Maharashtra

Gadchiroli

CC/08/22

Ku. Archna Ramdas Giradkar , Age 22 years - Complainant(s)

Versus

Branch Officer, Branch Gadchiroli, Bhartiya jivan vima nigam , Office Gadchiroli - Opp.Party(s)

R.S. Donadkar

09 Apr 2009

ORDER

 
Complaint Case No. CC/08/22
 
1. Ku. Archna Ramdas Giradkar , Age 22 years
R/s. Nehru ward, Ta. Armori
Gadchiroli
Maharastra
2. Nandkishor Ramdas Giradkar, Age 18 years
R/s. Nehru ward, Armori, Ta. Armori
Gadchiroli
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. Branch Officer, Branch Gadchiroli, Bhartiya jivan vima nigam , Office Gadchiroli
Branch Officer, Branch Gadchiroli, Bhartiya jivan vima nigam , Office Gadchiroli, ta. Gadchiroli
Gadchiroli
Maharastra
2. Head Officer, Zilla Parishad, Gadchiroli
Head Officer, Zilla Parishad, Gadchiroli
Gadchiroli
Maharastra
3. Education Officer, Panchyat Samiti, Chamorshi
Education Officer, Panchyat Samiti, Chamorshi
Gadchiroli
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONORABLE Shri. A. N. Kamble PRESIDENT
 HONORABLE Shri. R. L. Bombidwar Member
 HONORABLE Smt. M. J. Bhilkar Member
 
PRESENT:
 
ORDER

(मंचाचे निर्णयान्‍वये, अनिल एन. कांबळे, अध्‍यक्ष,प्रभारी)

(पारीत दिनांक : 9 एप्रिल 2009)

                                       ... 2 ...

 

                        ... 2 ...  

 

 

          अर्जदारांनी, सदरची तक्रार, गैरअर्जदाराचे विरुध्‍द मृतक रामदास पांडूरंग गिरडकर यांनी काढलेल्‍या, जीवन विमा पॉलिसीची रक्‍कम व्‍याजासह मिळण्‍याकरीता दाखल केली आहे.

 

अर्जदाराच्‍या तक्रारीचा आशय थोडक्‍यात खालीलप्रमाणे.

 

1.        अर्जदार हे मृतक रामदास पांडूरंग गिरडकर यांचे मुलगा व मुलगी आहे.  अर्जदाराचे वडिल पंचायत समिती, चामोर्शी, भाडभिडी (मोकासा) येथे प्राथमिक शिक्षक म्‍हणून होते.  त्‍यांनी आपले हयातीत जीवन विमा कार्यालयातून 4 पॉलिस्‍या काढल्‍या होत्‍या.

 

 

अ.क्र.

पॉलिसी क्रमांक    

मासीक हप्‍ता

देय रुपये  

विमा काढल्‍याची तारीख

 1. 

972899286

385/-

   50,000/-

28/01/2001

 2.

972844895

530/-

   50,000/- x 2 =1,00,000/-

15/02/2001

 3.

973136612

256/-

     25,000/-

15/03/2003

 4.

973399899

1,726/-

  1,50,000/- x 2 =3,00,000/-

28/01/2005

 

 

                   वरील पॉलिसीच्‍या मासीक हप्‍त्‍याची रक्‍कम अर्जदारांच्‍या वडिलांचे पगारातून, गैरअर्जदाराने कपात करुन विमा कंपनीकडे भरणा करण्‍यात येत होते.

2.        अर्जदारांचे वडिल रामदास पांडूरंग गिरडकर यांचा दिनांक 24/12/2006 रोजी मोटार वाहन अपघातात निधन झाला.  सदर अपघातात पत्‍नी व मुलगा खेमराज हे सुध्‍दा मरण पावले.  अर्जदार हे

                                                ... 3 ...

 

 

                        ... 3 ...

 

मृतक रामदासचे वारसदार असुन, कमाईचे कोणतेही साधन नाही.  गैरअर्जदार क्र. 2 कडून विचारणा केली असता, गैरअर्जदार क्र. 1 कडून विमा पॉलिस्‍या काढल्‍या होत्‍या व त्‍याचे पगारातून कपात होत होती, असे आढळून आले.  अर्जदारांनी गैरअर्जदार क्र. 3 ला पॉलिसीच्‍या रकमाची मागणी केली असता, गैरअर्जदार क्र. 1 कडून मिळेल असे सांगीतले.  गैरअर्जदार क्र. 1 कडे वडिलांचे मृत्‍युबाबत कळविले, तेंव्‍हा त्‍यांना वारसान दस्‍ताऐवज दाखविले.  गैरअर्जदार क्र. 3 कडून पॉलिसीच्‍या हप्‍ता आलेला नसल्‍यामुळे पॉलिसीची रक्‍कम देता येत नाही, असे गैरअर्जदार क्र. 1 ने कळविले.

 

3.        सविस्‍तर माहिती कळविल्‍यानंतर असे लक्षात आले की, पॉलिसी क्र. 973136612, 972844895 आणि 972866286 याची मासीक किस्‍त जुलै-2005 पर्यंत भरणा केली आहे, आणि पॉलिसी क्र. 973366899 ची मासीक किस्‍त जुन, जुलै-2005 ची मासीक किस्‍त भरणा केली नाही, बाकी किस्‍त पगारातून परस्‍पर कपात करण्‍यात आलेली आहे.   गैरअर्जदार क्र. 1 ने, गैरअर्जदार क्र. 3 कडे मासीक किस्‍त बद्दलचे पञ दिले, त्‍याची प्रत अर्जदारास दिली.  मृतक रामदास हा जिल्‍हा परिषद अंतर्गत शाळेमध्‍ये शिक्षक असल्‍यामुळे गैरअर्जदार क्र. 2 म्‍हणून जोडण्‍यात आले आहे.

 

4.        गैरअर्जदार क्र. 3 नी वरील चारही पॉलिसीच्‍या किस्‍तीची रक्‍कम पगारातून कपात करुन गैरअर्जदार क्र. 1 कडे भरण्‍याची नैतीक जबाबदारी होती.  तसेच, पॉलिसी रकमेची अदायगी करण्‍याची जबाबदारी गैरअर्जदार क्र. 1 ची होती.  मासीक किस्‍त भरण्‍याची जबाबदारी ही मृतकाच्‍या वडिलांची नव्‍हती, त्‍यामुळे किस्‍त वेळेवर भरण्‍यात आली नाही, यात मृतक रामदासची कोणतीही चुक किंवा जिम्‍मेदारी नाही.  अर्जदार हे शिक्षण घेत असून, उत्‍पादनाचे कोणतेही साधन नाही.  अर्जदारास पॉलिसी रक्‍कम न मिळाल्‍यामुळे अतोनात आर्थिक नुकसान होत आहे.  त्‍यामुळे, अर्जदारांना मानसीक ञासास सामोरे जावे लागत आहे.  अर्जदार, गैरअर्जदाराकडून चारही विमा पॉलिसीची रक्‍कम रुपये 4,75,000/-, 12 % टक्‍के व्‍याजासह मिळण्‍यास पाञ आहे.  तसेच, मानसीक,शारीरीक ञासापोटी

                                                ... 4 ...

 

                        ... 4 ...

 

 

रुपये 20,000/- आणि खर्चापोटी रुपये 2,000/- गैरअर्जदाराकडून मिळण्‍याकरीता, सदर तक्रार दाखल केलेली आहे.  अर्जदारांनी आपले तक्रारीत गैरअर्जदारांकडून एकुण 4,97,000/-, 12 % टक्‍के व्‍याजासह आदेश पारीत करण्‍यात यावी, अशी मागणी केलेली आहे.

 

5.        अर्जदारांनी आपले तक्रारीसोबत निशाणी 2 नुसार एकुण 6 झेरॉक्‍स दस्‍ताऐवज दाखल केले आहे.  अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन गैरअर्जदारास नोटीस काढण्‍यात आले.  गैरअर्जदार हजर होऊन लेखी बयाण दाखल केले आहे.  गैरअर्जदार क्र. 1 ने निशाणी 16, गैरअर्जदार क्र. 2 ने निशाणी 8, आणि गैरअर्जदार क्र. 3 ने निशाणी 21 नुसार आपले शपथेवर लेखी उत्‍तर दाखल केलेले आहे. 

 

6.        गैरअर्जदार क्र. 1 ने आपले लेखी बयाणात प्राथमिक आक्षेपासह उत्‍तर दाखल केलेले आहे.  गैरअर्जदार क्र. 1 ने प्राथमिक आक्षेप घेतला की, अर्जदारांनी या पूर्वी ग्राहक तक्रार क्र. 1/2007 नुसार न्‍यायमंचात तक्रार दाखल केली होती.  न्‍यायमंचाने दिनांक 13/6/2007 ला आदेश पारीत करुन, तक्रार खारीज केले.  अर्जदारांनी त्‍याच तक्रारीतील विषयानुसार सदर तक्रार दाखल करुन एकाच बाबी करीता पुन्‍हा तक्रार दाखल करुन रेस-ज्‍युडीकेटाच्‍या तत्‍वानुसार, तक्रार त्‍याच कारणाकरीता, चालविण्‍याचा, न्‍यायमंचास अधिकार नाही, या सतकृतदर्शनी कारणामुळेच खर्चासह, न्‍यायाच्‍या हितार्थ खारीज होणे जरुरीचे आहे.

 

7.        गैरअर्जदार क्र. 1 ने प्राथमिक आक्षेपाला बाधा न येऊ देता आपले लेखी उत्‍तर दाखल करुन, हे मान्‍य केले आहे की, अर्जदाराचे वडिल, श्री रामदास पांडूरंग गिरडकर हे पंचायत समितीच्‍या अंतर्गत भाडभिडी (मोकासा) येथे प्राथमिक शिक्षक होते व त्‍या परिछेदात दर्शविल्‍याप्रमाणे पॉलिस्‍या काढल्‍या होत्‍या व पॉलिसीची रकमाची कपात अर्जदारांच्‍या वडिलांचे पगारातून करण्‍यात येत होती.  गैरअर्जदार क्र. 1 ने आपले लेखी बयाणात असे स्‍पष्‍ट केले आहे की, केवळ पॉलिसी क्र. 972899286 आणि पॉलिसी क्र. 972844895 अंतर्गत भरलेल्‍या प्रिमियमची मुल्‍य अर्जदारांना

                                                ... 5 ...

 

                        ... 5 ...                     

 

देय आहे.  परंतु, या पॉलिसी अंतर्गतचे हितलाभ मिळण्‍यास अर्जदार पाञ नाही.  गैरअर्जदार क्र. 1 यांनी दोन्‍ही पॉलिसीच्‍या जमा किस्‍तीची रक्‍कम अर्जदारांना देऊ केली होती, माञ अर्जदारांनी रक्‍कम नाकारली.  गैरअर्जदार क्र. 1 ने लेखी बयाणात पुढे असेही नमुद केले आहे की, विमा धारक रामदास पांडूरंग गिरडकर यांनी विमा धन दूहेरी अपघात लाभाची पॉलिसी क्र. 973399899 जुन, जुलै-2005 या महिन्‍याचे प्रीमीयमची किस्‍त गैरअर्जदाराकडे जमा केली नव्‍हती, त्‍यामुळे या पॉलिसी प्रीमीयमची किस्‍त सानुग्रहा ( Ex Gratia  Basis) तत्‍वावर  देय आहे अथवा नाही, या बद्दलच्‍या विचारार्थ प्रलंबित आहे.  विमा धारकाने पॉलिसीचे जेवढे प्रिमियम भरले तेवढे देण्‍याचा अधिकार आयुर्विमा महामंडळाचे अध्‍यक्षांना आहे, त्‍याबद्दलचा निर्णय व्‍हायचा आहे.  अर्जदारांची प्रथम तक्रार खारीज झाली असतानांही, दूसरी तक्रार त्‍याच विषयाची दाखल केलेली आहे, या सबबीवरही खर्चासह खारीज होणे आगत्‍याचे आहे. 

 

8.        गैरअर्जदाराने, आपले लेखी बयाणात हे अमान्‍य केले आहे की,

दिनांक 24/12/2006 रोजी अर्जदाराचे वडिल विमा धारक रामदास पांडूरंग गिरडकर याची पत्‍नी व मुलगा मरण पावले व विम्‍याची मासीक किस्‍त पगारातून कपात होत होती.  अर्जदारांनी वारसानाबद्दलचे दस्‍ताऐवज अद्यापही सादर केलेले नाही व गैरअर्जदार क्र. 1 चे विरुध्‍द खोटे विधाने केली असल्‍यामुळे अमान्‍य केले आहे.  गैरअर्जदाराने हे अमान्‍य केले आहे की, सविस्‍तर माहिती काढल्‍यानंतर असे लक्षात आले की, मासीक किस्‍त जुलै-2005 ला भरणा केला आहे व पॉलिसी क्र. 973366899 रुपये 1,50,000/- x 2 =  3,00,000/- रुपये यांचे माहे जुन व जुलै-2005 याची मासीक किस्‍त भरणा केली नाही, बाकी किस्‍त परस्‍पर पगारातून कपात करण्‍यात आलेली आहे.  गैरअर्जदाराने हे ही अमान्‍य केले आहे की, अर्जदाराची पूर्वीची तक्रार न्‍यायमंचाने खारीज केल्‍यामुळे 4 विमा पॉलिसीची रक्‍कम रुपये 4,75,000/-, 12  %  टक्‍के व्‍याजासह मिळण्‍यास पाञ आहे.  तसेच, शारीरीक व मानसीक ञासापोटी रुपये 20,000/- व खर्चापोटी रुपये 2,000/- असे एकुण रुपये 4,97,000/- केलेली मागणी सतकृतदर्शनी

                                                ... 6 ...

 

 

                        ... 6 ...

 

योग्‍य नाही, ती खर्चासह खारीज होणे न्‍यायाचे दृष्‍टीने जरुरीचे आहे.   अर्जदाराची प्रार्थना नामंजूर करुन अर्जदार न्‍यायमंचाकडून आदेश किंवा दिलासा प्राप्‍त करण्‍यास अप्राप्‍त आहे.  अर्जदाराचा दावा चुकीचा, खोटा व न्‍यायमंचाचे अधिकारक्षेञा बाहेरील असल्‍याने खर्चासह खारीज करण्‍यात यावा.

 

9.        गैरअर्जदाराने आपले विशेष कथनात असे नमुद केले आहे की, अर्जदाराचे वडिल भाडभिडी (मोकासा) येथे शिक्षक होते व गैरअर्जदारांकडून त‍पशिलात नमुद केल्‍याप्रमाणे पॉलिसी काढल्‍या होत्‍या.  गैरअर्जदार क्र. 3 ला दिनांक 5/8/2005 रोजी ऑगष्‍ट-2005 पासून पॉलिसी क्र. 973399899 ची किस्‍त रुपये 1726/- कापण्‍यात यावी व इतर पॉलिसीची किस्‍त कापू नये, त्‍या प्रमाणे गैरअर्जदार क्र. 3 ने ऑगष्‍ट-2005 नंतर फेब्रूवारी-06 पर्यंत पॉलिसीची किस्‍त पाठविलेली आहे.  गैरअर्जदार क्र. 1 यांनी भरलेल्‍या एकुण प्रिमियम किस्‍तीचे मुल्‍याची रक्‍कम पॉलिसी क्र. 972899286 करीता धनादेश क्र. 11998 दिनांक 24/6/06 रुपये 30,600/-, आणि पॉलिसी क्र. 972844895 करीता धनादेश क्र. 11999 दिनांक 24/6/06 रुपये 13,700/- व्‍दारे अर्जदारांना दिला होता, माञ अर्जदारांनी ती रक्‍कम स्विकारण्‍यास नकार दिला, यावरुन गैरअर्जदार क्र. 1 चे सेवेमध्‍ये कोणतीही ञृटी नव्‍हती, हे स्‍पष्‍ट होते.  सबब, गैरअर्जदार क्र. 1 चे विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात यावी.

 

10.       गैरअर्जदार क्र. 1 ने आपले विशेष कथनात पुढे असेही नमुद केले आहे की, विमा दाव्‍याची निपटारा करण्‍याची आवश्‍यक असलेला क्‍लेम फार्म अर्जदाराने अजुन पर्यंत सादर केलेला नाही.  यावरुन, गैरअर्जदार क्र. 1 ने कोणतीही ञृटीपूर्ण सेवा पुरविली नसून, दावा निपटारा होण्‍यास झालेल्‍या विलंबास अर्जदाराच कारणीभूत आहे, हे स्‍पष्‍ट होते.  अर्जदार यांनी दावा गैरअर्जदार क्र. 1 च्‍या लोकायुक्‍ताकडे (Ombudsman’s)  दाखल न करता, सदर तक्रार न्‍यायमंचा समोर आणलेली आहे.  सबब, गैरअर्जदार क्र. 1 चे विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात यावी.  विमा धारकाने घोषणापञा नुसार दिलेल्‍या माहिती नुसार, अर्जदारावर बंधनकारक आहे

                                                ... 7 ...

 

                        ... 7 ...

 

यावरुनही गैरअर्जदार क्र. 1 चे सेवेत कोणतीही ञृटी दिसून येत नाही, यावरुनही अर्जदाराची तक्रार खर्चासह खारीज होण्‍यास पाञ आहे.

                    

11.       गैरअर्जदार क्र. 2 ने दिनांक 13/1/09 च्‍या पञानुसार बिना शपथेवर आपले म्‍हणणे सादर केले आहे.  त्‍या पञातील मजकूरानुसार मयत रामदास पांडूरंग गिरडकर प्राथमिक शिक्षक या पदावर, पंचायत समिती चामोर्शी जिल्‍हा परिषद येथे कार्यरत होता.  त्‍याचे वेतन व भत्‍ते पंचायत समिती चामोर्शी येथूनच काढण्‍यात येत आहे.  गट शिक्षणाधिकारी व संवर्ग विकास अधिकारी , पंचायत समिती, चामोर्शी हे आहरण व संवितरण अधिकारी आहे, त्‍याचे वेतनातून रक्‍कम कपात करुन, भारतीय जीवन विमा निगम यांना रक्‍कम कपात करुन पाठविण्‍याची जबाबदारी गट शिक्षणाधिकारी व संवर्ग विकास अधिकारी यांची आहे.  त्‍यामुळे, सदर प्रकरणात मुख्‍य कार्यकारी अधिकारी जबाबदार नाही.  तरी पाटी नं. 2 चे नांव प्रकरणातून खारीज करण्‍यात यावे, अशी विनंती केली आहे.

 

12.       गैरअर्जदार क्र. 3 ने, लेखी बयाण दाखल केला आहे.  श्री रामदास पांडूरंग गिरडकर, प्राथमिक शिक्षक जुन-05 मध्‍ये पंचायत समिती, मुलचेरा येथून स्‍थानांतराने पंचायत समिती चामोर्शी येथे स्‍थानांतरीत झाले.  त्‍याचे वेतनपञानुसार  4 विमा पॉलिस्‍या काढल्‍या आहेत.  पॉलिसी क्र. 972899286 रुपये 385/-, 972844895 रुपये 530/-, 973136612 रुपये 256/- यांची मासीक कपात रुपये 1171 x 2 = 2342/- आहे.  माहे जुन 2005 व जुलै-05 चे विमा हप्‍ता कपात करुन प्रमाणक क्र. 734 दि. 8/9/2006 अन्‍वये या कार्यालयाचे पञ क्र. 477/06 दि. 27/3/2006 नुसार विमा हप्‍ता भरण्‍यात आला असून दि. 1/7/06 च्‍या  पञान्‍वये शाखा व्‍यवस्‍थापक, भारतीय जीवन विमा निगम, गडचिरोली यांना कळविण्‍यात आले आहे.  श्री रामदास पांडूरंग गिरडकर यांनी दि. 5/8/2005 ला या कार्यालयात सादर केलेल्‍या विनंती अर्जानुसार ऑगष्‍ट 2005 पासून विमा हप्‍ता रुपये 1726/- प्रमाणे नियमित कपात केलेली आहे.  त्‍यामुळे संबंधित पॉलिसी सुरु असल्‍यामुळे त्‍याचे अपघाती मृत्‍यु नंतरचे देय व अनुदेय रक्‍कम आहे, ती रक्‍कम वारसदारास जीवन विमा

                                                ... 8 ...

 

                        ... 8 ...

 

 

कार्यालयाकडून मिळणे अपेक्षित आहे.  तक्रारीतील मुद्दा क्र. 4 व 5 च्‍या अनुषंगाने अनुपालनाची आवश्‍यकता नाही असे नमुद केले आहे.  मुद्दा क्र. 6 चे उत्‍तरात गैरअर्जदार क्र. 3 ने असे नमुद केले आहे की, रामदास गिरडकर, प्राथमिक शिक्षक, तळोधी (मोकासा) पंचायत समिती चामोर्शी यांनी दिनांक 5/8/2005 चे विनंती अर्जानुसार या कार्यालयाने कार्यवाही केली आहे.  त्‍याचे विनंती नुसार पॉलिसी क्रमांक 973399899 चा मासीक हप्‍ता रुपये 1726/- प्रमाणे दरमाह ऑगष्‍ट-05 पासून फेब्रूवारी-06 पर्यंत वेतनातून नियमित कपात करण्‍यात आलेली आहे.

 

13.       गैरअर्जदाराने, आपले लेखी बयाणासोबत निशाणी 22 नुसार दस्‍ताऐवज दाखल केले आहे.  अर्जदाराने आपले तक्रारीतील मजकुरच शपथपञ समजण्‍यात यावे, अशी पुरसिस दाखल केली आहे.

 

14.       अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले लेखी बयाण, कागदपञावरुन खालील मुद्दे उपस्थित होतात.

 

              मुद्दे                        :  उत्‍तर

 

(1)  अर्जदाराची तक्रार रेस-ज्‍युडीकेटाच्‍या (res-judicata) :  नाही.

     तरतुदी नुसार खारीज होण्‍यास पाञ आहे काय ?  

(2)  अर्जदार मृतक रामदास पांडूरंग गिरडकर याचे     :  होय.

     जीवन विमा पॉलिसीची रक्‍कम मिळण्‍यास पाञ

     आहे काय ?

(3) गैरअर्जदाराने, सेवा देण्‍यात ञृटी केली आहे काय ? :  होय.

(4) अर्जदाराची तक्रार मंजुर करण्‍यास पाञ आहे काय ?:  होय.

(5) या तक्रारीचा अंतिम निकाल काय ?         : अंतिम आदेशाप्रमाणे

                                                ... 9 ...

 

 

 

 

 

 

 

                        ... 9...

 

              // कारण मिमांसा //

 

मुद्दा क्रमांक 1 :-

 

15.       अर्जदाराने, गैरअर्जदाराचे विरुध्‍द या तक्रारीच्‍या पूर्वी मृतक रामदास पांडूरंग गिरडकर यांचे नावाने असलेल्‍या विमा पॉलिसीची रक्‍कम मिळण्‍याकरीता तक्रार क्र. 1/2007 दाखल केली होती.  त्‍यामध्‍ये, दिनांक 13/6/2007 ला तक्रार खारीज करण्‍यात आली.  गैरअर्जदार क्र. 1 ने या लेखी बयाणात असा मुद्दा उपस्थित केला की, पूर्वी दाखल केली तक्रार खारीज करण्‍यात आल्‍यामुळे, पुन्‍हा त्‍याचा कारणासाठी तक्रार दाखल केली असल्‍यामुळे खारीज होण्‍यास पाञ आहे.  परंतु, गैरअर्जदाराचे हे म्‍हणणे ग्राह्य धरण्‍यास पाञ नाही.  दिवाणी संहितेच्‍या कलम 11 नुसार गैरअर्जदार क्र. 1 ने आक्षेप घेतलेला आहे, परंतु अर्जदारानी दाखल केली तक्रार क्र. 1/2007 च्‍या आदेशामध्‍ये अर्जदारांना वारसान प्रमाणपञ प्राप्‍त झाल्‍यानंतर तक्रार दाखल करण्‍याची मुभा दिलेली आहे, त्‍यामुळे, त्‍याच कारणासाठी पुन्‍हा तक्रार दाखल करण्‍यात आली असली तरी, रेस ज्‍युडीकेटा होत नाही.  गैरअर्जदाराने, अर्जदार मृतक रामदास पांडूरंग गिरडकर चे वारसदार आहे किंवा नाही याबद्दलचा आक्षेप घेतल्‍यामुळेच पूर्वी दाखल केली तक्रार वारसान प्रमाणपञाचे आधारावर खारीज करण्‍यात आली.  अर्जदार हे बेनिफीसीयरी असल्‍यामुळे ते गैरअर्जदार क्र. 1 चे ग्राहक आहे.  गैरअर्जदारानी आपले लेखी बयाणासोबत तक्रार क्र. 1/2007 चा आदेशाची प्रत दाखल केली, तसेच अर्जदार  क्र. 1 व 2 यांचे नावाने रुपये 30,600/- चा चेक दिनांक 30/9/2006 ला तयार करण्‍यात आला असून, लेखी बयाणातील मजकुरानुसार अर्जदारांना देण्‍यात तयार असतांना, तो चेक अर्जदारांनी घेण्‍यास नकार दिला.  गैरअर्जदार क्र. 1 नी अर्जदार हे पूर्वीची तक्रार दाखल करण्‍याचे ही पूर्वी त्‍यांचे नावाने चेक तयार केल्‍यानंतरही मृतक रामदासचे वारसदार नाही, असा मुद्दा उपस्थित करणे संयुक्‍तीक वाटत नाही.

 

16.       अर्जदाराची प्रथम तक्रार खारीज झाल्‍यानंतर दिवाणी न्‍यायाधीश, कनिष्‍ठ स्‍तर, आरमोरी यांचे कोर्टातून M.J.C.(Succession) केस

                                                ... 10 ...

 

                        ... 10 ...

 

नं. 1/2007, दिनांक 7/8/2008 ला पारीत केला.  ते प्रमाणपञ पारीत झाल्‍यानंतर अर्जदारांनी सदरची तक्रार दाखल केली आहे.  त्‍यामुळे, दिवाणी संहितेच्‍या कलम 11 नुसार रेस ज्‍युडीकेटा होत नाही, असे या न्‍यायमंचाचे ठाम मत असल्‍यामुळे, अर्जदाराची तक्रार या कारणावरुन खारीज होण्‍यास पाञ नाही.

 

17.       अर्जदारांनी, तक्रारीसोबत विमा पॉलिसीची झेरॉक्‍स प्रत दाखल केली आहे.  त्‍याचे अवलोकन केले असता, सदर पॉलिसीत नॉमिनी म्हणून ‘इंदिरा’ हीचे नांव दर्ज आहे.  विमा धारक रामदास पांडूरंग गिरडकर ची, ‘इंदिरा’ ही पत्‍नी असून, ती सुध्‍दा दिनांक 24/2/2006 च्‍या अपघात मृत्‍यु पावली आहे, त्‍यामुळे मृतक रामदास पांडूरंग गिरडकर याचे वारस म्‍हणून अर्जदारांनी सदर तक्रार दाखल केली असल्‍यामुळे, व गैरअर्जदार क्र. 2 व 3 नी वारसानाबाबत कुठलाही आक्षेप घेतला नसल्‍यामुळे, गैरअर्जदार क्र. 1 चा रेस ज्‍युडीकेटाचा (res-judicata) आक्षेप मान्‍य करण्‍यास पाञ नाही, असे या न्‍यायमंचाचे ठाम मत असल्‍यामुळे, मुद्दा क्र. 1 चे उत्‍तर नकारार्थी देण्‍यात येत आहे.

 

मुद्दा क्रमांक 2 ते 4 :-

 

18.       अर्जदार व गैरअर्जदार यांच्‍यात मृतक रामदास पांडूरंग गिरडकर हे प्राथमिक शिक्षक, भाडभिडी येथे जिल्‍हा परिषद अंतर्गत प्राथमिक शाळेत कार्यरत होते व त्‍यांनी त्‍याचे हयातीत 4 विमा पॉलिस्‍या काढल्‍या होत्‍या, याबद्दल वाद नाही.  गैरअर्जदार क्र. 1 ने आपले लेखी बयाणात व तोंडी युक्‍तीवादात असा मुद्दा उपस्थित केला की, मृतक रामदास च्‍या जीवन पॉलिसी क्र. 972899286 आणि पॉलिसी क्र. 972844895 या पॉलिसीचे 4 वर्षे 6 महिने झाले असून त्‍याच्‍या विमा प्रिमियमची रक्‍कम गैरअर्जदार क्र. 3 ने जमा न केल्‍याने बंद झाली असल्‍यामुळे, त्‍याचे विमा धन, अर्जदार मिळण्‍यास पाञ नाही.  परंतु, सदर पॉलिसीच्‍या जमा झालेल्‍या किस्‍तीची रक्‍कम परत करण्‍याबाबत गैरअर्जदार क्र. 1 ने चेक अर्जदारांना दिला होता, परंतु तो अर्जदारांनी घेण्‍यास नकार दिला होता.  अर्जदाराच्‍या तक्रारीनुसार

                                                ... 11 ...

 

                        ... 11 ...

 

 

अर्जदाराचे वडिल हे शिक्षक असून विमा पॉलिसी प्रिमियम गैरअर्जदार क्र. 3 व्‍दारे पगारा‍तून कपात करण्‍यात येत होते.  विमा प्रिमियमची रक्‍कम कपात करण्‍याची जबाबदारी गैरअर्जदार क्र. 3 ची असून, त्‍यांनी गैरअर्जदार क्र. 1 ला तशी हमी देवून सुध्‍दा अर्जदाराचे वडिलांचे प्रिमियमची रक्‍कम कपात केली नाही, ही गैरअर्जदार क्र. 3 ची सेवेतील न्‍युनता असून, त्‍याकरीता गैरअर्जदार क्र. 3 जबाबदार आहे.  गैरअर्जदार क्र. 3 हा गैरअर्जदार क्र. 1 चा एजंट म्‍हणून काम करतो, त्‍यामुळे गैरअर्जदार क्र. 1 व 3 जबाबदार आहे, असे या न्‍यायमंचाचे मत आहे.  गैरअर्जदार क्र. 3 ने आपल्‍या लेखी बयाणासोबत दस्‍ताऐवज दाखल केले, त्‍या दस्‍ताऐवजाचे अवलोकन केले असता निशाणी 22 ब-5 वर एल.पी.सी. (अंतिम वेतन प्रमाणपञ) दाखल केले आहे.  त्‍यानुसार, मे-2005 च्‍या वेतनातून पॉलिसी 972899286 रुपये 385/-, 972844895 रुपये 530/- आणि 973136612 रुपये 256/- असे एकंदरीत रुपये 1171/- कपात केल्‍याचे स्‍पष्‍टपणे नमुद केले आहे.  त्‍यासोबत पॉलिसी क्र. 973399899 रुपये 1726/- मार्च-05 पासून कपात करावयाची आहे, असे नमुद आहे.  सदर अंतिम वेतन प्रमाणपञ पंचायत समिती मुलचेरा यांनी दिला असून, मृतक रामदास गिरडकर यांची बदली पंचायत समिती चामोर्शी अंतर्गत भाडभिडी येथे झाली व त्‍यानंतरची वेतन काढण्‍याची व कपात करण्‍याची जबाबदारी ही गैरअर्जदार क्र. 3 ची होती.  परंतु, गैरअर्जदार क्र. 3 ने मृतकाच्‍या पॉलिसीच्‍या रकमा कपात करुन गैरअर्जदार क्र. 1 कडे पाठविले नाही, असे दाखल दस्‍ताऐवजा वरुन दिसून येते.  त्‍यामुळे, विमा धारकाच्‍या विमा पॉलिसी बंद झाल्‍या, यात गैरअर्जदार क्र. 3 ची सेवेत निष्‍काळजीपणा असल्‍याची बाब सिध्‍द होतो.

19.       गैरअर्जदार क्र. 3 ने आपले लेखी बयाणात असे नमुद केले की, मृतक रामदास गिरडकर यांनी दिनांक 5/8/2005 ला दिलेल्‍या अर्जा नुसार विमा प्रि‍मियमची रक्‍कम कपात करण्‍यात आली नाही, त्‍याबाबत दिलेला विनंती अर्ज निशाणी 22 नुसार दाखल केली आहे.  सदर पञाचे अवलोकन केले असता, पॉलिसी क्र. 973399899 चे प्रिमियम रुपये 1726/- ऑगष्‍ट-05 च्‍या वेतनातून कपात करण्‍यात यावी असे गैरअर्जदार क्र. 3 ला

                                                ... 12 ...

 

                        ... 12 ...

 

कळविले असल्‍याचे स्‍पष्‍टपणे दिसून येते.  सदर पञात उर्वरीत 3 विमा पॉलिसीचे प्रिमियम कपात करु नये असा कुठलाही उल्‍लेख नाही, तरी गैरअर्जदार क्र. 3 ने मृतकाच्‍या वेतनातून उर्वरीत 3 विमा पॉलिसीची रक्‍कम कपात न केल्‍यामुळेच विमा पॉलिसी बंद पडले असल्‍याचे स्‍पष्‍टपणे दिसून येते.  त्‍यामुळे, गैरअर्जदार क्र. 3 हाच अर्जदाराच्‍या विमा पॉलिसीची विमा धन रुपये 1,25,000/- व्‍याजासह देण्‍यास जबाबदार आहे, असे या न्‍यायमंचाचे ठाम मत आहे.

 

20.       गैरअर्जदार क्र. 1 कडे विमा पॉलिसी क्र. 973399899 चे जुन व जुलै-05 महिन्‍याची किस्‍त संपूर्ण प्रिमियमची रक्‍कम वगळता बाकी प्रिमियम नियमितपणे जानेवारी-06 पर्यंत भरणा केलेला आहे.  त्‍यामुळे, सदर पॉलिसीचे पूर्ण लाभ गैरअर्जदार क्र. 1 कडून मिळण्‍यास अर्जदार पाञ आहे, असे या न्‍यायमंचाचे मत आहे.  सदर मिळणा-या लाभातून थकीत जुन व जुलै-05 ची रक्‍कम कपात करुन पूर्ण लाभ गैरअर्जदार क्र. 1 यांनी अर्जदारांना देणे आवश्‍यक होते.  परंतु, गैरअर्जदाराने ती पॉलिसी नियमितपणे चालु असून सुध्‍दा,  अजुनपर्यंत त्‍याचा लाभ अर्जदारांना दिला नाही.  जेंव्‍हा की, अर्जदारांनी त्‍याचे वडिलाचे मृत्‍यु बाबतची सुचना गैरअर्जदार क्र. 1 ला दिली.  अर्जदारांनी ग्राहक तक्रार क्र. 1/2007 दाखल केली, ती तक्रार निकाली निघाल्‍यानंतरही अर्जदारांना लाभ दिला नसल्‍याचे दिसून येत असल्‍यामुळे गैरअर्जदार क्र. 1 यांनी सेवा देण्‍यात ञृटी केली आहे, असे या न्‍यायमंचाचे ठाम मत आहे.  गैरअर्जदार क्र. 1 ने आपले लेखी बयाणात असा मुद्दा उपस्थित केला की, अर्जदाराने क्‍लेम फार्म अजुनपर्यंत सादर केला नाही असे म्‍हटले आहे.  परंतु, अजुनपर्यंत क्‍लेम फार्म दिला नाही याबाबतचा मागणी पञ किंवा केलेल्‍या पञ व्‍यवहाराची कुठलीही प्रत गैरअर्जदार क्र. 1 ने दाखल केलेली नाही.  अर्जदाराने, विमा दावा फार्म भरुन दिला नाही, तरी सुध्‍दा 30/9/2006 ला अर्जदाराच्‍या नावाने चेक कसा तयार करुन दिला हे स्‍पष्‍ट होत नाही, यावरुन गैरअर्जदार क्र. 1 चे म्‍हणणे संयुक्‍तीक वाटत नाही.

 

21.       गैरअर्जदार क्र. 1 ने आपले लेखी बयाणासोबत दस्‍त दाखल

                                                ... 13 ...

 

                        ... 13 ...

 

 

केला, त्‍यात पॉलिसी क्र. 972844895 च्‍या बाबत 16/6/06 ला केलेल्‍या हिशोबाची प्रत दाखल केली आहे.  त्‍यानुसार अर्जदारांना रुपये 13,600/- चा चेक 30/9/06 ला तयार केलेल्‍या चेकची झेरॉक्‍स दाखल केली आहे, परंतु, सदर हिशोब संयुक्‍तीक नाही.  गैरअर्जदार क्र. 1 ने 972899286 च्‍या काढलेल्‍या हिशोबा नुसार 972844895 चा हिशोब चुकीचा असल्‍याचे दिसून येते.  गैरअर्जदार क्र. 3 ने दाखल केलेल्‍या अंतिम वेतन प्रमाणपञातील पॉलिसीचा क्रमांक सुध्‍दा बरोबर जुळत नाही.  पंचायत समिती, मुलचेरा यांनी प्रिमियमची कपात केली, परंतु गैरअर्जदार क्र. 3 ने त्‍यानंतर एकाच विमा पॉलिसीची कपात करुन, उर्वरीत पॉलिसीची रक्‍कम कपात केली नाही.  गैरअर्जदार क्र. 1 ला गैरअर्जदार क्र. 3 कडून विमा पॉलिसीची रक्‍कम प्राप्‍त झाली नाही.  त्‍यामुळे, विमा पॉलिसी बंद पडली,  या आशयाचा पञ व्‍यवहार गैरअर्जदार क्र. 3 गट शिक्षणाधिकारी चामोर्शी किंवा रामदास गिरडकर यांचेशी पञ व्‍यवहार केल्‍याचा कुठलाही पुरावा दाखल केला नाही.  गैरअर्जदार क्र. 1 ने गैरअर्जदार क्र. 3 च्‍या कार्यास अप्रत्‍यक्ष मदत केल्‍याचे स्‍पष्‍टपणे दिसून येते.  त्‍यामुळे, गैरअर्जदार क्र. 1 व 3 हे जबाबदार आहेत.  मा. राजस्‍थान राज्‍य ग्राहक तक्रार निवारण आयोग, जयपूर यांनी, लाईफ इन्‍श्‍युरन्‍स कार्पोरेशन ऑफ इंडिया व इतर –विरुध्‍द – मेमो खातून, या प्रकरणात आपले मत दिले आहे ते या प्रकरणाला तंतोतंत लागू पडतो.  त्‍यातील महत्‍वाचा भाग खालीलप्रमाणे.

 

(i)  Consumer Protection Act, 1986 --- Section 2(1)(g), 15 – Life Insurance – Money Back Policy – Salary Saving Scheme – Policy lapsed – Non-deduction of premium from salary – Premium paid by employer after death of insured – Claim repudiated – Employer being agent of Insurance Company, liability cannot be absolved—Repudiation unjustified – Insurer and employer jointly liable to pay insured amount along with interest.

 

Life Insurance Corporation of India & Anr.

-V/s.-

Memo Khatoon

II (2008) CPJ 358

 

          *****                    ******                      *****                    *****

                                                ... 14 ...

                        ... 14 ...

 

22.       वरील न्‍यायनिवाडयातील पॅरिच्‍छेद 13 मध्‍ये, आदरणीय सर्वोच्‍च न्‍यायालयाने, चेअरमन, लाईफ इन्‍शुरन्‍स कार्पोरेशन व इतर –विरुध्‍द – राजीव कुमार भास्‍कर, या प्रकरणातील भाग नमुद केला आहे.  त्‍यात दिलेले मत या प्रकरणाला तंतोतंत लागू पडतो.  परिच्‍छेद 13 तील भाग खालीलप्रमाणे.

 

13.     In Chairman, Life Insurance Corporation and Other v. Rajiv Kumar Bhasker, V (2005) SLT 567=III (2005) CLT 144 (SC)=2005 (2) WLC (SC) Civil 309, the Hon’ble Supreme Court has clearly observed that under  salary saving scheme floated by Life Insurance Corporation of  India, position  of employer is that of agent and in case employer fails to deduct premium from salary of concerned employee and death of employee had taken place, the insurer (Insurance Company) was not discharged of its obligation as under the terms of the policy, insurer and employer both are jointly liable to pay insurance amount to heirs of deceased.

 

          *****                    ******                  ******                     ******

 

 

23.       गैरअर्जदार क्र. 2 ने लेखी बयाण निशाणी 8 वर दाखल केले आहे.  त्‍यात जीवन विमा पॉलिसीची रकमाची कपात करण्‍याची पूर्ण जबाबदारी संवर्ग गट शिक्षणाधिकारी व पंचायत समिती चामोर्शी यांची आहे.  त्‍यामुळे, गैरअर्जदार क्र. 2 चा या प्रकरणाशी संबंध नसल्‍यामुळे त्‍याचे विरुध्‍द तक्रार खारीज होण्‍यास पाञ आहे, असे या न्‍यायमंचाचे मत आहे.

 

24.       अर्जदारांनी आपले तक्रारीत विमा मुल्‍य रुपये 4,75,000/- ची मागणी केली आहे.  तसेच, तक्रारीत मृत्‍युची तारीखही चुकीची नमुद केली आहे.  परंतु, दाखल दस्‍ताऐवजावरुन रामदास पांडूरंग गिरडकर याचा मृत्‍यु 24/2/2006 ला झाला असून विमा मुल्‍य रुपये 2,75,000/- दाखल पॉलिसीवरुन दिसून येते.  अर्जदारांनी तक्रार क्र. 1/2007 मध्‍येही चारही विमा पॉलिसीची रक्‍कम रुपये 2,75,000/- ची मागणी केली होती.  परंतु, या तक्रारीत रुपये 4,75,000/- ची मागणी केली आहे, ती पूर्णपणे मंजुर करण्‍यास पाञ नाही.

                                                ... 15 ...

 

 

                        ... 15 ...

 

 

25.       अर्जदारांचे आई, वडिल व भाऊ अपघातात मरण पावले, त्‍यामुळे त्‍यांच्‍या उत्‍पन्‍नाचे कुठलेही साधन नसल्‍याचे दिसून येते, तरी गैरअर्जदार क्र. 1 ने विमा पॉलिसीची रक्‍कम दिली नाही, तसेच गैरअर्जदार क्र. 3 ने सहकार्य केले नाही. त्‍यामुळे, अर्जदारांना मानसीक, शारीरीक ञास सहन करावा लागला असल्‍याने, त्‍याबद्दल नुकसानभरपाई मिळण्‍यास पाञ आहे, असे या न्‍यायमंचाचे मत आहे. 

 

26.       वरील विवेचनावरुन गैरअर्जदार क्र. 1 व 3 ने सेवा देण्‍यात ञृटी केली असल्‍याचे सिध्‍द होत असल्‍यामुळे अर्जदाराची तक्रार मंजुर करण्‍यास पाञ आहे, या निर्णयाप्रत हे न्‍यायमंच आले असल्‍यामुळे, मुद्दा क्र. 2 ते 4 चे उत्‍तर होकारार्थी देण्‍यात येत आहे. 

                                                 

मुद्दा क्रमांक 5 :-

 

27.       वरील मुद्दा क्र. 1 ते 4 चे विवेचनावरुन अर्जदाराची तक्रार मंजुर करुन, खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

 

              // अंतिम आदेश //

 

(1)  अर्जदाराची तक्रार अंशतः मंजुर.

(2)  गैरअर्जदार क्र.1 व 3 ने वैयक्‍तीकरित्‍या किंवा संयुक्‍तीकरित्‍या

पॉलिसी क्रमांक 972899286 रुपये 50,000/-, 972844895 रुपये 50,000/-, 973136612 रुपये 25,000/- चे रक्‍कम तक्रार दाखल दिनांक 18/11/2008 पासून द.सा.द.शे. 9 %  टक्‍के व्‍याजाने, आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍यापासून 30 दिवसांचे आंत द्यावे.

(3)  गैरअर्जदार क्र. 1 ने पॉलिसी क्र. 973399899 चे विमा धन रुपये

1,50,000/- तक्रार दाखल दिनांक 18/11/2008 पासून 9 %  टक्‍के व्‍याजाने, आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍यापासून 30 दिवसांचे आंत द्यावे.

 

                                           ... 16 ...

 

 

 

                      ... 16 ...

 

(4)  गैरअर्जदार क्र. 1 ने, मानसिक, शारीरीक ञासापोटी रुपये 5,000/- व

गैरअर्जदार क्र. 3 ने रुपये 10,000/-, तसेच तक्रारीचा खर्च म्‍हणून गैरअर्जदार क्र. 1 ने रुपये 2,000/- व गैरअर्जदार क्र. 3 ने रुपये 3,000/- आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍यापासून 30 दिवसांचे आंत द्यावे.

(5)  गैरअर्जदार क्र. 2 चे विरुध्‍द तक्रार खारीज.

(6)  उभयतांना आदेशाची प्रत देण्‍यात यावी.

 

गडचिरोली.

दिनांक :9/4/2009.

 
 
[HONORABLE Shri. A. N. Kamble]
PRESIDENT
 
[HONORABLE Shri. R. L. Bombidwar]
Member
 
[HONORABLE Smt. M. J. Bhilkar]
Member

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.