निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 22/09/2011
तक्रार नोदणी दिनांकः- 23/09/2011
तक्रार निकाल दिनांकः- 13/04/2012
कालावधी 06 महिने. 21दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B.
सदस्या सदस्या
सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc.
मिर्झा कबीर बेग हबीब बेग. अर्जदार
वय 60 वर्ष.धंदा.- निवृत्त कर्मचारी. अड.एस.एन.वेलणकर.
रा.पिठाच्या गिरणी जवळ,युसूफ कॉलनी.
परभणी ता.जि.परभणी.
विरुध्द
1 अधिकृत प्रतिनिधी. गैरअर्जदार.
कॉम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रा.लि. स्वतः
युनीट एस.बी.आय.म्युच्युअल फंड.
जुना क्र.178 नवीन क्र.10 कदम्बकम रोड.
हॉटेल प्रामग्रोव्हच्या समोर.
नुनगम्बकम,चेन्नाई ( 600034)
2 इन्व्हेसमेंट मॅनेजर. स्वतः
एस.बी.आय.फंड्स मॅनेजमेंट प्रा.लि.
(एक सयुंक्त उपक्रम SBI आणि SGAM )
191,मेकर टॉवर्स – E, कफपरेड,मुंबई ( 400005)
3 अधिकृत प्रतिनिधी, अड.डि.एन.देशपांडे.
एस.बी.आय.म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर सर्व्हिस डेस्क,
औरंगाबाद,पहिला मजला,विरज कॉम्प्लेक्स,
बीगसिनेमा समोर,खडकेश्वर,औरंगाबाद.
4 शाखाधिकारी,भारतीय स्टेट बँक अड.ए.एस.कौसडीकर.
परभणी मुख्य शाखा,स्टेशन रोड,परभणी.
------------------------------------------------------------------------------------
कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष.
2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या.
-------------------------------------------------------------------------------------------------------
( निकालपत्र पारित व्दारा – सौ.सुजाता जोशी. सदस्या.)
अर्जदाराने गैरअर्जदाराकडे गुंतवलेली रक्कम कमी मिळाल्यामुळे झालेल्या त्रुटीच्या सेवेबद्दल अर्जदाराने ही तक्रार दाखल केलेली आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की,
अर्जदाराने त्याच्या निवृत्तीनंतर मिळालेली रक्कम गैरअर्जदारांच्या “ SBI Magnum balanced fund – Growth ” या योजनेत दिनांक 28/01/2010 रोजी रु.8,00,000/- गुंतवण्यासाठी गैरअर्जदार क्रमांक 4 कडे जमा केली व गैरअर्जदाराने Follo no. 1218977 अन्वये हे पैसे गुंतवल्याचे अर्जदारास कळवले अर्जदाराने दिनांक 31/01/2011 रोजी ही रक्कम उचलून घेण्याचे ठरवले व तसा गैरअर्जदार क्रमांक 4 कडे अर्ज दिला त्या दिवशी Redumption Value रु. 8,30,914/- होती,परंतु अर्जदारास अनपेक्षितरित्या समजले की, त्याची विनंती 02/02/2011 रोजी मान्य करण्यात आली व त्या दिवशीची किंमत
रु.7-86,626/- अर्जदारास मिळाले अर्जदाराने कमी मिळालेल्या रु.17,288/- ची मागणी करणारे पत्र दिनांक 10/02/2011 रोजी दिले असता अर्जदारास गैरअर्जदार क्रमांक 3 कडून असे उत्तर आले की, दिनांक 01/02/2011 रोजी दुपारी 3-15 वाजता अर्जदाराचा अर्ज गैरअर्जदारास मिळाला व व्यवहार दिनांक 02/02/2011 रोजी करण्यात आला व त्या दिवशीची किंमत मिळाली. अर्जदाराचे म्हणणे असे आहे की, गैरअर्जदार क्रमांक 4 ने गैरअर्जदार क्रमांक 3 ला फोन किंवा नेटवर कळवणे आवश्यक होते, किंवा अर्जदाराने स्वतः जावुन गैरअर्जदार क्रमांक 3 ला अर्ज दिला असता.अर्जदारास गैरअर्जदाराने रु.17,288/- कमी देवुन त्रुटीची सेवा दिलेली आहे.म्हणून अर्जदाराने ही तक्रार दाखल केलेली आहे व रु.17,288/- दिनांक 02/02/2011 पासून 10 टक्के व्याजाने द्यावेत.व त्रुटीच्या सेवेबद्दलन रु.3000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु. 2000/- मिळावेत अशी मागणी केलेली आहे.
अर्जदाराने तक्रारीसोबत त्याचे शपथपत्र, म्युच्युअल फंडाची स्टेटमेंट ऑफ अकाउंट, गैरअर्जदारांशी केलेला पत्रव्यवहार, वकीला मार्फत पाठवलेली नोटीस, त्याला आलेला उत्तर इ.कागदपत्र दाखल केलेले आहेत.
गैरअर्जदार क्रमांक 1 ने त्याच्या लेखी जबाबात गुंतवणुकदाराने त्याची रक्कम काढण्यासाठी ऑथोराइज्ड कलेक्शन सेंटरलाच अर्ज करावयास पाहिजे,त्यानंतर अर्जदाराच्या सहीची पडताळणी झाल्यानंतरच अर्जदाराला रक्कम मिळू शकते अर्जदाराने म्युच्युअलफंडाच्या स्कीमची माहिती काळजीपूर्वक वाचावी अशी अपेक्षा असते तसेच पैसे काढतानाही अर्जदाराने “ की इन्फर्मेशन मेमोरंडम ” वाचावयास हवे होते.गैरअर्जदार क्रमांक 1 ने अर्जदारास कोणतीही त्रुटीचीसेवा दिलेली नाही.असे त्यांचे म्हणणे आहे.
गैरअर्जदार क्रमांक 3 ने त्याच्या लेखी जबाबात अर्जदाराने रु.8,00,000/- त्यांच्याकडे SBI Magnum Balance of Fund – Growth option मध्ये भरल्याचे मान्य केले आहे व त्यातील अर्जदाराने दरमहा रु.8000/- काढायचा प्लॅन ( Systematic / Withdrawl Plan) घेतला होता व त्याप्रमाणे अर्जदाराने 7 वेळा रु.8000/- काढले.SBI Mutual fund ची की इन्फॉर्मेशन मेमोरंडम मध्ये अर्जदाराने अधिकृत कलेक्शन सेंटर्सकडेच अर्ज द्यावयास हवा.स्टेट बँक ऑफ इंडिया परभणी शाखा ही SBI Mutual Fund डीस्ट्रीब्युटर आहे पण अधिकृत कलेक्शन सेंटर नाही.त्यामुळे परभणी शाखेने अर्ज घेवुन तो औरंगाबाद कलेक्शन सेंटरला पाठवला.तो त्यांना दुपारी 3 नंतर मिळाला म्हणून दिनांक 02/02/2011 ला असलेली Nav ची रक्कम अर्जदाराला मिळाली. रीडम्पशन रीक्वेस्ट ही फॅक्स अथवा e-mail ने पाठवता येत नाही.कारण त्यातील सत्यता पडताळून पहावयाची असते अर्जदारास गैरअर्जदाराने रु. 8,00,000/- च्या गुंतवणूकीवर रु.8,42,626.34 दिलेले आहेत.अर्जदारास गैरअर्जदाराने कोणतीही त्रुटीची सेवा दिलेली नाही म्हणून सदरील तक्रार फेटाळण्याची विनंती गैरअर्जदार क्रमांक 3 ने केलेली आहे.
गैरअर्जदार क्रमांक 4 ने त्याच्या लेखी जबाबात गैरअर्जदार क्रमांक 4 हे S B I Mutual fund चे फक्त वितरक आहेत. व ते त्यांच्याकडे आलेले सर्व अर्ज गैरअर्जदार क्रमांक 3 यांच्याकडे पाठवतात. गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी अर्जदाराचा अर्ज दिनांक 31/03/2011 रोजीच गैरअर्जदार क्रमांक 3 कडे पाठवला त्यामुळे गैरअर्जदार क्रमांक 4 ने अर्जदारास कोणतीही त्रुटीची सेवा दिलेली नाही व सदरील तक्रार खर्चासहीत खारीज करण्याची विनंती केलेली आहे.
गैरअर्जदार क्रमांक 4 ने लेखी जबाबासोबत त्याचे शपथपत्र दाखल केलेले आहे.
गैरअर्जदार क्रमांक 2 ने मंचातर्फे पाठवलेली नोटीस स्वीकारुन ही नेमल्या तारखेस मंचात हजर न राहील्यामुळे त्यांच्या विरुध्द तक्रार एकतर्फा चालवण्याचा आदेश पारीत करण्यात आला.
तक्रारीत दाखल कागदपत्र व वकिलांच्या युक्तीवादावरुन तक्रारीत निर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे. उत्तर
1 अर्जदारास गैरअर्जदाराने त्रुटीची सेवा दिलेली
आहे का ? नाही.
2 अर्जदार कोणता अनुतोष मिळणेस पात्र आहे.? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
अर्जदाराने गैरअर्जदाराकडे म्युच्युअल फंड रु.8,00,000/- गुंतवले होते ही बाब सर्वमान्य आहे.अर्जदाराने दिनांक 31/01/2001 रोजी गैरअर्जदारांकडे रीडम्पशनचा अर्ज दिल्याचे नि.4/1 वरुन सिध्द होते, परंतु S B I Mutual Fund चे खाते उतारा पहाता
S B I परभणी हे म्युच्युअल फंडाचे ब्रोकर आहेत. पण सदरील अर्ज जमा करण्यासाठी
“ Investor Service Center ” किंवा Desk हे परभणी नसुन औरंगाबाद आहे. हे खाते उता-याच्या मागील पानावर छापलेले आहे.त्यामुळे जरी S B I परभणीने अर्ज घेतला तरी तो औरंगाबाद येथील Investor Service Desk लाच पाठवायला लागणार, त्यामुळे अर्जदार क्रमांक 4 ने अर्जदाराचा रीडम्पशनचा अर्ज औरंगाबाला पाठवुन अर्जदारास कोणतीही त्रुटीची सेवा दिलेली नाही. तसेच गैरअर्जदार क्रमांक 3 ने त्यांना अर्ज मिळाल्यानंतर त्यांनी दिनांक 02/02/2011 ची NAV अर्जदारास देवून कोणतीही त्रुटीची सेवा दिलेली नाही. असे आमचे मत आहे त्यामुळे खालील प्रमाणे आदेश करण्यात येत आहे.
आ दे श
1 अर्जदाराची तक्रार फेटाळण्यात येत आहे.
2 तक्रारीचा खर्च अर्जदार व गैरअर्जदाराने आपापला सोसावा.
4 पक्षकारांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात.
सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे
सदस्या सदस्या अध्यक्ष.