन होल्डरचे नांवमध्ये तक्रारदाराचे नांव श्री भिमराव आनंदा दाभाडे नमुद असून बिझेनस असि.नांव उदय आनंदराव पाटील असे नमुद आहे. प्लॅन नांव- जेम ऑप्शन- कॉम्बो कालावधी – 5 वर्षे प्लॅन रक्कम रु.5,000/- रजि.फी रु.100/- असे नमुद असलेचे दिसून येते. यावरुन तक्रारदार यांनी वि प यांचेकडून जेम कॉम्बो प्लॅनमध्ये रक्कम रु.5,000/- प्रमाणे एकूण रक्कम रु.75,000/- गुंतवलेचे स्पष्ट होते. सदर ठेव रक्कमांची मुदत संपल्यानंतर तक्रारदार यांची ठेव रक्कम व्याजासहीत परत करणेची जबाबदारी वि.प. यांची होती. सदरची बाब वि.प. यांनी प्रस्तुत कामी हजर राहून अमान्य केलेली नाही. वि.प.क्र.1 व 2 यांनी प्रस्तुत प्रकरणामध्ये वर नमूद केल्याप्रमाणे आपली लेखी कैफियत दाखल केलेली नाही आणि तक्रारदाराचे कोणतेही कथन अमान्य केलेले नाही. वि प क्र.1 व 2 यांना सदर कामी नोटीस लागू होउुनही ते सदर कामी हजर झालेले नाहीत किंवा म्हणणेही दाखल केलेले नाही. सबब वि प क्र.1 व 2 यांचेविरुध्द दि.24/02/2022 रोजी ‘’एकतर्फा ‘’ आदेश पारीत करण्यात आला. त्यामुळे वि.प.क्र.1 व 2 यांना तक्रारदाराची संपूर्ण कथने मान्य आहेत असेच गृहित धरावे लागेल. सबब, तक्रारदाराने आपली केस पूर्णतया शाबीत केलेली असून वि.प.क्र.1 व 2 यांनी तक्रारदारास सेवेत त्रुटी दिलेली आहे असा या जिल्हा आयोगाचा निष्कर्ष आहे. सबब मुद्दा क्र.2 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.3 व 4
7. सबब, वि.प. क्र.1 व 2 यांचेकडून तक्रारीत नमूद ठेव पावत्यांवरील मुदतीनंतर देय असलेली रक्कम मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. तसेच सदर मुदती नंतरची मिळणा-या रकमेवर सदरची संपूर्ण रक्कम तक्रारदार यांना मिळेपावेतो द.सा.द.शे. 6 टक्के प्रमाणे व्याज मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
8. प्रस्तुत कामी वि.प. क्र.1 व 2 यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेने तक्रारदार यांना मानसिक त्रास व शारिरिक त्रास झाला तसेच सदरचे तक्रारअर्जासाठी खर्च करावा लागला. त्याकारणाने तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.5,000/- मिळणेस पात्र आहेत. सबब, मुद्दा क्र.3 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.सबब, याकामी खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्यात येतो.
- आ दे श -
- तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
- वि.प. क्र.1 व 2 यांनी तक्रारदारांना न्यायनिर्णय कलम 1 मध्ये नमूद केलेल्या ठेव पावत्यांवर मुदती नंतर मिळणारी एकूण रक्कम रु.3,50,000/- अदा करावी व सदर रक्कमेवर मुदत संपले तारखेपासून म्हणजे दि.04/04/2019 पासून ते संपूर्ण रक्कम तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के प्रमाणे व्याज अदा करावे.
- वि.प. क्र.1 व 2 यांनी तक्रारदार यांना मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.5,000/- अदा करावी.
- वर नमूद सर्व आदेशांची पुर्तता वि.प. क्र.1 व 2 यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.
- विहीत मुदतीत आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदा, 2019 कलम 71 व 72 प्रमाणे वि.प. विरुध्द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
- आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.