Maharashtra

Kolhapur

CC/11/394

Smt Jaitun Salim Mulla - Complainant(s)

Versus

Bharathi Aaksa GIC - Opp.Party(s)

Sandip Jadhav

14 Jul 2015

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, KOLHAPUR
Central Administrative Building, Second Floor,
South Side, Kasaba Bawada Road, Kolhapur.
Phone No. (0231) 2651327, Fax No. (0231) 2651327
.
 
Complaint Case No. CC/11/394
 
1. Smt Jaitun Salim Mulla
Juni More Colony,Kolhapur.
...........Complainant(s)
Versus
1. Bharathi Aaksa GIC
Millnium Star Bldg. Gala no. 9,Dhole Patil Road,Pune.
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. Sanjay P. Borwal PRESIDENT
 HON'ABLE MR. Dinesh S. Gavali MEMBER
 HON'ABLE MRS. Rupali D. Ghatage MEMBER
 
For the Complainant:Sandip Jadhav, Advocate
For the Opp. Party: K S Dandage, Advocate
ORDER

नि का ल प त्र :- ( व्‍दारा- मा. श्री. दिनेश एस. गवळी, सदस्‍य) (दि .14-07-2015) 

(1)   प्रस्‍तुतचा तक्रार अर्ज तक्रारदार यांनी ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 कलम 12 अन्‍वये वि.प. विमा कंपनी यांनी तक्रारदारांना द्यावयाच्‍या सेवेत त्रुटी केल्‍याने नुकसान भरपाई मिळणेसाठी या मंचात दाखल केला आहे. 

     प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन वि.प. यांना नोटीसीचा आदेश झाला.  वि.प.  विमा कंपनी वकिलामार्फत मंचापुढे उपस्थित राहून त्‍यांनी म्‍हणणे दाखल केले.  तक्रारदार तर्फे व वि.प. विमा कंपनी तर्फे वकिलांचा तोंडी अंतिम युक्‍तीवाद ऐकला.   

 (2)   तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी आहे की,

       तक्रारदार यांचे पती सलीम युसूफ मुल्‍ला यांनी स्‍वत:चे नांवे “यामा मोटर सायकल”  दि. 15-01-2010 रोजी घेतलेली होती.  मोटर सायकलचा नं. एम.एच.09-बी.एल. 8639 असा आहे.  तक्रारदार यांनी सदर मोटर सायकल घेतेवेळी पुर्ण विमा वि.प. यांचेकडे उतरविला होता. तक्रारदार यांचे पती दि. 19-06-2010 रोजी कोल्‍हापूरहून कुरुंदवाड  येथे चालले होते.  सदरची मोटर सायकल तक्रारदार हे स्‍वत: चालवीत होते. तक्रारदार हे मोटर सायकल चालवीत असताना त्‍यांचा अपघात टाकवडे गावाजवळ झाला.  त्‍यानंतर तक्रारदार यांचे पतीला इचलकरंजी येथील इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्‍पीटल येथे उपचारासाठी अॅडमिट केले.  त्‍यानंतर त्‍यांना कोल्‍हापूर येथे सी.पी.आर. हॉस्‍पीटल कोल्‍हापूर येथे उपचारासाठी अॅडमिट केले.  तक्रारदार यांचे पतीवर उपचार चालू असताना दि. 19-06-2010 रोजी मयत झाले आहेत.  त्‍यांना उपचारासाठी रक्‍कम रु. 4 ते 5 हजार खर्च आलेला आहे. 

     तक्रारदार त्‍यांचे तक्रारीत पुढे नमूद करतात की, तक्रारदार यांचे पतीने वि.प. यांचेकडे  यामा मोटार सायकल नं. एम.एच.09-बी.एल. 8639 चा विमा उतरविलेला होता.  सदर गाडीचा इन्‍शुरन्‍स उतरविताना “PA to Owner –Driver” साठी रक्‍कम रु. 50/-  चा विमा भरलेला आहे.  त्‍यामुळे मयत सलीम युसूफ मुल्‍ला यांचे पत्‍नीला रक्‍कम रु. 1,00,000/- वि.प. विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळणेसाठी तक्रारदार यांनी दि. 4-10-2010 रोजी रजि. ए.डी. नोटीस पाठविली.  नोटीस वि.प. यांना लागू झालेली होऊनही वि.प.यांनी तक्रारदारांना रक्‍कम दिलेली नाही.  तक्रारदार यांचे पतीचा अपघात झाला त्‍यावेळी गाडीचे फार मोठया प्रमाणात नुकसान झाले असून वि.प. यांचेकडे क्‍लेमफॉर्म भरुन दिलेला असताना वि.प. यांनी आजतागायत क्‍लेम दिलेला नाही.  सदरच्‍या गाडीला रिपेअरी करण्‍यासाठी तक्रारदारी यांना रु. 4 ते 5 हजार खर्च आलेला आहे.   तक्रारदार या अशिक्षित असलेमुळे सदरची बिले ठेवलेली नाहीत. तक्रारदार यांना मेडीकल व अॅम्‍बुलन्‍सचा खर्च रु. 5,000/- आलेला आहे.  तक्रारदारांनी क्‍लेमसाठी आवश्‍यक सर्व मुळ कागदपत्रे वि.प. यांचेकडे सादर केली आहेत.  तक्रारदार हिस त्रास देणेच्‍या उद्देशाने सदरचा क्‍लेम मंजूर केलेला नाही.  तक्रारदार हया क्‍लेमच्‍या चौकशीसाठी गेल्‍या असता वि.प.यांनी त्‍यांना उडवाउडवीची उत्‍तरे दिली.  वि.प. यांनी तक्रारदार यांचा क्‍लेम नाकारुन तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी ठेवली आहे.  सबब, तक्रारदार यांना विमा क्‍लेमची रक्‍कम रु. 1,00,000/- द.सा.द.शे. 12 % व्‍याजासह मिळावी,  गाडीची नुकसान भरपाई रक्‍कम रु. 5,000/-, औषधोपचाराचा खर्च रु. 5,000/-, मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु. 25,000/- व तक्रार अर्जाचा  खर्च रु. 5,000/- मिळणेसाठी तक्रारदारांनी तक्रार अर्ज दाखल केलेला आहे.                          

(3)    तक्रारदारांनी तक्रार अर्जासोबत एकूण 7 कागदपत्रे दाखल केली असून त्‍यामध्‍ये अ.क्र. 1 कडे खबरी जबाब दि. 22-06-2010, अ.क्र. 2 कडे पंचनामा दि. 20-06-2010, अ.क्र. 3 कडे मरणोत्‍तर पंचनामा दि. 19-06-2010, अ.क्र. 4 कडे पी.एम. रिपोर्ट अ.क्र. 19—06-2010, अ.क्र. 5 कडे इन्‍शुरन्‍स पॉलिसी दि. 19-01-2010, अ.क्र. 6 कडे वि.प. कंपनी यांना तक्रारदारांनी दिलेला मागणी अर्ज दि. 4-10-2010, अ.क्र. 7 कडे वि.प. यांनी पाठविलेल्‍या नोटीसीसीची पोहच दि. 7-10-2010 इत्‍यादी कागदपत्रांच्‍या प्रती दाखल केलेल्‍या आहेत व तक्रारीसोबत शपथपत्र दाखल केले आहे.

 (4)      वि.प. विमा कंपनीने तक्रार अर्जास लेखी म्‍हणणे दाखल केले असून त्‍यामध्‍ये त्‍यांनी तक्रारदाराची तक्रार परिच्‍छेदनिहाय नाकारली आहे.  तथापि,  तक्रार अर्जामधील मोटार सायकल नं. MH-09-BL-8639 चा विमा उतरविला होता व त्‍याचा कालावधी दि. 17-01-2010 ते 16-01-2011 रोजीपर्यंत होता हे मान्‍य केलेले आहे. वि.प. यांनी तक्रार अर्जातील कथने अमान्‍य केली असून त्‍यातील नमूद केलेला मजकूर जसे, तक्रारदारांचा अपघात झाला, त्‍याला इंदिरा गांधी हॉस्‍पीटल, इचलकरंजी येथे अॅडमिट केले.  त्‍याचे मेडीकल औषधोपचाराकरिता रक्‍कम रु. 3000/- ते 5000/-  इतका खर्च आला  या बाबी नाकारलेल्‍या आहेत. तसेच तक्रारदार या महिला असल्‍याने त्‍यांना त्रास देणेचा उद्देशाने त्‍यांना क्‍लेम दिला नाही.  त्‍याचप्रमाणे  तक्रारदार या क्‍लेमचे चौकशीकरिता  कंपनीत गेल्‍या असता तेथील ब्रॅच मॅनेजर यांनी त्‍यांना चुकीची उत्‍त्‍रे दिली इत्‍यादीबाबतचा मजकूर नाकारला आहे.

       वि.प. त्‍यांचे म्‍हणणेमध्‍ये पुढे असे कथन करतात की, तक्रारदाराने केवळ पर्सनल अॅक्‍सीडेंट कव्‍हर (owner driver) खाली क्‍लेम दाखल केलेला होता.  त्‍यांनी मोटार सायकलमध्‍ये नुकसानीदाखल क्‍लेम दाखल केलेला नव्‍हता आणि त्‍यांनी रेपीअर्सची बीले दाखल केलेली नव्‍हती किंवा नुकसानीबद्दलचा क्‍लेमबाबत माहिती दिलेली नव्‍हती. तक्रारदाराचे क्‍लेमचे अनुषंगाने तक्रारदारांचा क्‍लेम “P.A. To Owner- DRIVER” खाली दाखल केलेला होता.  सदर क्‍लेमचे कागदपत्रे पडताळणीचेवेळी कंपनीस असे दिसून आले की, मयत हा मोटार सायकल नं. MH-09-BL-8639  चालवित होता की, जी गिअर मोटार सायकल असून त्‍याची क्षमता 60 C.C. पेक्षा अधिक आहे. मोटार वाहन कायदा, कलम 10 प्रमाणे गिअर्स असलेली मोटार सायकल चालविणेकरिता लायसेन्‍सची आवश्‍यकता असते.  प्रस्‍तुत तक्रारीमध्‍ये मयत सलीम मुल्‍ला यांचेकडे केवळ ‘A/R only’ असे लायसन्‍स होते  व ते अपघातावेळी वैध व परिणामकारक नव्‍हते. 

        वि.प. कंपनी त्‍यांचे म्‍हणण्‍यात पुढे असे कथन करतात की, विमा पॉलिसीचे  Drivers  Clause:  पुढीलप्रमाणे आहे.  “Any persons or Classes of person entitled to drive – Any person  including  the insured: Provided that a person driving holds an effective driving license at the time of the accident and is not disqualified from holding or obtaining such a license.”. मयत मालक ड्रायव्‍हर सलीम मुल्‍ला याचेकडे अपघातावेळी वैध व परिणामकारक वाहन चालविणेचा परवाना नव्‍हता त्‍यामुळे सदरचा क्‍लेम देय होत नाही.  त्‍यामुळे तक्रारदार वि.प. यांचेकडून कोणतीही नुकसानभरपाई मिळणेस पात्र नाहीत.  सबब, वरील सर्व बाबींचा विचार करता तक्रारदारांचा तक्रार अर्ज खर्चासह नामंजूर करणेत यावा अशी वि.प. यांनी विनंती केली आहे.                     

 (5)   तक्रारदारांची तक्रार, तक्रारसोबत दाखल कागदपत्रे, तक्रार अर्जास वि.प. यांनी दाखल केलेले म्‍हणणे व उभय पक्षकारांचे वकिलांचा युक्‍तीवादाचा विचार करता पुढील  मुद्दे निष्‍कर्षासाठी मुद्दे उपस्थित होतात. 

               मुद्दे                                                                     उत्‍तरे  

 1    वि.प. विमा कंपनीने  तक्रारदारांना

     द्यावयाच्‍या सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ?                     नाही.

2.   आदेश काय ?                                                              तक्रार अर्ज नामंजूर.

                                           

कारणमीमांसा:-

मुद्दा क्र. 1    

     प्रस्‍तुत कामी यातील  तक्रारदार यांचे पती दि.19-06-2010 रोजी कोल्‍हापूरहुन कुरुंदवाड येथे मोटरसायकलवरुन चालले असताना टाकवडे गावाजवळ त्‍यांचा अपघात झाला.   तदनंतर  त्‍यांना इंदिरा गांधी हॉस्‍पीटल, इचलकरंजी येथे अॅडमिट केले असता उपचार चालू असताना दि. 19-06-2010 रोजी मयत झाले.  त्‍याचे उपचाराकरिता रक्‍कम रु. 4000 ते रु. 5000/- इतका खर्च आला आहे.  तक्रारदाराचे पती यांनी सदर अपघातातील मोटर सायकलचा विमा वि.प. कडे उतरविला होता. सदर विम्‍यामध्‍ये PA to Owner समाविष्‍ट  होता.  त्‍यामुळे तक्रारदाराने विमा कंपनीकडे क्‍लेम दाखल केला असता वि.प. विमा कंपनीने क्‍लेम दिला नाही.  त्‍यामुळे प्रस्‍तुत तक्रार नुकसानभरपाई मिळणेकरिता दाखल केलेली आहे.  सदर कामी वि.प. यांनी हजर होऊन तक्रारदारांचे मयत पती यांचेकडे अपघाताचे वेळी “वैध व परिणामकारक वाहन चालविणेचा परवाना नसलेने क्‍लेम देय होत नाही असे म्‍हणणे दाखल केलेले आहे.  सबब, प्रस्‍तुत कामी तक्रारदारांचे मयत पती यांचेकड अपघातावळी मोटर सायकल चालविणेचा वैध व परिणामकारक वाहन चालविणेचा परवाना होता का ? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो.

      सदरचे मुद्दयाचे अनुषंगाने या मंचाने तक्रारदाराने दाखल केलेल्‍या कागदपत्रांचे अवलोकन  केले. तक्रारदाराने तक्रारीसोबत यादीने वर्दी जबाब, पंचनामा, पी.एम.रिपोर्ट, विमा पॉलिसी इत्‍यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत. सदरचे कागदपत्रामधील वर्दी जबाब पाहिला असता यातील  तक्रारदार यांचे मयत पतीचा दि.19-06-2010 रोजी अपघात झाला हे नमूद आहे.  तसेच तक्रारदाराने त्‍यांचे मयत पतीचे वाहन परवाना या कामी दाखल केलेला आहे.  तो पाहिला असतk सदरचे परवानावरती  AR असे नमूद आहे तसेच तक्रारदाराने  या कामी आर.टी.ओ. कोल्‍हापूर यांचा दाखला दि. 19-03-2015 रोजीचा दाखल केला आहे तो पाहिला असता त्‍यामध्‍ये Class of License समोर A/R (NT) तसेच Additional Class A/R (Tr) असे नमूद आहे.  सदरचे कागदपत्रांवरुन तक्रारदाराचे मयत पतीचे रिक्षाचे लायसन्‍स होते हे स्‍पष्‍ट होते.  प्रस्‍तुत कामातील वि.प.  यांनी तक्रारदाराचे मयत पती हे अपघाताचे वेळी गिअर असलेली  मोटर सायकल चालवित होते व त्‍यावेळी त्‍यांचेकडे सदरचे वाहन चालविणेचा वैध परवाना नव्‍हता त्‍यामुळे विमा पॉलिसीतील अटींचा भंग झाल्‍याने विमा क्‍लेम देयत होत नसल्‍याने विमा दावा नाकारला आहे असा बचाव घेतलेला आहे व त्‍याअनुषंगाने त्‍यांनी विमा पॉलिसी दाखल केली आहे.  सदरची पॉलिसी पाहिली असता त्‍यामधील DRIVERS CLAUSE पुढीलप्रमाणे आहे. “Any persons or Classes of person entitled to drive – Any person  including  the insured: Provided that a person driving holds an effective driving license at the time of the accident and is not disqualified from holding or obtaining such a license.”. त्‍याचप्रमाणे मोटर वाहन कायदा कलम 10 Form and Contents of licences to driver, Class of Vehicle मध्‍ये नमूद केलेले वाहनांचे वर्गीकरण नमूद  असुन ते खालीलप्रमाणे आहे. 10. Form and contents of licences to drive.—

(1) Every learner’s licence and driving licence, except a driving licence issued under section 18, shall be in such form and shall contain such information as may be prescribed by the Central Government.

(2) A learner’s licence or, as the case may be, driving licence shall also be expressed as entitling the holder to drive a motor vehicle of one or more of the following classes, namely:—

(a) motor cycle without gear;

(b) motor cycle with gear;

(c) invalid carriage;

(d) light motor vehicle; 1[(e) transport vehicle;] 1[(e) transport vehicle;]"

(i) road-roller;

(j) motor vehicle of a specified description.

     उपरोक्‍त कलमानुसार मोटर चालकाकडे सदर वर्गीकरणात नमूद प्रमाणे वाहन चालविण्‍याचा परवाना आवश्‍यक आहे.  प्रस्‍तुत कामातील मयत सलीम मुल्‍ला हा अपघाताचेवेळी मोटर सायकल चालवित होता. त्‍यावेळी त्‍याचेकडे रिक्षाचे लायसन्‍स होते परंतु त्‍याचेकडे मोटर सायकल चालविण्‍याचा वैध परवाना नव्‍हता.  त्‍यामुळे वि.प. म्‍हणतात त्‍याप्रमाणे तक्रारदाराचे पतीकडे अपघातावेळी वाहन चालविण्‍याचा वैध परवाना नव्‍हता हे शाबीत होते.    

    त्‍याचप्रमाणे वि.प. यांनी आपले म्‍हणणेचे पृष्‍टयर्थ  खाली नमूद  मा. उच्‍च न्‍यायालयाचे तसेच मा. राष्‍ट्रीय आयोगाचे न्‍यायनिवाडे दाखल केले आहेत ते खालीलप्रमाणे-

1) 2012 ACJ 1011 HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY

    Nagpur Bench.

Manager, United India Insurance Company Ltd.       – Appellant

               V/S.

Kamalabai Mukunda Kumare and Others             - Respondents

       Motor Vehicles Act, 1988, section 149(2) (a) (ii) – Motor insurance – Driving licence – Liability of insurance company – Insurance company disputed its liability on the ground that driver was holding a licence to drive auto- rickshaw but he was driving a motor cycle at the time of accident – Tribunal directed the insurance company to pay compensation to the claimants – Policy containing a clause that driver must possess a valid and effective driving licence and if a person is found driving vehicle of class which he is not  authorized to drive that can be treated as a breach of condition of policy and insurance company will be absolved from liability – Whether the Tribunal  was justified in directing the insurance company to pay compensation and then recover the same from the owner of vehicle – Held: no; such direction can be issued by Apex Court under Article 141 of the Constitution of India and such direction cannot be given by High Court; owner alone is liable.            

2) 2014 (I) (CPR) 272 (SC) SUPREME COURT OF INDIA

Ram Babu Tiwari                     - Appellant

V/S.

United India Insurance Co. Ltd.       – Respondent

      Consumer Protection Act, 1986 – Section 23 – Motor Vehicle Act, 1988 – Section 15 Insurance – Death in accident – Claim repudiated on ground of not having valid license – Complaint dismissed by High Court – Defence on part of insurance company that vehicles involved in accident was not being driven by a driver having a valid driving license would be a valid one – It is a case where a breach of contract of insurance is established – There is not infirmity in impugned judgement – Appeals dismissed.          

     उपरोक्‍त नमूद केलेले न्‍यायनिवाडयातील मते या तक्रारीशी साम्‍य दर्शवित असल्‍याने सदरचे न्‍यायनिवाडयातील मते या ठिकाणी हे मंच विचारात घेत आहे.

     सबब, वरील सर्व विवेचनाचा विचार करता तक्रारदारांचे पतीचे अपघाताचे वेळी मोटर सायकल चालविताना मोटर वाहन कायदा तसेच विमा पॉलिसीतील तरतुदीप्रमाणे वैध व परिणामकारक वाहन परवाना नव्‍हता या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.  त्‍यामुळे  वि.प. यांनी तक्रारदाराचे पतीकडे वैध परवाना नसल्‍याने विमा पॉलिसीचे अटींचा भंग झाल्‍याने विमा दावा नाकारला आहे व सदरचे कारण हे योग्‍य आहे असे या मंचाचे मत आहे.  सबब, वि.प. यांनी तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत कोणतीही त्रुटी केलेली नाही असे या मंचाचे मत आहे. सदर मुद्दा  क्र. 1 चे उत्‍तर हे मंच नकारार्थी देत आहे.                       

  मुद्दा क्र. 2    सबब हे मंच या प्रकरणी पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.                

                                        दे

1.    तक्रारदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करणेत येतो.

2.    खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत. 

3.    सदर आदेशाच्‍या प्रमाणीत प्रती उभय पक्षकारांना विनामुल्‍य पाठविण्‍यात याव्‍यात.

 

 
 
[HON'ABLE MR. Sanjay P. Borwal]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. Dinesh S. Gavali]
MEMBER
 
[HON'ABLE MRS. Rupali D. Ghatage]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.