::: आ दे श :::
( पारित दिनांक : 19/06/2018 )
माननिय सदस्या श्रीमती शिल्पा एस. डोल्हारकर, यांचे अनुसार : -
1) तक्रारकर्त्याने सदरहू तक्रार, ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम 12 अन्वये, बॅंकीग व्यवहारा संदर्भात विरुध्द पक्षाविरुध्द दाखल केली.
2) त्यानंतर, सदर प्रकरणात विरुध्द पक्षास नोटीस बजावण्यात आली व विरुध्द पक्ष यांनी त्यांचा लेखी जबाब प्रकरणात दाखल केला.
3) परंतु, तक्रारकर्त्याने आज दिनांक 19/06/2018 रोजी प्रकरण काढून टाकण्यासाठी पुरसिस/अर्ज केला व त्यामध्ये नमुद केले की, “ प्रस्तुतचे प्रकरण मला पुढे चालवायचे नाही. म्हणून प्रस्तुतचे प्रकरण काढून घेण्यात यावे. ”
सबब प्रकरणात, अंतिम आदेश पारित करण्यांत येतो तो पुढीलप्रमाणे . .
:: अंतिम आदेश ::
1. तक्रारकर्त्याची तक्रार, त्यांच्या अर्जाप्रमाणे नस्तीबध्द करण्यात येते.
2. न्यायिक खर्चाबद्दल कोणताही आदेश नाही.
3. उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
( श्री. कैलास वानखडे ) (श्रीमती शिल्पा एस. डोल्हारकर )
सदस्य. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, वाशिम.
svGiri