(मंचाचे निर्णयान्वये, श्री अनिल एन.कांबळे, अध्यक्ष(प्रभारी))
(पारीत दिनांक : 30 जुलै 2011)
अर्जदार यांनी, सदर दरखास्त ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 27 अन्वये दाखल केली असून, गैरअर्जदारांनी तक्रार क्र.20/2010 आदेश दि.30.3.2011 च्या आदेशाचे
... 2 ... (चौ.अ.क्र.6/2011)
पालन केले नाही. त्यामुळे, गैरअर्जदारांना व्यक्तीशः जास्तीत-जास्त शिक्षा व दंड ठोठावण्यात यावा अशी प्रार्थना केली आहे.
सदर तक्रार नोंदणी करुन, गैरअर्जदाराविरुध्द नोटीस काढण्यात आला. दरखास्त न्यायप्रविष्ठ असतांना, अर्जदार तर्फे मुखत्यार व त्याचे वकील यांनी आज दि.30.7.2011 ला हजर होऊन, नि.क्र.6 नुसार गैरअर्जदार क्र.1 ने विद्यमान मंचाचे आदेशाप्रमाणे कोर्टात रुपये 2,37,237/- जमा केले आहे. त्यामुळे, अर्जदाराला गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचे विरुध्द प्रकरण पुढे चालवायचे नाही या आशयाची पुरसीस दाखल केली आहे. अर्जदार तर्फे मुखत्यारधारास पुरसीस मधील मजकुराबाबत विचारणा केली असता तक्रार काढून टाकण्यात यावे असे सांगीतले.
अर्जदार यांनी नि.6 नुसार तक्रार मागे घेण्याची पुरसीस दाखल केल्यामुळे, तक्रार अंतिमतः निकाली काढून खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
// अंतिम आंदेश //
अर्जदाराची तक्रार परत घेतल्यामुळे खारीज.
( Complainant disposed by way of withdraw)
गडचिरोली.
दिनांक :-30/07/2011.