Maharashtra

Gadchiroli

CC/10/33

Shri. Saifhuddin Gulamhusen Jiwani - Complainant(s)

Versus

Authorised Irose Hundai, Nagpur and 1 other - Opp.Party(s)

Adv. Sachin U. Kumbhare

29 Apr 2011

ORDER

 
Complaint Case No. CC/10/33
 
1. Shri. Saifhuddin Gulamhusen Jiwani
At. Armori, Tah. Armori
Gadchiroli
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. Authorised Irose Hundai, Nagpur and 1 other
Gayatri sadan, Ghat Road, Nagpur, Tah. Nagpur
Nagpur
Maharastra
2. Divisional Manager, Oriental Insurance Company, Nagpur
Oriental Insurance Company, Divisional Office-2, Hindustan Colony, Ajni Chouk, Wardha Road, Nagpur, Tah. Nagpur
Nagpur
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONORABLE Shri. A. N. Kamble PRESIDENT
 HONORABLE Shri. R. L. Bombidwar Member
 HONORABLE Smt. M. J. Bhilkar Member
 
PRESENT:
 
ORDER

(मंचाचे निर्णयान्‍वये, श्री अनिल एन.कांबळे, अध्‍यक्ष(प्रभारी))

     (पारीत दिनांक : 29 एप्रिल 2011)

                                      

            अर्जदाराने सदर तक्रार, वाहनाची पूर्ण नुकसान भरपाई मिळण्‍याकरीता दाखल केली आहे.  अर्जदाराच्‍या तक्रारीची हकीकत थोडक्‍यात येणे प्रमाणे.

 

 

                           ... 2 ...                    (ग्रा.त.क्र.33/2010)

 

 

1.           अर्जदार हा आरमोरी येथील रहिवासी असून गै.अ.क्र.1 कडून होन्‍डाई वरना चार चाकी वाहन किंमत रुपये 8,46,462/- मध्‍ये खरेदी केले.  वाहनाकरीता सुंदरम फायनान्‍स लि.कडून आर्थीक मदत घेतली.  गै.अ.क्र.1 कडून वाहन विकत घेतले तेंव्‍हा वाहनाचा विमा गै.अ.क्र.2 कडून काढला.  गै.अ.क्र.2 कडून काढलेल्‍या वाहनाचा विमा 28.5.10 पासून 27.5.11 चे मध्‍यराञी पर्यंत वैध आहे.  अर्जदाराने विम्‍यापोटी 21,056/- रुपये प्रिमियमचा भरणा केला. 

 

2.          अर्जदाराचा भाऊ अमीन गुलाहुसेन जीवानी वाहनाने दि.29.6.10 ला बाहेरगांवी जात असतांना, आरमोरी ते ब्रम्‍हपूरी रोडवरील अरसोडा गांवाजवळ अचानक बैलांचा कळप रोडवर आल्‍याने, त्‍यांना वाचविण्‍याकरीता ब्रेक केले असता वाहन झाडाला जावून आदळले व पलटी घेतली, वाहनाची नुकसान झाले, पोलीसांनी पंचनामा तयार केला.  अपघात ग्रस्‍त वाहन गै.अ.क्र.1 कडे दाखल केले.  वाहनातील तपासणीकरुन ईस्‍टीमेंट दिला गै.अ.क्र.1 ने रुपये 8,68,619/- चा खर्च इस्‍टीमेटनुसार सांगीतला. गै.अ.क्र.2 कडून काढलेल्‍या विमा कालावधीत वाहनाचा अपघात झाल्‍यामुळे नुकसान भरपाई देण्‍यास सांगीतले.  विमा नियमानुसार 70 % गाडीच्‍या किंमतीपेक्षा खर्च असेल तर टोटल लॉस मध्‍ये मोडतो.  गाडी संपूर्णपणे क्षतीग्रस्‍त झाल्‍याने नवीन गाडी द्यावी अथवा गाडीची किंमत रुपये 8,46,462/- इतकी द्यावे. परंतु, गै.अ.क्र.2 यांनी गाडीची किंमत किंवा दुसरी गाडी देण्‍यास नकार दिला.  गै.अ.क्र.1 ने गाडी दुरुस्‍त होत नाही असे स्‍पष्‍ट सांगीतले, तर गै.अ.क्र.2 गाडी दुरुस्‍त करण्‍यास सांगतो.  अर्जदाराला व्‍यापार सोडून नागपूरला जावे लागते.  विनाकारण खर्च सोसावा लागत आहे व मानसिक ञास होत आहे.  गै.अ.क्र.2 यांनी नवीन गाडी देण्‍यास नकार दिल्‍यामुळे तक्रार दाखल करुन हुंडाई वरना या गाडीची संपूर्ण रक्‍कम द्यावी किंवा नवीन गाडी द्यावी आणि शारीरीक, मानसिक ञासापोटी रुपये 2000/- गै.अ.कडून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे. 

 

3.          अर्जदाराने तक्रारीसोबत नि.4 नुसार एकूण 10 झेरॉक्‍स दस्‍ताऐवज दाखल केले.  तक्रार नोंदणी करुन गैरअर्जदारांना नोटीस काढण्‍यात आले. गै.अ.क्र.1 ला नि.8 नुसार नोटीस तामील होऊनही हजर झाला नाही. त्‍यामुळे नि.1 वर एकतर्फा आदेश पारीत करण्‍यात आला.  गै.अ.क्र.2 ने नि.12 नुसार लेखी उत्‍तर दाखल करुन तक्रार खोटी, बेकायदेशीर दाखल केली आहे, सत्‍य परिस्थिती मंचापासून लपवून खोट्या आशयाचे आधारावर दाखल केली आहे. म्‍हणून गै.अ.क्र.2 चे खर्चासहीत खारीज करण्‍यात यावी.

 

4.          गै.अ.क्र.2 ने लेखी बयानातील विशेष कथनात परिच्‍छेद वाईज उत्‍तराचा हक्‍क राखून कथन केले आहे की, गै.अ.क्र.2 ला वाहनाच्‍या अपघाताची सुचना मिळताच विनीत महाजन यांना मौका निरिक्षण करण्‍याबाबत सर्व्‍हेअर नियुक्‍त केले. सर्व्‍हेअर महाजन यांनी अर्जदारा समक्ष मौका चौकशी करुन दि.23.7.10 रोजी अहवाल सादर केला.

   ... 3 ...                    (ग्रा.त.क्र.33/2010)

 

 

गै.अ.क्र.1 च्‍या वर्कशॉप नागपूर येथे सर्व्‍हेअर अमरजीतसिंग दुगल यांनी वाहनाचा सर्व्‍हे केला. सदर अपघात ग्रस्‍त वाहन दुरुस्‍त करण्‍यासाठी उपयुक्‍त असून रिपेअरच्‍या आधारावर निकाली काढा असे कळविले.  सर्व्‍हेअरने अर्जदारास गाडी दुरस्‍त होऊ शकतो याबाबत समज दिली, परंतू अर्जदार यांनी मला गाडी बदलवूनच पाहिजे, नाहीतर गाडीची पूर्ण किंमत पाहिजे याबाबत हट्ट धरला.   सर्व्‍हेअर श्री दुगल यांनी वाहनाचा योग्‍य सर्व्‍हे करुन रिपोर्ट सादर केला, त्‍यानुसार गाडी नुकसानीची आकारणी रुपये 2,51,250/- प्रमाणे काढली आहे.  त्‍याप्रमाणे, शिफारस केली आहे.  गै.अ.क्र.2 यांनी सर्व्‍हेअरच्‍या अभिप्राया प्रमाणे क्‍लेम कबूल करावा असे अर्जदारास सांगीतले.  विमा कराराप्रमाणे त्‍याच्‍या बाहेर क्‍लेम काढता येत नाही असे अर्जदारास सांगीतले.  परंतू, अर्जदार मान्‍य करण्‍यास तयार नव्‍हता, उलट कोर्टाची धमकी देत होता. 

 

5.          गै.अ.क्र.2 यांनी विमा कराराप्रमाणे आपली कायदेशीर कारवाई पूर्ण केली आहे.  अर्जदाराने, संयुक्‍तीक व कायदेशीर कारणा अभावी तक्रार दाखल केली. गै.अ.क्र.2 यांनी सेवेत न्‍युनता केल्‍याचा पुरावा नाही. क्‍लेम नाकारल्‍याचा पुरावा नाही.  अर्जदाराने, खोटी तक्रार दाखल करुन गै.अ.क्र.2 वर बेकायदेशीर अडचण आणण्‍याचा प्रयत्‍न केला आहे, तो न्‍यायोचीत नाही. एकंदरीत, समाविष्‍ठ वाद हा मंचाच्‍या न्‍यायकक्षेबाहेर असल्‍याने न्‍यायदानास पाञ नाही, म्‍हणून तक्रार खर्चासह खारीज करण्‍यात यावी.

 

6.          अर्जदाराने तक्रारीचे कथना पृष्‍ठयर्थ नि.15 नुसार शपथपञ दाखल केले. तसेच, गै.अ.क्र.2 ने नि.16 नुसार शपथपञ दाखल केले.  गै.अ.क्र.2 ने लेखी बयानासोबत विमा पॉलिसी व सर्व्‍हेरिपोर्टची झेरॉक्‍स प्रत दाखल केली. तसेच नि.18 च्‍या यादी नुसार 4 झेरॉक्‍स दस्‍ताऐवज दाखल केले. 

 

7.          अर्जदाराने दाखल केलेले दस्‍ताऐवज व वकीलांनी केलेल्‍या युक्‍तीवाद आणि गै.अ.क्र.2 यांनी दाखल केलेला लेखी बयान, दस्‍ताऐवज व नि.19 नुसार सादर केलेल्‍या लेखी युक्‍तीवादावरुन खालील कारणे व निष्‍कर्ष निघतात.

 

//  कारणे व निष्‍कर्ष //

 

8.          अर्जदाराने गै.अ.क्र.2 कडून होन्‍डाई वरना वाहनाचा विमा दि.28.5.10 ते 27.5.2011 या कालावधी करीता काढला.  वाहनाचा दि.29.6.10 रोजी अरसोडा गांवाजवळ अपघात होऊन वाहन क्षतीग्रस्‍त झाले याबद्दल वाद नाही. अर्जदाराचे म्‍हणणे नुसार अपघात ग्रस्‍त वाहनाची नुकसान भरपाई टोटल लॉस बेसीसच्‍या आधारावर गै.अ.क्र.2 नी क्‍लेम द्यावा, तर गै.अ.क्र.2 याचे म्‍हणणे नुसार वाहनाची नुकसान भरपाई रिपेअर लॉसच्‍या आधारावर क्‍लेम निकाली काढण्‍याचे मान्‍य केले आहे. 

    ... 4 ...                         (ग्रा.त.क्र.33/2010)

 

 

9.          अर्जदाराने, तक्रारीत गै.अ.क्र.1 यांनी दिलेल्‍या इस्‍टीमेटच्‍या आधारावर गाडी दुरुस्‍तीचा खर्च गाडी किंमतीच्‍या 70 % पेक्षा जास्‍त असल्‍यामुळे तोटल लॉस बेसीसच्‍या आधारावर नुकसान भरपाई मागणी केली आहे.  परंतू, याबाबत अर्जदाराने कोणताही तज्ञाचा पुरावा सादर केलेला नाही.  इस्‍टीमेटच्‍या आधारावर तोटल लॉस बेसीस म्‍हणून क्‍लेम मंजूर करणे संयुक्‍तीक होणार नाही, तर गै.अ.यांनी अपघातानंतर सर्व्‍हेअर विनीत महाजन यांचे सर्व्‍हेरिपोट आणि दुगल यांनी केलेल्‍या सर्व्‍हेच्‍या रिपोर्ट नुसार क्‍लेम मंजूर करण्‍यास तयार असून अर्जदारास दुरुस्‍ती तत्‍वावर क्‍लेम उचलून घ्‍यावे अशी लेखी विनंती केली तरी अर्जदार यांनी नवीन गाडी द्यावी किंवा नवीन गाडीची किंमत रुपये 8,46,462/- रुपयेच हवे म्‍हणून क्‍लेम गै.अ.कडून उचलला नाही.  वास्‍तवीक, अर्जदाराने अ-8 वर घटनास्‍थळ पंचनामा दाखल केला, त्‍याचे अवलोकन केले असता, वाहनाने झाडाला धडक दिली असल्‍यामुळे समोरच्‍या बाजूने चपकलेला असल्‍याचे नमूद केले आहे.  अर्जदाराचा भाऊ वाहन चालवीत होता व त्‍यानेच वाहनाचे घटनास्‍थळ पंचनाम्‍याचे वेळी माहिती सांगीतली त्‍यात त्‍याला काहीही जखम झालेली नाही किंवा अर्जदाराने त्‍याबाबतचा पुरावा सुध्‍दा दाखल केलेला नाही.  चालकाला कोणतीही ईजा न होता वाहन पूर्णपणे क्षतीग्रस्‍त झाले ही बाब संयुक्‍तीक वाटत नाही. 

 

10.         गै.अ.ने लेखी उत्‍तरात रुपये 2,51,250/- दुरुस्‍ती तत्‍वानुसार सर्व्‍हेअर यांनी मान्‍य केले आहे.  गै.अ.यांनी नि.18 चे यादी नुसार दाखल केलेल्‍या अमरजीतसिंग दुगल यांचे सर्व्‍हेरिपोर्ट नुसार रुपये 4,13,169.56 ऐवढा दुरुस्‍तीचा खर्च मान्‍य केला आहे, त्‍यात सालवेज अंदाजे रुपये 25,000/- काढलेला आहे.  गै.अ.ने विनीत महाजन यांचाही सर्व्‍हे रिपोर्ट सादर केला.  त्‍यात, घटनास्‍थळावर आढळून आलेले नुकसानाच्‍या आधारावर तयार केलेला आहे.  एकंदरीत, अमरजीतसिंग दुगल यांच्‍या सर्व्‍हे रिपोर्टनुसार हुन्‍डाई वरना दुरुस्‍तीचा खर्च रुपये 4,13,169.56 पुर्णांकांत रुपये 4,13,170/- गै.अ.क्र.2 च्‍या अधिकृत सर्व्‍हेअर यांनी मान्‍य केलेला आहे.  अर्जदाराने पूर्ण वाहनाची किंमत किंवा नवीन वाहनाची मागणी केलली आहे.  वाहन पूर्ण क्षतीग्रस्‍त झाले याबाबत कोणताही ठोस पुरावा सादर केलेला नाही.  वाहनाची किंमत अ-1 नुसार रुपये 8,46,462/- ऐवढी असून त्‍या वाहनास झालेल्‍या अपघातानंतर दुरुस्‍तीचा खर्च गै.अ.क्र.1 यांनी मुळ किंमती पेक्षा जास्‍त रुपये 8,68,619/- ऐवढा सांगीतलेला आहे.  अर्जदार यांनी ठोस असा सर्व्‍हेअरचा रिपोर्ट बेकायदेशीर ठरविण्‍याबाबतचा पुरावा दाखल केलेला नाही.  त्‍यामुळे, गै.अ.यांनी दाखल केलेला अमरजितसिंग दुगल यांचा सर्व्‍हे रिपोर्टला अयोग्‍य आहे असे म्‍हणता येणार नाही.  सदर सर्व्‍हे रिपोर्ट हा तज्ञाचा अहवाल असून पुरावा कायद्यानुसार तज्ञ अहवाल म्‍हणून ग्राह्य धरण्‍यास पाञ आहे. सदर सर्व्‍हे रिपोर्ट हा विसंगत, खोटा, चुकीचा आहे असा कोणताही पुरावा रेकॉर्डवर नाही.  यावरुन, सर्व्‍हे रिपोर्टच ठोस तज्ञाचा अहवाल म्‍हणून पुरावा ग्राह्य धरण्‍यास पाञ आहे. अर्जदाराचे वकीलानी मा.सर्वोच्‍च न्‍यायालयाने सिव्‍हील अपील

 

    ... 5 ...                         (ग्रा.त.क्र.33/2010)

 

क्र.3253/02, न्‍यु इंडिया अॅश्‍युरन्‍स कं. लि. -वि.- प्रदीप कुमार दि.9.4.09 ला पारीत केलेल्‍या आदेशाचा हवाला दिला.  सदर प्रकरणात वाहन 300 फुट खोल दरीत पडला आहे.  तसेच, बिल पावत्‍या जोडलेल्‍या सदर प्रकरणातील बाब (fact) या प्रकरणातील बाबीशी (fact) भिन्‍न आहे.  त्‍यामुळे, त्‍यात दिलेले मत या प्रकरणाला लागू पडत नाही.  प्रस्‍तूत, प्रकरणात अर्जदाराने पावत्‍या दुरुस्‍तीचा बिल इत्‍यादी काहीच रेकॉर्डवर सादर केलेले नाहीत आणि फक्‍त इस्‍टीमेटच्‍या आधारावर नवीन वाहन किंवा वाहनाची किंमत मागणी केले आहे, सदर मागणी उचीत नाही.  या उलट, गै.अ. यांचे वकीलानी सादर केलेल न्‍यायनिवाडे लागू पडतात.   

11.          गै.अ.चे वकीलानी लेखी युक्‍तीवादासोबत वरिष्‍ठ न्‍यायालयाचे न्‍यायनिवाडे सादर केले, मा.राष्‍ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग, नवी दिल्‍ली यांनी दिलेले न्‍यायनिवाडे तंतोतंत लागू पडतो, त्‍यातील महत्‍वाचा भाग खालील प्रमाणे.

 

(1)                    Insurance Claim – Granting of – Legality – Held – If the Insurance claim is granted on the basis of surveyor report requires no interference.

 

                  The New India Assurance Co.Ltd.-Vs.- M/s Sukhdham India Pvt. Ltd.

                                                2011 NCJ 193 (NC)

 

(2)                    Insurance Claim – Vehicle damaged in accident – Determination – Held – In a claim case of vehicle damaged in accident, the report of surveyor has considerable evidentiary value and can not be ignored unless discredited by producing contrary evidence – Settlement of claim on repair basis directed as per surveyor’s report.

 

                        New India Assurance Com pany Ltd.-Vs.- Subash Kumar

                                                2010 NCJ 525 (NC)

 

12.         गै.अ.चे शपथपञ नि.16 मध्‍ये कथन केले आहे की, दुरुस्‍ती खर्चाचे आधारावर रुपये 3,88,169.56 सालवेज वजा जाता क्‍लेम घेवून जावे असे पञ दिले.  दुगल यांनी दिलेल्‍या पञाची प्रत गै.अ.क्र. 2 ने दाखल केले आहे, त्‍यात कुठेही रकमेचा उल्‍लेख केला नाही.  गै.अ.यांनी मोघमपणे दुरुस्‍ती खर्चा आधारावर क्‍लेम स्विकारावे असे कथन केले.  परंतू कुठल्‍याही सर्व्‍हेअरने ऐवढा क्‍लेम मंजूर केला असा कुठेही उल्लेख आला नाही व अर्जदारासही याबाबत कळविले नाही आणि आता मंचासमक्ष केस आल्‍यानंतर सर्व्‍हे रिपोर्ट सादर केला आहे, ही गै.अ.ची न्‍युनतापूर्ण सेवा आहे, या निष्‍कर्षाप्रत हे न्‍यायमंच आले आहे. 

13.         गै.अ.यांनी सर्व्‍हेअर श्री दुगल यांचा रिपोर्ट सादर केला, त्‍यात अंदाजे रुपये 25,000/- सालवेज काढलेला आहे. परंतू, तो अंदाजे खर्च काढलेला असल्‍यामुळे सालवेज गै.अ.यांनीच आपलेकडे घेवून अर्जदारास रुपये 4,13,170/- तक्रार दाखल दिनांकापासून व्‍याजासह देण्‍यास पाञ आहे, या निष्‍कर्षाप्रत हे न्‍यायमंच आलेले आहे.

 

   ... 6 ...                    (ग्रा.त.क्र.33/2010)

 

14.         अर्जदाराने तक्रारीत नागपूरला जाण्‍या-येण्‍याचा खर्च आणि मानसिक ञासापोटी नुकसान भरपाईची मागणी केली आहे.  अर्जदारास नागपूरला गै.अ.क्र.1 कडे वाहन दुरुस्‍तीकरीता जाणे भाग पडले. त्‍यामुळे, गै.अ. अर्जदारास मानसिक, शारीरीक ञासापोटी काही रक्‍कम देण्‍यास जबाबदार आहे, या निष्‍कर्षाप्रत हे न्‍यायमंच आलेले आहे.

 

15.         अर्जदाराने, गै.अ.क्र.1 ला आवश्‍यक पक्ष म्‍हणून तक्रारीत जोडल्‍याचे दाखल दस्‍ताऐवजावरुन दिसून येते.  गै.अ.क्र.1 हा होन्‍डाई मोटर्सचा अधिकृत सर्व्‍हीस स्‍टेशन असून त्‍यानी इस्‍टीमेट दिला आहे.  अर्जदार याने तक्रारीत, गै.अ.क्र.1 ने कोणती सेवा देण्‍यात न्‍युनता केली याचा कुठलाही उल्‍लेख केलेला नाही आणि मागणी मध्‍येही गै.अ.क्र.1 च्‍या विरुध्‍द अशी कुठलीही मागणी दिसून येत नाही. त्‍यामुळे, गै.अ.क्र.1 चे विरुध्‍द तक्रार खारीज होण्‍यास पाञ आहे, या निष्‍कर्षाप्रत हे न्‍यायमंच आले आहे.

16.       वरील कारणे व निष्‍कर्षावरुन अर्जदाराची तक्रार मंजूर करण्‍यास पाञ आहे, या निष्‍कर्षाप्रत हे न्‍यायमंच आले असल्‍याने खालील प्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

 

                  //  अंतिम आंदेश  //

(1)   अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर.

(2)   गैरअर्जदार क्र.2 ने, अर्जदाराचा हुन्‍हाई वरना वाहनाची अपघाती दुरुसतीचा खर्च रुपये 4,13,170/- तक्रार दाखल दिनांक 27.9.2010 पासून 9 % व्‍याजाने आदेशाच्‍या दिनांकापासून 30 दिवसांचे आंत द्यावे.

(3)   गैरअर्जदार क्र.2 ने, अर्जदारास मानसिक, शारीरीक ञासापोटी रुपये 2000/- व तक्रारीच्‍या खर्चापोटी रुपये 500/- आदेशाच्‍या तारखेपासून 30 दिवसाचे आंत द्यावे.

      (4)   गैरअर्जदार क्र.1 चे विरुध्‍द तक्रार खारीज.

      (5)   उभय पक्षांना आदेशाची प्रत देण्‍यात यावी.

 

गडचिरोली.

दिनांक :- 29/4/2011.

 
 
[HONORABLE Shri. A. N. Kamble]
PRESIDENT
 
[HONORABLE Shri. R. L. Bombidwar]
Member
 
[HONORABLE Smt. M. J. Bhilkar]
Member

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.