द्वारा- श्री.ना.द.कदम...................मा.सदस्य.
1. सामनेवाले हि बँकिंग कंपनी आहे. तक्रारदार हे सामनेवाले यांचे करंट खातेधारक आहेत. तक्रारदारांनी शेअर खरेदीसाठी दिलेला धनादेश अयोग्य कारणासाठी सामनेवाले यांनी अनादर केल्याच्या बाबीतून प्रस्तुत वाद निर्माण झाला आहे.
2. तक्रारदाराच्या तक्रारींमधील कथनानुसार सामनेवाले यांच्या ठाणे येथील शाखेमध्ये तक्रारदाराचे करंट खाते असून या खात्यावर त्यांना रु. 5.40 लाख या रकमेची कॅश क्रेडिट सुविधा दिलेली आहे. दि. 05/01/2015 रोजी सदर खात्यावर एकूण 5.67 लाख रक्कम शिल्लक असताना त्यांनी त्या दिवशी रु. 2.46 लाख व 2.80 लाख रकमेचे दोन धनादेश शेअर्स खरेदीसाठी वेंचूरा सिक्युरिटीज यांना दिले. ते धनादेश दि 07/01/2015 रोजी क्लिअरिंगसाठी सामनेवाले यांच्या सर्व्हिस ब्रॅन्चमध्ये आले असता "सिग्नेचर नॉट स्कॅन्ड" या शेऱ्यासह अनादर होऊन परत आले. यांनतर ते धनादेश पुन्हा दि. 10/01/2015 रोजी क्लिअरिंगसाठी पाठविले असता पुन्हा त्याच कारणासह न वठवीता परत आले. त्यामुळे तक्रारदार शेअर्स खरेदी विक्रीचा व्यवहार करू शकले नाहीत. परिणामतः त्याना रु 10 लाख रुपयांपेक्षा ज्यास्त नुकसान झाले. याबाबत सामनेवाले यांना वेळोवेळी संपर्क साधूनही त्यांनी सकारात्मक अशी कोणतीही कार्यवाही केली नसल्याने प्रस्तुत तक्रार दाखल करून त्यांना झालेली नुकसानीची रक्कम रु 10 लाख मिळावी अशी मागणी केली आहे.
3. सामनेवाले यांनी लेखी कैंफियत दाखल करून तक्रारदाराचे सर्व आक्षेप फेटाळताना असे नमूद केले कि तक्रारदाराचे धनादेश दि. 07/01/2015 रोजी सामनेवाले यांच्या सर्व्हिस शाखेमध्ये क्लिअरिंगसाठी आले असता दुर्दैवाने त्या वेळी सर्व्हिस शाखेमध्ये इंटरनेट सुविधामध्ये बिघाड झाला होता. परिणामतः तक्रारदाराची धनादेशावरील सहीची पडताळणी करता आली नाही. या नंतर पुन्हा दोन्ही धनादेश दि.10/01/2015 रोजी क्लिअरिंग साठी पाठविले असता सर्व्हिस शाखेमध्ये त्या दिवशी सुद्धा इंटरनेट सुविधेमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने तक्रारदाराच्या सहीची पडताळणी करता न आल्याने धनादेश अनादर झाले. तथापि, दि. 14/01/2015 रोजी सदर धनादेशाचे अधिदान करण्यात आले. दि.07/01/2015 रोजी धनादेश अनादर झाल्यानंतर सामनेवाले यांना धनादेश अनादराबाबतचा अहवाल प्राप्त झाला नसल्याने ते तक्रारदाराशी संपर्क करू शकले नाहीत. धनादेशाच्या अनादर घटनेनंतर सामनेवाले यांना तांत्रिक बिघाडाची कल्पना दिली. एवढेच नव्हेतर त्यांना नुकसानभरपाई देण्याची तयारीही दाखविली. तथापि त्यांनी यास कोणताही प्रतिसाद न देता प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे. तक्रारदारांनी तक्रारीमध्ये मागणी केलेल्या नुकसानी बाबत कोणताही पुरावा सादर केला नसल्याने ते नुकसान भरपाई मिळण्यास ते पात्र नाहीत . सबब तक्रार फेटाळण्यात यावी.
4. उभय पक्षांनी पुरावा शपथपत्र तसेच लेखी युक्तिवाद दाखल केला. उभय पक्षांचा वाद प्रतिवाद, व कागदपत्रे यांचे वाचन मंचाने केले. तसेच त्यांचा तोंडी युक्तिवादही ऐकण्यात आला. त्या वरून प्रकरणामध्ये खालीलप्रमाणे निष्कर्ष निघतात.
अ) सामनेवाले यांच्या शाखेमध्ये तक्रारदाराचे करंट अकौंट क्रमांक 60194822589 असून सदर खात्यावर तक्रारदारास कॅश क्रेडिट रु. 5.40 लाख इतकी सुविधा सामनेवाले यांनी दिल्याची बाब, तसेच दि.07/01/2015 रोजी खात्यावर शिल्लक असेलेली रक्कम रु.27,338/- अधिक कॅश क्रेडिट रु. 5.40 लाख, अशी एकूण रक्कम रु 5.67 लाख शिल्लक असल्याची बाब सामनेवाले यांनी मान्य केली आहे. तसेच, तक्रारदारांच्या खात्यावर पुरेशी रक्कम शिल्लक असूनही तक्रारदाराचे दोन धनादेश, इंटरनेट बिघाडामुळे अनादर झाल्याची बाब सामनेवाले यांनी लेखी कैफियत , पुरावा शपथपत्र व लेखी आणि तोंडी युक्तिवादामध्ये मान्य केली आहे. एवढेच नव्हेतर तक्रारदारांना बँकेच्या धोरणानुसार योग्य ती नुकसान भरपाई देऊ केली होती हि बाब सुद्धा तक्रारदाराचे वकिलांनी तोंडी युक्तिवादाचे वेळी स्पष्टपणे नमूद केली होती. सबब, सामनेवाले यांनी तक्रारदाराचा धनादेश चुकीच्या करणाद्वारे अनादर करून त्रुटींची सेवा दिल्याची बाब सामनेवाले यांनी मान्यच केली आहे. त्यामुळे प्रकरणामध्ये आता दोन बाबीवर निर्णय घेणे आवश्यक आहे एक म्हणजे तक्रारदार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत का? व दुसरी म्हणजे नुकसान भरपाई मिळण्यास पात्र असल्यास नुकसान भरपाईच्या रकमेचे परिमाण quantum of amount किती?
ब) तक्रारदार हे 82 वर्षाचे वयोवृद्द सेवानिवृत्त नागरिक आहेत. त्यांचे सामनेवाले यांचे शाखेमध्ये करंट अकाउंट असून सामनेवाले यांनी तक्रारदारांना त्या खात्यावर रु. 5.40 लाख या रकमेची कॅश क्रेडिट सुविधा दिल्याचे उपलब्ध कागदपत्रावरून दिसून येते. शिवाय, त्यांनी दाखल केलेल्या कागदपत्रावरून ते शेअर्स ट्रेडिंग मध्ये लाखो रुपयांची उलाढाल नियमितपणे करत असल्याचे दिसून येते. त्यानुसार शेअर्स खरेदीसाठी त्यांनी दि.05/01/2015 रोजी मे. व्हेंच्युरा सिक्युरिटीज यांना 2.40 लाख व 2.80 लाख रकमेचे दिलेले दोन धनादेश सामनेवाले यांनी चुकीच्या कारणास्तव अनादर केल्याने तक्रारदार दि. 05/01/2015 ते दि.14/01/2015 दरम्यान सदर रकमेचा वापर शेअर्स खरेदी विक्रीसाठी करू शकले नाहीत हि बाब स्पष्ट होते. वर नमूद केल्याप्रमाणे तक्रारदार हे वयोवृद्द सेवानिवृत्त असल्याने, ते शेअर्स ट्रेडिंग हा व्यवसाय नफा कमविण्यासाठी करत नसुन आपले उर्वरित जीवनाचा चरितार्थ चालविण्यासाठी ट्रेडिंग करतात असे दिसून येते. शिवाय, सामनेवाले यांनी तक्रारदार हे शेअर्स ट्रेडिंग नफा कमविण्यासाठी व्यवसाय म्हणून करतात असा कोठेही उल्लख अथवा आक्षेप घेतलेला नाही. त्यामुळे तक्रारदाराचे धनादेश अनादर झाल्यामुळे ते नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत असे मंचास वाटते.
क) या संदर्भात मा रिझर्व्ह बँक ऑफ ईंडियiने तांत्रिक अडचणीमुळे अनादर झालेल्या धनादेशाबाबत दि. 7/5/2013 रोजी सर्व बँकांना मार्गदर्शक सूचना पाठवून, अशा प्रकरणामध्ये कशाप्रकारची तातडीची कार्यवाही करावी या बाबत खालील मार्गदर्शक सूचना केल्या असून संबंधित बँकांनी याची त्वरित अंमलबजावणी करण्याचे आदेशित केले आहे.
RBI/2012-13/493
DPSS.CO.CHD.No. 2030/03.06.01/2012-2013
May 7, 2013
The Chairman and Managing Director / Chief Executive Officer
All Scheduled Commercial Banks including RRBs /Local Area Banks
Urban Co-operative Banks / State Co-operative Banks /
District Central Co-operative Banks
Madam / Dear Sir,
Delay in re-presentation of technical return cheques and levy of charges for such returns
As you are aware, banks are expected to indicate the timeline for realisation of local/outstation cheques in their Cheque Collection policy(CCP) and charges for cheque returns to be levied in an upfront manner with due prior notice to the customers as enumerated in RBI circulars no. DPSS.CO. (CHD) No. 873 / 03.09.01 / 2008-09 dated November 24, 2008 and DBOD.No.Dir.BC. 56 /13.03.00/2006-2007 dated February 2, 2007 respectively.
2. However, recently, instances have been brought to our notice where banks are (i) levying cheque return charges even in cases where customers have not been at fault in the return and (ii) delaying the re-presentation of the cheques which had been returned by the paying बँकस under technical reasons. Both of these issues result in unsatisfactory customer service.
3. It is, therefore, considered necessary to streamline the procedure followed by all banks in this regard. Accordingly, banks are advised to adhere to the following instructions with immediate effect:
Cheque return charges shall be levied only in cases where the customer is at fault and is responsible for such returns. The illustrative, but not exhaustive, list of returns, where the customers are not at fault are indicated in the annex.
Cheques that need to be re-presented without any recourse to the payee, shall be made in the immediate next presentation clearing not later than 24 hours(excluding holidays) with due notification to the customers of such re-presentation through SMS alert, email etc.
4. Banks are accordingly advised to reframe their CCPs to include the procedures indicated in paragraph 3(i) and 3(ii) above, and may note to give publicity to their revised CCPs for better customer service and dissemination of information.
5. The above instructions are issued under Section 18 of the Payment and Settlement Systems Act, 2007 (Act 51 of 2007).
6. Please acknowledge receipt and confirm compliance.
Yours faithfully,
(Vijay Chugh)
Chief General मॅनेजर
Annx
".39 .. Image not clear; present again with पेपर"
ड) उपरोक्त नमूद परिपत्रकानुसार तांत्रिक कारणामुळे अनादर झालेले धनादेश पुढील 24 तासाच्या आत उपलब्ध असलेल्या क्लिअरिंगसाठी , तक्रारदारांना एसेमेस किंवा इमेल द्वारे किंवा अन्य साधनांद्वारे सूचना देऊन तात्काळ पाठविण्याचे आदेशित केले आहे. शिवाय अशा प्रकरणामध्ये धनादेश अनादर झाल्याबाबतचा आकार ग्राहकाच्या खात्यावयर खर्ची टाकू नये असे स्पष्ट केले आहे. प्रस्तुत प्रकरणात दि. 07/01/2015 रोजी धनादेश अनादर झाल्यानंतर तो 3 दिवसानी म्हणजे 10/1/2015 रोजी व 10/1/2015 रोजी अनादर झालेला धनादेश दि. 14/01/2015 रोजी क्लिअरिंगसाठी पाठविला असल्याचे दिसून येते. सबब सामनेवाले यांची सदर कृती हि रिझर्व्ह बँकेने दिलेल्या सूचनेचा भंग करणारी म्हणजे उपलब्द 24 तासाच्या आत क्लिअरिंगसाठी पाठविण्याच्या आदेशाचा भंग करणारी आहे. एवढेच नाही तर तांत्रिक कारणास्तव अनादर झालेल्या धनादेशाबाबतचा आकार ग्राहकाच्या खात्यामध्ये खर्ची टाकू नये अशी सक्त सूचना असताना दोन्ही अनादर झालेल्या धनादेशाबाबत तक्रारदाराच्या खात्यामध्ये रु 169 आकार खर्ची दाखविण्यात आला व नंतर तो रिव्हर्स करण्यात आला. म्हणजेच सामनेवाले यांनी रिझर्व्ह बँकेच्या आदेशाचे उल्लन्घन केले असल्याचे स्पष्ट होते.
इ) तक्रारदारांनी मागणी केल्लेल्या नुकसानभरपाई रु 10 लाख बाबत असे नमूद करावे वाटते कि सामनेवाले यांनी दि. 07/01/2015 ते दि. 13/01/2015 पर्यंत तक्रारदारांना त्यांच्या रक्कम रु 5.21 लाख चा विनियोग शेअर्स खरेदी व विक्रीसाठी करू दिला नाही, हि बाब स्वयं स्पष्ट आहे. तक्रारदारांनी मे. व्हेंचुरा सिक्युरिटीज यांना कोणत्या कंपनीचे किती शेअर्स खरेदीसाठी / विक्रीसाठी आदेशित केले होते या बाबतचा कोणताही पुरावा दिलेला नाही. तक्रारदारांनी दिलेले रु 10 लाख रकमेचे नुकसान दर्शिविणारे 1 पृष्ठ स्टेटमेंट हे नुकसानीचा नक्की तपशील देत नसल्याने त्याचा विचार करता येत नाही.
या शिवाय इथे असे हि नमूद करणे आवश्यक वाटतेकी सामनेवाले यांनी आपली चूक मान्य करून तक्रारदारांना नुकसान भरपाईबद्दल बोलणी करण्यासाठी सूचना केली होती. त्यामुळे सामनेवाले यांच्या सकारात्मक वर्तणुकीचा विचार नुकसान भरपाईची रक्कम आदेशित करताना विचारात घेणे आवश्यक होईल असे मंचास वाटते. अशाच प्रकारच्या धनादेश अनादर प्रकरणामध्ये सामनेवाले यांच्या सकारात्मक वृत्तीची मा. राष्ट्रीय आयोगाने दाखल घेऊन, जिल्हा मंचाने दिलेली रु. 6 लाख रकमेची नुकसान भरपाई मा. राज्य आयोगाने केवळ धनादेशाच्या रकमेएवढीच म्हणजे रु 13486/ इतकी मर्यादित केली व राज्य आयोगाचे आदेश मा. राष्ट्रीय आयोगाने खालील प्रकरणामध्ये कायम केले.
NATIONAL CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION
NEW दिल्ली, REVISION PETITION NO. 3305 OF 2008
(Against the order dated 01.07.2008
in Appeal No.331/2005 of the State Commission, Tamil Nadu)
M/S COIMBATORE EARTHMOVERS AND POWER GENERATORS
A PARTNERSHIP FIRM REP. BY ITS PARTNER SHRI GURPREET SINGH
R/O 249, DR. NANJAPPA ROAD,
COIMBATORE – 18 ........ Petitioner (s)
Vs.
CANARA BANK
THROUGH SHRI R.V. SHASTRY,
CHAIRMAN
H.O. – 112, J.C. ROAD, BANGALORE-560001
" The State Commission vide its detailed order dated 1.7.2008 arrived at the finding that while the officials of the Bank indeed committed a mistake in returning the cheque for Rs.13,486/- when sufficient funds were available in the current account of the petitioner/complainant, the mistake had been quickly realized and necessary amends were sought to be made by the officials of the Bank by meeting the Managing partner and explaining to him thecircumstances under which the unhappy and unwarranted incident took place. After a thorough consideration of the entire episode, the State Commission was of the view that the petitioner/complainant ought to have shown the grace to condone the mistake. All the same, the State Commission modified the order of the District Forum and awarded the value of the cheque i.e. Rs.13,486/- to be paid by the respondent/opposite parties – Bank to the petitioner as against Rs.6 lakhs ordered by the District Forum while retaining the cost of litigation at Rs.5000/-.
The fact that even after the incident, the petitioner/complainant continues to maintain his accounts and carries on his business activities through transaction from the same Bank A/c goes to show that there has been no damage, much less serious damage to the reputation of the petitioner. The un-pleasantness over such incidents last for a short while and as seen from the facts of the case, it had perhaps been forgotten but for some reason which we are not able to appreciate, the petitioner/ complainant has preferred to revive the same, which is not justified.
We do not find that the State Commission has committed any illegality or has exercised its jurisdiction illegally. The revision under the circumstances, is dismissed, however, with no order as to cost."
इ) मा. राष्ट्रीय आयोगापुढील उपरोक्त प्रकरणात अनादरीत धनादेशाचे दर्शनी मूल्य केवळ रु. 13486/ होते. व तेवढेच मूल्य नुकसान भरपाई म्हणून तक्रारदारांना देण्यात आले. तथापि प्रस्तुत प्रकरणामधील तक्रारदाराच्या दोन अनादरीत धनादेशामधील मूल्य रु. 5.21 लाख पेक्षाही जास्त होते. मा. राष्टीय आयोगाचे उपरोक्त निकष प्रस्तुत प्रकरणास लावल्यास तक्रारदार रु. 5.21 लाख या नुकसानभरपाईस पात्र होतात. तथापि प्रस्तुत प्रकरणातील धनादेश अनादर होण्याचे कारण हे कर्मचाऱ्याचा निकाळजीपणा किंवा अन्य तत्सम मानविय चुक हे कारण नसून तत्कालीन इंटरनेट सुविधेमधील तांत्रिक बिघाड हे आहे. या शिवाय सामनेवाले यांनी सदर घटना घडल्या नंतर तक्रारदारशी संवाद साधून नुकसान भरपाई देण्याची तयारीही दर्शविल्याचे दिसून येते. या सर्व बाबींचा विचार, नुकसान भरपाई ठरविताना करणे आवश्यक आहे असे मंचास वाटते.
ई) प्रस्तुत प्रकरणातील सर्व बाबींचा विचार करता व विशेषतः सामनेवाले यांच्या इंटरनेट सुविधेमधील तांत्रिक अडचणीमुळे धनादेश अनादर झाल्यामुळे व चूक दुरुस्त करण्यासाठी अपरिहार्यतेमुळे झालेला कांहीसा विलंब, पर्यायाने, रिझर्व्ह बँकेच्या आदेशाचे अपरिहार्यतेमुळे झालेले उल्लन्घन या बाबी विचारात घेतल्यास तक्रारदार हे रु. 50,000/- इतकी नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत असे मंचास वाटते.
5. उपरोक्त चर्चेवरून व निष्कर्षावरून खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
1) तक्रार क्र. 142/206 अंशतः मंजूर करण्यात येते.
2) सामनेवाले यांनी तक्रारदाराचे धनादेश चुकीच्या करणाद्वारे अनादर करून त्रुटींची सेवा दिल्याचे जाहीर करण्यात येते.
3) तक्रारदाराचे धनादेश, सामनेवाले यांच्या अपरिहार्यतेमुळे अनादर झाल्याने तक्रारदारांना झालेल्या आर्थिक नुकसानीसाठी, व मानसिक त्रासासाठी एकूण रु. 50,000/- (अक्षरी रु. पंन्नास हजार फक्त) सामनेवाले यांनी तक्रारदारांना दि 20/12/2016 पूर्वी दयावेत. आदेशपुर्ती नमूद कालावधीमध्ये न केल्यास दि 21/12/2016 पासून 6% व्याजासह संपूर्ण रक्कम तक्रारदारांना द्यावी.
4) तक्रार खर्चाबद्दल बद्दल रु. 3,000/- (अक्षरी रु. तीन हजार फक्त) दि. 20/12/2016 पूर्वी सामनेवाले यांनी तक्रारदारांना द्यावेत.
5) आदेशाच्या प्रति विनाविलंब, विनाशुल्क उभय पक्षांना पाठविण्यात याव्यात.