Maharashtra

Pune

CC/09/459

Yogesh N. Phale - Complainant(s)

Versus

Bineet Mishra,Credit Manager,Pune Agri Business group,Kotak Mahindra Bank Ltd. - Opp.Party(s)

Ravindra V. Kulkarni

17 Nov 2011

ORDER

 
Complaint Case No. CC/09/459
 
1. Yogesh N. Phale
Survey No. 18/3/1,Vitthal Height,Hingane Khurd,Pune 51
...........Complainant(s)
Versus
1. Bineet Mishra,Credit Manager,Pune Agri Business group,Kotak Mahindra Bank Ltd.
4th floor,Sohrabhall,121,Sasoon Road,Pune -1
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
  Smt. Anjali Deshmukh PRESIDENT
  Shri. S. K. Kapase MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

श्रीएस. के. कापसे, मा. सदस्‍य यांचेनुसार
                              :- निकालपत्र :-
                           दिनांक 17 नोव्‍हेंबर 2011
तक्रारदाराची तक्रार थोडक्‍यात खालीलप्रमाणे-
 1.        तक्रारदार क्र.1 ते 3 धवल प्रॉपर्टीज व धवल प्रोजेक्‍टस प्रा.लि. चे डायरेक्‍टर आहेत.  तक्रारदारांनी जाबदेणार बँक पुणे शाखा यांच्‍याकडे ओव्‍हरड्राफट सुविधा व टर्म लोन शेती व डेव्‍हलपमेंट कामांसाठी अर्ज केला होता. धवल प्रॉपर्टीज व धवल प्रोजेक्‍टस कर्जासाठी जामीनदार होते. दिनांक 24/3/2008 च्‍या पत्रान्‍वये तक्रारदारांना टर्म लोन रुपये 1,00,00,000/- व ओव्‍हरड्राफट रुपये 1,00,00,000/- मंजूर करण्‍यात आले होते. तक्रारदारांनी सदनिका क्र.बी 102, सी 103 व सी 103,  धवल विंडस्‍केप, सर्व्‍हे नं 80/2ए व 80/2बी, हडपसर, पुणे 28 संदर्भातील मॉरगेज डीड जाबदेणारांबरोबर केले होते. तसेच तक्रारदारांनी जाबदेणार बँके बरोबर NA जमीन सर्व्‍हे नं 63/12/3/1, 63/12/3/2 व 63/12/3/3 1250 चौ.मिटर, आंबेगाव खुर्द, ता. हवेली, जि.पुणे संदर्भातील मॉरगेज डीड केले होते. जाबदेणार क्र.2 बँकेनी दिनांक 11/6/2008 रोजीच्‍या पत्रान्‍वये त्‍यात नमूद केलेल्‍या काही सुविधा काही अटींची तक्रारदारांनी पुर्तता केल्‍यानंतर, तक्रारदारांना डिसबर्स करण्‍याचे मान्‍य केले होते. सदरहू पत्र दिनांक 11/6/2008 प्राप्‍त झाल्‍यानंतर दिनांक 17/6/2008 रोजी नोंदणीकृत मॉरगेज डीड करण्‍यात आले. दिनांक 13/6/2008 रोजी हायपोथिकेशन डीड, इन्‍डेमनिटी बॉन्‍ड व पॉवर ऑफ अॅटर्नी करण्‍यात आले. कार्पोरेट गॅरंटी देण्‍यात आली होती. जाबदेणार यांनी दिनांक 31/7/2008 च्‍या पत्रान्‍वये मागणी केल्‍याप्रमाणे पुर्तता करण्‍यात आली होती. पोस्‍ट डेटेड चेक्‍स देण्‍यात आले होते.  तक्रारदारांनी कर्ज मंजुर पत्रातील अटी व शर्तींचा भंग केल्‍याने, बँकेने मालमत्‍तेवर चार्ज निर्माण करण्‍याआधीच मालमत्‍ता तक्रारदारांनी आधीच विकल्‍याने जाबदेणार बँकेने दिनांक 26/3/2009 रोजीच्‍या पत्रान्‍वये कर्ज डिसबर्स करण्‍याचे नाकारले. यासंदर्भात तक्रारदारांनी बँकेला खुलासा दिला होता. तक्रारदार क्र.1 व 2 यांनी दिनांक 6/3/2009 रोजीच्‍या पत्रान्‍वये कर्ज डिसबर्स करण्‍यासंदर्भात व बँकींग सुविधांबाबत विनंती केली होती. जाबदेणार बँकेनी दिनांक 24/2/2009 च्‍या पत्रान्‍वये कर्ज मंजुरी पत्रातील अटी व शर्तींचा भंग केल्‍यामुळे कर्ज डिसबर्स करता येणार नाही व बँकींग सुविधा देता येणार नाही असे कळविले आहे. यासर्वांमुळे तक्रारदारांना एकूण खर्च रुपये 6,34,120/- सहन करावा लागला. म्‍हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणार यांच्‍याकडून रुपये 6,34,120/- व्‍याजासह मागतात. रुपये 2,00,00,000/- कर्ज डिसबर्स व्‍हावे अशी मागणी करतात, नुकसान भरपाई पोटी रुपये 10,00,000/- व इतर दिलासा मागतात. तक्रारदारांनी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
2.                जाबदेणार यांनी प्राथमिक मुद्ये उपस्थित केले. तक्रारदारांना टर्म लोन रुपये 1,00,00,000/- व कमर्शिअल ओव्‍हर ड्राफट रुपये 1,00,00,000/- दिनांक 24/3/2008 च्‍या पत्रान्‍वये मंजुर करण्‍यात आला होता. तक्रारदारांनी सिक्‍युरिटी पोटी जाबदेणार क्र.3 यांच्‍याकडे ज्‍या मालमत्‍ता दिलेल्‍या होत्‍या त्‍यातील एक सदनिका क्र.सी 103 ज्‍यावर जाबदेणार बँकेनी चार्ज निर्माण करण्‍याआधीच, तक्रारदारांनी दिनांक 8/2/2007 रोजी श्रीमती सविता उर्फ अश्‍लेषा दिपक कुंजीर यांना विकली होती. सदरहू बाब तक्रारदारांनी जाबदेणारांपासून लपविली होती. सदनिका क्र.सी 102 व बी 102 जाबदेणार बँकेकडे मॉरगेज करण्‍यात आल्‍या होत्‍या, परंतू बँकेच्‍या लेखी परवानगी नंतर तिस-या व्‍यक्‍तीच्‍या नावे करण्‍यात आल्‍या होत्‍या. तक्रारदारांनी प्रस्‍तूत तक्रार कर्ज रुपये 2,00,00,000/- डिसबर्स करुन मिळणेसंदर्भात दाखल केलेली आहे तसेच रुपये 6,34,120/- परत मिळण्‍यासाठी दाखल केलेली आहे. मा. मंचासमोर रुपये 20,00,000/- पर्यन्‍तच्‍या तक्रारी दाखल व चालू शकत असल्‍यामुळे प्रस्‍तूत तक्रार मा. मंचासमोर चालू शकत नाही. जाबदेणार बँकेनी काही अटींच्‍या पुर्ततेनंतर कर्ज डिसबर्स करण्‍याचे मान्‍य केले होते. परंतू त्‍यांची पुर्तता तक्रारदारांनी केलेली नसल्‍यामुळे तक्रारदार व जाबदेणार बँकेमध्‍ये बँकर व बॉरोअर रिलेशन्‍स नाहीत, म्‍हणून सदरहू तक्रार खर्चासह नामंजुर करण्‍यात यावी अशी मागणी जाबदेणार करतात. सोबत प्रतिज्ञापत्र दाखल केले.
3.                तक्रारदारांनी जाबदेणार यांच्‍या अर्जावर म्‍हणणे दाखल करुन जाबदेणार यांचा अर्ज नाकारला. तक्रारदारांनी प्रस्‍तूत तक्रार रुपये 6,34,120/-परत मिळणेसाठी व नुकसान भरपाई पोटी रुपये 10,00,000/- मिळणे संदर्भात दाखल केलेली आहे. तक्रारदार कर्ज डिसबर्स करण्‍याची मागणी नॉट प्रेस करीत आहेत. म्‍हणून प्रस्‍तूत तक्रार मा. मंचासमोर चालू शकते असे नमूद केले.
4.                जाबदेणार बँकेने तक्रारदारांचे कर्ज डिसबर्स केलेले नसल्‍यामुळे तक्रारदार दिनांक 8/6/2011 च्‍या अर्जाद्वारे NA जमीन सर्व्‍हे नं 63/12/3/1, 63/12/3/2 व 63/12/3/3 1250 चौ.मिटर, आंबेगाव खुर्द, ता. हवेली, जि.पुणे संदर्भातील मॉरगेज डीड केले होते ते रिलीज करुन मागतात.
5.          जाबदेणार बँकेने तक्रारदारांना दिनांक 24/3/2008 च्‍या पत्राद्वारे रुपये 1,00,00,000/- टर्म लोन व रुपये 1,00,00,000/- ओव्‍हरड्राफट काही अटी व शर्तींच्‍या अधिन राहून मंजुर केले होते. दिनांक 24/3/2008 च्‍या पत्रातील अटी व शर्तींची पुर्तता तक्रारदारांनी न केल्‍यामुळे जाबदेणार बँकेनी दिनांक 26/3/2009 च्‍या पत्राद्वारे तक्रारदारांना कर्ज डिसबर्स करण्‍याचे नाकारले, मॉरगेज पोटी तक्रारदारांनी NA जमीन सर्व्‍हे नं 63/12/3/1, 63/12/3/2 व 63/12/3/3 1250 चौ.मिटर, आंबेगाव खुर्द, ता. हवेली, जि.पुणे संदर्भातील मॉरगेज डीड केले होते, हया बाबी निर्वीवाद आहेत. प्रस्‍तूत तक्रारीत तक्रारदार जाबदेणार बँकेकडून कर्ज रुपये 2,00,00,000/- डिसबर्स करुन मिळावे अशी मागणी करतात. जाबदेणार बँकेने प्राथमिक मुद्ये उपस्थित करणारा अर्ज दाखल केल्‍यानंतर तक्रारदारांनी दिनांक 19/3/2010 च्‍या अर्जाद्वारे त्‍यांची कर्ज डिसबर्स करुन मिळण्‍याची मागणी नॉट प्रेस व रद्य केलेली आहे. त्‍यामुळे तक्रारदार जाबदेणार बँकेचे ग्राहक आहेत, सदरची तक्रार मा. मंचाच्‍या आर्थिक अधिकारक्षेत्रात [Pecuniary Jurisdiction] येते असे मा. मंचाचे मत आहे. तक्रारदारांनी दाखल केलेल्‍या दिनांक 13/6/2008 हायपोथिकेशन डीडची पाहणी केली असता पान क्र. 12 वर शेडयुल डी मध्‍ये तक्रारदारांनी जाबदेणार बँकेकडे मॉरगेज केलेल्‍या मालमत्‍तेचे सविस्‍तर वर्णन करण्‍यात आलेले असून त्‍यातील कलम B मध्‍ये NA जमीन सर्व्‍हे नं 63/12/3/1, 63/12/3/2 व 63/12/3/3 1250 चौ.मिटर, आंबेगाव खुर्द, ता. हवेली, जि.पुणे चा उल्‍लेख आढळून येतो. तक्रारदारांनी अटी व शर्तींची पुर्तता न केल्‍यामुळे जाबदेणार बँकेने सदरहू कर्ज डिसबर्स करण्‍याचे दिनांक 26/3/2009 च्‍या पत्राद्वारे नाकारलेले आहे. त्‍यामुळे जाबदेणार बँकेने तक्रारदारांची उपरोक्‍त नमूद केलेली मॉरगेज मालमत्‍ता दिनांक 26/3/2009 रोजीच रिलीज करावयास हवी होती असे मंचाचे मत आहे.  तक्रारदारांनी अटी व शर्तींची पुर्तता न केल्‍यामुळे जाबदेणार बँकेने कर्ज रिलीज केले नाही हे जरी योग्‍य व समर्थनीय असले तरीदेखील कर्ज डिसबर्स न केल्‍यानंतर मॉरगेज प्रॉपर्टी रिलीज न करणे ही जाबदेणार बँकेच्‍या सेवेतील त्रुटी आहे असे मा. मंचाचे मत आहे. त्‍यामुळे तक्रारदारांना निश्‍चीतच आर्थिक, मानसिक व शारिरीक त्रास सहन करावा लागला असणार असे मंचाचे मत आहे. म्‍हणून तक्रारदार जाबदेणार यांच्‍याकडून नुकसान भरपाई पोटी रक्‍कम रुपये 10,000/- व तक्रारीचा खर्च रक्‍कम रुपये 1,000/- मिळण्‍यास पात्र आहेत असे मंचाचे मत आहे.
      वरील विवेचनावरुन व कागदपत्रांवरुन खालीलप्रमाणे आदेश देण्‍यात येत आहे-
                                    :- आदेश :-
1     तक्रार अंशत: मान्‍य करण्‍यात येते.
2.    जाबदेणार क्र.1 ते 3 यांनी वैयक्तिकरित्‍या आणि संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांची मॉरगेज मालमत्‍ता - NA जमीन सर्व्‍हे नं 63/12/3/1, 63/12/3/2 व 63/12/3/3 1250 चौ.मिटर, आंबेगाव खुर्द, ता. हवेली, जि.पुणे या आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍यापासून सहा आठवडयांच्‍या आत रिलीज करुन दयावी.
3.    जाबदेणार क्र.1 ते 3 यांनी वैयक्तिकरित्‍या आणि संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांना नुकसान भरपाईपोटी रक्‍क्‍म रुपये 10,000/- आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍यापासून सहा आठवडयांच्‍या आत अदा करावी.
4.    जाबदेणार क्र.1 ते 3 यांनी वैयक्तिकरित्‍या आणि संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांना तक्रारीच्‍या खर्चापोटी रक्‍कम रुपये 1,000/-दयावी.
5.    आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्‍क पाठविण्‍यात यावी.
 
 
 
 
[ Smt. Anjali Deshmukh]
PRESIDENT
 
[ Shri. S. K. Kapase]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.