Maharashtra

Kolhapur

CC/19/119

Ashok Sakharam Patil - Complainant(s)

Versus

Br. Manager, Cholomandalam MS General Insurance Co. Ltd. - Opp.Party(s)

S.R.Sardesai

17 Dec 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION,KOLHAPUR
Central Administrative Building, Second Floor,
South Side, Kasaba Bawada Road, Kolhapur.
Phone No. (0231) 2651327, Fax No. (0231) 2651327
.
 
Complaint Case No. CC/19/119
( Date of Filing : 15 Feb 2019 )
 
1. Ashok Sakharam Patil
Malwadi,Zenda Chowk,Shiroli Pulachi,Tal.Hatkangale,Kolhapur
Kolhapur
...........Complainant(s)
Versus
1. Br. Manager, Cholomandalam MS General Insurance Co. Ltd.
1146/B, E Ward,Takala Chowk,Mouni Vihar Apt.Kolhapur
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. Savita P. Bhosale PRESIDENT
 HON'BLE MRS. Rupali D. Ghatage MEMBER
 HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 17 Dec 2021
Final Order / Judgement

न्‍या य नि र्ण य

 

व्‍दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्‍यक्षा 

 

1.     तक्रारदारांनी प्रस्‍तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे.  तक्रार अर्जातील  कथन थोडक्‍यात पुढीलप्रमाणे—

      

      तक्रारदार यांचे मालकीची कार नं. एमएच-09-डीएक्‍स-3921 असून तिचा विमा वि.प. विमा कंपनीकडे पॉलिसी क्र. 3311/00167446/000/00 ने ता. 13/7/18 ते 12/07/2019 या कालावधीसाठी उतरविला होता.  सदर पॉलिसीमध्‍ये कारची आय.डी.व्‍ही. रक्‍कम रु.5,69,550/- इतकी दर्शविली आहे. दि. 06/08/2018 रोजी तक्रारदार यांचा मुलगा विजय अशोक पाटील हा सदरची कार घेवून गणपतीपुळे येथून कोल्हापूर येथे येत असताना सायंकाळी बहिरेवाडी गावच्‍या हद्दीत आल्‍यानंतर समोरुन येणा-या ट्रकने कारला ठोकर दिली व त्‍यामध्‍ये तक्रारदारांचे कारचे पूर्णपणे नुकसान झाले.  त्‍यावेळी तक्रारदारांचे मुलासोबत पुढील सीटवर प्रतिक पाटील व पाठीमागील सीटरवर राहुल सावेकर, शुभम सोडगे व दादासो खवरे बसले होते.  तसेच तक्रारदाराचे मुलाकडे अपघातावेळी कायदेशीर परवाना होता.  सदरची बाब वि.प. यांना कळविलेनंतर सदर कारचा सर्व्‍हे झाला. सदर कारचे रिपेअरीसाठी कारचे आय.डी.व्‍ही. पेक्षा जास्‍त खर्च येईल असे इस्‍टीमेट अधिकृत कंपनीने दिले.  सर्व्‍हे रिपोर्टप्रमाणे सदरचे कारचे संपूर्ण नुकसान झाले आहे.  परंतु वि.प. यांनी अपघातसमयी प्रतिक राजेश पाटील हा ड्रायव्‍हींग करीत होता व विजय अशोक पाटील हा ड्रायव्‍हींग करीत नव्‍हता.  तसेच प्रतिक पाटील याचेकडे कायदेशीर वाहन चालविण्‍याचा परवाना नाही या कारणास्‍तव तक्रारदारांचा न्‍यायोचित क्‍लेम वि.प. यांनी दि. 24/12/18 चे पत्राने नाकारला आहे.  अपघातानंतर शाहुवाडी पोलिस स्‍टेशनला सदर अपघाताबाबत गुन्‍हा नोंद झाला असून सदर गुन्‍हयाच्‍या तपासामध्‍ये अपघातामध्‍ये विजय अशोक पाटील हाच ड्रायव्‍हींगला होता व प्रतिक पाटील हा शेजारी बसला होता व बाकीचे तिघेही मित्र पाठीमागे बसले होते असे दिसून येईल.  तसेच अपघातानंतर शाहुवाडी पोलिस स्‍टेशनने रितसर तपास कला असून त्‍या तपासामध्‍येही सर्वांचे जबाब घेतलेले आहेत.  त्‍यावरुन असे दिसून येईल की, अपघातसमयी तक्रारदारांचा मयत मुलगा विजय पाटील हाच ड्रायव्‍हींग करीत होता.  सबब, वि.प. यांनी तक्रारदाराचा विमाक्‍लेम मंजूर न करुन सेवात्रुटी केली आहे.  म्‍हणून, तक्रारदाराने प्रस्‍तुतचा तक्रारअर्ज या मंचात दाखल केला आहे.    

 

2.    प्रस्‍तुतकामी तक्रारदाराने वि.प. यांचेकडून विमाक्‍लेमची रक्‍कम रु.4,99,550/-,  मानसिक त्रासापोटी रु.20,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.10,000/- वि.प. कडून वसूल होवून मिळावा अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे.

 

3.    तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्‍हीट, कागदयादी सोबत अ.क्र.1 ते 3 कडे अनुक्रमे विमा पॉलिसी, त्रुटीपत्र, एफ.आय.आर. वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत.  तसेच कागदयादीसोबत तक्रारदारांचे ड्रायव्‍हींग लायसेन्‍स, रिपेअर इस्टिमेट, चार्जशीट, खबरी जबाब, तपास टिपण, डीलीव्‍हरी नोट तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.

 

4.    वि.प. यांनी सदरकामी म्‍हणणे/कैफियत व अॅफिडेव्‍हीट, कागदयादीसोबत विमा पॉलिसी, इन्‍व्‍हेस्‍टीगेशन रिपोर्ट, प्रतिक पाटील यांचे ड्रायव्‍हींग लायसेन्‍स, प्रतिक पाटील व इतर यांचे मेडिकल पेपर, सर्व्‍हे रिपोर्ट, साक्षीदाराचे शपथपत्र, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.  वि.प. ने त्‍यांचे म्‍हणण्‍यामध्‍ये तक्रारअर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत.  वि.प. ने तक्रारदाराचे तक्रारअर्जावर पुढील आक्षेप घेतलेले आहेत.

 

i)          तक्रारदाराचा तक्रारअर्ज व त्‍यातील सर्व मजकूर मान्‍य व कबूल नाही.

 

ii)    तक्रारदाराने केवळ विम्‍याचा गैरफायदा घेणेकरिता पश्‍चातबुध्‍दीने व पोलिसांशी संगनमताने चुकीच्‍या मजकूराच्‍या गुन्‍हा नोंद केला आहे व खोटे जबाब दिले आहेत व पोलीसांनी योग्‍य तपास न करता गुन्‍हा नोंदविला आहे व खोटे जबाब दिले आहेत व पोलिसांनी योग्‍य तपास न करता गुन्‍हा नोंदविला आहे. 

 

iii)    अपघातावेळी विजय अशोक पाटील हा वाहन चालवित असलेचे कथन खोटे आहे कारण केवळ ड्रायव्‍हर बाजूचे एयरबॅगवर रक्‍ताचे डाग होते पण कथित ड्रायव्‍हर विजय अशोक पाटील यांना त्‍यांचे डोक्‍यास मार लागलाच नव्‍हता.  तथापि प्रतिक राजेश पाटील यांना डोक्‍याला मार लागला होता.  तसेच ड्रायव्‍हरच्‍या बाजूचे सीटसमोरील एयरबॅगवर रक्‍ताचे डाग आजिबात नव्‍हते. 

 

iv)    चौकशीप्रमाणे कथित अपघातावेळी वाहन गणपतीपुळे ते कोल्‍हापूर येताना प्रतीक राजेश पाटील हेच चालवत होते व त्‍यांचेकडे कार चालवण्‍याचे लायसेन्‍स नसलेने पश्‍चातबुध्‍दीने व खोटेपणाने वाहन विजय अशोक पाटील हा चालवत असलेचे पोलिसांत व वि.प.यांना सांगितले आहे.  तक्रारदार हे सत्‍य परिस्थिती लपवत आहेत.  

 

v)         वि.प. यांचे वैकल्पिकरित्‍या असेही म्‍हणणे आहे की, नुकसानीची रक्‍कम सर्व्‍हेअरच्‍या असेसमेंटप्रमाणेच ठरवता येते.  सबब, तक्रारदार हे नुकसानीची रक्‍कम रु. 4,99,550/- ही रक्‍कम मिळण्‍यास पात्र नाहीत.  सबब, तक्रारदाराची तक्रार नामंजूर करावी अशी मागणी वि.प. यांनी केली आहे.

      अशा स्‍वरुपाचे आक्षेप वि.प. यांनी तक्रारअर्जावर घेतलेले आहेत.

 

5.   वर नमूद तक्रारदार व वि.प. यांनी दाखल केलेल्‍या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.

 

­अ. क्र.

                मुद्दे

उत्‍तरे

1

तक्रारदार व वि.प. हे नात्‍याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ?

होय.

2

तक्रारदाराची तक्रार मुदतीत आहे काय ?

होय.

3

वि.प. यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय ?     

होय.

4

तक्रारदार हे वि.प. यांचेकडून विमाक्‍लेमची रक्‍कम व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय ?

होय.  

5

अंतिम आदेश काय ?

खालील नमूद आदेशाप्रमाणे.

 

 

 

वि वे च न

 

6.    वर नमूद मुद्दा क्र.1 ते 4 ची उत्‍तरे आम्‍ही होकारार्थी दिली आहेत कारण तक्रारदार यांचे मालकीची कार नं. एमएच-09-डीएक्‍स-3921 असून तिचा विमा वि.प. विमा कंपनीकडे पॉलिसी क्र. 3311/00167446/000/00 ने ता. 13/7/18 ते 12/07/2019 या कालावधीसाठी उतरविला होता.  वि.प. यांनी सदरची बाब नाकारलेली नाही.  उभय पक्षांनी याकामी सदरची विमा पॉलिसी दाखल केलेली आहे. सबब, तक्रारदार व वि.प. हे नात्‍याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत या निष्‍कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी दिले आहे.

              

7.    वि.प. यांनी त्‍यांचे म्‍हणण्‍यामध्‍ये वि.प. यांनी केलेले चौकशीप्रमाणे कथित अपघातावेळी वाहन गणपतीपुळे ते कोल्‍हापूर येताना प्रतीक राजेश पाटील हेच चालवत होते व त्‍यांचेकडे कार चालवण्‍याचे लायसेन्‍स नसलेने पश्‍चातबुध्‍दीने व खोटेपणाने वाहन विजय अशोक पाटील हा चालवत असलेचे पोलिसांत व वि.प. यांना सांगितले आहे.  त्‍यामुळे वि.प. यांनी तक्रारदाराचा विमा नाकारला आहे.  परंतु तक्रारदारांनी याकामी वर्दी जबाब, चार्जशीट, खबरी जबाब, तपास टिपण यांच्‍या प्रती दाखल केल्‍या आहेत.  सदर कागदपत्रांचे अवलोकन करता वादातील वाहन हे विजय अशोक पाटील हाच चालवत असल्‍याचे दिसून येते.  याउलट वि.प. यांनी त्‍यांचे कथन शाबीत करण्‍यासाठी कोणताही ठोस पुरावा दाखल केलेला नाही.  वि.प. यांनी याकामी Fourthforce Surviellance Indo Pvt.Ltd. यांचा चौकशी रिपोर्ट व शपथपत्र दाखल केले आहे.  परंतु सदरचे रिपोर्टचे अवलोकन करता, कथित अपघातावेळी वाहन गणपतीपुळे ते कोल्‍हापूर येताना प्रतीक राजेश पाटील हेच चालवत होते असे केवळ अनुमान काढले आहे.  सदर अनुमानाच्‍या पुष्‍ठयर्थ कोणताही ठोस पुरावा दाखल केलेला नाही.  सदर रिपोर्टसोबत सदरचे इन्‍व्‍हेस्‍टीगेटर यांनी घेतलेल्‍या जबाबांच्‍या प्रती दाखल नाहीत.  सबब, वि.प यांनी आपल्‍या म्‍हणण्‍यातील कथने शाबीत केली नाहीत असे या आयोगाचे मत आहे.  सबब, तक्रारदारांचा विमाक्‍लेम चुकीच्‍या कारणास्‍तव नाकारुन वि.प. यांनी तक्रारदाराला सदोष सेवा दिली आहे या निष्‍कर्षाप्रत हे आयोग येत आहे.  सबब, मुद्दा क्र.2 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी दिले आहे.

 

8.    वि.प. यांनी त्‍यांचे म्‍हणण्यामध्‍ये वैकल्पिकरित्‍या असे कथन केले आहे की, नुकसानीची रक्‍कम सर्व्‍हेअरच्‍या असेसमेंटप्रमाणेच ठरवता येते.  सबब, तक्रारदार हे नुकसानीची रक्‍कम रु. 4,99,550/- ही रक्‍कम मिळण्‍यास पात्र नाहीत.  वि.प. यांनी त्‍यांचे कथनाचे पुष्‍ठयर्थ सर्व्‍हेअर श्री संतोष पाटील यांचे शपथपत्र दाखल केले आहे.  सदर शपथपत्रामध्‍ये सर्व्‍हेअर यांनी सदर वाहनाचे नुकसानीपोटी रक्‍कम रु. 2,50,805/- निश्चित केली असून सॅल्‍वेजची रक्‍कम रु.2,42,411 होत असलेचे नमूद केले आहे.  याउलट तक्रारदाराने त्‍यांचे युक्तिवादात वाहनाची आय.डी.व्‍ही. रक्‍कम रु.5,69,550/- असून गाडीची विक्री रक्‍कम रु.70,000/- या रकमेस केल्‍याचे कथन केले आहे. 

 

9.    तक्रारदाराने याकामी वरिष्‍ठ न्‍यायालयांचे खालील निवाडे दाखल केले आहेत.

 

  1. IV(2009) ACC 356 (SC)

New India Assurance Co.Ltd.Vs.Pradeep Kumar

 

Head Notes : Insurance-Assessment of loss – Pre-requisite for settlement of claim – Surveyor’s report not last and final word – It may be basis for settlement of claim but neither binding upon insurer nor insured – Complainant’s claim accepted by Consumer For a as duly supported by original vouchers, bills and receipts – No interference required in appeal.

 

  1. IV(2009) CPJ 230 (NC)

Oriental Insurance Co.Ltd.Vs. Mehar Chand

 

Head Notes : Insurance – Surveyor’s report – Motor accident claim – Vehicle badly damaged – Estimated cost of repairs given by authorized garage, not accepted by Surveyor – Contention, authorized garages normally give inflated estimate, not acceptable – Surveyor required to give sound and cogent reasons for disallowing estimated claim – No reasons given by surveyor disallowing estimated claim given by authorized garage – Consent given on basis of Surveyor’s report, no consent in facts and circumstances of case – Claim allowed by State Commission after 10% depreciation on estimated amount – Orderupheld in revision.

 

            प्रस्‍तुत प्रकरणातही वि.प.यांनी नेमलेल्‍या सर्व्‍हेअर यांनी त्‍यांचे शपथपत्रात त्‍यांनी निश्चित केलेल्‍या रकमेबाबत कोणतीही ठोस कारणे नमूद केलेली नाहीत.  सबब, सदरचे निवाडे या प्रकरणास लागू होतात असे या आयोगाचे मत आहे. सबब, तक्रारदार हे विमाक्‍लेमपोटी आय.डी.व्‍ही. रक्‍कम रु.5,69,550/- मधून गाडी विक्रीची किंमत रु.70,000/- वजा जाता रक्‍कम रु.4,99,550/- इतकी रक्‍कम वि.प. यांचेकडून मिळण्‍यास पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.  तसेच सदरचे रकमेवर तक्रारदार हे विमा क्‍लेम नाकारले तारखेपासून रक्‍कम प्रत्‍यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्‍के व्‍याजदराने वसूल होवून मिळणेस तसेच मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.10,000/- व अर्जाचा खर्च रक्‍कम रु.5,000/- वि.प. यांचेकडून वसूल होवून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे आयोग येत आहे.  सबब, मुद्दा क्र.4 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी दिले आहे.

 

      सबब, प्रस्‍तुतकामी आम्‍ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.

 

 

आदेश

 

 

1)     तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.

 

2)    वि.प. विमा कंपनीने तक्रारदार यांना विमाक्‍लेमपोटी रक्‍कम रु. 4,99,550/- अदा करावेत व सदर रकमेवर विमा क्‍लेम नाकारले तारखेपासून रक्‍कम प्रत्‍यक्ष तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्‍के दराने व्‍याज अदा करावे.

 

3)    मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.10,000/- व अर्जाचा खर्च रु.5,000/- वि.प. विमा कंपनीने तक्रारदारास अदा करावेत.

 

4)    वर नमूद सर्व आदेशांची पूर्तता वि.प. यांनी आदेशाची प्रत मिळाले तारखेपासून 45 दिवसांत करावी.

 

5)    विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदींअन्‍वये कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.

 

6)    आदेशाच्‍या सत्‍यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्‍य पाठवाव्‍यात.

 

 

 
 
[HON'BLE MRS. Savita P. Bhosale]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. Rupali D. Ghatage]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.