Maharashtra

Kolhapur

CC/14/104

Bhartruhari Maruti Patil - Complainant(s)

Versus

B.G.Desai Youth Development Sahakari Patsanstha Maryadit., Gargoti. through Chairman Madhukar Kundal - Opp.Party(s)

V.B.Sarnaik

24 Nov 2015

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, KOLHAPUR
Central Administrative Building, Second Floor,
South Side, Kasaba Bawada Road, Kolhapur.
Phone No. (0231) 2651327, Fax No. (0231) 2651327
.
 
Complaint Case No. CC/14/104
 
1. Bhartruhari Maruti Patil
Patil Galli, Kasaba Bawada, Kolhapur
Kolhapur
...........Complainant(s)
Versus
1. B.G.Desai Youth Development Sahakari Patsanstha Maryadit., Gargoti. through Chairman Madhukar Kundalik Desai
Br.Shahupuri, Kolhapur, At present- Gargoti, Tal.Bhudargad.
Kolhapur
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Sharad D. Madke PRESIDENT
 HON'ABLE MR. Dinesh S. Gavali MEMBER
 HON'ABLE MRS. Rupali D. Ghatage MEMBER
 
For the Complainant:
Adv.V.B.Sarnaik, Present
 
For the Opp. Party:
ORDER

 

निकालपत्र (दि.24.11.2015)   व्‍दाराः- मा.अध्‍यक्ष – श्री.शरद डी.मडके.             

 

1     प्रस्तुतची तक्रार तक्रारदारांनी ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम-12 प्रमाणे सामनेवाले-बी.जी.देसाई युथ डेव्‍हलपमेंट सहकारी पतसंस्‍था मर्या. गारगोटी शाखा-शाहूपुरी (सध्‍या गारगोटी) यांनी सेवेत त्रुटी ठेवलेमुळे नुकसानभरपाई मिळणेकामी दाखल केलेली आहे.     

2           प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाले यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाले क्र.1 ते 3, 5, 6, 8, 10 व 12 यांना नोटीस लागू होऊन देखील हजर झाले नाहीत. त्‍यामुळे त्‍यांचे विरुध्‍द एकतर्फा आदेश पारीत करण्‍यात आला तसेच सामनेवाले क्र.7 व 9 हजर झाले परंतु म्‍हणणे दाखल केले नाही त्‍यामुळे त्‍यांचेविरुध्‍द नो से चा आदेश पारीत केला.आणि सामनेवाले क्र.4 व 11 मयत झालेने दि.30.03.2015 रोजीच्‍या आदेशान्‍वये त्‍यांना सदर कामातून वगळण्‍यात आले. सामनेवाले क्र.13 हे मंचापुढे उपस्थित राहून त्‍यांनी म्‍हणणे दाखल केले. तक्रारदार तर्फे वकीलांचा तोंडी अंतिम युक्‍तीवाद ऐकला. सामनेवाले क्र.13 गैरहजर.

तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी की:-

3           सामनेवाले क्र.1 ही सहकारी संस्‍था असून तीचे कामकाज महाराष्‍ट्र सहकार सं‍स्‍था, 1960 मधील तरतुदीनुसार चालते. सामनेवाले क्र.1 संस्‍थेचे कामकाजाचे स्‍वरुप हे सभासदांना कर्जपुरवठा करणे तसेच लोकांचे मागणीप्रमाणे रक्‍कम मागणी परतफेड करणे अशाप्रकारचे आहे. सामनेवाले क्र.2 ते 12 हे सामनेवाले क्र.1 संस्‍थेचे संचालक असून सामनेवाले क्र.13 हे सामनेवाले क्र.1 संस्‍थेचे शाखाधिकारी आहेत. तक्रारदार हे सामनेवाले क्र.1 संस्‍थेचे ग्राहक आहेत. तक्रारदारांनी दि.03.04.2002 रोजी कॉल डिपॉझिट 5698 अन्‍वये ठेव रक्‍कम रु.20,000/- ठेवलेली होती.  सदरची रक्‍कम सामनेवाले क्र.1 संस्‍थेकडे वेळोवेळी मागणी करुनही त्‍यांनी देणेस टाळाटाळ केली.  दि.04.03.2014 रोजी मागणी केली असता, सदर रक्‍कम तुम्‍हांस मिळणार नाही, तुम्‍ही सामनेवाले यांचेकडे कोर्टातून घ्‍या अशी कथने केली होती. सदरहू तक्रारदारांची रक्‍कम देणेस टाळाटाळ केल्‍याने सामनेवाले यांनी तक्रारदारांना दयावयाच्‍या सेवेत त्रुटी ठेवली आहे. सामनेवाले क्र.13 हे सदर पतसंस्‍थेचे शाखाधिकारी आहेत तसेच त्‍यांच्‍या सहयां ठेव पावतीवर आहेत. तक्रारदारांनी सामनेवाले क्र.1 संस्‍थेत मागणी ठेव रक्‍कमा ठेवल्‍यानंतर सदर रक्‍कमा तक्रारदारांचे मागणीनुसार त्‍वरीत परत करणेचे सामनेवाले संस्‍थेने अभिवचन दिेलेले होते.  तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे वेळोवेळी वरील रक्‍कमांची मागणी केली. परंतु सामनेवाले यांनी सदर रक्‍कमा देणेची टाळाटाळ केली. सदरचे सामनेवाले संस्‍थेचे कृत्‍य बेकायदेशीर व अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब करणारे आहे. सामनेवाले यांची ठेव रक्‍कम अदा करणेचे टाळून सेवेतील त्रुटी केलेली आहे, म्‍हणून तक्रारदारांना भरपाईसह ठेव रक्‍कमा परत मिळणेकरीता प्रस्‍तुतची तक्रार सदरहू मंचात दाखल केली. तक्रारदारांनी सदरहू तक्रार मंचात दाखल करुन सामनेवाले यांचेकडून ठेव पावती क्र.5698 ची रक्‍कम रु.20,000/- तसेच दि.03.06.2002 पासून ते दि.04.03.2014 पर्यंत द.सा.द.शे.15टक्‍के प्रमाणे होणारे व्‍याज, तक्रारदारांना झालेला मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्‍कम रु.5,000/- अशी एकूण रक्‍कम रु.75,170/- तक्रारदारांना मिळणेस सदरहू मंचास विनंती केलेली आहे.

4          तक्रारदारांनी तक्रार अर्जासोबत सामनेवाले यांचेकडे ठेव-कॉल डिपॉझिटसाठी ठेवलेल्‍या रक्‍कमेच्‍या पावतीची झेरॉक्‍सची प्रत, दि.13.03.2014 रोजीचे तक्रारदाराचे शपथपत्र व दि.04.07.2015 रोजीचे पुराव्‍याचे शप‍थपत्र तक्रारदारांनी तक्रार अर्जासोबत जोडलेले आहे.             

5           प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाले यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाले क्र.1 ते 3, 5, 6, 8, 10 व 12 यांना नोटीस लागू होऊन देखील हजर झाले नाहीत. त्‍यामुळे त्‍यांचे विरुध्‍द एकतर्फा आदेश पारीत करण्‍यात आला तसेच सामनेवाले क्र.7 व 9 हजर झाले परंतु म्‍हणणे दाखल केले नाही त्‍यामुळे त्‍यांचेविरुध्‍द नो से चा आदेश पारीत केला.आणि सामनेवाले क्र.4 व 11 मयत झालेने दि.30.03.2015 रोजीच्‍या आदेशान्‍वये त्‍यांना सदर कामातून वगळण्‍यात आले. सामनेवाले क्र.13 हे मंचापुढे उपस्थित राहून त्‍यांनी म्‍हणणे दाखल केले. तक्रारदार तर्फे वकीलांचा तोंडी अंतिम युक्‍तीवाद ऐकला. सामनेवाले क्र.13 गैरहजर.

6           सामनेवाले क्र.13 यांनी तक्रारदारांचे तक्रार अर्जास म्‍हणणे दाखल केले असून तक्रारदारांची तक्रार परिच्‍छेदनिहाय नाकारलेली आहे. सामनेवाले यांचे म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदारांचा तक्रार अर्ज मुदतबाहय असून कायदयाने चालणेस पात्र नाही. ग्राहक संरक्षण कायदयाअंतर्गत संचालकाविरुध्‍द, शाखा समिती सदस्‍याविरुध्‍द व संस्‍थेच्‍या कर्मचा-यांविरुध्‍द तक्रार अर्ज चालणेस पात्र नाही. सामनेवाले क्र.1 ही महाराष्‍ट्र सहकार कायदयानुसार नोंद असणारी सहकारी पतसंस्‍था आहे. तिचा मुख्‍य उद्देश सभासदांना कर्ज पुरवठा करणे, ठेवी स्विकारणे, इत्‍यादी आहे.  सामनेवाले संस्‍थेचे मुख्‍य कार्यालय गारगोटी, ता.भुदरगड, जि.कोल्‍हापूर येथे आहे. सामनेवाले क्र.2 ते 13 यांना पक्षकार केलेले आहे. सामनेवाले क्र.2 ते 12 हे संस्‍थेचे संचालक आहेत. संचालक असलेल्‍या कारणावरुन सामनेवाले क्र.2 च 12 यांना संस्‍थेच्‍या ठेवी परत करणेसाठी जबाबदार धरता येणार नाही. तसेच सामनेवाले क्र.13 हे सामनेवाले संसथेचे कर्मचारी आहेत. तरी कर्मचा-यांवर देखील वैयक्तिक जबबादारी बसवता येणार नाही.  तक्रार अर्जास मिसजॉईडर ऑफ पार्टीज या तत्‍वाची बाधा येते. तक्रारदारांची सदरची तक्रार चालणेस पात्र नाही. तक्रारदारांनी केवळ सुडबुध्‍दीने सामनेवाले यांना सामील केले आहे.  सामनेवाले यांना वैयक्तिक अगर संयुक्तिक जबाबदार धरता येणार नाही. सबब, विनंती की, तक्रारदाराची तक्रार खर्चासह फेटाळण्‍यात यावी. 

7          तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्रे, पुराव्‍याचे शपथपत्र तसेच सामनेवाले क्र.13 यांचे म्‍हणणे तसेच तक्रारदारांचे लेखी युक्‍तीवाद यांचा विचार होता, न्‍यायनिर्णसाठी पुढील मुद्दे उपस्थित होतात.

            

क्र.

मुद्दे

उत्‍तरे

1

सामनेवाले-पतसंस्‍थेने सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ?

होय.

2

तक्रारदार हे ठेव पावतीची रक्‍कम मिळण्‍यास पात्र आहेत का ?

होय.

3

तक्रारदार हे मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्‍कम मिळण्‍यास पात्र आहेत काय ?

होय.

4

आदेश काय ?

अंतिम निर्णयाप्रमाणे.

कारणमिमांसाः-

मुद्दा क्र.1 :     प्रस्‍तुत प्रकरणात तक्रारदार यांनी तक्रारीचे अनुषंगाने दाखल केलेली कागदपत्रे पाहता, तक्रारदार यांनी पतसंस्‍थेत कॉल डिपॉझिट ठेव स्‍वरुपात गुंतविलेली रक्‍कम ठेवलेली आहे ही बाब सिध्‍द होते. तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्‍याकडे कॉल डिपॉझिट ठेव स्‍वरुपात गुंतविलेली रक्‍कम परत करणे हे पतसंस्‍थेचे कर्तव्‍य होते. तक्रारदार यांनी ठेवींची रक्‍कम अद्याप मागणी करुनही सामनेवाले यांनी दिलेली नाही.  त्‍यामुळे तक्रारी अद्यापी सातत्‍याने कारण घडत आहे.  सबब, प्रस्‍तुतची तक्रार मुदतीत आहे.  परंतु मागणी करुनही रक्‍कम न देणे ही सामनेवाले यांची तक्रारदार यांना दयावयाच्‍या सेवेतील त्रुटी आहे असे या मंचाचे मत आहे,  म्‍हणुन मुद्दा क्र.1 चे उत्‍तर मंच होकारार्थी देत आहे.          

मुद्दा क्र.2 व 3:-    तक्रारदार यांनी दाखल केलेली ठेव रक्‍कमेवर व्‍याजासह होणारी रक्‍कम सामनेवाले क्र.1 ते 13  यांच्‍याकडून मिळावी अशी विनंती केली आहे.  या संदर्भात मा. मुंबई उच्‍च न्‍यायालय, खंडपीठ औरंगाबाद यांनी रिट याचिका क्र.5223/09 सौ.वर्षा रविंद्र ईसाई विरुध्‍द राजश्री राजकुमार चौधरी  या न्‍यायिक दृष्‍टांतामध्‍ये पुढीलप्रमाणे मत व्‍यक्‍त केले आहे.

“As has been recorded above, I am of the view that a society registered under the provision of Maharashtra Co-operative Societies Act 1960, although can be proceeded against and a complaint under the provision of Consumer Protection Act is entertain able against the society, the Directors of members of the managing committee cannot be held responsible in view of the scheme of Maharashtra Co-operative Societies Act. To hold the Directors of the banks/members of the managing committee of the societies responsible, without observing the procedure prescribed under the Act, would also be against the principles of co-operation, which is the very foundation of establishment of the co-operative societies”.

                    वरील न्‍यायिक दृष्‍टांतामध्‍ये संचालकांना ठेवीच्‍या रक्‍कमा देण्‍यासाठी वैयक्तिक व संयुक्तिकरित्‍या जबाबदार ठरविता येणार नाही असे तत्‍व विषद करण्‍यात आले आहे. त्‍यामुळे सामनेवाले क्र.2 ते 12  यांना वैयक्तिक व संयुक्तिकरित्‍या जबाबदार ठरविता येणार नाही. तक्रारदार हे सामनेवाले क्र.1 सामनेवाले पतसंस्‍था यांच्‍याकडून वर  कलम  2 मध्‍ये नमूद कॉल डिपॉझिट ठेव स्‍वरुपात ठरलेप्रमाणे नमूद व्‍याजासह रक्‍कम द्यावी व त्‍यानंतर द.सा.द.शे.6 % व्‍याजासह मिळोपावेतो परत देण्‍यास सामनेवाले क्र. 1 पतसंस्‍था हे जबाबदार आहेत असे या मंचाचे मत आहे. 

          तसेच, तक्रारदार यांना सामनेवाले यांनी ठरलेप्रमाणे कॉल डिपॉझिट ठेव खात्‍यातील रक्‍कम न दिल्‍याने सेवेत त्रुटी केली आहे, त्‍यामुळे तक्रारदारांना मानसिक त्रास झाला तसेच सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले. त्‍यामुळे सामनेवाले पतसंस्‍था यांच्‍याकडून मानसिक त्रासापोटी रु.3,000/- व अर्जाच्‍या खर्चापोटी रक्‍कम रु.1,000/- वसुल होऊन मिळण्‍यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.  सबब, मुद्दा क्र.2 व 3 चे उत्‍तर मंच होकारार्थी देत आहे.

 

मुद्दा क्र.4:- सबब, हे मंच पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.

 

                                                                                          आदेश

 

  1. तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करण्‍यात येतो.
  2. सामनेवाले क्र.1 बी.जी.देसाई यूथ डेव्‍हलपमेंट सहकारी पतसंस्‍था मर्या., गारगोटी, शाखा-शाहुपूरी यांनी तक्रारदारांना न्‍यायनिर्णयातील परिशिष्‍ट कलम-3 मधील नमुद केलेल्‍या कॉल डिपॉझिट ठेव पावतीवरील एकूण रक्‍कम रु.20,000/- (रु.वीस हजार फक्‍त)  व सदर रक्‍कमेवर ठरलेल्‍या व्‍याज दराने व्‍याज अदा करावे. तसेच सदर ठेवींच्‍या एकूण रक्‍कमेवर देय तारखेपासून सदरची रक्‍कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्‍केप्रमाणे व्‍याज अदा करावे. 
  3. सामनेवाले क्र.1 क्र.1 बी.जी.देसाई यूथ डेव्‍हलपमेंट सहकारी पतसंस्‍था मर्या., गारगोटी, शाखा-शाहुपूरी यांनी तक्रारदारास मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु.3,000/- (रु.तीन हजार फक्‍त) तसेच या तक्रार अर्जाचा खर्च रक्‍कम रु.1,000/- (रु.एक हजार फक्‍त) या आदेशाची प्रत मिळालेपासुन 30 दिवसांचे आत अदा करावेत.
  4.  आदेशाच्‍या प्रमाणित प्रतीं उभय पक्षकारांना विनामुल्‍य पाठविण्‍यात याव्‍यात.
 
 
[HON'BLE MR. Sharad D. Madke]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. Dinesh S. Gavali]
MEMBER
 
[HON'ABLE MRS. Rupali D. Ghatage]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.