| Complaint Case No. CC/22/148 | | ( Date of Filing : 25 May 2022 ) |
| | | | 1. Smt.Pushpa Maroti Patewar | | Shri.Maroti Pimpalkar yanche ghari chavhan colony Tukum, Chandrapur | | Chandrapur | | Maharashtra | | 2. Suhas Maroti Patewar | | Shri.Maroti Pimpalkar yanche ghari chavhan colony Tukum, Chandrapur | | CHANDRAPUR | | MAHARASHTRA | | 3. Tejas Maroti Patewar | | Shri.Maroti Pimpalkar yanche ghari chavhan colony Tukum, Chandrapur | | CHANDRAPUR | | MAHARASHTRA |
| ...........Complainant(s) | |
| Versus | | 1. Balakrushna Prabhakar Nagose | | Ramnagar Satwai mata mandir Khat road Bhandara, T.Dist.Bhandara | | Bhandara | | MAHARASHTRA | | 2. Kamlakar Ghanashyam Kimatkar | | Khat road,Post office samor,Bhandara, T.Dist.Bhandara | | Bhandara | | MAHARASHTRA | | 3. Sau.Kanchan Kamalakar Kimatkar | | Khat road,Post office samor,Bhandara, T.Dist.Bhandara | | Bhandara | | MAHARASHTRA |
| ............Opp.Party(s) |
|
|
| Final Order / Judgement | :::नि का ल प ञ ::: (आयोगाचे निर्णयान्वये,सौ. कल्पना जांगडे (कुटे), मा. सदस्या,) (पारीत दिनांक ०३/०५/२०२३) - प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ चे कलम ३५ अन्वये दाखल केली असून तक्रारीचा थोडक्यात आशय खालिलप्रमाणे.
- तक्रारकर्ती क्रमांक १ ही मयत श्री मारोती मल्लाजी पाटेवार यांची पत्नी असून तक्रारकर्ता क्रमांक २ व ३ हे मयत श्री मारोती यांची मुले आहेत. श्री मारोती पाटेवार यांचे दिनांक ९/७/२०२१ रोजी कोरोना मुळे निधन झाले. विरुध्दपक्ष क्रमांक १ ते ३ यांचा जमीन खरेदी व विकसीत करुन विक्री करण्याचा व्यवसाय आहे. मयत मारोती पाटेवार यांचा मृत्यु झाल्यानंतर तक्रारकर्तीस त्यांच्या कागदपञाच्या फाईलमधून एक बयाणपञाचा लेख मिळून आला. त्या बयानपञानुसार मयत मारोती पाटेवार यांनी दिनांक २१/११/२०१० रोजी विरुध्द पक्ष क्रमांक १ यांचेकडून मौजा नागभीड येथील गट क्रमांक १५/१ मधील अकृषक भुखंड क्रमांक १४, एकूण आराजी १५४ चौरस मीटर (१६५७.६५ चौरस फुट) हा रुपये १५०/- प्रति फुट प्रमाणे एकूण रक्कम रुपये २,४८,८४७/- ला विकत घेण्याकरिता बयाणपञ केल्याचे निदर्शनास आले. त्या बयाणपञानुसार मयत श्री मारोती यांनी विरुध्द पक्ष क्रमांक १ यांना उपरोक्त भुखंड खरेदी करण्याच्या मोबदल्यात रुपये ७०,०००/- नगदी दिले व उर्वरित रक्कम रुपये १,६७,८४७/- ही फेब्रुवारी २०११ पर्यंत देण्याचे व विक्रीपञ करुन घेण्याचे ठरले, असे दिसून येते. तक्रारकर्ते क्रमांक १ ते ३ हे मयत मारोती चे वारसदार आहेत त्यामुळे ते विरुध्द पक्ष क्रमांक १ यांचे ग्राहक आहेत. तक्रारकर्त्यांना मयत मारोतीच्या मृत्यु नंतरच उपरोक्त भुखंडाच्या खरेदीबाबतचे बयाणपञाबाबत माहिती झाली. त्यामुळे त्यांनी विरुध्द पक्ष क्रमांक १ यांच्यासोबत नोव्हेंबर २०२१ मध्ये संपर्क साधला असता विरुध्द पक्ष क्रमांक १ यांनी तक्रारकर्त्यांना टाळले परंतु तक्रारकर्त्यानी बयाणपञाची अस्सल प्रत दाखविल्यानंतर त्यांनी कबूल केले की, मयत श्री मारोती ने उपरोक्त भुखंड विकत घेण्याकरिता बयाणपञ केले होते. तक्रारकर्त्यांनी विरुध्द पक्ष क्रमांक १ यांना उर्वरित रक्कम स्वीकारुन भुखंडाची विक्रीपञ करुन देण्याची मागणी केली असता विरुध्द पक्ष क्रमांक १ यांनी फोन करुन कळवितो असे सांगून परत पाठविले. विरुध्द पक्ष क्रमांक १ यांनी भुखंड खरेदी करुन देण्यास टाळाटाळ केल्याने तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष क्रमांक १ यांना दिनांक ३/३/२०२२ रोजी अधिवक्ता मार्फत नोटीस पाठवून उर्वरित रक्कम स्वीकारुन विक्रीपञ करुन देण्याची मागणी केली. नोटीस प्राप्त होऊन सुध्दा विरुध्द पक्ष क्रमांक १ यांनी नोटीसला उत्तर दिले नाही वा पूर्तताही केली नाही. तक्रारकर्त्यांनी यांनी तक्रार दाखल करण्याकरिता अधिवक्ता चे सांगण्यानुसार उपरोक्त भुखंडाचे सातबारा उतारा काढला असता त्या उता-यावरुन विरुध्द पक्ष क्रमांक २ व ३ हे सुध्दा भुखंडाचे सहमालक आहे असे दिसून आले. विरुध्द पक्ष क्रमांक १ ते ३ यांनी मौजा नागभीड, तहसील ब्रम्हपूरी, जिल्हा चंद्रपूर, गट क्रमांक १५/१ चे ०.७३ हेक्टर आर या भुखंडापैकी ०.६० हेक्टर आर कृषक जमीन निवासी प्रयोजनासाठी उपविभागीय अधिकारी, ब्रम्हपूरी यांचेकडे अकृषक करण्याकरिता परवानगी मागितली होती त्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी यांनी दिनांक ४/१२/२००७ रोजी जमीन निवासी प्रयोजनार्थ उपयोगासाठी अकृषक म्हणून परावर्तीत केली. त्यानंतर विरुध्दपक्ष क्रमांक १ ते ३ यांनी सदर अकृषक जमीनीमध्ये भुखंड पाडले. त्यामधीलच भुखंड क्रमांक १४, एकूण आराजी १५४ चौरस मीटर हे मयत श्री मारोती यांनी विकत घेण्याकरिता बयाणपञ केलेले आहे असे दिसून आले. त्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्रमांक २ व ३ यांच्यासोबत परत विरुध्द पक्ष क्रमांक १ यांना दिनांक २०/०४/२०२२ रोजी अधिवक्ता मार्फत नोटीस पाठविला परंतु विरुध्द पक्ष क्रमांक १ ते ३ यांनी सदर नोटीस स्वीकारण्यास नकार दिल्याने ते तक्रारकर्त्यांना परत मिळाले. विरुध्द पक्ष क्रमांक १ ते ३ यांनी तक्रारकर्त्यांना उपरोक्त भुखंडाची उर्वरित रक्कम स्वीकारुन विक्रीपञ करुन न दिल्याने तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्रमांक १ ते ३ विरुध्द आयोगासमक्ष तक्रार दाखल करुन त्यामध्ये अशी मागणी केली आहे की, विरुध्द पक्ष क्रमांक १ यांनी मौजा नागभीड येथील अकृषक भुखंड क्रमांक १४, आराजी १५४ चौरस मीटर ची उर्वरित रक्कम रुपये १,६७,८४७/- स्वीकार करुन तक्रारकर्ते क्रमांक १ते ३ च्या नावे विक्रीपञ करुन द्यावे किंवा विरुध्द पक्ष क्रमांक १ ते ३ विक्रीपञ करुन देण्यास टाळाटाळ करीत असल्यास आयोगामार्फत विक्रीपञ करुन द्यावे अथवा भुखंडाचे विक्रीपञ करुन देण्यास कायदेशीर अडचण उद्भवल्यास बाजारभावाप्रमाणे उपरोक्त भुखंडाची किंमत ठरवून तक्रारकर्त्यांना विरुध्द पक्ष क्रमांक १ ते ३ यांनी वैयक्तिक वा संयुक्तीकरित्या द्यावी तसेच तक्रारकर्त्यांना झालेल्या शारीरिक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई दाखल रुपये २,००,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये २०,०००/- विरुध्द पक्षांनी वैयक्तिक वा संयुक्तीकरित्या तक्रारकर्त्यांना द्यावे, अशी प्रार्थना केली आहे.
- तक्रारकर्त्याची तक्रार दाखल करुन विरुध्द पक्ष क्रमांक १ ते ३ यांना आयोगामार्फत नोटीस काढण्यात आली. तक्रारकर्त्याने दिनांक १३/१२/२०२२ रोजी पुरसीस सोबत दाखल केलेल्या पोस्टाच्या ट्रॅक रिपोर्टवरुन ‘Item returned unclaimed’ असे नमूद आहे तसेच लिफाफे परत आलेले आहेत. unclaimed म्हणजेच नोटीस प्राप्त झाली असे कायद्यामध्ये गृहीतक आहे. त्यामुळे आयोगाने विरुध्द पक्ष क्रमांक १ ते ३ यांचे विरुध्द दिनांक १३/१२/२०२२ रोजी निशानी क्रमांक १ वर प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश पारित करण्यात आला.
- तक्रारकर्ता क्रमांक १ ते ३ यांनी दाखल केलेली तक्रार, दस्तावेज, तक्रारकर्त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीलाच त्यांचा पुरावा समजण्यात यावा, अशी पुरसीस, लेखी युक्तिवाद व तोंडी युक्तिवाद यावरुन तक्रार निकालीकामी खालील मुद्दे आयोगाच्या विचारार्थ घेण्यात आले व त्याबाबतची कारणमीमांसा आणि निष्कर्ष पुढीलप्रमाणे.
अ.क्र. मुद्दे निष्कर्ष १. तक्रारकर्ते क्र. १ ते ३ हे विरुध्द पक्ष क्र. १ चे ग्राहक आहेत कायॽ होय २. तक्रारकर्ते क्र. १ ते ३ हे विरुध्द पक्ष क्र. २ व ३ नाही चे ग्राहक आहेत कायॽ ३. विरुध्द पक्ष क्रमांक १ यांनी तक्रारकर्त्यांप्रती होय न्युनतापूर्ण सेवा दिली आहे कायॽ ४. आदेश कायॽ अंतिम आदेशाप्रमाणे कारणमीमांसा मुद्दा क्रमांक १ बाबतः- - तक्रारकर्ती क्रमांक १ चे मयत पती व तक्रारकर्ता क्रमांक २ व ३ चे वडिल श्री मारोती मल्लाजी पाटेवार यांनी दिनांक २१/११/२०१० रोजी विरुध्द पक्ष क्रमांक १ यांचेकडून ‘मौजा नागभीड, तहसील नागभीड, जिल्हा चंद्रपूर’ येथील गट क्रमांक १५/१ मधील अकृषक भुखंड क्रमांक १४, एकूण आराजी १५४ चौरस मीटर (१६५७.६५ चौरस फुट) प्रति चौरस फुट रुपये १५०/- प्रमाणे खरेदी करण्याकरिता रुपये ७०,०००/- रोख रक्कम विरुध्द पक्ष क्रमांक १ ला दिली व उर्वरित मोबदला रक्कम रुपये १,७८,६४७/- देऊन फेब्रुवारी २०११ चे शेवटी विक्रीपञ करुन घेण्याचे ठरले, या संदर्भात विरुध्द पक्ष क्रमांक १ यांनी मयत मारोती यांना बयाणपञ करुन दिले. तक्रारकर्त्यांनी सदर अस्सल बयाणपञ प्रकरणात दाखल केलेले आहे. यावरुन मयत मारोती हा विरुध्द पक्ष क्रमांक १ यांचा ग्राहक होता व त्याचे मृत्युनंतर तक्रारकर्ते क्रमांक १ ते ३ हे मयतचे कायदेशीर वारस असल्याने ते सुध्दा विरुध्द पक्ष क्रमांक १ यांचे ग्राहक संरक्षण कायदा, कलम २(७) नुसार ग्राहक आहेत व त्यामुळे त्यांना सुध्दा ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ चे कलम २(५)(६) अंतर्गत विरुध्द पक्ष क्रमांक १ चे विरुध्द तक्रारकर्ते म्हणून तक्रार दाखल करण्याचा अधिकार आहे. सबब मुद्दा क्रमांक १ चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रमांक २ बाबतः- - तक्रारकर्त्यांनी दाखल केलेल्या सातबारा वरुन उपरोक्त गट क्रमांक १५/१ मधील भुखंड क्रमांक १४ हा विरुध्द पक्ष क्रमांक १ ते ३ यांचे नावे असून सामाईक क्षेञ असल्याचे नमूद आहे. तक्रारकत्यांनी सदर अस्सल बयाणपञ, सातबारा उतारा, उपविभागीय अधिकारी, ब्रम्हपूरी यांच्या आदेशाची नक्कल प्रत प्रकरणात दाखल केली आहे. विरुध्द पक्ष क्रमांक २ व ३ यांनी मयत मारोती यांचेसोबत उपरोक्त भुखंडाचे विक्रीबाबत कोणताही व्यवहार केल्याचे तसेच मोबदला रक्कम स्वीकारल्याचे सुध्दा बयाणपञावरुन स्पष्ट होत नाही. तसेच तक्रारकर्त्यांनी सुध्दा मयत मारोती ने विरुध्द पक्ष क्रमांक २ व ३ यांचेसोबत भुखंड खरेदीचा व्यवहार वा मोबदला रक्कम दिल्याबाबत कोणताही दस्तावेज दाखल केला नाही. विरुध्द पक्ष क्रमांक २ व ३ सोबत उपरोक्त भुखंड विक्रीबाबत कोणताही व्यवहार झालेला नाही त्यामुळे मयत हा विरुध्द पक्ष क्रमांक २ व ३ यांचा ग्राहक नाही त्यामुळे त्यांचे कायदेशीर वारस तक्रारकर्ते क्रमांक १ ते ३ हे सुध्दा विरुध्द पक्ष क्रमांक २ व ३ यांचे ग्राहक नाही. सबब मुद्दा क्रमांक २ चे उत्तर नकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रमांक ३ बाबतः- - मयत श्री मारोती पाटेवार यांचा दिनांक ९/७/२०२१ रोजी मृत्यु झाल्यानंतर तक्रारकर्त्यांना मयत मारोती यांचे फाईलमध्ये विरुध्द पक्ष क्रमांक १ यांनी उपरोक्त भुखंड विक्री बाबतचे अस्सल बयाणपञ मिळाल्यामुळे त्यांना मयत व विरुध्द पक्ष क्रमांक १ यांनी केलेल्या व्यवहाराबाबत माहिती झाल्यामुळे त्यांनी विरुध्द पक्ष क्रमांक १ यांचेसोबत प्रत्यक्ष संपर्क साधून त्यांना अस्सल बयाणपञ दाखवून उपरोक्त भुखंड क्रमांक १४ चे उर्वरित मोबदला रक्कम घेऊन विक्रीपञ करुन देण्याची मागणी केली तेव्हा त्यांनी नंतर फोन करुन कळवितो असे सांगून तक्रारकर्त्यांना परत पाठविले. तक्रारकर्त्यांनी विरुध्द पक्ष क्रमांक १ यांना ब-याचवेळा फोन करुन विक्रीपञ करुन देण्याची मागणी केली परंतु त्यांनी विक्रीपञ करुन देण्याचे टाळल्यामुळे तक्रारकत्यांनी विरुध्द पक्ष क्रमांक १ यांना दिनांक ३/३/२०२२ रोजी अधिवक्ता मार्फत नोटीस पाठविली. नोटीस प्राप्त होऊन सुध्दा विरुध्द पक्ष क्रमांक १ यांनी नोटीसला उत्तर दिले नाही वा पूर्तताही केली नाही व त्यानंतर तक्रारकर्त्यांनी परत विरुध्द पक्ष क्रमांक १ यांना दिनांक २०/०४/२०२२ रोजी अधिवक्ता मार्फत नोटीस पाठविला परंतु त्यांनी सदर नोटीस स्वीकारण्यास नकार दिल्याने ते तक्रारकर्त्यांना परत मिळाले. बयाणपञावरुन मयत मारोती याने विरुध्द पक्ष क्रमांक १ यांना उपरोक्त भुखंड खरेदी करण्याकरिता मोबदला रक्कम रुपये ७०,०००/- दिलेले आहे हे स्पष्ट होते. विरुध्द पक्ष क्रमांक १ यांनी उर्वरित मोबदला रक्कम स्वीकारुन उपरोक्त भुखंड क्रमांक १४ चे पंजिबध्द विक्रीपञ तक्रारकर्त्यांना करुन दिले नाही तसेच घेतलेली मोबदला रक्कमही परत केली नाही. विरुध्द पक्ष क्रमांक १ यांनी विक्रीपञ करुन न दिल्याने तक्रार दाखल करण्यास सततचे कारण घडत आहे. विक्रीपञ करुन न देणे तसेच स्वीकारलेली मोबदला रक्कम परत न करणे ही विरुध्द पक्ष क्रमांक १ ची कृती तक्रारकर्त्यांप्रति न्युनतापूर्ण सेवा दर्शविते, या निष्कर्षाप्रत आयोग आलेले आहे. याशिवाय विरुध्द पक्ष क्रमांक १ यांनी तक्रारीत हजर होऊनही आपले बचावापुष्ठर्थ काही दाखल केले नाही व तक्रारकर्त्यांचे तक्रारीतील कथन सुध्दा खोडून काढलेले नाही. विरुध्द पक्ष क्रमांक १ यांनी २०१० मध्ये मयत मारोती यांचेकडून मोबदला रक्कम स्वीकारुन भुखंड विक्रीबाबत बयाणपञ करुन दिले होते परंतु विरुध्द पक्ष क्रमांक २ व ३ यांनी उपरोक्त भुखंडाचे विक्रीबाबत रक्कम स्वीकारल्याचे व बयाणपञ करुन दिल्याचे स्पष्ट होत नाही. अशा परिस्थितीत वस्तुस्थितीचा विचार करता उपरोक्त भुखंडाची विक्रीपञ करुन देण्यास कायदेशीर अडचण निर्माण झाली आहे त्यामुळे तक्रारकर्ते क्रमांक १ ते ३ हे फक्त विरुध्द पक्ष क्रमांक १ यांचे कडूनच मयत मारोतीने उपरोक्त भुखंडाचे किंमतीपोटी दिलेली रक्कम रुपये ७०,०००/- तसेच त्या रकमेवर विक्रीपञ करुन देण्याचे ठरलेल्या फेब्रुवारी २०११ पासून व्याज तसेच तक्रारकर्त्यांना झालेल्या शारीरिक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई रक्कम व तक्रार खर्च मिळण्यास पाञ आहे. विरुध्द पक्ष क्रमांक २ व ३ यांनी रक्कम स्वीकारलेली नसल्यामुळे ते कोणतीही रक्कम देण्यास जबाबदार नाही त्यामुळे त्यांचे विरुध्द कोणताही आदेश नाही, या निष्कर्षाप्रत आयोग आलेले आहे. सबब मुद्दा क्रमांक ३ चे होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रमांक ४ बाबतः- - मुद्दा क्रमांक १ ते ३ च्या विवेचनावरुन आयोग खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
अंतिम आदेश - तक्रारकर्ते क्रमांक १ ते ३ यांची तक्रार क्रमांक १४८/२०२२ अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्द पक्ष क्रमांक १ यांनी मौजा नागभीड येथील गट क्रमांक १५/१ मधील अकृषक भुखंड क्रमांक १४ चे किंमतीपोटी मयत मारोती यांचेकडून बयाणपञाचे वेळी स्वीकारलेली मोबदला रक्कम रुपये ७०,०००/- व त्यावर फेब्रुवारी २०११ पासून संपूर्ण रक्कम प्रत्यक्ष अदा करेपर्यंत द.सा.द.शे. ७ टक्के व्याजासह परत दयावी.
- विरुध्द पक्ष क्रमांक १ यांनी तक्रारकर्त्यांना झालेल्या शारीरिक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई रक्कम रुपये १०,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये १०,०००/- अदा करावे.
- विरुध्द पक्ष क्रमांक २ व ३ विरुध्द कोणताही आदेश नाही.
- उभयपक्षांना आदेशाच्या प्रती विनामुल्य देण्यात यावे.
| |