// तक्रार दाखलकामी आदेश //
द्वारा – श्रीमती. स्नेहा म्हात्रे, अध्यक्षा
तक्रारदार म्हणून श्री. निखील नवीनचंद्र साईता हजर. प्रस्तूत तक्रार दाखल करणेकामी त्यांचा युक्तिवाद ऐकण्यात आला. सदर प्रकरणामध्ये तक्रारदारांनी झवेरी बाझार ब्रँच बॅंक ऑफ बरोडा यांच्याविरुध्द त्यांनी तक्रारदारांचा रक्कम रु. 50,00,000/- चा धनादेश दोनवेळा चुकीची कारणे देऊन वटविला नसल्याने सामनेवाला यांनी तक्रारदारांना त्रुटीची सेवा दिली असे निवेदन करुन दाखल केली आहे. तक्रारीसह जोडलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता, सदर धनादेश हा रक्कम रु. 50,00,000/- चा असून तक्रारीमधील वाद विषयाची रक्कम ही रु. 50,00,000/- असल्याचे दिसून येते व चुकीच्या पध्दतीने सामनेवाला यांनी तक्रारदाराचा धनादेश वटवण्यास नकार दिल्याने wrongful dishonour बाबत तक्रारदारांनी सामनेवाला यांचेकडून रक्कम रु. 1,00,000/- ची मागणी केली आहे व मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्हणून रक्कम रु. 1,00,000/- देण्यात यावे असे प्रार्थना कलमात नमूद केले आहे.
ग्रासंका 1986 च्या कलम 11(1) अन्वये खालीलप्रमाणे नमूद आहे.
“ Section 11(1) Subject to the other provisions of this Act the District Forum shall have jurisdiction to entertain complaints where the value of the goods or services and the compensation if any claimed does not exceed Rs.20,00,000/-”.
सबब प्रस्तूत तक्रारीत नमूद वादविषय असलेल्या धनादेशाची रक्कम रु.50,00,000/- आहे व त्याव्यतिरिक्त तक्रारदारांनी तकारीच्या प्रार्थना कलमामध्ये मागणी केलेल्या रकमेचा एकत्रितपणे विचार केला असता, प्रस्तूत तक्रार मंचाच्या आर्थिक कार्यक्षेत्राबाहेर जात असल्याचे दिसून येते. तसेच तक्रारदारांनी तक्रारदार व त्यांच्या आईचे एकत्रितपणे सदर बचत खाते असल्याचे नमूद केले असले तरी ते सिध्द करण्यासाठी संबंधित पासबुकच्या प्रथम पृष्टाची प्रत अभिलेखावर दाखल केलेली नाही. तसेच सदर प्रकरणामध्ये श्रीमती. चंद्रिका साईता यांचे नाव तक्रारदार म्हणून तक्रारीच्या शिर्षकामध्ये नमूद नाही. परंतु केवळ तांत्रिक बाबींमुळे तक्रारदाराचे नुकसान होऊ नये या हेतूने तक्रारीत नमूद वादविषय संदर्भात तक्रारदारांनी योग्य त्या आयोगात / न्यायालयात तक्रारीत नमूद कारणास्तव नवीन तक्रार दाखल करण्याची तक्रारदारांना मुभा देऊन प्रस्तूत तक्रार कार्यक्षेत्राअभावी दाखल टप्प्यावर असताना निकाली काढण्यात येते. खर्चाबाबत आदेश नाहीत.