Maharashtra

Chandrapur

CC/24/204

MAYA SUNIL ALONE - Complainant(s)

Versus

BRANCH MANAGER - Opp.Party(s)

RAKESH CHARANDAS WALKE

17 Dec 2024

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTE REDRESSAL COMMISSION
CHANDRAPUR
 
Complaint Case No. CC/24/204
( Date of Filing : 27 Nov 2024 )
 
1. MAYA SUNIL ALONE
NEHARU NAGAR WARD NO 4MUL ROAD CHANDRAPUR
CHANDRAPUR
MAHARASHTRA
2. MAYA SUNIL ALONE
JATPURA GATE CHANDRAPUR
CHANDRAPUR
MAHARASHTRA
3. ASAMA SUNIL ALONE
JATPURA GATE CHANDRAPUR
CHANDRAPUR
MAHARASHTRA
4. ASHIYA SUNIL ALONE
JATPURA GATE WARD CHANDRAPUR
CHANDRAPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. BRANCH MANAGER
BRANCH MANAGER ICICI LOMBARD MAHAVIDARBH BUILDING SECOND-FLOOR MUL ROAD CHANDRAPUR
CHANDRAPUR
MAHARASHTRA
2. BRANCH MANAGER ICICI LOMBARD
BRANCH MANAGER ICICI LOMBARD MAHAVIDARBH BUILDING MUL ROAD CHANDRAPUR
CHANDRAPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Nitinkumar Swami PRESIDENT
 HON'BLE MRS. Swati A.Deshpande MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 17 Dec 2024
Final Order / Judgement

ग्राहक तक्रार क्र. CC/204/2024

 

माया सुनिल अलोणे व ईतर  विरुद्ध  ब्रॅंच मॅनेजर आय.सी.आय.सी.आय.     

                        लोम्‍बार्ड

 

निशाणी क्र. 1 वरील आदेश

(द्वारे - श्री. नितीनकुमार चं. स्वामी, मा. अध्यक्ष)

                  दिनांक :- 17/12/2024

 

  1. तक्रारीचे व त्यासोबत जोडलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले. तसेच तक्रार दाखल (स्वीकृत) करून घेण्याच्या मुद्द्यावर तक्रारकर्त्यातर्फे वकिलांनी केलेला युक्तीवाद ऐकण्यात आला.
  2. प्रस्तुत प्रकरणी तक्रारदारांची तक्रार अशी की, ते मयत सुनिल यांचे वारस आहेत. मयत सुनिल यांचा मृत्यू दि. 13/04/2020 रोजी झाला. तक्रारकर्त्यांनी त्यांची स्वतः ची गाडी फोर्ड वीगो असपायर या चार चाकी वाहनाचा विरुद्ध पक्ष विमा कंपनी यांच्याकडून विमा उतरविला होता, ज्याचा कालावधी हा 1/12/2021 ते 31/12/2021 पर्यंत होता. दि. 9/1/2021 रोजी त्या वाहनाचा अपघात झाला व ते क्षतिग्रस्त झाले. त्याचे माहिती त्यांनी विरुद्ध पक्ष यानां दिली होती व आवश्यक ते कागदपत्रे देऊन प्रस्ताव दाखल केला होता. हे वाहन त्यांनी पार्श्व ऑटोरायडर्स प्रायवेट लिमिटेड येथे, विरुद्ध पक्ष यांच्या संमतीने दुरुस्त केले होते. या दुरुस्तीसाठी खर्च रु 3,93,952.30/-  ईतका आला होता. परंतु तक्रारदार यांच्या विमा प्रस्तावावर विरुद्ध पक्ष यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही व दुरुस्तीचा खर्चही दिला नाही. कायदेशीर नोटीस पाठवूनही विरुद्ध पक्ष यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे तक्रारकर्त्यांनी प्रस्तुत तक्रार विरुद्ध पक्ष- विमा कंपनी यांच्या विरुद्ध दाखल केलेली आहे.
  3. तक्रारकर्त्यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन करण्यात आले. त्यातील विम्याचे प्रमाणपत्रावरून (दस्त क्र. 5, पान क्र. 16) असे दिसून येते की, त्यात विमाधारकाचे नाव “सुनिल जगदीश अलोणे” असे असून हे विमापत्र (policy) दि. 30/12/2020 रोजी जारी केले गेले आहे. परंतु मयत सुनिल याचा मृत्यू दि. 13/04/2020 रोजीच झालेला आहे असे तक्रारीत नमूद असून त्याच्या मृत्यू प्रमाणपत्रावरूनही (दस्त क्र. 4, पान क्र. 15) तेच दिसून येते. त्यामुळे ही बाब स्पष्ट आहे की, मयत सुनिलच्या मृत्यूनंतर जवळ-जवळ 8 महिन्यानंतर त्याच्या नावे विमाधारक म्हणून सदर पॉलिसी जारी करण्यात आली आहे, जे की अनाकलनीय आहे. हे प्रस्थापीत न्यायतत्व आहे की, मृत व्यक्तीसोबत कोणताही करार केला जाऊ शकत नाही. त्यामुळे मृत व्यक्तीच्या नावे जारी केलेली अशी विमा पॉलिसी ही पोकळ (null and void) असते व त्याद्वारे कोणताही अधिकार किंवा दायित्व निर्माण होत नाही. तसेच मयत सुनीलच्या मृत्युनंतर तक्रारकर्त्यांनी सदर वाहनाची नोंद त्यांच्या नावे होण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात, विहित मुदतीत कार्यवाही केली असल्याचा कोणतेही कागदपत्रे तक्रारीसोबत जोडलेली नाही. त्यामुळे प्रस्तुत तक्रार दाखल करण्याचा अधिकार त्याना नाही. या सर्व कारणांवरून, तक्रारकर्त्यांना सदर पोकळ (null and void) पॉलिसी अंतर्गत कोणताही अधिकार प्राप्त झाला नसल्याने, प्रस्तुत तक्रार नाकारण्यास/ अस्वीकृत (Reject) होण्यास पात्र आहे असे या आयोगाचे मत झाले आहे. सबब खालीलप्रमाणे आदेश पारित केले जातात.  

                   :: आदेश ::

  1. तक्रारकर्त्यांची प्रस्तुत तक्रार  नाकारण्यात / अस्वीकृत (Reject) करण्यात येत आहे.

 

  1. प्रस्तुत तक्रारीचा खर्च तक्रारकर्त्यांनी स्वतः सोसावा.

 

  1. तक्रारकर्त्यांना आदेशाची प्रत विनामूल्य देण्यात यावी.

 

  1. प्रकरणाच्या “ब” व “क” संचिका तक्रारकर्त्यांना परत करण्यात याव्यात.
 
 
[HON'BLE MR. Nitinkumar Swami]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. Swati A.Deshpande]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.