Maharashtra

Kolhapur

CC/19/543

Bajirao Bapu Davar - Complainant(s)

Versus

Br. Manager, The New India Assurance Co. Ltd. - Opp.Party(s)

R.G. Shelke

30 Aug 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION,KOLHAPUR
Central Administrative Building, Second Floor,
South Side, Kasaba Bawada Road, Kolhapur.
Phone No. (0231) 2651327, Fax No. (0231) 2651327
.
 
Complaint Case No. CC/19/543
( Date of Filing : 06 Jul 2019 )
 
1. Bajirao Bapu Davar
Kudutri,Tal.Radhanagari, Kolhapur
Kolhapur
...........Complainant(s)
Versus
1. Br. Manager, The New India Assurance Co. Ltd.
204/E,Station Road,Kolhapur
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. Savita P. Bhosale PRESIDENT
 HON'BLE MRS. Rupali D. Ghatage MEMBER
 HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 30 Aug 2022
Final Order / Judgement

न्‍या य नि र्ण य

 

व्‍दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्‍यक्षा 

 

1.     तक्रारदारांनी प्रस्‍तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 चे कलम 11 व 12 प्रमाणे दाखल केला आहे.  तक्रार अर्जातील  कथन थोडक्‍यात पुढीलप्रमाणे—

      

      तक्रारदार हे ताराराणी महिला सहकारी दूध व्‍यावसायिक संस्‍था मर्या. कुडूत्री ता. राधानगरी यांचेकडे काम करत होते.  तक्रारदार यांचा विमा सदर संस्‍थेमार्फत व कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध संस्‍था कर्मचारी संघटना यांचे माध्‍यमातून वि.प. यांचेकडे जनता व्‍यक्तिगत अपघात विमा योजनेअंतर्गत उतरविलेला होता व आहे.  सदर विमा पॉलिसीचा नंबर 151200/47/16/23/00000011 असा आहे.  तक्रारदार हे दि. 11/10/2016 रोजी त्‍यांचे शेतातून वैरणीचा भारा डोकीवरुन घेवून येत असताना रस्‍त्‍यावर दोन्‍ही पाय अपघाताने व अनावधानाने घसरुन जखमी होवून तक्रारदार यांचे उजवा हात व उजवा पाय यास गंभीर दुखापत झाली होती.  त्‍यावेळी त्‍यांचेवर उपचार होवून सदर औषधोपचाराचा खर्च हा रक्कम रु.2,50,000/- इतका झालेला होता.  तक्रारदार यांना अधूपणा आलेला असून तक्रारदार यांना आजअखेर उजवा हात व उजवा पाय हालवता येत नाही.  तक्रारदार यांना आले अधुपणाबाबत गावकामगार पोलिस पाटील व सरपंच, मौजे कुडूत्री ता.राधानगरी यांनी दाखला दिलेला आहे.  तक्रारदार यांनी याबाबत वि.प. यांचेकडे विमा प्रस्‍ताव दाखल केला.  परंतु वि.प. यांनी तक्रारदाराचा विमा प्रस्‍ताव तक्रारदार यांना आलेला अधूपणा हा 100 टक्‍केपेक्षा कमी आहे या कारणावरुन नाकारलेला आहे.  सबब, तक्रारदाराचा विमादावा नाकारुन वि.प. यांनी सेवात्रुटी केली आहे.  म्‍हणून, तक्रारदाराने प्रस्‍तुतचा तक्रारअर्ज या मंचात दाखल केला आहे.    

 

2.    प्रस्‍तुतकामी तक्रारदाराने वि.प. यांचेकडून विमाक्‍लेमपोटी रक्‍कम रु. 1,00,000/-, मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.10,000/- वि.प. कडून वसूल होवून मिळावा अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे.

 

3.    तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्‍हीट, कागदयादी सोबत अ.क्र.1 ते 11 कडे अनुक्रमे क्‍लेम फॉर्म, ताराराणी महिला दूध संस्‍थेचे पत्र, हॉस्‍पीटलची डिस्‍चार्ज समरी, दाखला, उपचाराचे एस्टिमेट, अपंगत्‍वाचे प्रमाणपत्र, एम.आर.आय रिपोर्ट, गावकामगार पोलिस पाटील व सरपंच यांचा दाखला, विमा पॉलिसीची प्रत, वि.प. यांचे क्‍लेम नामंजूरीचे पत्र वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत.  तसेच पुरावा शपथपत्र दाखल केले आहे.

 

4.    वि.प. यांनी सदरकामी म्‍हणणे/कैफियत व अॅफिडेव्‍हीट, पुरावा शपथपत्र, कागदयादीसोबत पॉलिसीची प्रत, तक्रारदाराचे अपंगत्‍वाचे प्रमाणपत्र, अपंगत्‍वाबाबतची भारत सरकारची मार्गदर्शक तत्‍वे, इन्‍व्‍हेस्‍टीगेटर यांचा अहवाल तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत.  वि.प. ने त्‍यांचे म्‍हणण्‍यामध्‍ये तक्रारअर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत.  वि.प. ने तक्रारदाराचे तक्रारअर्जावर पुढील आक्षेप घेतलेले आहेत.

 

i)          तक्रारदाराचा तक्रारअर्ज व त्‍यातील सर्व मजकूर मान्‍य व कबूल नाही.

 

ii)    वि.प. यांनी कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही.  तक्रारदाराची तक्रार मुदतीत नाही.  सदरची तक्रार चालविणेचे अधिकार या आयोगास नाहीत.

 

iii)    विमा पॉलिसीचे अटी व शर्तीनुसार विमादावा मंजूर होणेसाठी विमाधारक व्‍यक्‍तीस 100 टक्‍के अधूपणा येणे आवश्‍यक आहे.  तक्रारदाराने दाखल केलेल्‍या कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारदारास 100 टक्‍के अधूपणा आलेला नाही.  त्‍यामुळे वि.प. यांनी तक्रारदाराचा विमादावा योग्‍य व वैध कारणामुळे नाकारला आहे.

 

iv)    वरील मुद्यास बाधा येवू न येता वि.प. यांचे वैकल्पिकरित्‍या असे कथन आहे की, कोणत्‍याही परिस्थितीत वि.प. यांची जबाबदारी ही पॉलिसीतील अटी व शर्तीनुसार निश्चित केलेल्‍या जबाबदारीपेक्षा अधिक होवू शकत नाही. सबब, तक्रारदाराची तक्रार नामंजूर करावी अशी मागणी वि.प. यांनी केली आहे.

      अशा स्‍वरुपाचे आक्षेप वि.प. यांनी तक्रारअर्जावर घेतलेले आहेत.

 

5.   वर नमूद तक्रारदार व वि.प. यांनी दाखल केलेल्‍या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.

 

­अ.क्र.

                मुद्दे

उत्‍तरे

1

तक्रारदार व वि.प. हे नात्‍याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ?

होय.

2

वि.प. यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय ?     

होय.

3

तक्रारदार हे वि.प. यांचेकडून विमाक्‍लेमची रक्‍कम व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय ?

होय.  

4

अंतिम आदेश काय ?

खालील नमूद आदेशाप्रमाणे.

 

 

 

 

 

वि वे च न

 

6.    वर नमूद मुद्दा क्र.1 ते 3 ची उत्‍तरे आम्‍ही होकारार्थी दिली आहेत कारण तक्रारदार हे ताराराणी महिला सहकारी दूध व्‍यावसायिक संस्‍था मर्या. कुडूत्री ता. राधानगरी यांचेकडे काम करत होते.  तक्रारदार यांचा विमा सदर संस्‍थेमार्फत व कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध संस्‍था कर्मचारी संघटना यांचे माध्‍यमातून वि.प. यांचेकडे जनता व्‍यक्तिगत अपघात विमा योजनेअंतर्गत उतरविलेला होता व आहे.  सदर विमा पॉलिसीचा नंबर 151200/47/16/23/00000011 असा आहे.  सदर पॉलिसीची प्रत वि.प. यांनी याकामी दाखल केलेली आहे.  सबब, तक्रारदार व वि.प. हे नात्‍याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत ही बाब निर्विवादपणे स्‍पष्‍ट व सिध्‍द झालेली आहे.  सबब, मुद्दा क्र.1 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी दिले आहे.

 

7.    तक्रारदाराने आपले तक्रारअर्जात, तक्रारदार हे दि. 11/10/2016 रोजी त्‍यांचे शेतातून वैरणीचा भारा डोकीवरुन घेवून येत असताना रस्‍त्‍यावर दोन्‍ही पाय अपघाताने व अनावधानाने घसरुन जखमी होवून तक्रारदार यांचे उजवा हात व उजवा पाय यास गंभीर दुखापत झाली होती.  तक्रारदार यांना अधूपणा आलेला असून तक्रारदार यांना आजअखेर उजवा हात व उजवा पाय हालवता येत नाही. तक्रारदार यांनी याबाबत वि.प. यांचेकडे विमा प्रस्‍ताव दाखल केला.  परंतु वि.प. यांनी तक्रारदाराचा विमा प्रस्‍ताव तक्रारदार यांना आलेला अधूपणा हा 100 टक्‍केपेक्षा कमी आहे या कारणावरुन नाकारलेला आहे असे कथन केले आहे.  प्रस्‍तुतकामी वि.प. यांनीही त्‍यांचे लेखी म्‍हणण्‍यामध्‍ये, विमा पॉलिसीचे अटी व शर्तीनुसार विमादावा मंजूर होणेसाठी विमाधारक व्‍यक्‍तीस 100 टक्‍के अधूपणा येणे आवश्‍यक आहे.  तक्रारदाराने दाखल केलेल्‍या कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारदारास 100 टक्‍के अधूपणा आलेला नाही.  त्‍यामुळे वि.प. यांनी तक्रारदाराचा विमादावा योग्‍य व वैध कारणामुळे नाकारला आहे असे कथन केले आहे.  वि.प. यांनी त्‍यांचे कथनाचे पुष्‍ठयर्थ Unique Disability ID MH 3420019760169200, Department of Empowerment of Persons with Disabilities, Ministry of Social Justice and Empowerment, Government of India यांच्‍या संकेतस्‍थळावरुन पडताळून पाहिली असता दि. 03/06/2021 च्‍या प्रमाणपत्रामध्‍ये It is certified that the insured patient has disability to the extent of 52% in relation to his Right Upper Limb, Right Lower Limb as per guidelines (Guidelines for the purpose of assessing the extent of specified disability in a person included under RPWD Act, 2016 notified by Government of India vide S.O.76(E) dated 04/01/2018 असे नमूद आहे.   सदरचे प्रमाणपत्र वि.प. यांनी संबंधीत राजपत्रासह दाखल केले आहे.  तसेच वि.प. यांनी दि. 09/06/2022 रोजी सुभाष मा. काकडे यांची इन्‍व्‍हस्‍टीगेटर म्‍हणून नेमणूक करुन तपासणी केली असता तक्रारदार हा अंथरुणाला खिळलेला नसून, तक्रारदाराचे सध्‍याच्‍या स्थितीमध्‍ये भरपूर सुधारणा झालेने तो हिंडू-फिरु शकतो तसेच स्‍वतःची कामे स्‍वतः करण्‍यास सक्षम आहे.  सदरची बाब ही तक्रारदाराचा जबाब, गावकामगार पोलिस पाटील यांचा दि. 09/6/202 चा जबाब, तसेच इन्‍व्‍हेस्‍टीगेटर यांचा दि 13/6222 चा अहवाल व तक्रारदाराचे फोटोंचे अवलोकन केले असता स्‍पष्‍टपणे दिसून येते.  सदरचे सर्व कागदपत्रांवरुन तक्रारदारास 100 टक्‍के अपंगत्‍व आलेले नसून त्‍याला फक्‍त 52 टक्‍के अपंगत्‍व हे उजव्‍या हाताच्‍या व उजव्‍या पायाच्‍या हालचालींवर आलेले आहे ही बाब दिसून येते.  वि.प. यांनी त्‍यांचे लेखी युक्तिवादामध्‍ये सदरची बाब कथन केली आहे.  सबब, तक्रारदारास 52 टक्‍के अधूपणा आला असल्‍यामुळे तक्रारदार हे 50 टक्‍के विमा रक्‍कम मिळण्‍यास पात्र आहेत असे या आयोगाचे मत आहे.  परंतु वि.प. यांनी तक्रारदारांचा संपूर्ण विमादावा नाकारुन तक्रारदारास द्यावयाचे सेवेत त्रुटी केली आहे या निष्‍कर्षाप्रत हे आयोग येत आहे. 

 

8.    सबब, तक्रारदार हे विमाक्‍लेमपोटी रक्‍कम रु.1,00,00/- च्‍या 50 टक्‍के रक्‍कम रु.50,000/- वि.प. यांचेकडून मिळण्‍यास पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.  तसेच सदरचे रकमेवर तक्रारदार हे विमा क्‍लेम नाकारलेचे तारखेपासून रक्‍कम प्रत्‍यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्‍के व्‍याजदराने वसूल होवून मिळणेस तसेच मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.25,000/- व अर्जाचा खर्च रक्‍कम रु.10,000/- वि.प. यांचेकडून वसूल होवून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे आयोग येत आहे. 

 

      सबब, प्रस्‍तुतकामी आम्‍ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.

 

 

आदेश

 

1)     तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.

 

2)    वि.प. विमा कंपनीने तक्रारदार यांना विमाक्‍लेमपोटी रक्‍कम रु. 50,000/- अदा करावेत व सदर रकमेवर विमा क्‍लेम नाकारले तारखेपासून रक्‍कम प्रत्‍यक्ष तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्‍के दराने व्‍याज अदा करावे.

 

3)    मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु. 25,000/- व अर्जाचा खर्च रु.10,000/- वि.प. विमा कंपनीने तक्रारदारास अदा करावेत.

 

4)    वर नमूद सर्व आदेशांची पूर्तता वि.प. यांनी आदेशाची प्रत मिळाले तारखेपासून 45 दिवसांत करावी.

 

5)    विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदींअन्‍वये कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.

 

6)    आदेशाच्‍या सत्‍यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्‍य पाठवाव्‍यात.

 

 
 
[HON'BLE MRS. Savita P. Bhosale]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. Rupali D. Ghatage]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.