Maharashtra

Nagpur

CC/432/2020

ANIL ANAND KADSE - Complainant(s)

Versus

BANK OF BARODA THROUGH MANAGER - Opp.Party(s)

ADV. HEMANT B. MADANKAR

28 Mar 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/432/2020
( Date of Filing : 23 Oct 2020 )
 
1. ANIL ANAND KADSE
R/O. PLOT NO.34/B SHAKTI MATA NAGAR, NANDANWAN, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. BANK OF BARODA THROUGH MANAGER
KOTHIRAM CHAMBERS GRURU DEO NAGAR ROAD, NANDANVAN, NAGPUR-440009
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:ADV. HEMANT B. MADANKAR, Advocate for the Complainant 1
 
Dated : 28 Mar 2022
Final Order / Judgement

आदेश पारीत व्‍दारा  श्री. एस आर आजने मासदस्‍य

  1. तक्रारदाराने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा २०१९ च्‍या कलम ३५(1) नुसार दाखल केलेली आहे
  2. वि.प. ही व्यवसायाने बॅंक असुन ग्राहकांना कर्ज तसेच क्रेडीट कार्डची सेवा पूरविते. तक्रारदाराने वि.प.कडुन सन-2018 मध्‍ये क्रेडीट कार्डची सेवा घेतली होती व त्याचा नंबर 5320999900795452 असा आहे. तक्रारकर्ता क्रेडीट कार्डचे देयक व सेवाशुल्क नियमित भरीत होता. वि.प.ने तक्रारदाराला माहे जूलै-2019 ते डिसेंबर 2019 पर्यत क्रेडीट कार्डचे विवरण पाठविणे बंद केले. तक्रारदाराने वि.प.ला विवरण पाठविण्‍याबाबत अनेकदा विनंती केली परंतु वि.प. विवरण पाठविण्‍याबाबत इच्छुक दिसला नाही. तक्रारदाराला विवरणपत्र नसतांनाही वसूली अधिका-याच्या सांगण्‍यावरुन महिन्याला देय असणारे किमान रक्कम भरीत होता. तक्रारदाराचे असे निर्देशनास आले की, त्यांने कोणताही व्यवहार केलेला नसतांना त्याला देय असलेली किमान देय रक्कम त्यामधे दिवसेदिवस वाढ होत आहे त्यामूळे किमान देय रक्कम का वाढत आहे याबाबत चौकशी केली असता त्यावेळी तक्रारदाराला माहे जानेवारी 2020 मधे जूलै-2019 ते डिसेंबर 2019 पर्यतचे क्रेडीट कार्डचे विवरणपत्र पूरविण्यात आले. तक्रारदाराने कोणत्याही प्रकारचे अधिकार कोणालाही दिले नसतांना पेटीएम नॉएडा www.Paytm.in, Paytm.visa.direct, 197 बाबत आणि इतर व्यवहार करण्‍यात आले. ज्याबाबत तक्रारदाराला काहीही माहिती नाही व तक्रारदाराचे PAYTM  मधे खाते नसतांना व त्यांने क्रेडीट कार्डची सेवा घेतली नसतांना तकारदाराचे क्रेडीट कार्ड व्दारे अनाधिकृत दस्तऐवज क्रमांक 5,6,7, वर नमुद केल्याप्रमाणे खरेदी करण्‍यात आल्याचे विवरण दाखल केले आहे. तक्रारदाराच्या क्रेडीट कार्डव्दारे रुपये 69,656/- एवढया रक्कमेच फसवणूकीचे व्यवहार करण्‍यात आले. ज्याकरिता तक्रारदाराने कोणालाही कोणतेही अधिकार व संमती दिली नव्हती. तक्रारदाराने वि.प.ला वारंवार विवरणपत्राची मागणी करुनही वि.प.ने विवरणपत्र दिले नाही ही वि.प.ची सेवेतील त्रुटी होय म्हणुन तक्रारदाराने सदर तक्रार आयोगा समक्ष दाखल करुन विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिल्याने ले ऑफ करण्‍याबाबत निर्देश देण्‍यात यावे. तसेच तक्रारदाराला झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी खर्च मिळावा अशी मागणी केली आहे.
  3. विरुध्‍द पक्षाला आयोगा मार्फत नोटीस पाठविण्‍यात आली असता वि.प. नोटीस प्राप्‍त होऊन सुध्‍दा आयोगा समक्ष हजर न झाल्‍याने त्‍यांच्‍या विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दिनांक 7.2.2022  रोजी पारित करण्‍यात आला.
  4. तक्रारकर्त्‍याने तक्रारी सोबत दाखल केलेले दस्‍तावेजांचे अवलोकन केले असता व तोंडी युक्तीवाद ऐकता खालील मुद्दे विचारार्थ घेण्‍यात आले.

मुद्दे                                       उत्तरे

  1. तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?             होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिल काय ?      होय
  3. विरुध्‍द पक्षाने अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केला काय ?  होय
  4. काय आदेश ?                             अंतिम आदेशानुसार

का र ण मि मां सा

  1. तक्रारदाराने बॅंक ऑफ बडोदा, नंदनवन या शाखेतुन क्रेडीट कार्डची सेवा घेतल्याचे नि.क्रं. 2(5) वर दाखल बॅंकेने पूरविलेल्या विवरण पत्रावरून दिसून येते. यावरुन तक्रारकर्ता हा वि.प.चा ग्राहक आहे हे सिध्‍द होते. तक्रारदाराला वि.प. बॅकेने माहे जूलै-2019 या महिन्यातून त्याचे खात्यातून झालेल्या व्यवहाराबाबतचे एकुण रुपये 62,321/- चे विवरणपत्र दिनांक 1.8.2021 ला निर्गमित केल्याचे व त्याअन्वये तक्रारदाराकडे एकुण रुपये 62,321/-एवढी रक्कम देय असल्याचे व किमान देय रक्कम रुपये 5,330/- देय असल्याचे नि.क्रं.2(5) वरील दाखल विवरणपत्रावरुन निर्देशनास येते. भारतीय रिर्झव बॅंक यांचे पत्र क्रमांक RBI/2017-18/15, DBR No.Leg.BC.78/0 9.07.005/2017-18 नुसार Limited Liability of a Customer हे खालील प्रमाणे आहे.

“ (a) Zero Liability of a Customer

A customers entitlement to zero liability shall arise where the unauthorised transaction occurs in the following events:

(i)    Contributory fraud/negligence/deficiency on the part of  

the bank(irrespective of whether or not the transaction is reported by the customer)

(ii) Third party breach where the deficiency lies neither with the bank nor with the customer but lies elsewhere in the system, and the customer notifies the bank with three working days of receiving the communication from the bank regarding the unauthorised transaction.”

  1. तक्रारदाराने त्यांचे खात्यात क्रेडीट कार्ड व्दारे फसवणूक झाल्याबाबतची तक्रार रिर्झव बॅंकेच्या दिनांक 6.7.2017 चे वर नमुद सूचनेनूसार फसवणूक झाल्यापासून 3 दिवसाचे आत “बॅंकेचे निर्देशनास ” आणावयास पाहिजे होते. परंतु तक्रारदाराने नि.क्रं.2 वर दाखल दस्तऐवजांवरुन तक्रादाराने फसवणूकीची तक्रार उशीराने जानेवारी-2020 ला केल्याचे दिसून येते. तक्रारदाराने त्याच्या खात्यात क्रेडीट कार्डव्दारे झालेल्या फसवणूकीची दखल त्वरीत न घेतल्याचे आयोगाचे स्पष्‍ट मत आहे. तक्रारदाराने त्याच्या क्रेडीट कार्डव्दारे झालेल्या फसवणूकीच्या व्यवहाराची तक्रार उशीराने दाखल केल्याने तक्रारकर्ता रिझर्व बॅंकेच्या नियमानुसार भरपाई मिळण्‍यास पात्र होत नाही असे आयोगाचे स्पष्‍ट मत आहे. सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार खारीज करण्‍यात येते.
  2. तक्रारदाराने तक्रारीचा खर्च स्वतः सोसावा.

उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.

 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.