तक्रारकर्त्यातर्फे वकील ः- श्री.एस.बी.राजनकर
विरूध्द पक्षातर्फे वकील ः- श्रीमती. सुचिता देहाडराय
(युक्तीवादाच्या वेळेस)
निकालपत्रः- श्री. सु.रा आजने सदस्य, -ठिकाणः गोंदिया.
निकालपत्र
(दिनांक 28/12/2018 रोजी घोषीत )
1. तक्रारकर्ता यांनी ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये विरूध्द पक्ष विमा कंपनीने विम्याचा दावा फेटाळला म्हणून ही तक्रार या मंचात दाखल केलेले आहे.
2. तक्रारकर्त्याने स्वतः वापराकरीता वाहन विकत घेतले व तो चारचाकी वाहन रोनाल्ड डस्टरचा मालक आहे. त्या वाहनाचा नोंदणी क्र. MH/30 AF 2525 हा आहे. तक्रारकर्त्याने रू. 23,000/-,प्रिमीयम देऊन, वरील नमूद वाहनाचा विरूध्द पक्षाकडून विमा विकत घेतला. त्यांनी तक्रारकर्त्याच्या नावे विमा पॉलीसी निर्गमीत केली जिचा नं. 04-16 -9995-1801-00008986 कालावधी दि. 07/09/2015 ते दि. 06/09/2016.
3. दुर्देवाने दि. 02/10/2015 ला सिरेगांवबंधला वाहनाचा अपघात झाला आणि नुकसान झाले, मोठी दुरूस्ती आवश्यक होती. वाहनाचा विरूध्द पक्षाकडे विमा काढला होता. विरूध्द पक्षाकडे वाहनाचा क्लेम नं. 0c-16-2101-1801-44442396 दाखल करण्यात आला. तक्रारकर्त्याने वाहन मोकाशी मोटर्स यांचे वर्कशॉप नागपूर यांचेकडून वाहन दुरूस्त करून घेतले. तक्रारकर्त्याने विरूध्द पक्षाकडून अधिकृत विक्रेता व स्केअरपार्ट पुरवठा करण्याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, निःष्फळता सिध्द झाली. तक्रारकर्त्याने मोकाशी मोटर्स नागपूरकडून ESTIMATE मिळविले. ESTIMATE MEMO दि. 05/10/2015 प्रमाणे वाहनाला स्केअरपार्टकरीता रू.1,39,113/-,आणि रू.16,000/-,लेबरचार्ज असे एकुण खर्चाचे रू. 1,55,113/-,चे ESTIMATE घेऊन, तक्रारकर्त्याने मोकाशी मोटर्स नागपूर यांचेकडून वाहन दुरूस्त करून घेतले आणि रू. 16,000/-,लेबरचार्ज इनवाईस नं. 001 दि. 09/11/2015 प्रमाणे दिले. स्केअरपार्टबाबत निविदा मोकाशी मोटर्स नागपूर यांची जास्ती होती. म्हणून राज ट्रेडर्स राममंदिर सि.ए.रोड नागपूर-18, यांचेकडून स्केअरपार्टस किफायत दराने रू. 1,15,247/-,बिल नं. 162 दि. 14/10/2015 प्रमाणे मिळविले. तक्रारकर्त्याने एकुण खर्च रू. 1,31,747/-, केले. बिलाच्या प्रती अभिलेखावर आहेत.
4. विरूध्द पक्षाने नुकसानाची रक्कम बसविण्याकरीता सर्व्हेअरची नेमणुक केली ज्यांनी दि. 15/03/2016 ला लहरीपणाने स्केअरपार्टकरीता रू. 30,587.50 पैसे आणि लेबरचार्ज करीता रू. 7,325/-,चा खर्च दाखवून किंमत दाखविली. सर्व्हेअर वाहनाचे झालेल्या नुकसानाचे प्रापर असेसमेंट बसविण्यात असमर्थ होता. तक्रारकर्त्याने देऊ केलेली रक्कम घेण्यास नकार दिला आणि कायदेशीर ख-या कायदेशीर तक्रारीचे निवारण करण्याकरीता मा. मंचाकडे दाद मागविण्याचे ठरविले. काही मार्ग उरला नाही म्हणून तक्रारकर्त्याने अधिवक्ता श्री. वाय एच. ऊफराडे मार्फत कायदेशीर नोटीस दि. 10/05/2016 ला विरूध्द पक्षाला पाठविली. आणि वाहनाचे नुकसानाकरीता रू. 1,31/747/-,देण्याबाबत आणि विरूध्द पक्षाचे कार्यालयाला भेट देण्याकरीता प्रवासापोटी रू. 10,000/-, आणि शारीरीक व मानसिक त्रासापोटी रू. 50,000/-,ची मागणी केली परंतू काही फायदा झाला नाही. तक्रारकर्त्याने खालीलप्रमाणे मागणी केली आहेः-
1) तक्रारकर्त्याची पूर्ण मागणी विरूध्द पक्षाने नाकारून, विरूध्द पक्षाने सेवेत न्यूनता केली आहे असे घोषीत करावे.
2) विरूध्द पक्षाने रू. 1,31,747/-,इतकी रक्कम द.सा.द. शे. 12 टक्के दराने दि. 14/10/2015 पासून (CREDIT INVOICE DATE:- 14/10/2015 ) अदा करावी.
3) शारिरिक व मानसिक त्रासाकरीता रू. 50,000/-,आणि तक्रारीचा खर्च व प्रवास खर्च म्हणून रू. 10,000/-,अदा करावे.
5. विरूध्द पक्षाच्या कथनानूसार अपघाताच्या वेळी, अपघात झालेल्या वाहनाच्या चालकाजवळ अधिकृत परवाना नव्हता. (VALIED & EFECTIVE DRIVING LICNCE) आणि DRIVING परवाना मिळण्याकरीता तो Qualified नव्हता. Central motor vehicle rule 1989 चे नियम (3) ची requirement Satisfied केली नव्हती आणि त्याने M.V ACT आणि नियमाचे उल्लंघन केले होते आणि पॉलीसीच्या अटी व शर्तीचे उल्लंघन केले आहे.
6. तक्रारकर्त्याकडून अपघाताची सूचना मिळाल्यानंतर, वाहनाच्या नुकसानाची किंमत काढण्याकरीता विरूध्द पक्षाने IRDA परवाना असलेल्या सर्व्हेअरची नेमणुक केली त्याप्रमाणे अधिकृत सवर्हेअरने अपघाताचे स्वरूप वाहनाचे नुकसान किती झाले आणि पॉलीसीच्या अटी व शर्तीनूसार वाहनाचे PHYSICAL तपासणी केली. वाहनाची दुरूस्ती करीत असतांना, तपासणी करतांना आणि ती पूर्ण झाल्यानंतर बदलविलेल्या पार्टची तपासणी आणि सादर केलेले बिल आणि इंन्शुरंन्स कंपनीच्या दायीत्वानूसार सर्व्हेअरने केलेल्या कामाप्रमाणे वाहनाच्या नुकसानाची किंमत रू. 36,500/-,आहे. त्याबाबतची माहिती विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्याला दिली होती. विमा पॉलीसीच्या अट क्र. ‘4’ प्रमाणे “ The company at its own option repair, reinstate or replace the vehicle or part thereof &/or its accessories or may pay in cash the amount of the loss or damage & the liability of the company shall not exceed; for partial losses i.e. losses other than total loss/ constructive total loss of the vehicle- actual & reasonable cost &/or replacement of parts lost or damaged subject to depreciation as per limits specified”.
विरूध्द पक्षाने आणि सर्व्हेअरने या बाबतीत तक्रारकर्त्यांशी चर्चा केली व समजावून सांगीतले. सर्व्हेअरच्या अहवालाप्रमाणे नुकसानाची सरासरी किंमत आणि स्केअरपार्टचा दुरूस्ती खर्च रू. 30,587.50 पैसे आहे आणि लेबरचार्ज रू. 7,325/-,असा आहे. घसारा रककम व COMALSARY रक्कम रू. 1,000/-, वजा केल्यानंतर, निव्वळ ASSESSED रक्कम रू. 36,499.50 पैसे आहे. IRDA सव्हेअरने काढलेल्या नुकसान किंमतीपेक्षा विरूध्द पक्षाची जबाबदारी जास्त नाही. तक्रारकर्त्याची मागणी जास्त आहे. तक्रारकर्त्याने स्केअरपार्टचे बिल पुरविले नाही आणि तो कोणत्याही मागणीकरीता ENTITLED नाही आहे.
7. तक्रारकर्त्याचे वकील श्री. एस.बी राजनकर तसेच विरूध्द पक्षकारातर्फे वकील श्रीमती. सुचिता देहाडराय यांचा (दि.29/11/2018 ) रोजी तोंडीयुक्तीवाद ऐकण्यात आला.
8. प्रस्तुत मंचाने तक्रारकर्त्यांचे पुराव्याचे शपथपत्र, तसेच लेखीयुक्तीवाद विरूध्द पक्षानी त्यांची लेखीकैफियत, पुराव्याचे शपथपत्र, तसेच सर्व्हेअरचे पुराव्याचे शपथपत्र व लेखीयुक्तीवाद, यांचे मंचानी वाचन केले आहे. त्यावरून तक्रारीचे निकालकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र.. | मुद्दे | उत्तर |
1 | तक्रारकर्ता हा ग्रा.सं.कायदा कलम 2(1),डी प्रमाणे ग्राहक होतात काय? | होय. |
2. | तक्रारकर्ता हा दाद मिळण्यास पात्र आहे काय? | अंशतः |
3 | अंतीम आदेश | तक्रारकर्त्याची तक्रार अंशतःमंजूर करण्यात येते. |
कारण मिमांसा
मुद्दा क्र. 1 व 2 ः-
9. तक्रारकर्त्याने स्वतःच्या वापराकरीता चारचाकी वाहन रोनाल्ड डस्टर विकत घेतले होते. ज्या वाहनाचा नोंदणी क्र. MH/30 AF 2525 हा आहे. तक्रारकर्त्याने वरील नमूद वाहनाचा विरूध्द पक्षाकडून वार्षीक प्रिमीयम रू.23,000/-,देऊन विमा काढला होता. विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्याच्या नावे विमा पॉलीसी निर्गमीत केली होती. जिचा नं. 04-16 -9995-1801-00008986 कालावधी दि. 07/09/2015 ते दि. 06/09/2016 हा आहे. तक्रारकर्त्याच्या वाहनाचा सिरेगांवबंध येथे दि. 02/10/2015 ला अपघात झाला सर्व्हेअरने पुराव्याच्या शपथपत्रासोबत सादर केलेल्या अंतिम सर्व्हे अहवालाचे अवलोकन केले असता, असे निदर्शनास आले की, अपघाताच्या दिवशी तक्रारकर्त्याचे वाहन, वाहन चालक श्री. देवीनाथ श्रीराम नागपुरे हा चालवित होता व त्याचा वाहन परवाना नं. MH-35-20080001297 हा असून, तो दि. 07/02/2017 पर्यंत valid आहे व त्याच्या वाहनाचे फार मोठे नुकसान झाले. वाहनाला मोठी दुरूस्ती आवश्यक होती. विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्याची मागणी क्र. 0c-16-2101-1801-44442396 प्रमाणे दाखल केली. तक्रारकर्त्याने मोकाशी मोटर्स नागपूर कडून वाहन दुरूस्तीबाबत निविदा मिळविली. निविदा दि.05/10/2015 प्रमाणे वाहनाला स्केअरपार्टकरीता रू. 1,39,113/-, आणि रू. 16,000/-,लेबरचार्ज लागणार होता. म्हणून तक्रारकर्त्याने राज ट्रेडर्स राममंदिर सि.ए.रोड नागपूर यांचेकडून बिल नं. 162 दि. 14/10/2015 प्रमाणे रू. 1,15,2417/-,इतक्या किंमतीचे स्केअरपार्ट मिळविले व तक्रारकर्त्याने मोकाशी मोटर्स नागपूर कडून वाहन दुरूस्त करून घेतले. तक्रारकर्त्याला वाहनाचे स्केअरपार्टपोटी व लेबरचार्जकरीता एकुण रू. 1,31,747/-, इतका वाहन दुरूस्तीकरीता खर्च आला. तक्रारकर्त्याने विरूध्द पक्षाकडे वाहन दुरूस्तीकरीता रू.1,31,747/-,इतक्या रकमेची मागणी केली. तक्रारकर्त्याची मागणी हि जास्त असल्यामूळे विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्याची मागणी फेटाळली.
10. तक्रकारर्त्याकडून अपघाताची सूचना मिळाल्यानंतर, विरूध्द पक्षाने वाहानाच्या नुकसानाची किंमत काढण्याकरीता IRDA परवाना असलेल्या सर्व्हेअरची नेमणुक केली. सर्व्हेअरने वाहनाच्या अपघाताचे स्वरूप व वाहनाचे किती नुकसान झाले आणि पॉलीसीच्या अटी व शर्तीनूसार वाहनाची तपासणी केली. वाहनाची दुरूस्ती करीत असतांना आणि दुरूस्ती पूर्ण झाल्यानंतर, बदलविलेल्या पार्टची तपासणी केली आणि इंन्शुरंन्स कंपनीच्या दायीत्वानूसार सर्व्हेअरने वाहनाच्या नुकसानाची किंमत रू. 36,500/-,आकारली आहे. विमा पॉलीसीच्या अट क्र. ‘4’ प्रमाणे “ The company at its own option repair, reinstate or replace the vehicle or part thereof &/or its accessories or may pay in cash the amount of the loss or damage & the liability of the company shall not exceed; for partial losses i.e. losses other than total loss/ constructive total loss of the vehicle- actual & reasonable cost &/or replacement of parts lost or damaged subject to depreciation as per limits specified”. विमा कंपनीने नेमलेल्या IRDA परवाना असलेल्या सर्व्हेअरने पुराव्याचे शपथपत्र तक्रारीमध्ये सादर केलेले आहे. या मंचाचे असे मत आहे की, विमा पॉलीसीची अट क्र. ‘4’ नूसार IRDA सर्व्हेअरने काढलेल्या वाहनाच्या नुकसान किंमतीपेक्षा विरूध्द पक्षाची जबाबदारी जास्त नाही. करीता हा मंच मुद्दा क्र 1 व 2 वरील निःष्कर्ष होकारार्थी नोंदवित आहे. विरूध्द पक्षांनी रक्कम रू. 36,500/-, तक्रारकर्त्याला, तक्रार दाखल करण्या अगोदरच दयायला सहमत होते. तरी देखील तक्रारकर्त्यांनी घेण्यास नकार दिला. म्हणून त्यांना कोणतीही नुकसान भरपाई किंवा दाव्याची रक्कम देता येणार नाही, असे या मंचाचे मत आहे.
वरील निष्कर्षास अनुसरून मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-// अंतिम आदेश //-
1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. विरूध्द पक्ष यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्त्याला विम्याची रक्कम रू.36,500/-,अदा करावे.
3. विरूध्द पक्ष यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी उपरोक्त आदेशाचे पालन आदेशाची प्रत प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसांचे आंत करावे. तसे न केल्यास, वरील नमूद आदेश क्र. (2) प्रमाणे त्या रकमेवर द.सा.द.शे 9 टक्के व्याज अदा करावे.
4. आदेशाची प्रत उभय पक्षांना विनामूल्य पाठविण्यात यावी.
5. अतिरीक्त संच तक्रारकर्त्याला परत करण्यात यावे.