Maharashtra

Kolhapur

CC/17/176

Namrata Nitin Mug - Complainant(s)

Versus

Branch Manager,United India Insu.Co.Ltd. - Opp.Party(s)

R.N.Powar

28 Feb 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION,KOLHAPUR
Central Administrative Building, Second Floor,
South Side, Kasaba Bawada Road, Kolhapur.
Phone No. (0231) 2651327, Fax No. (0231) 2651327
.
 
Complaint Case No. CC/17/176
( Date of Filing : 06 May 2017 )
 
1. Namrata Nitin Mug
796/C,Shahu Garden Road,Kumbhar Galli,Bajargate,
Kolhapur
...........Complainant(s)
Versus
1. Branch Manager,United India Insu.Co.Ltd.
Divisional Office No.1,Rajrshi Shahu Sadan,Station Road,
Kolhapur
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. Savita P. Bhosale PRESIDENT
 HON'BLE MRS. Rupali D. Ghatage MEMBER
 HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 28 Feb 2022
Final Order / Judgement

न्‍या य नि र्ण य

(व्‍दाराः- मा. सौ. रुपाली धै. घाटगे, सदस्‍या)

 

1.     तक्रारदाराने प्रस्‍तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे.  तक्रार अर्जातील थोडक्‍यात कथन पुढीलप्रमाणे—

  

      तक्रारदार यांचे मालकीची इंडिका कार क्र. एमएच-09-बीएक्‍स-9572 असून तिचा विमा वि.प. विमा कंपनीकडे उतरविला आहे.  सदर पॉलिसीचा नंबर 1605003115P112729129 असा असून कालावधी दि. 22/01/2016 ते 21/01/2017 असा होता.  दि. 29/3/2018 रोजी सदर कारला अपघात होवून कारचे नुकसान झाले. सदरच्‍या अपघातात कोणतीही जखमी झाले नसल्‍याने तक्रारदाराने पोलिस स्‍टेशनला खबर दिली नाही.  तक्रारदार यांनी सदरची गाडी अपघातस्‍थळावरुन देसाई मोटार्स प्रा.लि. यांचेकडे नेली.  देसाई मोटर्स यांनी रु. 5,57,914/- इतके इस्टिमेट दुरुस्‍तीचे खर्चापोटी दिले.  तदनंतर तक्रारदार यांनी याबाबत विमा कंपनीला कळविले.  त्‍यानंतर वि.प. कंपनीने इन्‍व्‍हेस्‍टीगेटर नेमला.  त्‍याने संजय आनंदा पाटील यांच्‍यावर दबाव आणून जबाब घेतला की, अपघाताचे वेळेस तो गाडी चालवित नव्‍हता व तक्रारदार यांनी आपसातील तक्रारीमुळे त्‍याचे मूळ लायसेन्‍स काढून घेतले आहे.  वरीलप्रमाणे त्रुटी दाखवून वि.प. यांनी तक्रारदाराचा क्‍लेम नामंजूर केला.   सत्‍य परिस्थिती अशी आहे की, संजय आनंदा पाटील हाच अपघातावेळी वाहन चालवित होता. अशा प्रकारे वि.प. यांनी सेवेत त्रुटी केल्‍याने प्रस्‍तुतची तक्रार तक्रारदाराने दाखल केली आहे.  सबब, तक्रारदारास वि.प. यांचेकडून क्‍लेमची रक्‍कम रु.2,75,000/-, सदर रकमेवर द.सा.द.शे. 12 टक्‍के प्रमाणे व्‍याज, मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.20,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रु.10,000/- देणेचा आदेश वि.प. यांना व्‍हावा अशी मागणी तक्रारदाराने केली आहे. 

 

2.    तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्‍हीट, कागदयादी सोबत विमा पॉलिसी, त्रुटी पत्र, इस्टिमेट, ड्रायव्‍हींग लायसेन्‍स इ. कागदपत्रे दाखल केली आहेत.  तसेच तक्रारदाराने पुराव्‍याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.

 

3.    वि.प. यांनी याकामी दि.11/07/17 रोजी तक्रारदाराचे तक्रारअर्जास म्‍हणणे दाखल केले असून तक्रारदाराची तक्रार परिच्‍छेदनिहाय नाकारली आहे.  सदरचे अपघाताची चौकशी करणेसाठी तसेच सदर वाहनावरील ड्रायव्‍हरचा अस्‍सलपणा पाहणेकरिता वि.प. यांनी अनिल झाझगे यांची इनव्‍हेस्‍टीगेटर म्‍हणून नेमणूक केली होती. सदरचे चौकशीवेळी सदरचे अपघाताची व नुकसान भरपाईची पोलस स्‍टेशनला नोंद केलेली नाही असे दिसून आले.  मालमत्‍तेला नुकसान झालेस पोलिस स्‍टेशनमध्‍ये तक्रार/माहिती देणे बंधनकारक आहे.  जेव्‍हा इन्‍व्‍हेस्‍टीगेटर यांनी सदरचे वाहनावरील ड्रायव्‍हर संजय आनंदा पाटील यांना भेटण्‍याचा प्रयत्‍न केला, तेव्‍हा त्‍यांनी इन्‍व्‍हेस्‍टीगेटर यांना भेटण्‍याचे टाळले.  तथापि, अखेर सदर ड्रायव्‍हरना भेटले असता, सदर ड्रायव्‍हर यांनी तक्रारदार यांचेकडील नोकरी डिसेंबर 2016 मध्‍ये सोडलेली असून जानेवारी 2017 मध्‍ये सदर ड्रायव्‍हर तक्रारदार यांचेकडे कामासाठी नव्‍हते.  सदर ड्रायव्‍हर तक्रारदार यांचेकडे कामाला होते, तेव्‍हा कोणताही अपघात झालेला नाही.  सदरचा अपघात झाला तेव्‍हा सदरचे वाहन ड्रायव्हर चालवित नव्‍हते.  जरी संजय आनंदा पाटील यांनी तक्रारदार यांचे काम सोडले होते तरी ड्रायव्‍हर संजय आनंदा पाटील यांचे मूळ लायसेन्‍स तक्रारदार यांनी सिक्‍युरिटीपोटी जमा केलेले होते.  ता. 21/1/2017 रोजी सदरचे मूळ लायसेन्‍स तक्रारदार यांनी संजय आनंदा पाटील यांना दिले.  त्‍याअनुषंगाने संजय आनंदा पाटील यांनी वि.प. कंपनीचे इन्‍व्‍हेस्‍टीगेटर यांचेकडे पुरावा शपथपत्र दिले आहे. सबब, संजय आनंदा पाटील अपघात समयी सदर वाहनावर ड्रायव्‍हर नसताना देखील तक्रारदार यांनी वि.प. यांची दिशाभूल करुन चुकीचे पध्‍दतीने सदरचे क्‍लेमची मागणी केलेली असलेने तक्रारदार हे सदरचा क्‍लेम मिळणेस अपात्र आहेत.  वि.प. यांनी त्‍यांचे कोणत्‍याही हक्‍कास बाधा न येता, वि.प.यांचे गव्‍हर्मेंट सर्व्‍हेअर प्रशांत पाटील यांनी दाखल केलेल्‍या सर्व्‍हेप्रमाणे सदरचे वाहनाची सॅल्‍वेज व्‍हॅल्‍यू रु. 75,000/- सदरची रक्‍कम वजा करुन आणि compulsory excess Rs.10,000/- वजा जाता रक्‍कम रु. 1,99,000/- पेक्षा जास्‍त जबाबदारी वि.प. यांचेवर रहात नाही असे म्‍हणणे दाखल केले आहे.  सबब, वि.प. विमा कंपनीने कोणतीही त्रुटी न दिल्‍याने तक्रारअर्ज खर्चासह नामंजूर करण्‍यात यावा अशी मागणी वि.प. यांनी केली आहे.

 

4.    वि.प. यांनी याकामी सर्व्‍हेअरचा रिपोर्ट, इनव्‍हेस्‍टीगेटरचा अहवाल तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.

 

5.   तक्रारदारांचा तक्रारअर्ज, वि.प. यांचे म्‍हणणे, दाखल केलेली अनुषंगिक कागदपत्रे, तक्रारदाराचे व वि.प. यांचे पुराव्‍याचे शपथपत्र, लेखी युक्तिवाद यांचा विचार करता निष्‍कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.

 

अ. क्र.

                मुद्दा

उत्‍तरे

1

तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत काय ?

होय.

2

वि.प. यांनी तक्रारदाराला द्यावयाच्‍या सेवेत त्रुटी केली आहे काय ?     

होय.

3

तक्रारदार हे विमा रक्‍कम मिळणेस पात्र आहेत काय ?

होय.

4

तक्रारदार हे मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्‍कम मिळणेस पात्र आहेत काय ?

होय.

5

अंतिम आदेश काय ?

अंशतः मंजूर.

 

 

कारणमिमांसा

 

मुद्दा क्र. 1

 

6.    प्रस्‍तुतकामी तक्रारदार यांचे मालकीची इंडिका कार क्र. एमएच-09-बीएक्‍स-9572 असून तिचा विमा वि.प. विमा कंपनीकडे उतरविला आहे त्‍याचा पॉलिसी क्र. 1605003115P112729129 असून कालावधी दि. 22/01/2016 ते 21/01/2017 असा आहे.  तक्रारदार यांनी कारची पॅकेज पॉलिसी उतरविली आहे.  प्रस्‍तुतकामी तक्रारदाराने वि.प. विमा कंपनीची विमा पॉलिसीची प्रत दाखल केली आहे. सदरची पॉलिसी व तिचा कालावधी वि.प. यांनी नाकारलेला नाही.  त्‍या कारणाने तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत.  सबब, मुद्दा क्र.1 चे उत्‍तर होकारार्थी दिले आहे.

 

7.    उपरोक्‍त मुद्दा क्र.1 मधील विस्‍तृत विवेचनाचा विचार करता तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत.  ता.17/1/2017 रोजी तक्रारदार यांची गाडी श्री संजय आनंदा पाटील हे कोल्‍हापूर ते मलकापूर रोडवर बोरपाडळेजवळ गाडी समोर अचानक मनुष्‍य आल्‍याने त्‍याला चुकविण्‍यासाठी गाडी रस्‍त्‍याच्‍या बाजूला घेत असताना गाडी रस्‍ता सोडून खाली गेली व पलटी झाली.  सदरचे अपघातामध्‍ये कोणीही जखमी झाले नसल्‍याने पोलिस स्‍टेशनला खबर दिली नाही. तथापि कारचे संपूर्ण नुकसान झाले.  तक्रारदार यांनी वि.प. कंपनीकडे क्‍लेम फॉर्म भरुन दिलेनंतर वि.प. विमा कंपनीने इनव्‍हेस्‍टीगेटर नेमला.  सदर इन्‍व्‍हेस्‍टीगेटर यांनी श्री संजय आनंदा पाटील यांच्‍यावर दबाव आणून दिशाभूल करुन नोटराईज्‍ड जबाब घेतला.  अपघात वेळेस तो गाडी चालवत नव्‍हता व तक्रारदार यांनी आपसातील तक्रारीमध्‍ये त्‍याचे मूळ लायसेन्‍स काढून घेतले आहे.  सबब, इन्‍व्‍हेस्‍टीगेटर यांचे अहवालावरुन वि.प. यांनी तक्रारदारांचा क्‍लेम नामंजूर करुन तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली का ? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो.  सदरचे मुद्याचे अनुषंगाने दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता तक्रारदारांनी तक्रारीसोबत पॉलिसी, वि.प. यांनी पॉलिसी नाकारलेचे पत्र, देसाई मोटार्स यांचेकडील अपघातग्रस्‍त वाहनाचे इस्टिमेट, सदर वाहनावरील ड्रायव्‍हर यांचे ड्रायव्‍हींग लायसेन्‍स इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. 

 

8.    वि.प. यांनी दि. 11/7/2017 रोजी म्‍हणणे दाखल करुन तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. सदरचे अपघाताची चौकशी करणेसाठी तसेच सदर वाहनावरील ड्रायव्‍हरचा अस्‍सलपणा पाहणेकरिता वि.प. यांनी अनिल झाझगे यांची इनव्‍हेस्‍टीगेटर म्‍हणून नेमणूक केली होती. सदरचे चौकशीवेळी सदरचे अपघाताची व नुकसान भरपाईची पोलीस स्‍टेशनला नोंद केलेली नाही असे दिसून आले.  मालमत्‍तेला नुकसान झालेस पोलिस स्‍टेशनमध्‍ये तक्रार/माहिती देणे बंधनकारक आहे.  सदर इन्‍व्‍हेस्‍टीगेटर ड्रायव्‍हरना भेटले असता, सदर ड्रायव्‍हर यांनी तक्रारदार यांचेकडील नोकरी डिसेंबर 2016 मध्‍ये सोडलेली असून जानेवारी 2017 मध्‍ये सदर ड्रायव्‍हर तक्रारदार यांचेकडे कामासाठी नव्‍हते.  सदर ड्रायव्‍हर तक्रारदार यांचेकडे कामाला होते, तेव्‍हा कोणताही अपघात झालेला नाही.  सदरचा अपघात झाला तेव्‍हा सदरचे वाहन ड्रायव्हर चालवित नव्‍हते.  जरी संजय आनंदा पाटील यांनी तक्रारदार यांचे काम सोडले होते तरी ड्रायव्‍हर संजय आनंदा पाटील यांचे मूळ लायसेन्‍स तक्रारदार यांनी सिक्‍युरिटीपोटी जमा केलेले होते.  ता. 21/1/2017 रोजी सदरचे मूळ लायसेन्‍स तक्रारदार यांनी संजय आनंदा पाटील यांना दिले.  त्‍याअनुषंगाने संजय आनंदा पाटील यांनी वि.प. कंपनीचे इन्‍व्‍हेस्‍टीगेटर यांचेकडे पुरावा शपथपत्र दिले आहे. सबब, संजय आनंदा पाटील अपघात समयी सदर वाहनावर ड्रायव्‍हर नसताना देखील तक्रारदार यांनी वि.प. यांची दिशाभूल करुन चुकीचे पध्‍दतीने सदरचे क्‍लेमची मागणी केलेली असलेने तक्रारदार हे सदरचा क्‍लेम मिळणेस अपात्र आहेत असे वि.प. यांचे कथन आहे. वि.प. यांनी ता. 1/11/2018 रोजी पुराव्‍याचे शपथपत्र दाखल केले  तसेच दि. 20/3/2017 रोजीचा वि.प. कंपनीचा इन्‍व्‍हेस्‍टीगेटर यांचा रिपोर्ट, ड्रायव्‍हर श्री संजय आनंदा पाटील यांचे ता. 3/3/2017 रोजीचे नोटरी अॅफिडेव्‍हीट दाखल केलेले आहे.  सदर ड्रायव्‍हरचे लायसेन्‍सची झेरॉक्‍स प्रत दाखल केलेली आहे.  तसेच दावा फॉर्मची प्रत दाखल केलेली आहे. 

 

9.    सदरचे इनव्‍हेस्‍टीगेटर यांनी आपल्‍या रिपोर्टमध्‍ये नमूद केले आहे की, सदरचे ड्रायव्‍हर सोबत ता. 14/2/2017 रोजी पासून संपर्कात येणेसाठी वारंवार फोन केला.   परंतु ता. 2/3/2017 पर्यंत सदरचा ड्रायव्‍हर श्री संजय आनंदा पाटील भेटू शकला नाही व अचानकपणे ता. 2/3/2017 रोजी इनव्‍हेस्‍टीगेटर यांची भेट घेतली.  सदरचा ड्रायव्‍हर तक्रारदार यांचेकडे डिसेंबर 2016 मध्‍ये काम करत होते.  नोकरी करणेपूर्वी ड्रायव्‍हींग लायसेन्‍स तक्रारदार यांनी जमा करुन घेतले असे सदर इनव्‍हेस्‍टीगेटर रिपोर्टमध्‍ये नमूद केले आहे. 

 

10.   सदर ड्रायव्‍हर श्री संजय आनंदा पाटील यांचे नोटरी पुराव्‍याचे शपथपत्राचे अवलोकन करता “ नोकरी करीत असताना माझे व गाडी मालक यांचे दरम्‍यान कामाचे कारणावरुन मतभेद होत गेले. मी लगेच साधारण तीन आठवडयांपासून काम बंद केले.  गाडी मालक यांचेकडे जाणे बंद केले होते.  ता. 19/12/2016 नंतर मी वाहन चालविणेचे कामी कधीही हजर नव्‍हतो व नाही. ”  सदरचे कारणांचा विचार करता ड्रायव्‍हर व मालक यांचेमध्‍ये मतभेद झालेची बाब निदर्शनास येते. त्‍या कारणाने ड्रायव्‍हरने सदरची कथने तक्रारदारांशी मतभेद झालेमुळे केल्‍याची बाब ही आयोगास नाकारता येत नाही.  सदरचे वाहन ड्रायव्‍हर संजय पाटील चालवित नव्‍हता ही बाब सदरचे ड्रायव्‍हर यांनी आयोगास अॅफिडेव्‍हीटरवर सांगितलेली नाही.  प्रस्‍तुतकामी तक्रारदार यांनी दाखल केलेल्‍या पुढील न्‍यायनिवाडयाचा आधार हे आयोग घेत आहे.

           III (2000) CPJ 480, Appeal No. 15009 of 1997 S.C. decided on 18/09/2000

            National Insurance Co.Ltd.   Vs. Munnilal Yadav

 

            Consumer Protection Act 1986 – Section 15 – Appeal – Insurance – Report of Investigator – Insurance claim made – Approved by Surveyor – Opposite party appointed investigation – Rapudiated claim on the basis of his report – Complaint – Allowed – Appeal – No necessity shown to appoint investigator – Report not supported by any evidence – Worthless piece of paper cannot be relied upon.

 

11.   प्रस्‍तुतकामी तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडे वादातील वाहनाचा विमा प्रायव्‍हेट कार पॉलिसी अंतर्गत उतरविलेला होता.  सदरचे वाहनाची आय.डी.व्‍ही. रक्‍कम रु. 2,75,000/- आहे.  वाहनाचे अपघात झालेल्‍या नुकसानीची दुरुस्‍ती/रिपेअरी करण्‍यासाठी तक्रारदार यांनी देसाई मोटार्स यांचेकडून रिपेअरी करुन घेवून झालेल्‍या खर्चापोटी प्रस्‍तुतकामी तक्रारीसोबत इस्टिमेट दाखल केलेले आहे. सदर इस्टिमेटमध्‍ये रु. 5,57,914/- इतका खर्च येईल असे इस्टिमेट दिले आहे.  सदरचे कारचे टोटल लॉस झाले असलेने तक्रारदारांनी आयोगामध्‍ये आय.डी.व्‍ही. प्रमाणे रु.2,75,000/- ची मागणी केली आहे.  तथापि सदरकामी वि.प. यांनी प्रशांत सर्व्‍हेअर यांचा ता. 7/2/17 या सर्व्‍हे रिपोर्ट दाखल केलेला आहे.  सदरचे सर्व्‍हे रिपोर्टचे अवलोकन करता

 

      Driver particulars

 

            Name of Driver - Sh. Sanjay Ananda Patil

            M.D.L. No. – MH 09 19980002199

            Net Excess loss on salvage loss – Rs.1,99,000

नमूद आहे.

 

12.   सबब, सदरचे सर्व्‍हे अहवालावरुन वि.प. यांचेकडून सदरचे वाहनाची नुकसान भरपाईची रक्‍कम रु.1,99,000/- असलेचे दिसून येते.  तक्रारदार यांनी सदरचे वाहनाचे अपघाताची नोंद पोलिस स्‍टेशनला दिली नाही. त्‍यामुळे सदरकामी सदरचे अपघाताचा पंचनामा दाखल नाही.  सबब, वरील सर्व बाबींचा व कागदपत्रांचा विचार करता तक्रारदार हे सदरचा क्‍लेम नॉन स्‍टँडर्ड बेसीस या तत्‍वाखाली मिळणेस पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे आयोग येत आहे.  त्‍याअनुषंगाने पुढील न्‍यायनिवाडयाचा आधार हे आयोग घेत आहे.

 

            1)  II (2010) CPJ (SC)

     Amalendu Sahoo   Vs.   Oriental Insurance Co.Ltd.

 

Insurance – Non-standard Settlement – Terms of policy violated – Vehicle insured for personal use, used on hire – Claim repudiated by insurer – Complaint dismissed by Consumer Forum – Order upheld in appeal – Revision against order dismissed – Civil appeal filed – Repudiation of claim in toto unjustified – Settlement of claim on non-standard basis directed.

 

            2)   National Insurance Co.Ltd.  Vs. Nitin Khandelwal

(2008) CPJ (SC)

 

The appellant insurance company liable to indemnify the owner of vehicle when the insurer obtain comprehensive policy for the loss caused to the insurer. The Respondent submitted that even assuming that there was a breach of conditions of insurance policy, the appellant insurance company ought to have settled the claim on non-standard basis.

 

सबब, वि.प. यांनी तक्रारदारांचा क्‍लेम पूर्णपणे नाकारुन तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे या निष्‍कर्षाप्रत हे आयोग येत आहे.  सबब, मुद्दा क्र.2 चे उत्‍तर हे आयोग होकारार्थी देत आहे.

 

मुद्दा क्र.3

 

13.   उपरोक्‍त मुद्दा क्र.2 मधील विस्‍तृत विवेचनाचा विचार करता वि.प. यांनी तक्रारदार यांचा संपूर्ण विमा क्‍लेम नाकारुन तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे. त्‍या कारणाने तक्रारदार हे वि.प. यांचेकडून सदरचे विमाक्‍लेमची वाहनाचे नुकसानीची रक्‍कम रु. 1,99,000/- चे 75 टक्‍के रक्‍कम नॉन स्‍टँडर्ड तत्‍वाप्रमाणे मिळणेस पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे आयोग येत आहे.  सबब, मुद्दा क्र.3 चे उत्‍तर हे आयोग होकारार्थी देत आहे.

 

मुद्दा क्र.4

 

14.   उपरोक्‍त मुद्दा क्र.1 ते 3 मधील विवेचनाचा विचार करता, वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेने तक्रारदार यांना मा‍नसिक त्रास झाला व सदरची तक्रार आयोगात दाखल करणे भाग पडले.  त्‍या कारणाने तक्रारदार हे वि.प. यांचेकडून मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.8,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रु.5,000/- मिळणेस पात्र आहेत.  सबब, मुद्दा क्र.4 चे उत्‍तर हे मंच होकारार्थी देत आहे.

 

मुद्दा क्र.5  -  सबब आदेश.

 

 

- आ दे श -

 

  1. तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो. 

 

  1. वि.प.क्र.1 विमा कंपनी यांनी तक्रारदार यांना विमा पॉलिसी क्र. 1605003115P112729129 अंतर्गत वाहनाचे नुकसान भरपाईपोटी रक्‍कम रु.1,99,000/- चे नॉन स्‍टँडर्ड बेसीस तत्‍वाप्रमाणे 75 टक्‍केप्रमाणे होणारी रक्‍कम 8 आठवडयांचे आत रक्‍कम अदा करावी.  सदरची रक्‍कम मुदतीत वि.प यांनी अदा न केलेस सदरचे रकमेवर मुदत संपले तारखेपासून सदरची संपूर्ण रक्‍कम तक्रारदार यास मिळेपावेतो द.सा.द.शे.6 टक्‍के प्रमाणे व्‍याज वि.प. यांनी अदा करावे.

 

  1. वि.प. यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.8,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रु.5,000/- अदा करावी.
  2.  
  3. वर नमूद सर्व आदेशांची पुर्तता वि.प. यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.

 

  1. विहीत मुदतीत आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदा, 2019 मधील तरतुदीप्रमाणे वि.प. विरुध्‍द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.

 

  1. आदेशाच्‍या सत्‍यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्‍य पाठवाव्‍यात.

 

 

 
 
[HON'BLE MRS. Savita P. Bhosale]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. Rupali D. Ghatage]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.