न्या य नि र्ण य
व्दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्यक्षा
1. तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 2019 चे कलम 34 व 35 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे—
तक्रारदाराचे पती मयत कै. संजय बाबुराव पाटील यांनी वि.प. कंपनीची बजाज अलियांझ लाईफ POS GOAL सुरक्षा लि. प्रिमियम नावाने प्रचलित असलेली पॉलिसी घेतली होती. सदर पॉलिसीचा नंबर 0356473792 असा असून कालावधी दि. 22/01/19 ते दि. 21/01/2029 असा आहे. सदर पॉलिसीची वार्षिक प्रिमियम रक्कम रु. 1,04,500/- कै. संजय बाबुराव पाटील यांनी भरलेली आहे. सदर पॉलिसीचा प्रपोजल फॉर्म वि.प. यांचे एजंटने भरुन घेतला. त्यावेळी एजंटनी जी जी माहिती तक्रारदाराचे पतीस विचारली, ती सर्व खरी व बरोबर माहिती तक्रारदाराने पतीने दिली आहे. सदर प्रमाणे पूर्ण आवश्यक ती माहिती घेवून वि.प. कंपनीचे पूर्ण समाधान झालेनंतर वि.प. यांनी पॉलिसीची प्रिमियमची रक्कम भरुन घेवून तक्रारदाराचे पतीस पॉलिसी दिली आहे. त्यावेळी वि.प. यांचे एजंटने तक्रारदाराचे पतीचे प्रकृतीबाबतची पूर्ण माहिती घेतली होती. तसेच सदर पॉलिसीप्रमाणे कोणकोणते आजार पॉलिसीअंतर्गत कव्हर होणार नाहीत याबाबतची कोणतीही माहिती कै. संजय बाबुराव पाटील यांना दिली नव्हती तसेच पॉलिसी प्रपोजलमध्येही कोणकोणत्याही प्रकारचे आजार कव्हर होणार नाहीत याचा कोणताही उल्लेख वि.प. कंपनीने केलेला नव्हता. तदनंतर दि. 02/01/2020 रोजी कै. संजय बाबुराव पाटील हे मयत झाले. म्हणून तक्रारदारांनी वि.प. यांचेकडे क्लेम दाखल केला असता वि.प. यांनी सदरचा क्लेम NON-DISCLOSURE OF MATERIAL FACTS या कारणाने नामंजूर केला आहे. वि.प. यांचे म्हणणेप्रमाणे मयतास 2016 पासून UNCONTROLLE DIEBETIS होता ही बाब मयताने पॉलिसी घेताना सांगितली नाही. कै. संजय बाबुराव पाटील यांनी पॉलिसी घेणेकरिता मुद्दामहून कोणतीही महत्वाची माहिती लपवून ठेवलेली नव्हती. वि.प. कंपनीने सर्व माहिती पडताळून खात्री करुन मगच मयतास पॉलिसी दिली आहे. पॉलिसी धारकास पॉलिसी देत असताना वि.प. कंपनीस त्यांची मेडिकल तपासणी करुन घेवून संपूर्ण मेडीकल पार्श्वभूमी पाहून पॉलिसी देणे ही वि.प. यांची जबाबदारी होती व आहे. अशा प्रकारची जबाबदारी पाळली नसलेस त्यास तक्रारदार जबाबदार नाही. अशा प्रकारे वि.प. यांनी विमा क्लेम नाकारुन सेवात्रुटी केली आहे. म्हणून, तक्रारदाराने प्रस्तुतचा तक्रारअर्ज या आयोगात दाखल केला आहे.
2. प्रस्तुतकामी तक्रारदाराने वि.प. यांचेकडून तक्रारदार ना विमाक्लेमपोटी रक्कम रु. 10,00,000/- मिळावेत, मानसिक त्रासापोटी रु.2,00,000/- व तक्रारअर्जाचा खर्च रु. 5,000/- मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे.
3. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत विमा पॉलिसी, क्लेम नामंजूरीचे पत्र, तक्रारदाराचे पतीचा मृत्यू दाखला, तक्रारदार यांचे आधारकार्ड वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
4. प्रस्तुत कामी वि.प. यांना नोटीस लागू होऊनही सदर वि.प. याकामी गैरहजर राहिलेने वि.प. यांचेविरुध्द एकतर्फा आदेश नि.1 वर पारीत झालेला आहे.
5. वर नमूद तक्रारदार यांनी दाखल केले सर्व कागदपत्रांचे अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे वि.प. यांचेकडून विमाक्लेमपोटी रक्कम मिळणेस व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
वि वे च न –
6. वर नमूद मुद्दा क्र.1 ते 3 ची उत्तरे आम्ही होकारार्थी दिली आहेत कारण तक्रारदाराचे पती मयत कै. संजय बाबुराव पाटील यांनी वि.प. कंपनीची बजाज अलियांझ लाईफ POS GOAL सुरक्षा लि. प्रिमियम नावाने प्रचलित असलेली पॉलिसी घेतली होती. सदर पॉलिसीचा नंबर 0356473792 असा असून कालावधी दि. 22/01/19 ते दि. 21/01/2029 असा आहे. सदर विमा पॉलिसी तक्रारदारांनी याकामी दाखल केली आहे. वि.प. यांनी याकामी हजर होवून प्रस्तुत बाब नाकारलेली नाही. तक्रारदार या मयत कै. संजय बाबुराव पाटील यांच्या पत्नी या नात्याने कायदेशीर वारस आहेत व पतीचे मृत्यूपश्चात सदर पॉलिसीचे लाभाधारक आहेत. सबब, तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत ही बाब निर्विवादपणे स्पष्ट सिध्द झाली आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
7. तक्रारदारांचे तक्रारअर्जातील कथनानुसार, सदर पॉलिसीचा प्रपोजल फॉर्म वि.प. यांचे एजंटने भरुन घेतला. त्यावेळी एजंटनी जी जी माहिती तक्रारदाराचे पतीस विचारली, ती सर्व खरी व बरोबर माहिती तक्रारदाराने पतीने दिली आहे. सदर प्रमाणे पूर्ण आवश्यक ती माहिती घेवून वि.प. कंपनीचे पूर्ण समाधान झालेनंतर वि.प. यांनी पॉलिसीची प्रिमियमची रक्कम भरुन घेवून तक्रारदाराचे पतीस पॉलिसी दिली आहे. त्यावेळी वि.प. यांचे एजंटने तक्रारदाराचे पतीचे प्रकृतीबाबतची पूर्ण माहिती घेतली होती. तसेच सदर पॉलिसीप्रमाणे कोणकोणते आजार पॉलिसीअंतर्गत कव्हर होणार नाहीत याबाबतची कोणतीही माहिती कै. संजय बाबुराव पाटील यांना दिली नव्हती तसेच पॉलिसी प्रपोजलमध्येही कोणकोणत्या प्रकारचे आजार कव्हर होणार नाहीत याचा कोणताही उल्लेख वि.प. कंपनीने केलेला नव्हता. तदनंतर दि. 02/01/2020 रोजी कै. संजय बाबुराव पाटील हे मयत झाले. म्हणून तक्रारदारांनी वि.प. यांचेकडे क्लेम दाखल केला असता वि.प. यांनी सदरचा क्लेम NON-DISCLOSURE OF MATERIAL FACTS या कारणाने नामंजूर केला आहे. वि.प. यांचे म्हणणेप्रमाणे मयतास 2016 पासून UNCONTROLLE DIEBETIS होता ही बाब मयताने पॉलिसी घेताना सांगितली नाही. कै. संजय बाबुराव पाटील यांनी पॉलिसी घेणेकरिता मुद्दामहून कोणतीही महत्वाची माहिती लपवून ठेवलेली नव्हती. वि.प. कंपनीने सर्व माहिती पडताळून खात्री करुन मगच मयतास पॉलिसी दिली आहे. पॉलिसी धारकास पॉलिसी देत असताना वि.प. कंपनीस त्यांची मेडिकल तपासणी करुन घेवून संपूर्ण मेडीकल पार्श्वभूमी पाहून पॉलिसी देणे ही वि.प. यांची जबाबदारी होती व आहे. अशा प्रकारची जबाबदारी पाळली नसलेस त्यास तक्रारदार जबाबदार नाही असे तक्रारदारांचे कथन आहे. सदर कथनांचे पुष्ठयर्थ तक्रारदाराने पुराव्याचे शपथपत्र दाखल केले आहे. तक्रारदाराचे तक्रारअर्जातील सदरची कथने वि.प. यांनी याकामी हजर होवून नाकारलेली नाहीत. वि.प. यांना तक्रारअर्जाची नोटीस लागू होऊनसुध्दा ते याकामी मंचात हजर झाले नाहीत. म्हणून, वि.प. यांचेविरुध्द नि.1 वर एकतर्फा आदेश पारीत झालेला आहे. म्हणजेच वि.प. यांनी तक्रारदाराचे तक्रारअर्जातील कोणतेही कथन खोडून काढलेले नाही. तक्रारदाराचे पतीस UNCONTROLLE DIEBETIS होता ही बाब वि.प. यांनी याकामी हजर होवून व योग्य तो ठोस पुरावा दाखल करुन शाबीत केलेली नाही. याउलट तक्रारदारांनी त्यांचे कथनाचे पुष्ठयर्थ पुराव्याचे शपथपत्र दाखल केले आहे. सबब, तक्रारदाराने तक्रारअर्जात केले कथनांवर विश्वासार्हता ठेवणे न्यायोचित वाटते. सबब, चुकीच्या कारणास्तव तक्रारदारांचा विमाक्लेम नाकारुन वि.प. यांनी तक्रारदाराला सदोष सेवा दिली आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
8. सबब, तक्रारदार हे सदर पॉलिसीची बेनिफीट रक्कम रु.10,00,000/- मिळणेस पात्र आहेत. तसेच सदरचे रकमेवर तक्रारदार हे विमा क्लेम नाकारलेचे तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के व्याजदराने वसूल होवून मिळणेस तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व अर्जाचा खर्च रक्कम रु.5,000/- वि.प. यांचेकडून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
सबब, प्रस्तुतकामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2) वि.प. विमा कंपनीने तक्रारदार यांना विमाक्लेमपोटी रक्कम रु. 10,00,000/- अदा करावेत व सदर रकमेवर विमा क्लेम नाकारले तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज अदा करावे.
3) मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व अर्जाचा खर्च रु.5,000/- वि.प. विमा कंपनीने तक्रारदारास अदा करावेत.
4) वर नमूद सर्व आदेशांची पूर्तता वि.प. यांनी आदेशाची प्रत मिळाले तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5) विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदीं अन्वये कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.