Maharashtra

Kolhapur

CC/19/129

Om Industries Tarfe Partner Tanaji Mahadev Patil - Complainant(s)

Versus

Bajaj Alianz General Insurance Co. Ltd. - Opp.Party(s)

A.K.Patil

23 Feb 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION,KOLHAPUR
Central Administrative Building, Second Floor,
South Side, Kasaba Bawada Road, Kolhapur.
Phone No. (0231) 2651327, Fax No. (0231) 2651327
.
 
Complaint Case No. CC/19/129
( Date of Filing : 20 Feb 2019 )
 
1. Om Industries Tarfe Partner Tanaji Mahadev Patil
1135 A/2 Plot No.3 Mahadik Wasahat Top Tal. Hatkangale Kolhapur
Kolhapur
...........Complainant(s)
Versus
1. Bajaj Alianz General Insurance Co. Ltd.
D-3 D-4 Royal Prestij Saix Extension Shahupuri Kolhapur
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. Savita P. Bhosale PRESIDENT
 HON'BLE MRS. Rupali D. Ghatage MEMBER
 HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 23 Feb 2022
Final Order / Judgement

न्‍या य नि र्ण य

 

 

द्वारा – मा. सौ मनिषा सं. कुलकर्णी, सदस्‍या

 

1.    तक्रारदाराने प्रस्‍तुत तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 11 व 12 प्रमाणे दाखल केला आहे.  तक्रारदार यांनी त्‍यांचे फर्मचे सुरक्षेसाठी Standard Fire and Special Perils Policy या दोन पॉलिसी घेतल्‍या होत्‍या. सन 2018 चे पावसाळयामध्‍ये ऑगस्‍ट महिन्‍यात अतिवृष्‍टीमुळे तक्रारदार यांचे कारखान्‍याच्‍या पूर्व बाजूस असलेली आरसीसी संरक्षण भिंत पडली व त्‍यामध्‍ये तक्रारदारांचे मोठे नुकसान झाले.  यामध्‍ये तक्रारदारांचे साधारणपणे रु.9,66,000/- चे नुकसान झाले.  तक्रारदारांनी सदरचे घटनची माहिती वि.प. यांना दिली  व नुकसान भरपाई मिळणेसाठी दावा मागणीपत्र वि.प. यांचेकडे दाखल केले.  परंतु सदर सर्व्‍हेअरच्‍या अहवालाप्रमाणे विमा कंपनीने तक्रारदार यांचे कारखान्‍याची भिंत ही पावसामुळे व सदर भिंतीच्‍या शेजारी असलेल्‍या समुद्रातील वाळूच्‍या दाबामुळे पडलेली आहे असा चुकीचा निष्‍कर्ष काढून तक्रारदार यांचा दावा नामंजूर करण्‍यात येत असलेबाबत दि. 31/12/2018 चे पत्राने कळविले आहे.  म्‍हणून तक्रारदारास सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले असे तक्रारदाराचे कथन आहे.

 

2.    क्रारदाराची तक्रार थोडक्‍यात पुढीलप्रमाणे

 

      तक्रारदार यांनी त्‍यांचे फर्मचे सुरक्षेसाठी Standard Fire and Special Perils Policy या दोन पॉलिसी घेतल्‍या होत्‍या.  सदर पॉलिसींचा  नं. OG-19-2005-4001-00000222 & OG-19-2005-4001-00000223 असा असून कालावधी दि. 01/05/2018 ते 30/04/2019 असा आहे.  सन 2018 चे पावसाळयामध्‍ये ऑगस्‍ट महिन्‍यात अतिवृष्‍टीमुळे तक्रारदार यांचे कारखान्‍याच्‍या पूर्व बाजूस असलेली आरसीसी संरक्षण भिंत पडली व त्‍यामध्‍ये तक्रारदारांचे मोठे नुकसान झाले.  यामध्‍ये तक्रारदारांचे साधारणपणे रु.9,66,000/- चे नुकसान झाले.  सदर घटनेची माहिती दिल्‍यानंतर गावकामगार तलाठी यांनी नुकसानीचा पंचनामा केला व त्‍याबाबतचा अहवाल तहसिलदार हातकणंगले यांना पाठविला. तक्रारदारांनी सदरचे घटनची माहिती वि.प. यांना दिली  व नुकसान भरपाई मिळणेसाठी दावा मागणीपत्र वि.प. यांचेकडे दाखल केले.  वि.प. यांनी आपला सर्व्‍हेअर घटनास्‍थळी पाठविला.  परंतु सदर सर्व्‍हेअरच्‍या अहवालाप्रमाणे विमा कंपनीने तक्रारदार यांचे कारखान्‍याची भिंत ही पावसामुळे व सदर भिंतीच्‍या शेजारी असलेल्‍या समुद्रातील वाळूच्‍या दाबामुळे पडलेली आहे असा चुकीचा निष्‍कर्ष काढून तक्रारदार यांचा दावा नामंजूर करण्‍यात येत असलेबाबत दि. 31/12/2018 चे पत्राने कळविले आहे.  सबब, तक्रारदारास भिंतीचे नुकसानीपोटी रक्‍कम रु.9,96,000/-,  आर्थिक, मानसिक व शारिरिक त्रासापोटी रु.1,00,000/- व तक्रारीचा खर्च देणेबाबत वि.प. यांना आदेश व्‍हावा अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.

 

3.    तक्रारदाराने तक्रारीसोबत शपथपत्र व कागदयादीसोबत पॉलिसी, क्‍लेम फॉर्म, वि.प. यांनी तक्रारदारांना पाठविलेले पत्र, पंचनामा, इंजिनियरचे इस्टिमेट, क्रेनची पावती, फर्मचे नोंदणी प्रमाणपत्र इ. कागदपत्रे दाखल केली आहेत.    तसेच वाहनाचे फोटो, पुराव्‍याचे शपथपत्र, साक्षीदाराचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केलेला आहे.

 

4.    वि.प.क्र.1 व 2 यांना नोटीस लागू झालेनंतर आयोगासमोर हजर होवून आपले लेखी म्‍हणणे दाखल केले. वि.प. यांनी आपले लेखी म्‍हणणेमध्‍ये तक्रारदाराचे तक्रारअर्जातील संपूर्ण मजकूर नाकारला आहे. वि.प. यांचे कथनानुसार, पहिली पॉलिसी तक्रारदाराचे फर्मची असून दुसरी पॉलिसी ही तक्रारदाराचे निवासस्‍थानासाठी आहे.  तक्रारदार हे व्‍यावसायिक कारणासाठी सदरच्‍या विमा सेवेचा वापर करतात.  सबब, तक्रारदार हे ग्राहक होत नाहीत.  वि.प. यांना तक्रारदाराकडून मिळालेलल्‍या कागदपत्रांचे अवलोकन केले असता असे दिसले की, तक्रारदाराने वाळू भिंतीस लागून ठेवलेली होती व ती भिजल्‍यानंतर प्रसरण पावली व भिंतीवर त्‍याचा दबाव पडला.  त्‍यामुळे तक्रारदाराच्‍या कारखान्‍याचे भिंतीचे नुकसान हे भिजलेल्‍या वाळूचा दबाव पडलेने झाले होते.  पावसामुळे कोणताही पूर अथवा जलप्रलय आलेला नव्‍हता.  सर्व्‍हेअरनेही अशाच प्रकारचा रिपोर्ट दिला आहे.  पॉलिसीत नमूद केलेल्‍या कारणांमुळे तक्रारदाराचे नुकसान झालेले नाही.  सबब, तक्रारदाराचा क्‍लेम योग्‍य कारणास्‍तव वि.प. यांनी नाकारला आहे.  सदरचे म्‍हणण्‍यास पूर्वग्रह न करता वि.प. यांचे वैकल्पिकरित्‍या असे म्‍हणणे आहे की, सर्व्‍हेअरच्‍या रिपोर्टप्रमाणे रु. 1,44,000/- इतकी असेसमेंट होत आहे.  सबब, वि.प. यांनी तक्रारदारास कोणतीही सेवात्रुटी न दिलेने तक्रारअर्ज नामंजूर करावा अशी मागणी वि.प. यांनी केली आहे.  

 

5.    वि.प. यांनी याकामी पुरावा शपथपत्र, कागदयादीसोबत विमा पॉलिसी, क्‍लेम  फॉर्म, सर्व्‍हे रिपोर्ट, क्‍लेम नाकारल्‍याचे पत्र, सर्व्‍हेअरचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.

 

6.    तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे तसेच वि.प. यांचे म्‍हणणे, पुरावा व युक्तिवाद यावरुन मंचासमोर निष्‍कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.   

 

­अ.क्र.

                मुद्दा

      उत्‍तरे

1

तक्रारदार हा वि.प. यांचा ग्राहक होतो काय ?

होय.

2

वि.प. यांनी तक्रारदार यांना सेवा देणेत त्रुटी केली आहे  काय ?     

होय.

3

तक्रारदारांनी केलेल्‍या मागण्‍या मिळणेस तक्रारदार पात्र आहे काय ?     

होय, अंशतः.

4

अंतिम आदेश काय ?

खालीलप्रमाणे

 

 

विवेचन

 

मुद्दा क्र.1

     

7.    तक्रारदार यांची ओम इंडस्‍ट्रीज ही वर नमूद पत्‍त्‍यावर फौंड्री रॉ मटेरियल तयार करणारी भागिदारी फर्म असून वर नमूद तक्रारदार हे तिचे भागिदार आहेत.  यातील वि.प. कंपनीकडून तक्रारदार यांनी वर नमूद ओम इंडस्‍ट्रीज या फर्मच्‍या सुरक्षेसाठी Standard Fire and Special Perils Policy या दोन पॉलिसी घेतल्‍या होत्‍या.  सदर पॉलिसींचा  नं. OG-19-2005-4001-00000222 & OG-19-2005-4001-00000223 असा असून कालावधी दि. 01/05/2018 ते 30/04/2019 असा आहे. याबद्दल उभय पक्षांमध्‍ये वाद नाही. सबब, तक्रारदार व वि.प. यांचेमध्‍ये सेवा घेणार व सेवा देणार हे नाते प्रस्‍थापित झालेचे दिसून येते.  सबब, तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदींनुसार वि.प. यांचे ग्राहक होतात या निष्‍कर्षाप्रत हे आयोग येत आहे.  सबब, मुद्दा क्र.1 चे उत्‍तर हे आयोग होकारार्थी देत आहे.

 

मुद्दा क्र.2 ते 4

 

8.    यातील वि.प. कंपनीकडून तक्रारदार यांनी वर नमूद ओम इंडस्‍ट्रीज या फर्मच्‍या सुरक्षेसाठी Standard Fire and Special Perils Policy या दोन पॉलिसी घेतल्‍या होत्‍या.  पॉलिसी संदर्भात उभय पक्षांमध्‍ये वाद नाही.  तक्रारदार यांचे कथनानुसार सन 2018 चे पावसाळयामध्‍ये साधारणपणे ऑगस्‍ट महिन्‍यात अतिवृष्‍टीमुळे निर्माण झालेल्‍या पाण्‍याच्‍या लोंढयामुळे व जलप्रवाहामुळे यातील वर नमूद कारखान्‍याच्‍या पूर्व बाजूस असलेली आर.सी.सी. संरक्षक भिंत पडली व तक्रारदार यांचे मोठे नुकसान झाले.  साधारणपणे रु. 9,66,000/- इतके नुकसान झाले.  सदरची माहिती तक्रारदार यांनी स्‍थानिक प्रशासनास म्‍हणजेच गावकामगार तलाठी यांना दिली व गाव कामगार तलाठी यांनी प्रत्‍यक्ष घटनास्‍थळी भेट देवून तक्रारदार यांचे झाले नुकसानीचा पंचनामा केला व त्‍याबाबतचा अहवाल तहसिलदार हातकणंगले यांना पाठवून उचित कारवाई करणेबाबत कळविले व या संदर्भातील दि. 12/02/2019 चा गावकामगार तलाठी यांनी तहसिलदार यांना रु. 8,60,000/- ची मदत शासनाकडून मिळावी हा रिपोर्ट याकामी दाखल आहे.  तसेच इं‍जिनिअर अभिनय क्षीरसागर यांनी दिलेले इस्‍टीमेट रक्‍कम रु.9,41,861/- हे याकामी तक्रारदार यांनी दाखल केले आहे व या सर्व घटनेची माहिती तक्रारदार यांनी वि.प. कंपनीला दिलेली आहे.  वि.प. कंपनीने तदनंतर घटनास्‍थळी सर्व्‍हेअर पाठवून सर्व्‍हेअरचे अहवालाप्रमाणे तक्रारदार यांची कारखान्‍याची भिंत पावसामुळे व सदर भिंतीच्‍या शेजारी असलेल्‍या वाळूच्‍या दबावामुळे पडलेचे कथन केले आहे व सदरचे कारण पॉलिसीमध्‍ये बसत नसलेने तक्रारदार यांचा विमादावा नामंजूर केला आहे. पावसामुळे कोणताही पूर अथवा जलप्रलय (flood & inundation) आलेला नव्‍हता व नाही व असाच रिपोर्ट सर्व्‍हेअर यांनी दिला आहे व सदरचे रिपोर्टनुसार रु. 1,44,000/- रक्‍कम नमूद आहे.  यासंदर्भात वि.प. विमा कंपनीतर्फे साक्षीदार सर्व्‍हेअर श्री नितीन जोशी यांचे शपथपत्र दाखल केले आहे तसेच विमा पॉलिसीचे अटी व शर्तीही दाखल केल्‍या आहेत व सदर अटी व शर्तीमधील कलम 6 नुसार Storm, Cyclone, Typhoon, Tempest, Hurricane, Tornado, Flood and Inundation

 

9.    वि.प. यांचे कथनानुसार Flood & Inundation झालेमुळे लॉस कव्‍हर होते फक्‍त पाऊस आला व नुकसान झालेस नुकसान कव्‍हर होणार नाही. वि.प. यांनी लेखी युक्तिवादामध्‍ये मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाचा पूर्वाधार दाखल केला आहे.

   1)   Supreme Court of India

            Civil Appeal No. 1375 of 2003 decided on 08/10/2010

            Sureaj Mal Ram Niwas Oil Mills (P) Ltd.   Vs.  United India Insurance Co.Ltd.

     

यानुसार Flood & Inundation चा अर्थ Flood means to cause to fill or become covered with water, especially in a way that causes problems आहे.  Inundation means a flood, or the fact of being flooded with water

 

10.      तक्रारदाराने आपले यु‍क्तिवादामध्‍ये CPJ 77 (SC) Oriental Insurance Co. Vs. J.K. Cement  या मा. सुप्रिम कोर्टाचे Damage caused by heavy rainfall would not fall beyond the flood and inundation असा निष्‍कर्ष नोंदविला आहे. या संदर्भात वि.प. यांनी कथन केले आहे की, तक्रारदाराने कथित नुकसानी बाबत कोणताही पुरावा दाखल केलेला नाही व वि.प. चा पुरावा खोडूनही काढलेला नाही. मात्र तक्रारदाराने वर नमूद केलेप्रमाणे तलाठी यांनी केलेला पंचनामा दाखल केला आहे.  तसेच तक्रारदार तर्फे साक्षीदार श्री सतिश गोपाळराव शहापूरकर यांचे शपथपत्रही दाखल केले आहे व यानुसार अतिवृष्‍टीमुळे निर्माण झालेल्‍या पाण्‍याचे लोंढयामुळे व जलप्रलयामुळे तक्रारदार यांनी शहापूरकर यांचे घराला लागून असलेली भिंत त्‍यांचे घरावर पडलेचे कथन केले आहे.  अशा परिस्थितीत तक्रारदार यांनी दाखल केलेल्‍या या मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाचे पूर्वाधाराचा विचार करता damage caused by heavy rainfall would not fall beyond the flood & inundation वि.प. विमा कंपनीने ज्‍या कारणास्‍तव तक्रारदाराचा विमा दावा नाकारला आहे, ते कारण तक्रारदाराने खोडून काढलेले आहे.  सबब, तक्रारदार यांनी वि.प. विमा कंपनीचे पॉलिसीचे अटी व शर्तीमध्‍ये बसत असणारा विमाक्‍लेम नामंजूर करुन तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली असलेचे निष्‍कर्षाप्रत हे आयेाग येत आहे व तक्रारदार यांनी पुराव्‍यानिशी सदरची नुकसान भरपाई शाबीत केलेने तक्रारदार यांनी मागितलेल्‍या मागण्‍याही अंशतः मंजूर करणेचे निष्‍कर्षाप्रत हे आयोग येत आहे.  तक्रारदाराने इस्‍टीमेट व तलाठी यांचा पंचनामा दाखल केला आहे.  तथापि, या उपरोक्‍त मा. न्‍यायालयांचे पूर्वाधाराचा विचार करता सर्व्‍हेअर रिपोर्ट हा महत्‍ववचा असलेने हे आयेाग दाखल केले सर्व्‍हे रिपोर्ट ग्राहय धरुन त्‍यानुसार होणारी रक्‍कम रु.1,44,000/- देणेचे निर्णयाप्रत येत आहे.  मात्र सदरची रक्‍कम रु.1,44,000/- ही तक्रार दाखल तारखेपासून ते संपूर्ण रक्‍कम हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्‍के व्‍याजदराने देणेचे आदेश करणेत येतात.  तसेच तक्रारदाराने आर्थिक, मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्‍कम रु.1,00,000/- मागितला आहे.  तक्रारदारास या गोष्‍टीचा निश्चितच त्रास झाला असला पाहिजे.  सबब, त्‍याकरिता रु. 10,000/- देणेचे निष्‍कर्षाप्रत हे आयोग येत आहे.  सबब, हे आयोग खालील आदेश पारीत करीत आहे.

 

आदेश

 

1.    तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.

 

2.    वि.प. विमा कंपनीने तक्रारदार यांचे संरक्षक भिंतीच्‍या नुकसानीपोटी रक्‍कम रु. 1,44,000/- अदा करणेचे आदेश करणेत येतात.  सदर रकमेवर वि.प. यांनी तक्रारदार यांना तक्रार दाखल तारखेपासून ते संपूर्ण रक्‍कम तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्‍के दराने व्‍याज अदा करावे.

 

3.    वि.प. विमा कंपनीने तक्रारदार यांना आर्थिक, मानसिक व शारिरिक त्रासापोटी रु.10,000/- देणेचे आदेश करणेत येतात.

 

4.    वर नमूद आदेशांची पूर्तता वि.प. यांनी आदेशाचे तारखेपासून 45 दिवसांत करावी. 

 

5.    विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदयातील तदतुदींअन्‍वये कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.

 

6.    जर यापूर्वी वि.प. यांनी काही रक्‍कम तक्रारदार यांना अदा केली असेल तर त्‍याची वजावट करण्‍याची वि.प. यांना मुभा राहील.

 

7.    सदर आदेशाच्‍या प्रती उभय पक्षकारांना विनाशुल्‍क पाठवाव्‍यात.

 

 
 
[HON'BLE MRS. Savita P. Bhosale]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. Rupali D. Ghatage]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.